Monday, February 15, 2021

परळी- पिंपळा रस्त्यावर शिवशाही उलटली ; अनेक प्रवासी जखमी .


परळी वैजनाथ : (प्रतिनीधी) परळी- पिंपळा धायगुडा या रस्त्यावर सोमवारी, दि.१५ रोजी सकाळी १०:३० वाजता नांदेड- पुणे शिवशाही बस खराब रस्त्यामुळे उलटली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहे.

नांदेड- पुणे (एम.एच.०६ बी.डब्ल्यू ४३८१) ही शिवशाही बस परळीहून अंबाजोगाईकडे जात होती. या रस्त्यावर पिंपळा धायगुडा टीव्ही सेंटरच्या जवळ शिवशाही बस खराब रस्त्यामुळे उलटली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहे. परळी -पिंपळा धायगुडा या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात होत आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मगाणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे. 

No comments:

Post a Comment