Saturday, February 13, 2021

लोकसेवक राहुल कोळी, परि.पोउपनि यांनी तक्रारदार यांचेकडे रु 30,000/- लाच स्विकारताना रंगेहात पकडले.



 आदरणीय सर

*यशस्वी सापळा*

▶️ युनिट -नवी मुंबई 

▶️ *तक्रारदार*-पुरुष,वय-32 वर्षे  रा. सानपाडा, नवी मुंबई 

▶️ *आरोपी-* श्री.राहूल शत्रुघ्न कोळी, वय- 29 वर्षे, पद- परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, सत्र क्र. 117, (वर्ग -2), नेमणूक सानपाडा पोलीस ठाणे, नवी मुंबई रा. ए/806, लामेर सोसायटी, साईनगर, पनवेल, नवी मुंबई.      

▶️ *लाचेची मागणी*-30,000/-रू 

▶️ *लाच स्विकारली-*  30,000/रु.

▶️ *हस्तगत रक्कम-* 30,000/-रु.

▶️ *लाचेची मागणी -* 

ता.12/02/2021

▶️ *लाच स्विकारली -* ता. 1३/02/2021

▶️  *लाचेचे कारण -*.  

यांतील तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांचे मालकीचा दुकानगाळा श्री चुन्नीलाल खाटनावलिया  यांना भाडेतत्वावर दिला होता. परंतु श्री चुन्नीलाल यांनी काही महिन्यानंतर दुकान गाळ्याचे भाडे न दिल्यामुळे तक्रारदार यांनी श्री चुन्नीलाल यांना दुकान गाळा खाली करण्यास सांगितले होते. त्यानंतर कोविड संक्रमणाच्या काळात ते दुकानगाळा मालक यांना काहीएक न सांगता गावी निघून गेले. त्यानंतर तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये सदर दुकानगाळ्यास श्री चुन्नीलाल यांचे लॉक असतानाही स्वतःचे लॉक लावले होते. त्यामुळे श्री चुन्नीलाल व तक्रारदार यांच्यात वाद होऊन श्री चुन्नीलाल यांनी तक्रारदार यांचे वडिलांविरुद्ध सानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज केला होता. सदरचे प्रकरण मिटविन्यासाठी लोकसेवक राहुल कोळी, परि.पोउपनि यांनी तक्रारदार यांचेकडे रु 30,000/- लाचेची मागणी करून मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आलेले आहे.                  

▶️ *पर्यवेक्षण अधिकारी*

पोउपअधी ज्योती देशमुख

▶️ *सापळा पथक-* 

पोनि शिवराज बेंद्रे, पोहवा नितीन पवार, पोना संतोष ताम्हाणेकर, पोशि मंगेश चव्हाण,पोशि अमोल चौगले, 

▶️ *मदत पथक-*

पोनि नितीन खैरनार, पोहवा प्रदिप जाधव,पोशि सचिन माने, चापोहवा रतन गायकवाड

▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*                                                                मा. पोलीस महासंचालक , म . रा मुंबई. 

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई 

दूरध्वनी क्र 022-27833344

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

No comments:

Post a Comment