Tuesday, February 16, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत श्री. सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन.




मुंबई  :- परिवर्तनवादी आणि समाजाला सुधारणेच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणाऱ्या क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र केले.
मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, संत सेवालाल महाराज यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरांना विरोध केला. निसर्ग आणि माणूस यांचे सहजीवन उलगडून दाखविले. निसर्गाचा आदर करण्याची विज्ञानवादी शिकवण दिली. लोकगीते, भजन यातून संत सेवालाल यांनी समाजाचे शिक्षण करण्याचा प्रयत्न केला. शिका आणि शिकवा असा त्यांचा आग्रह होता. परिवर्तनवादी आणि समाजाला सुधारणेच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी अखंड आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
000

No comments:

Post a Comment