बीड – राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ आज गहिनीनाथ गडावर एकत्र एकाच व्यासपीठावर सोबत दिसले .यावेळी पंकजा मुंडे यांनी यापुढे विकास करण्याची जबाबदारी विद्यमान सत्ताधारी मंडळींवर आहे असं म्हटलं तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गडाच्या विकासाला पैसा कमी पडू देणार नाही अस आश्वासन दिलं .हे दोघे बहीण भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलं .
संतश्रेष्ठ गहिनीनाथ महाराज यांच्या गडावर आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे,यांची उपस्थिती होती .
अनेक दिवसानंतर पंकजा आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर दिसल्याने कार्यकर्ते उत्साहात होते .यावेळी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी गडाच्या विकासासाठी आम्ही निधी दिला,आता विद्यमान सत्ताधारी यांच्यावर विकास करण्याची जबाबदारी आहे,त्यांनी तो करावा यासाठी मी शुभेच्छा देते असे म्हणत आपले भाषण पूर्ण केले .
त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा धागा पकडत गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी मागच्या सरकारने 25 कोटी घोषितकेले पण केवळ 2 कोटी दिले आम्ही मागचे सगळे अन नव्याने 5 कोटी रुपये देऊ असे आश्वासन दिले .
No comments:
Post a Comment