बीड - ( प्रतिनीधी) बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेसुमार वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने तांदळवाडी येथील सिंदफना नदीपात्रात छापा घालून सहा वाहनांसह तब्बल 35 लाख रुपयांचा माल जप्त केला .ज्या बीड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ही कारवाई झाली त्यांना मात्र याबाबत कसलीच माहिती नव्हती याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे .या कारवाईमुळे बीड ग्रामीण पोलीस किती कर्तव्यदक्ष पणे काम करतात यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आर रामस्वामी यांनी वाळू माफियांचे कंबरडे मोडण्याचा धडाका लावला आहे .गेवराई तालुक्यातील अनेक ठिकाणी छापे घालून लाखो रुपयांची वाळू जप्त केल्यानंतर एसपी च्या पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे आणि त्यांच्या टीमने बीड ग्रामीण हद्दीत कारवाई केली .
ही कारवाई एसपी च्या पथकाला करावी लागली यातच बीड ग्रामीण पोलीस किती अन कसा कारभार करतात हे उघड झाले आहे .वाळू माफियांकडून महिन्याला हप्ते बांधून हा गैरकारभार सर्रास सुरू ठेवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment