Saturday, April 30, 2022

स्वतंत्र मराठवाडा या वृत्तपत्राच्या संपादकाची चाकुने आठ वार करुन रस्यावर हत्या.


नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील मील रोडवर असलेल्या टीव्हीएस शो रुम जवळ स्वतंत्र मराठवाडाया वर्तमानपत्राच्या संपादकाची रस्त्यावर हत्या केल्याची घटना घडली आहे.


सोमेश काँलनी भागात राहाणारे संपादक प्रेमानंद भगवानराव जोंधळे (35) हे रात्री आपल्या घरातून बाहेर आले व मील रोडवर चालत असतांना त्यांच्या घरासमोर राहणारा कृष्णा हातांगळे हा त्यांच्या समोर आला आणि त्याने आपल्याकडील चाकूने प्रेमानंद जोंधळेच्या पोटात आणि छातीवर 7-8 वेळेस चाकू भोकसला आणि पळून गेला.हा प्रकार रात्री 9 वाजेच्या सुमारास रस्यावर घडल्या कठीणच आहे असे म्हणावे लागेल.


घटनेची माहिती मिळताच वजीराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार आणि त्यांचे सहकारी तेथे पोहचले.वृत्त लिहि पर्यंत कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली नव्हती. खासदार साहेब अजून एक खून प्रकरण जिल्हात  वाढले हो !

उस्मानाबाद जिल्हा 12 ते 14 वर्ष वयोगटातील कोविड-19प्रतिबंधक लसीकरण दुसरा डोस देण्यात महाराष्ट्रात दुसरा.



उस्मानाबाद (प्रतिनीधी) कोविड-19 आजारापासून सरंक्षण होण्यासाठी मास्क,सॅनिटायझरचा वापर,हात वारंवार स्वच्छ धुणे,सुरक्षित अंतर पाळणे, या बाबी सोबतच कोविड-19 प्रतिबंधक लस हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.ही लस घेतल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळतेच पण यदाकदाचित संसर्ग झालाच तर कोविड -19 आजाराची तिव्रता अत्यंत कमी राहते. जिल्हयाने 12 ते 14 वर्षे वयोगटातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा  दुसरा डोस देण्यात राज्यात दुसरा क्रमांक पटवली आहे, याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणेचे कौतुक केले आहे.

 या लसीमुळे न्युमोनिया किंवा मृत्यू टाळता येतो.या धर्तीवर उस्मानाबाद जिल्हयामध्ये 16 जानेवारी 2021 पासून या लसीकरणाला सुरूवात झाली आणि या अंतर्गत वेगवेगळया टप्यांमधून आरोग्य कर्मचारी,फंटलाईन वर्कर,ज्येष्ठ नागरिक,दुर्धर आजारी नागरिक 45 वर्षावरील नागरिक आणि त्यानंतर 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकरिता लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर 09 जुलै 2021 पासून प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानच्या माध्यमातून स्तनदा माता आणि गरोदर मातासाठी कोविड-19 लसीकरणास सुरूवात झाली दि.3 जानेवारी 2022 पासून 15-18 वयोगटासाठी लसीकरणास सुरूवात झाली,तसेच दि.17 मार्च 2022 पासून 12-14 वयोगटासाठी लसीकरणास सुरूवात झाली.

जिल्हयात 12 ते 14 वयोगठातील कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा 40204 बालकांना पहिला आणि 14962 बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.दुसरा डोस देण्याच्या कामात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे,याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दि.27 एप्रिल 2022 रोजी दूरदृष्य प्रणालीव्दारे घेतलेल्या कोविडविषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता आणि सर्व जिल्हास्तरीय विभागप्रमुख यांचे कौतूक केले आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील सर्व वयोगटातील एकंदरीत कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण कामाचा आढावा घेतला असता, जिल्हयातील पात्र लाभार्थ्यापैकी 83.28 टक्के लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे.दुसरा डोस जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांपैकी 61.33 टक्के लाभार्थ्यांनी घेतला आहे.जिल्हयातील 2,45,000 पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.त्यामुळे देय असलेल्या लाभार्थ्यांनी तात्काळ दुसरा डोस घेवून संरक्षित होणे आवश्यक आहे. देशात आणि राज्यात कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञानी वर्तविलेली आहे.त्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सामान्य जनतेला कोव्हीड-19 या आजारापासून संरक्षण मिळावे आणि जिल्हा कोविडमुक्त व्हावा  असा हेतू आहे. त्यामुळे पालकमंत्री शंकरराव गडाख,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व पात्र 12 ते 14 आणि 15 ते 18 वयोगटातील तसेच 18 वर्षावरील पात्र असणारे सर्व नागरिकांनी त्यांना देय असलेला पहिला किंवा दुसरा डोस लवकरात लवकर घेवून लसीकरण पूर्ण करण्याबाबत आवाहन केले आहे.

राज्यातील उच्चांकी 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाचे दुसऱ्या डोसबाबत सत्रांचे अयोजन,नियोजन आणि शिस्तबध्द पध्दतीने दिलेल्या सेवेसाठी  जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा प्रजनन तसेच बाल आरोग्य अधिकारी,निवासी वैद्यकीय अधिकारी बाहयसंपर्क श्क्षिणाधिकारी (माध्यिमिक व प्राथमिक) च्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व वैद्यकीय अधीक्षक,तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी, शिक्षक तसेच पोलिस प्रशासन,महसूल,गटविकास अधिकारी,महिला व बाल विकास विभाग यांनी विशेष सहभाग नोंदविला आहे.यापुढेही आयोजित करण्यात येणाऱ्या कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण सत्रांचा लाभ घेवून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

धक्कादायक. ...घरगुती करणामुळे लाकडी दांडक्याने फटके मारून सुनेने घेतला सासूचा जीव.

 

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे उघडकीला आली असून घरगुती कारणावरून सुनेने मारहाण केल्यानंतर चक्क सासूचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे सासूचा मृत्यू झाल्यानंतर सुनेने चक्कर येऊन पडल्याचा बहाना करत सासूला दवाखान्यात दाखल केले होते मात्र तिचे बिंग फुटले आणि ही खळबळजनक घटना समोर आली. कौशल्याबाई अंबादास हरवणे ( वय 45 ) असे सासूचे नाव असून कांचन गणेश हरवणे असे ( वय 22 ) असे सुनेचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कौशल्याबाई हरवणे या मूळच्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले येथील असून पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी गाव सोडून पाटेगाव येथे राहायला गेल्या होत्या तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वकष्टाने चार एकर जमीन खरेदी केली आणि आपल्या मुलाचा विवाह कांचन हिच्यासोबत लावून दिला होता.

काही दिवसातच कांचन हिने आपले रंग दाखवायला सुरू केले आणि त्यावरून सासु सुनाची भांडणे होऊ लागली. बुधवारी सकाळी असाच वाद झाल्यावर कांचनने चक्क सासू कौशल्याबाईला लाकडी दांड्याने मारहाण केली त्यात कौशल्याबाई रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. सासूचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात कांचनने चलाखीने लाकडी दांडा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र तो पेट घेईना म्हटल्यानंतर तिने घरावर फेकून दिला आणि नातेवाईकांना बोलावून चक्कर आली आणि त्या पडल्या आहेत असे सांगितले आणि कौशल्या यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

कांचन ही सतत आपल्या आईला मारहाण करत होती म्हणून गणेश याने आईला एक वेगळी रूम काढून दिली होती अशीही माहिती समोर आलेली आहे. गणेश याने आपण मध्ये पडल्यानंतर पत्नी आपल्याला देखील मारहाण करायची असेही म्हटलेले असून गणेश याने फिर्याद दिल्यानंतर असून कांचनच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

बनावट नकली दारू निर्मितीचा पर्दाफाश ! याप्रकरणी दोघांना अटक .


पंढरपूर (प्रतिनीधी) : आरोग्याला घातक असलेली बनावट दारूचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला एक जण पसार झाला आहे. या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.


गेल्या अनेक वर्षापासून बनावट दारूची चर्चा होत असते. कोरोना काळात शासनमान्य दारू विक्री बंद असल्यामुळे अशी बनावट नकली दारू अधिक चर्चेत आली होती. दारू दुकाने बंद असली तरी ज्यांना हवी त्यांना ती उपलब्ध होत होती. सरकारी दुकाने तर बंद असताना विविध कंपन्यांची दारू कुठून आणि कशी मिळते ? हा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. पाच ते सहा पट जादा दराने ती त्यावेळी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात होते आणि काही ठिकाणी पोलिसांनी हा प्रकार पकडून त्यांच्यावर कारवाई देखील केली आहे. पण आता पंढरपूर तालुक्यातच बनावट दारू तयार केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आजवर छुप्या पद्धतीने चालणारा हा प्रकार प्रकाशात आला असून यामुळे तळीरामात खळबळ उडाली आहे. 


बनावट दारू तयार केली जात असल्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळताच त्यांनी वाखरी येथे छापा टाकला असता सगळाच नकली प्रकार उजेडात आला. उत्पादन शुल्क विभागाचे पथक वाखरी येथील गोसावी आणि गायकवाड वस्ती येथे दाखल झाले तेंव्हा त्यांना मिळालेली माहिती सत्य असल्याचे दिसले. बाटल्यासह टोपणे, नकली लेबल्स अशा प्रकारचे विविध साहित्य देखील आढळून आले.  बनावट दारू पॅकिंग करण्याचे साहित्य, स्पिरिट, गोवा बनावटीची दारू, वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावांची लेबल्स, बाटल्यांची झाकणे, पॅकिंग करण्याची मशीन असे साहित्य पथकाला आढळून आले. 


दोघांना अटक 

बनावट दारू तयार करण्याचे साहित्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून विशाल बिभीषण गायकवाड आणि ऋषिकेश बिभीषण गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली परंतु मुख्य संशयित अमोल फडतरे हा मात्र उत्पादन शुल्क  अधिकाऱ्यांच्या हाती लागला नाही. 


नकली पण हुबेहूब !

गोव्यातून स्वस्त किमतीचे  मद्य आणून त्यात स्पिरिट तसेच अन्य घटक मिसळून बनावट दारू तयार केली जायची, या बाटल्यावर नामवंत विदेशी मद्य कंपनीचे लेबल्स चिकटवून तिची विक्री केली जायची. सगळे काही हूबेहूब केले जात असल्यामुळे ग्राहकांची सहज फसवणूक होत होती. नकली आणि मूळ कंपनी यांनी  यांच्यातील फरक लक्षात येणार नाही अशा पद्धतीने हा सगळं प्रकार सुरु होता पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा प्रकार उजेडात आणला आहे.  


ढाब्यावर विक्री 

नकली बनावटीची ही दारू ढाब्यावर विकली जात असल्याची बाब समोर आल्याने ढाब्यावर जाऊन मद्यप्राशन करणाऱ्या शौकिनांत देखील खळबळ उडाली आहे. कोणकोणत्या ढाब्यावर अशी दारू विकली जात होती त्या ढाबा चालकावर देखील कारवाई करण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. ढाब्यावर विनापरवाना मद्यविक्री केली जाते यावर देखील शिक्कामोर्तब होणार असून अशा प्रकारचे विष ग्राहकांना विकून फसवणूक करणारे ढाबेचालक देखील या कारवाईमुळे उघडे पडण्याची शक्यता आहे.

रुग्णाला दवाखान्यात योग्य सेवा मिळाली नाही, तर त्या डाॅक्टरविरुद्ध ग्राहक म्हणून रुग्णाला तक्रार दाखल करण्याचा अधिकार – सुप्रिम कोर्ट


डाॅक्टराला साक्षात देवाचं रुप मानलं जातं.. मात्र, कधी कधी या देवाकडूनही चूक होते.. कधी खूप प्रयत्न करुनही हा देव आपल्या रुग्णाला वाचवू शकत नाही.. पण सामान्यांना ते खरं वाटत नाही… त्यातून कधी कधी थेट डाॅक्टरांना मारहाण केली जाते.. कधी रुग्णालयात तोडफोड केली जाते..

याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण आदेश दिलाय.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.. तर दुसरीकडे डाॅक्टरांना अधिक दक्षतेनं काम करावं लागणार आहे.. याबाबत सविस्तर


जाणून घेऊ या.नेमकं प्रकरण काय…?

मुंबईतील डाॅक्टरांची एक संघटना आहे.. ‘मेडिको लीगल अ‍ॅक्शन ग्रुप’ असं या संस्थेचं नाव.. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत डॉक्टरांच्या विरोधात कोणीही तक्रार दाखल करू शकत नसल्याचे या संस्थेचं म्हणणं होतं.. मात्र, मुंबई हायकोर्टानं या संस्थेचं म्हणणं फेटाळून लावलं होतं..


मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध ही संघटना सर्वोच्च न्यायालयात गेली.. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. मात्र, सुप्रिम कोर्टानंही मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवताना, ‘मेडिको लीगल अ‍ॅक्शन ग्रुप’ संस्थेचा अर्ज फेटाळून लावला.

डाॅक्टरांकडून दिली जाणारी वैद्यकीय सेवा ही ‘कन्झ्यूमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट’  अंतर्गत येते.. त्यामुळे रुग्णाला दवाखान्यात योग्य सेवा मिळाली नाही, तर त्या डाॅक्टरविरुद्ध ग्राहक म्हणून रुग्णाला तक्रार दाखल करण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रिम कोर्टानं दिला आहे..


1986 चा कायदा रद्द करून ग्राहक संरक्षण कायदा-2019 हा कायदा बनवला आहे. केवळ कायदा रद्द करून व नवीन कायदा करून ‘सेवा’ या व्याख्याबाहेर डॉक्टरांची आरोग्यसेवा काढता येणार नाही. आरोग्य सेवा कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवायची असेल, तर संसदेने केलेल्या कायद्यात तसा उल्लेख करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटलं आहे.

डॉक्टरांची सेवा कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊ शकत नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. त्यामुळे रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना या निकालाने मोठा दिलासा मिळाला आहे.

*१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने.....

      *मोठ्या संघर्षमय रक्तरंजित चळवळीतून १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. त्याला आज १ मे २०२२ रोजी ६२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या इतिहासा बरोबरच गेल्या सहा दशकात राज्याने काय कमविले, काय गमविले याचा आढावा घेणारा हा लेख खास आपल्यासाठी...
    १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. २६ जानेवारी १९५० पासून संपूर्ण भारतासाठी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली. १९०५ मध्ये बंगालात तर १९१७ मध्ये तेलगु लोकांनी भाषावार प्रांतरचनेची मागणी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात ओरिसा हे भाषावार आधारे निर्माण होणारे प्रथम राज्य होते. भाषावार आधारित स्वतंत्र राज्याची मागणी १८९५ पासून सुरू होती. १९३६ साली मधुसुदन दास यांच्या प्रयत्नामुळे बिहार मधून स्वतंत्र नवीन ओरिसा प्रांताची निर्मिती झाली. १९२० ला  काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात व  १९२८ च्या नेहरू अहवालामध्ये भाषावार प्रांत रचनेच्या तत्त्वांचा स्वीकार केला गेला.
     पुढे १९४५-४६ च्या निवडणुक जाहीरनाम्यात काँग्रेसने याचा समावेश केला, परंतु स्वातंत्र्यानंतर फाळणीची झळ पाहणारे नेहरू भाषावार प्रांतरचनेचा धोका पत्करायला तयार नव्हते. संविधान सभेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १७ जून १९४७ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.के.धर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय प्रांतरचना आयोगाची स्थापना करण्यात केली.
    १४ ऑक्टोबर १९४८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयोगाला एक निवेदन देऊन त्यात त्यांनी भाषावार प्रांतरचनेला समर्थन दिले होते. विशेष करुन मराठी भाषिक लोकांसाठी महाराष्ट्र हे राज्य ज्याची राजधानी मुंबई असेल या मागणीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भर दिला होता. १० डिसेंबर १९४८ रोजी धर आयोगाने आपला अहवाल सादर केल्यावर या अहवालावर विचार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने डिसेंबर १९४८ मध्ये जे. व्ही.पी. समिती नेमली. या समितीने १ एप्रिल १९४९ मध्ये आपला अहवाल सादर करताना भाषिक आधारावर प्रांत रचनेला अनुकूलता दर्शविली नाही. म्हणून १९५३ मध्ये पुन्हा राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला.  फाजल अली हे आयोगाचे अध्यक्ष होते या त्रिसदस्यीय आयोगाने ३८ हजार मैलांचा प्रवास करून १ लाख ५२ हजार लेखी निवेदने स्वीकारली. १४ डिसेंबर १९५५ रोजी आपला अहवाल संसदेपुढे ठेवतांना या आयोगाने भाषिक प्रांतरचना तत्वाला प्रथम प्राधान्य दिले, पण मागील दोन्ही राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्यामुळे २१ नोव्हेंबर १९५६ रोजी फ्लोराफाऊंटन च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्यामुळे मराठी माणसे चिडली होती. त्यामुळे त्यांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोराफाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले होते. त्यामुळे प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसर्‍या बाजूने बोरीबंदर कडून गगनभेदी घोषणा देत फ्लोराफाउंटन कडे जमला. मोर्चाला पोलिसांनी ताकद लावून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज केला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे पोलिसांना गोळीबाराचे आदेश मिळाले होते. गोळीबार झाला आणि तब्बल एकशे पाच आंदोलकांना हुतात्मे प्राप्त झाले. मात्र अढळ सत्याग्रही मुळे पोलिसांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेत १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. 
     अशा या महाराष्ट्राच्या  सहा दशकांची वाटचाल अधोरेखित करताना महाराष्ट्राने विविध क्षेत्रात दैदिप्यमान अनन्य साधारण प्रगती साधली आहे. सहकार, लोकशाहीचे विकेंद्रीकरण, कृषी, औद्योगिक समाज व्यवस्थेची उभारणी या त्रिसूत्रीवर आधारित यशवंतरावांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता. पण तो मंगल कलश आज गायब तर झाला आहेच पण १९८०-९० पासून पुढे केवळ निवडणुकांचे राजकारण, पक्षीय राजकारणातील स्थित्यंतरे, नेतृत्वाचा संघर्ष व सत्तांतर इ. मुळे राज्याच्या विकासाची दिशा भरकटल्या सारखी झाली आहे. १९९१ नंतरच्या नवीन औद्योगिक व आर्थिक धोरणातील सुधारणा नुसार मुंबई बाहेर उद्योगाची स्थापना करणे, उद्योगाच्या स्थापनेतील अनेक जाचक अटी शिथिल करणे, सुलभीकरण, औद्योगिक क्षेत्रावरील सरकारी नियंत्रण कमी करणे, मुबलक प्रमाणात वीज, पाणी व स्वस्त दरात जमीन उपलब्ध करून देणे, नव्या उद्योगाच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे, सहाय्यक उद्योगाला चालना देणे, मागास भागाच्या विकासावर विशेष भर देणे, कर्ज पुरवठा, उत्पादन व विक्री करात सवलत आणि कामगारांच्या समस्याचे निराकरण या धोरणामुळे महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत मोठी झेप घेईल असे वाटत असतानाच आज महाराष्ट्र विकास सोडून सत्तासंघर्षाच्या गलिच्छ राजकारणाने रसातळाला गेला आहे हे स्पष्ट दिसते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ग. त्र्य. मांडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना हे राज्य मराठी माणसाचे असेल की मराठा माणसांचे ? असा परखड सवाल केला होता. तेव्हा यशवंतरावांनी तेवढ्याच आत्मविश्वासाने उत्तर देताना हे राज्य मराठी माणसांचे असेल. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा वारसा अगदी दमदारपणे चालविला जाईल असे सांगितले होते. पहिल्या तीन चार दशकात महाराष्ट्राने तशी वाटचाल करत विकास साधण्याचा यथोचित प्रयत्नही केला. पण १९९० नंतर राजकीय नेतृत्वाची नैतिक घसरण सुरू झाली व पुरोगामी महाराष्ट्रासमोर विकासाच्या विविध नवनव्या समस्या निर्माण झाल्या. मधुकर भावे आपल्या यशवंतराव ते विलासराव या पुस्तकात लिहिताना सांगतात, यशवंतराव पाच वर्षाचे असताना पंढरपूरला गेले होते. त्यांच्या आईने यशवंतरावांच्या मामाला सांगितले होते की, यशवंताचे बोट घट्ट पकड. नसता तो गर्दीत भरकटेल. हनुमंत मामाने पाच वर्षाच्या यशवंतरावाचे बोट घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे यशवंतराव गर्दीत भरकटले नाहीत, पण आज महाराष्ट्रातील नेत्यांनी यशवंतरावांचे पकडलेले बोट व घेतलेले विचार सोडल्याने महाराष्ट्र भोंग्या वरून जात-धर्म, मंदिर मस्जिद, अजान-चालीसा यात भरकटतांना दिसतो आहे. 
       महाराष्ट्राला सहकार, शेती, शिक्षण विस्तार व औद्योगिकरण करण्यात यश आले आहे, हे विसरता येत नसले तरी त्याच्या सामाजिक अंकेक्षणाची एक बाजू मात्र दुर्लक्षित राहिली आहे हेही विसरून चालणार नाही. राज्याचा ग्रामीण भाग केंद्रबिंदू मानून पहिली तीन-चार दशके अत्यंत सकारात्मक पद्धतीने राज्याच्या विकासाची वाटचाल सुरू होती, कारण प्रारंभीच्या काळात विविध राजकीय पक्षात एक धेय्यवाद व शिस्तबद्धता होती. चौफेर संवेदनशील व सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा होता. तत्कालीन परिस्थितीत व्यक्ती धनसंपन्न नसली तरी गुण संपन्न असल्याने  त्याला जनतेचा पाठिंबा मिळत होता. पण १९९० नंतर मात्र हे  राजकारणी सत्याग्रही समाज वादापासून - सत्याग्रही सत्ताकारणा पर्यंत सर्रास पैशाचा वापर करू लागल्याने राजकीय व्यवस्थेचे अवमूल्यन झाले व वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, कृषी, जलसिंचन व बेकारी सारख्या समस्या भेडसावू लागल्या. त्यामुळे आज सर्वांगीण विकासाचा समाजवाद भांडवल वादाकडे झुकल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्र आज एक प्रगत राज्य वाटत असले तरी राज्यातला मराठवाड्याचा व विदर्भाचा बराच मोठा भाग विकासापासून कोसो दूर आहे. सामाजिक,आर्थिक विकास साधत असताना एकसंघ व एकात्म महाराष्ट्राची उभारणी करणे हेच राजकीय सत्तेचे प्रयोजन असते, पण मागील दोन-तीन दशकांत म्हणावा तसा विकास तर झाला नाहीच पण जातीअंताचा लढा दिवसेंदिवस क्षीन होत गेल्याने राजकारणाची सूत्रे विकास सोडून जात आणि धर्म या भोवती फिरत राहिली. शरद पवार साहेब एकदा म्हणाले होते, ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी व अन्य वर्ग म्हणजे बहुजन समाज होय. त्यांचे व दलितांचे संबंध सातत्याने सामंजस्याचे राहावेत म्हणून दादासाहेब गायकवाड यांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर जिव्हाळ्याचे संबंध ठेवत असल्याचे सांगितले होते. ते संबंध आजही कायम असले तरी जातीवर आधारित राजकारणाची चौकट त्यांच्या वारसदारांनी तयार केल्यामुळे महाराष्ट्राचा विकास यशवंतराव, विलासराव, गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांनी आखून दिलेल्या दिशेने न जाता भलत्याच विरुद्ध दिशेने जाताना दिसतो आहे.  खरे म्हणजे शहरीकरणात आपण आघाडी घेतली असली तरी गरिबी निर्मूलनाचा वेग अतिशय कमी आहे. ग्रामीण व शहरी गरीबीचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. मुंबईचे ५४ टक्के क्षेत्रफळ गरीबांच्या झोपडपट्टीने व्यापले आहे. 
       संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार वर्गाच्या वेतनात तफावत आहे. विविध समस्या निर्मूलना बरोबर विविध क्षेत्रात रखडलेली पदभरती करणे, उत्तम दर्जाच्या आरोग्याच्या सुविधा वाढविणे, वाढत्या इंधन दराला लगाम घालीत वाढती महागाई थांबविणे, कृषी व जलक्षेत्रात नवी गुंतवणूक करून विकासाला चालना देणे, रस्ते, रेल्वे वाहतूक मजबूत करत पर्यटन व्यवसायाचा विकास साधून बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसत नाहीत. एखाद्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्तीला राज्य सक्षमपणे तोंड देईल अशी एखादी यंत्रणा आज पर्यंत आपणाला ऊभी करता आली नाही. कोरोना काळात यांचा प्रत्यय आपणाला आला आहेच. लोकशाहीचा चौथा स्तंभ ही आज निःपक्ष पाती न रहाता कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला गेल्याने त्याची विश्वासार्हता राहीली नाही. 
       राज्याचा समतोल विकास साधण्यासाठी सुजान नेतृत्वा बरोबर राज्याला स्थिर सरकार लाभणे आवश्यक असते. आमदार, खासदारांनी आपला विकास निधी योग्य व अत्यावश्यक कामासाठी वेळवर वापरायला हवा पण आज तरी अनेक आमदार खासदारांनी आपल्या विकास निधी ला हातही लावला नाही. विरोधकांनीही राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली नाही. त्यासाठी मतदारांनी  जागरूक राहून माझे गाव, माझे राज्य, माझा देश विकासाकडे नेणाऱ्या व्यक्तीलाच प्राधान्य द्यायला हवे. म्हणून आपण तर बदलायला हवे व राजकारण्यांना ही विकासासाठी बदलायला भाग पाडणे हे तुमचे, माझे, आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. तेंव्हा आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतांना किमान पुढील काळात राज्यात विकासाची गंगा वेगाने व्हावी एवढीच अपेक्षा....

      *प्रा.डाॅ.सखाराम वाघमारे*
     भूगोल शास्त्र विभाग प्रमुख व                संशोधक मार्गदर्शक
    वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर
        मो. नं. ९६२३२२८५७५

वैद्यनाथाच्या नगरीत कर्नाटक येथील गुरुवर्य ष ब्र श्री गुरु शांतेश्वर महास्वामीजी यांचे महिनाभर अनुष्ठान.


*रंभापुरी मठ संस्थानचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची उपस्थिती लाभणार.
* कार्यक्रम नियोजनसाठी बैठक.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  प्रभू वैद्यनाथाच्या श्रीक्षेत्र  नगरीत कर्नाटक येथील गुरुवर्य ष ब्र श्री गुरु    शांतेश्वर महास्वामीजी हिरेमठ संस्थान , (नेगळूरू, जिल्हा हावेरी)  यांचे जून-जुलै महिन्यात महिनाभर अनुष्ठान होणार आहे या अनुष्ठान समाप्ती समारंभास  रंभापुरी मठ संस्थानचे   जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी  यांची उपस्थिती लाभणार आहे,  हे जगद्गुरु परळीत प्रथमच येणार आहेत, त्यांच्या स्वागत संदर्भात  येथील श्री गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडी येथे   वीरशैव लिंगायत समाज बांधवांची बैठक  30 एप्रिल 2022 रोजी झाली.
  रंभापुरी मठ संस्थानचे   जगद्गुरु श्री श्री श्री 1008 सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी  यांचे कर्नाटक येथील गुरुवर्य ष ब्र श्री गुरु    शांतेश्वर महास्वामीजी हिरेमठ संस्थान , (नेगळूरू, जिल्हा हावेरी)  यांच्या      आषाढमास अनुष्ठान समाप्ती साठी परळी नगरीमध्ये आगमन होणार आहे .त्यासंदर्भातील नियोजनासाठी व महास्वामीजीना आमंत्रण देण्यासाठी सर्वानुमते ठराव घेण्यात आला. पुढील कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच स्पष्ट करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. बैठकीस समाजातील सर्व सन्माननीय सदस्यांची उपस्थिती होती बैठकीस   समाजाचे नेते डॉ.सुरेशचंद्र चौधरी,  दत्ताप्पा इटके गुरुजी ,  विजयकुमार  मेनकुदळे,  नारायण देव गोपनपाळे,अ‍ॅड. शशिकांत नरवणे,  शशांक निर्मळे ,प्रा अरुण अर्धापुरे , नरेश हालगे  चंद्रकांत आप्पा समशेट्टे, नागेश हालगे, अश्विन मोगरकर ,श्री संजय खाकरे , ओमप्रकाश बुरांडे,   गिरीश संकाये, चंद्रकांत उदगीरकर ,संदीप चौधरी  मनोज संकाये , कपिल चौधरी,अ‍ॅड. नरहरी आप्पा टेकाळे ,अ‍ॅड. उ मरदंड, श्री ओम प्रकाश फडकरी, कैलास एसके, श्री अशोक झाडे ,सचिन स्वामी  , योगेश स्वामी ,घेवारे आप्पा,  गिरीश संकाये व  उपस्थित होते.

आंबेडकरी चळवळ आणि मांग समाजाच्या प्रगतीतील अडथळे..!!!





        वर्ण व्यवस्था प्रमाणे अस्पृश्य वर्ग आणि त्यातील जाती या हिंदू नाहीत कारण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती या ना शूद्र आहेत ना अतिशूद्र  आहेत.ज्या हिंदू केवळ राजकीय मूल्य लक्षात ठेऊन गणल्या जातात परंतु मानल्या जात नाहीत.त्यापेक्षाही वर्ण व्यवस्थे प्रमाणे त्यांना माणूसच ग्रहीत धरले जात नव्हते म्हणूनच कदाचित किंबहुना डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी आपल्या महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह ची तुलना फ्रेंच राज्य क्रांतिशी सोबत केलेली होती.आम्ही हिंदू नाहीत जर आम्ही हिंदू असतो तर नाशिक काळा राम मंदिर प्रवेश सत्यागृहास सनातनी हिंदू धर्मीय लोकांनी केला नसता. 
      पूर्वापार चालत आलेल्या जोड शब्द ज्यात मातंग महार किंवा महार मांग यांच्या जातीच्या नावाने प्रसिद्ध अश्या काही गृहतिके इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने समाज मनावर ताबा घेऊन प्रचलित केल्या गेल्या आहेत.एखाद्या लहान मुलाने एखादा शब्द उच्चारताना जरा उर्मट व उद्धट पद्धतीने उच्चारला तर लगेच त्याचे घरातील ज्येष्ठ मंडळी किंवा पालक त्या लहान मुलाच्या मनावर अधिराज्य परिणाम करणारे वाक्य बोलतात की असे मांगा महरा सारखे बोलू नये.इथेच जातीय वादाचे बाळकडूच त्या लहान निरागस मनावर बिंबवले जाते.याचाच दुसरा अर्थ असा होतो की असंस्कृत भाषा आणि गलिच्छ राहणारे म्हणजे मांग आणि महार.
      नुकतेच औरंगाबाद येथे एका मातंग तरुणास पूर्वा श्रमीचे महार यांनी अमानुष मारहाण करून त्याची हत्या केली म्हणुन संपूर्ण महाराष्ट्रात महार मांग वाद पेटवला जावा या उद्देशाने काही समाज द्वेष्टे प्रयत्न करताना दिसले.आणि जातीचे प्रेम आणि असुरक्षततेची भावना विषेतः मातंग समाजाच्या नावाने आणि समाजात पेर न्याचे काम करणारे कार्यकर्ते दिसून आले. अन्याय अत्याचार बलात्कार खून आमच्या अस्पृश्य वर्गावर नवीन नाही. ज्याप्रमाणे आतापर्यंत अन्याय अत्याचार करणारे हे सवर्ण जातीतून होते तेव्हा मात्र हे समाज द्वेष्टे साधा निषेध करण्याचे औदार्य यांना दाखवावे वाटले नाही.नवरदेव पारावर गेला म्हणून मारहाण, गणपती मिरवणुकीत सरपंच नाचला म्हणून मारहाण, फाशी देऊन मारला एकुलता एक विधवा आईचा मुलगा,सरपंच मारला जातो स्मशान भूमी नाही, सवर्ण समाजातील स्मशान भूमीत अंत्यविधी करू दिल्या जात नाही, स्वतंत्र्य स्मशान भूमी नाही,पोलिसांनी केला अन्याय अत्याचार मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि फौजदारी संहिते प्रमाणे महिला आरोपीस अटक केली, तरुणास जिव मारले आणि अपघात दाखवणायची तरीही मांग समाज आणि द्वेष्टे शांत होते.इथे या दोन  बाब एकसमान होत्या त्याम्हणजे पीडित हे मातंग होते आणि जुलूम आणि अत्याचार गुन्हे करणारे हे सर्व सवर्ण होते.तेव्हा त्या प्रकरणात आवाज उठवणारे हे औरंगाबाद च्या प्रकरणात आवाज उठवणारे नेते कुठेच नव्हते.म्हणून जय भीम पेक्षा राम राम बरा !!! सवर्ण जेव्हा मांगा ला जवळ करतात पण मेल्या नंतर सुद्धा जातीचा विटाळ मात्र पाळतात.आणि अंत्यसंस्कार स्मशान भूमीत करू देत नाहीत हे इथले वास्तव मांग उघड्या डोळ्याने बघून सुद्धा शांत राहतात.
  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मातंग समाजाच्या परिषदा घेतल्या आहेत.तेव्हा केवळ अस्पृश्य हक्क आणि अधिकार याची लढाई होती.तथापि जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टो १९५६ ला बौद्ध धम्म स्वीकारला आणि तो सर्व अस्पृश्य अनुयायांना धम्माची दीक्षा दिली तेव्हा केवळ पूर्वाश्रमीचे महार लोकच होते असे काही नाही.त्यात मातंग, बंजारा आणि ओबीसी बांधव सुद्धा होते.इथूनच खरे महार मांग वादाची बिजे समाजात रुजली गेली.गावकी चे कामे सोडून द्या असा मूलमंत्र केवळ पूर्वा श्रमिचे महार यांनाच नाही तर सर्व अस्पृश्य समाजाला दिलेला मानवमुक्तीचा  सोबतच सामाजिक सांस्कृतिक धार्मिक गुलाम गिरितून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य समाता बंधुत्व आणि न्यायावर आधारित नव समाज निर्मानाची प्रक्रिया सुरू झाली.परंतु मातंग समाजातील तत्कालीन द्वेष्टे यांनी मातंग  समाजाच्या प्रगतीचा शास्वत मार्ग कोणता हे समाजाला पटवून देण्यास अपयशी ठरले.सोबतच महार समाज सुद्धा बुद्ध धम्मातील बंधुत्वा सोबत आलेली जबाबदारी विसरून गेला.वाशिम जिल्ह्यातील मातंग समाजाच्या प्रगतीचा आढावा जेव्हा वारूळ या पुस्तकात वाचायला आला तेव्हा लेखकाने महार समाजाने सोडलेली गावकीची कामे मातंग समाजाने मोठ्या हौशेने आणि आनंदाने स्वीकारली म्हणुन मातंग समाजीक शैक्षनिक परिर्तनाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेला.अर्थातच गावकी हीच महार मांग भावकीचा पक्का पाया  होता आणि आहे. हे इथे सिध्द होते.ज्या आनंदाने मातंग समाजाने गावकीचे जबाबदारी स्वीकारली म्हणजे मनुस्मृती ने लादलेले नियम स्वीकारले आणि हिंदू धर्मातील राम जो असेतू हिमाचल अवतराचा एक अवतार आहे असे भासवून संपूर्ण देशातील वेगवेगळे देव केवळ विष्णूच्या अवतराशी मिळवले गेलेले मातंग समाजाने ते स्वीकारले तेव्हा पासूनच ही म्हण पडली असावी की, जय भीम पेक्षा राम राम बरा.!!!
    अश्या प्रकारे मातंग समाजाने हिंदू धर्मातील मनुस्मृतीचे नियम स्वतः वर लादून घेतले आणि ते कायम सामाजिक सांस्कृतिक धार्मिक बंधनात अडकून बसले. कारण प्रस्थापित व्यवस्थेला सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय गुलामगिरी साठी एक अस्पृश्य समाजातील मोठा वर्ग पाहिजे होता जो धर्माच्या नावाने आज्ञाधारी गुलाम होईल आणि राजकीय चळवळ कमकुवत करण्यास पर्यायाने अस्पृश्य समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यास मदत करील.असा आयाता वर्ग मातंग समाजाने शासक लोकांना उपलब्ध करून दिला आहे, म्हणतात ना की लाकडाचा दांडा कुळास घात.इथेच शासक लोकांनी मातंग समाजाला जवळ केल  कारण.जय भीम पेक्षा राम राम बरा.!!!   पण मातांगतील काही हे बाबासाहेबांनी दिलेले मूलमंत्र शिक्षण घेऊन बाहेर पडले सोबतच बंधुत्वाची जबाबदारी घेऊन चलो बुद्ध की ओर हे अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करू लागले त्यापैकी एक बुद्धवासी जी.एस.दादा कांबळे, पारवे गुरुजी प्रा.मारुती कसाब इत्यादी. शासक लोकांनी येऊ घातलेला धोका ओळखून लगेच आरक्षणाचे वर्गीकरण नावाचे भूत लगेच द्वेश्ट्या मांग लोकांच्या मनात भरवल्या आणि परत एकदा दुही निर्माण करण्याचे काम सुरू झाले. बरं अनुसूचित जाती मध्ये एकूण 59 अस्पृश्य जाती आहेत. पण केवळ महार लोकांनी मांग लोकांचे सर्व हक्क अधिकार या आरक्षणातून पळवले याची आभासी प्रतिमा तयार करण्यात आली.अगोदरच मुखुप्रवाहापासून दूर असलेला मांग समाज आणि द्वेष्टे यांनी याचा उहापोह केला.आणि वर्गीकरण लढा चालू केला.आता त्या बाकी राहिलेल्या 57 जाती त्या कधीच महार समाजाच्या विरोधात तक्रार करीत नाहीत. परंतु गावकीचा आणि भावकिचा हेवा असलेल्या मांग समाजाला आरक्षण वर्गीकरण तेही ८ टक्के पाहिजेत तेही १३ टक्क्यामधून कारण मनावर असे बिंबवले गेले आहे शासक लोकांनी की महार च तुमचं हक्क अधिकार हिसकावून घेतात बाकी ५७ जातीला काही मिळो अथवा न मिळो पण ८ टक्के आरक्षण पाहिजेत मांग समाजातील द्वेष्टे यांना.शासक लोकांना माहिती आहे की जय भीम पेक्षा राम राम बरा!!!  म्हणून राजकीय स्वार्था साठी जवळ केलेला अस्पृश्य वर्गातील मांग हा अजूनही हिंदू अडगळीत पडलेला आहे. राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून विधान सभा,लोकसभेवर निवडून गेलेले मांग जातीचे आमदार खासदार हे कधीच सभागृहात मांग जातीच्या मागासलेपणाच बोलत नाहीत की मांग आयोगाच्या शिफारसी लागू करा म्हणून काहीच भूमिका घेत नाहीत.परंतु महार मांग वाद पेटवण्यासाठी वर्गीकरण मात्र हवे आहे असे समाजात जाऊन सांगताना पाहण्यास येतील कारण
फोडा नि राज्य करा हीच निती मागील शतकानुशतके इथली प्रस्थापित शासक लोकांनी अवलंबिली आहे त्याचे हस्तक म्हणून मांग द्वेष्टे काम करत आहेत यात शंकाच नाही. पण बाबासाहेबांनी सर्व ५९ जातीला एका अनुसूचित संवर्गात बसवून राष्ट्रीय स्तरावर बंधुभाव निर्माण केला आहे त्याला छेद देण्यासाठी शासक वर्ग कायम प्रयत्न करीत आहे हे मात्र मांग विसरत चालले आहेत यात शंकाच नाही.शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र  काही केवळ महारांची मक्तेदारी नसून संपूर्ण ६७४२  जाती ज्या अनुसूचित जाती जमाती,भटके विमुक्त,ओबीसी इतर मागासवर्गयांसाठी दिलेल्या सांविधनिक हक्क अधिकार यांच्या संरक्षणासाठी दिलेला आहे हे विसरता कामा नये.
महार लोकांनी केल्या अन्यायाविरुद्ध जसा आवाज राज्यभर माध्यमांच्या द्वारे आजुन महार मांग दूही निर्माण करण्यासाठी वापरलाय  तसा कधीच सवर्ण लोकांनी केलेल्या अन्यायाविरुध्द झाला नाही याचा तोडच नाही.म्हणून  असे वाटत असावे की जय भीम पेक्षा राम राम बरा.!!!!
           ॲड.शिरीष कांबळे
         उच्च न्यायालय खंडपीठ,
                 औरंगाबाद.
              ९६७३४१७३०४

शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यभर घेणार सभा, जिल्हा प्रमुखांनाही दिल्या सूचना.

मुंबई(प्रतिनीधी)उद्या औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता शिवसेना प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. मुंबईत आज शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली.

बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीवर तसेच इतर अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. तसेच, विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राज्यभरात सभा घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याची सुरुवात मराठवाडा व मुंबईपासून होणार आहे. 14 मे रोजी मुंबईत बीकेसी येथे तर 8 जून रोजी मराठवाड्यात सभा घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा डाव, धार्मिक-जातीय तेढ निर्माण करण्याची विरोधकांची नीती हाणून पाडण्यासाठी तसेच त्यांच्या आरोपांचा समाचार घेण्यासाठी या सभा होणार आहेत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज दिली.

जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बैठकीबाबत माहिती दिली. शिवसेनेवर विरोधक तुटून पडले आहेत. मात्र, आमच्याकडेही फटाके आहेत. ते कसे फोडायचे हे आता पाहू, असे सुचक वक्तव्य राऊत यांनी केले. तसेच, सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आमच्यावर हल्ला करणाऱ्यांवर प्रतिहल्ला करावाच लागेल. त्यांचे ढोगांचे बुरखे फाडावे लागतील. त्यासाठी राज्यात दोन महत्त्वपूर्ण सभा उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यानंतर राज्यभरात सभा घेतल्या जातील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना दिल्या. तसेच, सध्याच्या राजकीय स्थितीत काय करणे आवश्यक आहे यावर मार्गदर्शन केले. याबाबत संजय राऊत यांनी सांगितले की, सध्या अनेक नवहिंदुत्ववादी जागे झाले आहेत. त्यांचा बुरखा फाडणे गरजेचे आहे. मात्र, ही पक्षांतर्गत बैठकअसल्याने मुख्यमंत्र्यांनी याविषयी नेमके काय सांगितले, हे सांगणे उचित होणार नाही.

शिवसेनेकडून जोरदार प्रतिउत्तर दिले जाईल, हे मात्र नक्की, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोणीही घेरू शकत नाही. आम्हाला घेरणाऱ्यांचाच घेर किती छोटा आहे, हे पहायला हवे, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांना बीड नगरपरिषदेच्या विविध गलथान आणि भ्रष्ट कारभाराबाबत तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे.

______
बीड (प्रतिनीधी) बीड शहरात सर्वत्र अस्वच्छता, पाणीटंचाई असताना महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नसताना संकेतस्थळावर खोटी माहिती प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ मध्ये भारतातील ३७२ शहरातुन ६७ वा क्रमांक पटकावून फसवणूक केल्याबद्दल उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच नगरपरीषदेमार्फत बिंदुसरा नदीपात्रात कचरा  टाकुन प्रदुषित केल्याबद्दल संबधित दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आज ईमेल द्वारे तक्रार केली असून ऊद्या प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
सविस्तर माहीतीस्तव:-
___

अमृय अटल पाणीपुरवठा योजना योजना व भुयारी गटारी योजनेचे जीवन प्राधिकरण आधिका-यांनी वाटोळे केले म्हणून नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर आंदोलन करतात मग ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत ६७ क्रमांक कसा????
_____
 बीड शहरातील मंजूर अमृत अटल पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटारी योजनेची कामे मुदत संपुनही पुर्ण केली जात नसुन ठेकेदार एजन्सीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आधिकारी पाठीशी घालत असल्याबद्दल स्वतः नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर यांनी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले होते म्हणजेच स्वच्छता व पाणीपुरवठा संदर्भात मोठ्या योजना अपुर्ण असताना तसेच शहरात 
मोठ्याप्रमाणात अस्वच्छता असुन रस्त्यावर घनकचरा आढळुन येतोय 


*महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसताना संकेतस्थळावर खोटी माहिती कोण देतं?
____
 शहरातील मुख्य शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नसताना संकेतस्थळावर खोटी माहिती प्रसिद्ध करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१ स्पर्धेत भारतातील ३७६ शहरापैकी बीड नगरपरिषदेचा ६७ वा क्रमांक पटकावून शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याबद्दल उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत. 

*कचरा विल्हेवाट बिंदुसरा नदीपात्रात रोगराई पसरून नागरीकांच्या आरोग्याचं काय?
____ 
बीड नगरपरीषदेमार्फत शहरातील कच-याची विल्हेवाट  बिंदुसरा नदीपात्रात टाकुन करण्यात येत असून नदीचे पात्र प्रदुषित होत असून रोगराई पसरून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल नगरपरिषद प्रशासनातील आधिकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन टेंडर धारकांवर कारवाई करण्यात यावी. 

*शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब
____

 बीड शहरातील शासकीय कार्यालये उदाहरणार्थ जिल्हाधिकारी ,तहसिल, पंचायत समिती, जिल्हापरीषद, बसस्थानक आदि ठीकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसुन संबधित विभागांना निवेदन आंदोलनानंतर सुद्धा त्यांच्यात सुधारणा नाही. संबधित प्रकरणात आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. 

*घनकचरा कंत्राटदराकडुन कोण मलिदा खातं?
____
 बीड शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट अमरावतीच्या कनक एन्ट्रप्रायजेस कंपनीला देण्यात आले असुन महिन्याकाठी २७ लाख रूपये देयके देण्यात येते मात्र गल्लीबोळात कचरा संकलनासाठी घंटागाड्या येत नाहीत, नाल्यांची साफसफाई होत नाही, रस्त्यावरील धुळ झाडली जात नाही मात्र आधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून कंत्राटदारांच्या कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकुन दंडात्मक कारवाई करण्यात यावी. 


सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात दलित महिलांच्या अंत्यविधी रोखण्याची तीन महिन्यात तिसरी घटना, मुख्यमंत्र्यांना तक्रार - डाॅ.गणेश ढवळे.


 बीड  (प्रतिनीधी ) : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांच्या जिल्ह्यातील केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी)गावातील दलित स्मशानभुमीचा प्रश्न ऐरणीवर असुन दलित स्मशानभुमीबाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ३ महिन्यात ३ दलित महिलांचा अंत्यविधी रोखुन धरण्याची दुर्दैवी घटना घडली 

असून संबधित प्रकरणात अंत्यविधी रोखुन प्रेताची विटंबना केल्याबद्दल तसेच जबाबदार तहसिलदार दुलाजी मेंडके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केली आहे.


सविस्तर 

___

 बीड जिल्ह्य़ातील केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी)येथे दि.२६ एप्रिल मंगळवारी अंबुबाई काशिनाथ साखरे (वय ७५ वर्षे) या महिलेचे दुपारी निधन झाले.अंत्यसंस्कार करण्यासाठी गावालगतच्या रिकाम्या शासकीय जागेत अंत्यविधीचे साहीत्य घेऊन गेले असता त्याठीकाणी राहणा-या शेतक-यांनी विरोध करत अंत्यविधी करू देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे अंत्यविधी रखडला. 

यापुर्वीही ४ जानेवारी २०२२ रोजी लक्ष्मीबाई शहाजी कसबे या महिलेचा अंत्यविधी रोखण्यात आला होता संतप्त नातेवाईकांनी ५ जानेवारी २०२२ रोजी लक्ष्मीबाई कसबे यांचा मृतदेह ट्रक्टर मधुन केज तहसिल कार्यालय आवारात आणून ठेवला होता. तहसिलदार दुलाजी मेंडके यांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्या समवेत चर्चा करून अंत्यविधी करण्यात आला होता.तसेच दुस-या घटनेत दि.११ एप्रिल २०२२ रोजी नंदुबाई नामदेव थोरात (वय ५० वर्षे ) या महिलेचाही अंत्यविधी रोखण्यात आला होता. 

तहसिलदार दुलाजी मेंडके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा:-डाॅ.गणेश ढवळे 

___

 तहसिलदार दुलाजी मेंडके यांचा प्रशासकीय हलगर्जीपणा दिसत असून  यापुर्वी दि.५ जानेवारी रोजी मयत लक्ष्मीबाई कसबे यांचा अंत्यविधी रोखल्यामुळे संतप्त नातेवाइकांनी मृतदेह तहसिल कार्यालय आवारात आणून ठेवला होता, त्यानंतर कठोर कारवाई करणे आवश्यक असताना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. 

आरोग्य विभागाची प्राप्त माहिती एक महिन्यात उष्माघाताने राज्यात एकवीस मृत्यू ! नागरीकांनी काळजी घ्यावी .


मुंबई  (प्रतिनीधी) : यावर्षीच्या उन्हाचा कडाका सर्वाधिक जाणवत असतानाच केवळ एका महिन्यात राज्यात २१ जणांचा  केवळ उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मागील वर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झालेला असताना उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढलेली होती. उन्हाचा कडाका आणि अवकाळी पाऊस, गारपीठ असा सामना करावा लागत असताना अधूनमधून उष्णतेची लाट देखील येत राहिली. उष्णतेच्या लाटेचा विदर्भात अधिक त्रास होत असून अजून मे महिन्याच्या उष्णतेला सामोरे जायचे आहे.

मार्च महिन्यात उष्माघाताचे प्रकार वाढीस लागले आणि उष्माघाताने ३०० पेक्षा अधिक लोक आजारी पडले तर २१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेपासून दक्षता घेण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत होते पण तरीही कष्टकरी माणसाला उन्हात काम केल्याशिवाय पर्याय नसतो आणि अशा घटना घडतात.

उष्माघाताने मृत्यू झालेल्या २१ नागरिकात नागपूरमधील ७ जणांचा समावेश आहे. नागपूर विभागात उष्णतेशी संबंधित रुग्णाची संख्या २६२ वर गेली आहे. जळगाव जिल्ह्यात  ४, अकोला - ३, जालना - २ आणि अमरावती, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात प्रत्येकी एका उष्माघाताच्या बळींची नोंद झाली आहे. मागील वर्षी उष्माघाताने एकही बळी गेला नव्हता परंतु २०१६ ते २०१९ या कालावधीत ४३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मागील महिन्यात उष्णतेचा त्रास होऊन राज्यात ३३८ नागरिक आजारी पडले आहेत यातील अकोला जिल्ह्यात २९, पुणे - २१, नाशिक - १४ औरंगाबाद - १० लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी १ अशा रुग्णांचा समावेश आहे. अजूनही उन्हाची तीव्रता वाढत असून संपूर्ण मे महिना शिल्लक आहे त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून रक्षण करण्याची दक्षता घेणे अत्यावश्यक बनले आहे.

चुकीला माफी नाही ! बोगस मार्क लिस्ट तयार करणाऱ्या शिक्षकाला दंडासह एक वर्षाची कैद.


पुणे (प्रतिनीधी) पुणेच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तृतीय वर्षाचे बनावट गुणपत्रिकेचा आधार घेत मुख्याध्यापकाची पदोन्नती घेऊन 1 लाख 43 हजार 76 रुपयांची शासनाची व संस्थेची फसवणूक

केल्याप्रकरणी तीन हजार रुपये दंड व एक वर्ष कैद अशी शिक्षा न्यायाधीश जी.एम चरणकर यांनी सुनावली. या प्रकरणाची फिर्याद मंगळवेढा येथील श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ या संस्थेचे सचिव काशीनाथ पाथरवट यांनी दिली. सदर संस्थेच्या वतीने 5 शाळा चालवल्या जात असून त्यामधील करमाळा येथे जगदंबा कमलादेवी मूकबधिर मुलांची निवासी शाळा चालविण्यात येत असून

त्या शाळेमध्ये चक्रधर विश्वनाथ पाटील यांची 1999 पासून शिक्षक म्हणून नियुक्ती केली 2004 झाली या शाळेमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त झाल्याने शासनाने पदवीधर शिक्षकांमधून हे पद भरण्यात भरण्याच्या सूचना दिल्यानंतर चक्रधर पाटील यांनी पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले आरसीआय प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला,डीसई प्रमाणपत्र व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेचे मे 2000 सालच्या तृतीय वर्षाच्या गुणपत्रित्राची सत्यप्रत जोडली.

त्यानुसार मुख्याध्यापक पदावर 2004 साली पदोन्नती देण्यात आली मात्र त्यानंतर वरील कागदपत्राबाबत संस्थेचे सचिव काशिनाथ पाथरूट यांना संशय आल्यामुळे सदर प्रमाणपत्राच्या मुख्य प्रतीचे तोंडी व लेखी मागणी केली असता सदर शिक्षकाने दिली नाही.

यावर संस्थेने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडे पडताळणीसाठी अर्ज देऊन माहिती घेतली असता सदरचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे विद्यापीठाने कळविल्यानंतर सदर मुख्याध्यापक म्हणून काम करतानादि.27 जानेवारी 2004 ते 7 मार्च 2007 या कालावधीतील मुख्याध्यापक श्रेणीचा पगार 1 लाख 43 हजार 76 रुपये उचलून शासनाची व संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी सचिव पाथरूड यांनी

सदर शिक्षकावर 420, 468, 471 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याचा निकाल न्यायालयाने तीन वेगवेगळ्या कलमानुसार प्रत्येकी एक हजार रू. दंड व एक वर्षे शिक्षा दिली.

रमजानच्या पवित्र महिण्याचा सारीबा शेख हिचा पहिला रोजा.सामाजिक सलोखा रहावा यासाठी विशेष प्रार्थना.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सारीबा आरेफ शेख हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा शुक्रवारी (दि.२९ एप्रिल) पुर्ण केला. सद्या रमजानचा पवित्र  महिना सुरू आहे. इस्लाम धर्मात रोजा हा विशेष विधी मानला जातो.  
सारीबा शेख हिने वयाच्या नवव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा ठेवला. उन्हाची प्रचंड तीव्रता असताना सारीबा शेख हिने आत्मविश्वास व श्रद्धेने  पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्यातील रोजा ठेवण्यास सुरूवात केली आहे. सामाजिक सलोखा रहावा यासाठी तिने विशेष प्रार्थना केली. कमी वयात रोजा ठेवल्याने तिचे कौतुक होत असून कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे. कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांची सारीबा शेख  ही मुलगी आहे.

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य, ३० एप्रिल २०२२; महत्वाची कामे पुढे ढकला, नोकरीत कामाचा ताण !




मेष- चतुराईने बोलून कामे उरकून घ्या. क्रोधाला आवर घातला पाहिजे. एकदम तडकाफडकी निर्णय घेऊ नका. कुणाचे मन दुखावले जाईल असे शब्द वापरू नका. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. 

वृषभ-महत्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र आपण मुत्सद्दीपणाने वागून मार्ग काढाल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत साधक-बाधक परिस्थिती राहील. काही लोक मदत करतील. योग्य सल्ला मिळेल. आर्थिक आवक मनासारखी राहील. 

मिथुन-नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. उच्चपदस्थ लोकांचे सहकार्य मिळेल. वाहन सुख मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांना यश मिळेल, मनात थोडे काळजीचे विचार राहतील. काही कारणाने प्रवास करावा लागेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. 

कर्क- नोकरीत कामाचा ताण वाढेल. एखादी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र दगदग होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. मुलांची काळजी ग्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. भाग्याची चांगली साथ राहील. 

सिंह- महत्वाच्या कामात सफलता मिळेल. भाग्याची साथ राहील. प्रवास घडू शकतात. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नावलौकीक वाढवणाऱ्या घटना घडतील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. आर्थिक आवक सामान्य राहील. 

कन्या-हितशत्रुंपासून सावध राहा. कामाशी काम ठेवा. महत्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत झेपेल तेवढीच कामे अंगावर घ्या. स्वत:हून जादा कामे ओढवून घेऊ नका. वाहने जपून चालवा. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. 

तूळ-भागिदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. कागदपत्रे वाचून मगच सही करा, जीवनसाथीशी वाद टाळले योग्य ठरेल. सार्वजनिक कार्यात मधुर संभाषण ठेवा. कुणावर टीका करू नका. अन्यथा कटकटी निर्माण होतील. पोटाची काळजी घ्या. हलका आहार घ्या. 

वृश्चिक-महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या यशाच्या वार्ता काळतील. त्यांच्याशी संवाद साधा. चांगल्या घटना घडतील. तरुणांना योग्य संधी मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वाद टाळा. वरिष्ठांना विरोध करू नका. 

धनू-मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्या. घाईघाईत निर्णय घेऊ नका. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने हालचाली होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. घरात सुख समाधान राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी वादविवाद टाळा. 

मकर-नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र तुमच्या कामाचे कौतुक होईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. काही कारणाने गैरसमज होतील. 

कुंभ-धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. एखाद्या व्यवहारात मोठा फायदा होईल. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी संवाद साधा. गैरसमज टाळा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. 

मीन-अनुकूल परिस्थितीचा फायदा घ्या. जीवनसाथीही सूर जुळतील. कायद्याची बंधने पाळा. महत्वाच्या वस्तू, कागदपत्रे नीट ठेवा. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे तपासून घ्या. 

Friday, April 29, 2022

राजेश देशमुख यांच्या वतिने आयोजित रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसाद.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रमजान निमित्त येथील वैद्यनाथ देवस्थान संस्थेचे सचिव राजेश देशमुख यांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या रोजा इफ्तार पार्टीस मोठा प्रतिसाद मिळाला.
शेकडो समाज बांधवांनी यावेळी हजेरी लावली होती. श्री देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांचे राजेश देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी टोपी देवून स्वागत केले.
या रोजा इफ्तार पार्टीस चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी  जाबेरखान पठाण, वहाजोद्दीन मुल्ला, जाफर खॉन गुत्तेदार , मुसा खॉन, सिंकदर पठाण ,प्राचार्य बशीर, काझी आलिशान सर , शेख खदीर सर , खालेद सर ,जाहीगीर सर , चाँद खॉन, शेख जाहेद सर, मुसा खॉन, जमिल अध्यक्ष , हसनखान, समंदरखा पठाण, एतेशाम सिद्दिकी, आसरार सर ,सय्यद खदूस , मजास इनामदार आरबार खाँन, शेख मुजिब , शेख जीलानी, शेख आयुब , शेख तुराफ पटेल , मोहबत (पापा) खाँन ,यांच्यासह डॉ. सुरेश चौधरी,दत्ताप्पा ईटके , बाजीराव भैय्या धर्माअधिकारी, गिरडे साहेब, डॉ.सुर्यकांत मुंडे वैजनाथ जगतकर, निळकंठ चाटे , प्रा.पवन मुंडे, सुरेश टाक, राजेंद्र सोनी , वैजनाथराव सोळंके , शांतीलाल जैन ,रविंद्र परदेशी नंदु तोतला, प्रकाश जोशी, प्रदीपराव देशमुख, बाबुराव मेनकुदळे ,अनिल तांदळे, डॉ.गुरूप्रसाद देशपांडे, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, नागनाथराव देशमुख, तानाजी देशमुख , ओपळे राजेश तिळकरी,शाम गडेकर यांच्यासह नागरिक, पत्रकार, वकील, व्यापारी उपस्थित होते.

भिंतीखाली दबून बालिकेचा मृत्यू प्रकरणी. माजलगाव न.प. मुख्याधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल.





माजलगाव (प्रतिनिधी) -: नगर परिषदेच्या जेसीबी मशीनने पाडलेल्या संरक्षक भिंतीखाली दबून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. 28) माजलगाव मधील इदगाह मैदानावर घडली होती. याप्रकरणी माजलगाव न.प. मुख्याधिकारी विशाल भोसले, स्वच्छता विभाग प्रमुख जगदीश जाधवर, स्वच्छता कंत्राटदार, जेसीबीचा चालक आणि मालक अशा पाच जणांवर हयगयीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याने 279,304,अ 34,134, प्रमाणे
 गुन्हा दाखल झाला आहे.ईकरा सय्यद निसार (वय ६) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील सय्यद निसार सय्यद नूर यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी दुपारी ईकरा खेळण्यासाठी इदगाह मैदानात गेली होती. साडेचार वाजताच्या सुमारास नगर पालिकेने पाठविलेल्या जेसीबीचा ऑपरेटर महादेव अण्णासाहेब जाधव (रा. गौतमनगर, माजलगाव) हा कोणतीही पूर्व कल्पना न देता त्या ठिकाणी जेसीबी घेऊन आला. काम करताना देखरेख ठेवण्यासाठी सोबत कोणीही नसताना आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करता त्याने स्वच्छतेचे काम करण्यास सुरुवात केली. यावेळी तो मागेपुढे न पाहता निष्काळजीपणे जेसीबी चालवत होता. त्यामुळे जेसीबीच्या धक्क्याने संरक्षक भिंत पडली. नेमके त्याच वेळी तिथून घराकडे निघालेल्या ईकराच्या अनावर ही भिंत पडली आणि त्याखाली दबून तिचा जागीच मृत्यू झाला होता. 

आय.पी.एस पंकज कुमावत यांच्या पथकाने परळीत केली गुटक्यावर मोठी कारवाई! लाखोचा गुटखा केला जप्त.


*लाखोच्या गुटक्यासह दोन आरोपीवर केला गुन्हा दाखल!

*अवैध धंद्यावाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले!


परळी वैजनाथ (प्रतिनीधी)आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने काल रात्री 8-30 वाजण्याच्या सुमारास अवैध धंद्यावर धडक कारवाया केल्या. यामध्ये परळीतून सव्वा लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 28 एप्रिल रोजी 8-30 वा. जलालपुर रोड विद्यानगर परळी येथील एका दुकानात 126653 रुपयाचा गुटखा व तत्सम माल मिळुन आला. यातील आरोपीने स्वतःचे फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीररीत्या महाराष्ट्र राज्यात आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही गोवा गुटखा, विमला पानमसाला, बाबा, नवरतन, आरएमडी सुगंधी तबांखु, राजनिवास गुटख्याचा माल चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगला. या मुद्देमालाची किमंत 126653/- रुपये आहे. आरोपी मालासह मिळुन आला म्हणुन त्यास हा माल कोठुन व कोणाकडुन आणला याबाबत विचारना केली असता आरोपीच्या सांगण्यावरून गुटका किंग अल्ताप पठाण रा.परळी याच्याकडुन आणल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधित दोन आरोपी विरुद्ध आयपीएस पंकज कुमावत पथकाचे पोलीस हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गु.रनं 84/ 2022 कलम 328,272,273 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास सपोनि सपकाळ हे करीत आहेत.
मात्र या कारवाई ने अवैध धंदे करणाऱ्या माफियांच्या मात्र धाबे चांगलेच दणाणले असल्याचे परळी शहरात चर्चा सुरू आहेत.
तर गुटका किंग अल्ताब पठाण व त्याचे साथीदार खुले आम परळी शहरात फिरत असून त्यांना का ताब्यात घेतले जात नाही असा सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे

मनसेचे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी आवाज उठवताच थांबविल्या गेलं चालू रस्त्याचं बोगस काम.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पावरलुम सोसायटी, इंडस्ट्रीयल एरिया समोरील माॅ साहेब ठाकरे चौक ते दोस्ती टी हाऊस हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा व सतत ची रहदारी असलेला 350 मीटर लांबीच्या ह्या सिमेंट रस्त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर असून
ह्या रस्त्याचं उद्घाटन होऊन जवळ जवळ एक वर्ष होत आहे.
 पण संबंधित रस्त्याचं कामं कासवं गतीने सुरू आहे या बद्दल मनसेच्या वतीने या पुर्वी निवेदन देऊन काम दर्जेदार आणि लवकर पुर्ण करा अशी विनंती करण्यात आली होती पण नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्त्याचं काम संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने मनसेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज रोजी सुरू करण्यात आले परंतु काम सुरू करण्यात आले तेंव्हा ना नगर परिषदेचा नगर रचनाकार उपस्थित होता ना संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीचा, 
रस्त्याचं काम चालू करण्या पूर्वी ना रोलींग, ना प्रेसींग, ना वाॅटर क्युरींग करता रस्त्यावर पि.सी.सी.काम चालू केले,
हा सर्व प्रकार मनसे चे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नजरेस येताच त्यांनी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गुत्तेदारास चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली तात्काळ मनसेच्या शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भाऊ दहीवाळ, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण, सुमित कलशेट्टे, गणेश गित्ते, यांना बोलावून चालू असलेल्या रस्त्याच्या बोगस कामा बद्दल निदर्शनास आणून दिले व नगर परिषदेच्या नगर रचनाकार बेंडले साहेबांनी यांच्या सुचणे वरून दुरकर साहेब स्पाॅट वर दाखल होऊन चालु असलेल बोगस काम तातडीने थांबवलं व रस्त्याचं काम दर्जेदार व वाळू वापरून न केल्यास संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात सादर "या’ महिन्यात निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता.


मुंबई  :- राज्यातील अनेक महापालिकांच्या मुदत संपल्याने प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतींच्याही मुदती संपल्या आहेत. पण ओबीसी आरक्षण व इतर कारणांमुळे अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. पण राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात सादर केले आहे. याठिकाणी निवडणुकीची प्रक्रिया तातडीने पूर्ण केल्यास महापालिका निवडणुका 17 जून, नगर पालिका निवडणुका 22 जून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 11 जुलै तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका 2 जुलै रोजी घेणे शक्य असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

आयोगाकडून पावसाळ्यातही निवडणुका घेण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.आयोगाने थेट वेळापत्रकच सर्वोच्च न्यायालयात Supreme court सादर केल्याने आता लवकरच निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. या प्रतित्रापत्राच्या अनुषंगाने न्यायालयात येत्या चार मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी प्रतिवादी राज्य शासन, राज्य निवडणूक आयोगाची पुढील सुनावणीची किंवा मुदतवाढीची विनंती मान्य करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार, यावर निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

राज्य सरकारने 11 मार्च रोजी प्रभागरचनेचे अधिकार स्वतःकडे ठेवणारा कायदा मंजूर केला आहे. त्याला औरंगाबादच्या पवन शिंदे आणि इतरांनी आव्हान दिलं आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांच्या तारखांबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांबाबत येत्या चार मे रोजी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ब्रेकिंग न्युज! अखेर औरंगाबादच्या ‘राज’ सभेला परवानगी! ‘या’ अटी-शर्थींसह होणार राज ठाकरेंची सभा..?


राज्यभरात चर्चा होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या जाहीर सभेला पोलिसांची परवानगी मिळावी यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून आज सकाळपासून हालचाली सुरू झाल्या असून, आज (ता. 28) दुपारी बारा वाजेच्या जवळपास राज ठाकरे यांच्या सभेचे परवानगीपत्रक मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.


सभेला परवानगी देताना अटी आणि शर्थी?

राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेसाठी पोलीस प्रशासन अटी आणि शर्थीसह परवानगी देणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोलिसांच्या अटी-शर्थी मान्य करून सभा घेणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न चालू आहेत. या सभेला लाखोंचा समुदाय जमू शकतो, असं अंदाज वर्तवला जात आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे 1 मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना काही आवाहन करतील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची  येत्या 1 मे रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सभेच्या परवानगीसाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचं पत्रक जारी केलं जाऊ शकतं. पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केल्याचा समजतोय. राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण करून नये, यासाठी पोलीस त्यांना नोटिसही बजावण्याची शक्यता आहे. पण नोटीस स्वीकारून राज ठाकरे अटी मान्य करतील का, हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. दुसरीकडे मात्र मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत सभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.

सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्थी..


1) सभेला येणार्‍या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल.

2) 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये

3) सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये

4) लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी

5) सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये.

6) इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

7) सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही.

8) व्यक्ती किंवा समुदायाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.

9) सभेपूर्वी आणि सभेनंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही.

10) वाहन पार्किंगचे नियम पाळावे

वंचित बहुजन आघाडी आयोजित शांतता व सद्दभावणा रॅलीत सहभागी व्हावे.

  

* 1 मे रोजी बीड शहरात आयोजन.

बीड (प्रतिनिधि) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्षा श्रीमती रेखाताई ठाकूर यांच्या आव्हाना नुसार महाराष्ट्रात शांतता, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यासाठी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर दि. 1/5/2022 रोजी शांतता रॅली काढण्यात येणार आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी बीड पश्चिम च्या वतिने देखील बीड शहरात सायंकाळी 7 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शांतता रॅली निघणार आहे तरी आपण जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी या शांतता रॅली मध्ये आपण आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सहभागी व्हावे आसे अवहान अशोक हिंगे मराठवाडा अध्यक्ष उद्धव खाडे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर,पुष्पाताई तुरूकमारे, जिल्हा महासचिव युनुस शेख,पुरूषोत्तम वीर, दगडु गायकवाड,अनंतराव सरवदे केले आहे.

हवामान खात्याने अलर्ट जारी पुढील पाच दिवस उन्हाचा कडाका आणखी वाढणार.


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार , तूर्तास तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही . हवामान खात्याने अलर्ट जारी करत पुढील 5 दिवसात उष्णतेचा विक्रमही मोडला जाऊ शकतो . अनेक राज्यांमध्ये तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे .

 हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रमधील विदर्भ , राजस्थान आणि मध्य प्रदेशात पुढील 5 दिवस कडक ऊन पडणार आहे . 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान पंजाब , हरियाणा - चंडीगड आणि दिल्लीमध्येही उष्णतेचे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात . बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .

28 एप्रिल ते 1 मे दरम्यान पंजाब , हरियाणा - चंडीगड आणि दिल्लीमध्येही उष्णतेचे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात . बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . छत्तीसगड आणि गुजरातमध्येही पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे . येत्या पाच दिवसात वायव्य भारतात तापमान 4 ते 5 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे . पूर्व भारतातही उष्णता वाढणार आहे .

Thursday, April 28, 2022

धक्कादायक! इंजिनिअर मुलाने आईचा खून करून, केली आत्महत्या!



नागपूर (प्रतिनीधी) जन्मदात्या मुलाने आपल्या आईचा चाकूने वार करून खून करुन स्वतः विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपुरच्या हिंदुस्तान कॉलनी मध्ये २६ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडल्याचे समोर आली आहे. श्रीनिवास विष्णू चोपडे, वय ५१ वर्ष असे मुलाचे नाव असून लीला विष्णू चोपडे, (वय ७५) वर्ष असे त्याच्या आईचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, , नागपुरातील हिंदुस्तान कॉलनीमध्ये असलेल्या या मोठ्या घरात श्रीनिवास आपल्या आईसोबत राहत होता. श्रीनिवास हा इंजिनिअर असून त्याने लग्न केलेले नव्हते, तो नोकरी सुद्धा करत नव्हता. इतक्या मोठ्या घरात दोघेच आई, मुलगा राहत होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे आणि मोबाईल बंद असल्यामुळे नातेवाईकांनी घरी धाव घेतली. सर्व बाजूंनी आत मधून कुलूप लागलेले असल्यामुळे नातेवाईकांचा संशय वाढला,व नातेवाइकांनी धंतोली पोलीस ठाण्यात याची माहिती दिली

धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे आपल्या ताफ्यासह २६ एप्रिल च्या रात्री घटनास्थळी पोहोचले, घर आतून कुलूप बंद असल्यामुळे मुख्य दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा श्रीनिवास आणि त्याच्या आईचा मृतदेह हा चार ते पाच दिवसापूर्वीचा असून कुजलेल्या अवस्थेत बेडरूम मध्ये आढळून आला. श्रीनिवास याने आत्मघातकी पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही

दरम्यान सदर घटनेचा तपास पोलीस करत असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपुरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे.

नागरिकांनो सावधान!भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने हाती घेतली 'ही' धडक मोहीम.



वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे

तर दुसरीकडे अनेक आकडेबहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात; त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी, महावितरणने या आकडे बहाद्दरांना अद्दल घडविण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात सोलापूर जिल्ह्यासह बारामती परिमंडळातील हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत

तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी २४५०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. ही मागणी टिकून असली तरी यात वाढ होतच आहे. खुल्या बाजारात विजेचे दर १२ रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार आहे. ती कमीत कमी घेता यावी यासाठी यंत्रणेवरील अनधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत

आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० अॅम्पीअरच्या पुढे आहे अशा ३९८ न्या बारामती परिमंडलात आहेत. त्यांना टार्गेट करून सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अनधिकृतपणे जोडलेले कृषीपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा काढले जात आहेत.

परळी तालुक्यातील मिरवट येथे विवाहिततेवर सामूहिक बलात्कार .परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल.

परळी वैजनाथ (प्रतिनीधी ): गेल्या चार दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावातील 24 वर्षीय विवाहितेवर, चुलत पुतण्यासह गावातीलच चार जणांनी सामूहिक बलात्कार  केल्याची घटना घडली होती. त्यातच परळी तालुक्यातील मिरवट येथे एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि मारोती मुंडे हे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीसा कडून प्राप्त माहिती अशी की, मिरवट गावातील 22 पिडीत महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. काल पीडिता आपल्या शेतातील घरालगत शेतात काम करत होती. यादरम्यान अंगद केशव भदाडे वय 40 रा. मिरवट व साजन तिडके वय 30 रा. भोगलवाडी, या नराधम आरोपींनी पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तर याबाबद कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी 22 वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात नराधम आरोपिंविरोधात 376 (ड), 323, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या 3 तासात नराधम आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

शिवप्रतिष्ठाण चे प्रमुख संभाजी भिडे रुग्णालयात दाखल.भारती हाॕस्पिटलमध्ये उपचार सुरु

 

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. गणपती मंदिरात जात असताना त्यांना चक्कर आली. आणि ते सायकल वरून खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संभाजी भिडे हे नेहमीच सायकलवरून प्रवास करत असतात. आजही नेहमी प्रमाणे ते सायंकाळच्या सुमारास शहरातल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी जात होते, दरम्यान काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपण चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले.

ही घटना आसपासच्या लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ धाव घेत संभाजी भिडे यांना सावरले. काही क्षणात भिडे गुरुजी उठून बसले. मात्र, या अपघातामध्ये त्यांच्या खुब्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच अनेक धारकऱ्यांना गणपती मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी केली होती. यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, भिडे यांचे वय लक्षात घेता त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत.

15 राज्यांमध्ये वीजसंकटामध्ये अनेक राज्ये विजेच्या भारनियमनाला तोंड देत.

 

कोळसा टंचाई व इतर कारणांमुळे देशव्यापी वीजसंकटामध्ये अनेक राज्ये विजेच्या भारनियमनाला तोंड देत आहेत. भारनियमन करीत असलेल्या राज्यांची संख्या दोन दिवसांमध्ये 10 वरून 15 वर गेली आहे. मात्र, महावितरणच्या प्रभावी नियोजन व उपाययोजनांमुळे राज्यातील भारनियमन पूर्णतः आटोक्यात आहे. त्यामुळे गेल्या शुक्रवारी मध्यरात्रीपासून महावितरणने सर्वच वीजवाहिन्यांवर तसेच कृषिपंपांना वेळापत्रकानुसार दिवसा व रात्री 8 तास अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. अखंडित वीजपुरवठ्याची ही परिस्थिती बुधवारी देखील कायम होती व कुठेही भारनियमन करण्यात आले नाही.

प्रामुख्याने कोळसा टंचाईसह इतर विविध कारणांमुळे विजेचे संकट सध्या देशव्यापी झाले आहे. कमी अधिक प्रमाणात देशातील अनेक राज्यांना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून विविध स्त्रोत व वीज निर्मिती कंपन्यांकडून किती प्रमाणात वीज उपलब्ध होत आहे. यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

कोणत्याही क्षणाला विजेची तूट निर्माण होत असल्याची स्थिती दिसून येताच पर्यायी वीज उपलब्ध करून भारनियमन टाळण्यात महावितरणला यश येत आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून (दि. 22) बुधवारपर्यंत (दि. 27) महावितरणने राज्यात सर्व वीजवाहिन्यांवर अखंडित व सुरळीत वीजपुरवठा केला आहे. यापुढेही विजेची पुरेशी उपलब्धता व भार व्यवस्थापनाद्वारे कुठेही विजेचे भारनियमन करावे लागणार नाही. यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

याउलट देशातील वीज संकट अधिकच गडद झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. राष्ट्रीय भार प्रेषण केंद्राच्या आकडेवारीनुसार सोमवारी (दि. 25) देशातील राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा आदींसह 10 राज्यांमध्ये साधारणतः 9 ते 15 टक्क्यांपर्यंत विजेची तूट असल्यामुळे विजेचे भारनियमन करावे लागले. मात्र, मंगळवारी (दि. 26) विजेची तूट असलेल्या राज्यांची संख्या 10 वरून 15 झाली आहे. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, झारखंड, पंजाब, आंध्र प्रदेश, ओरिसा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, केरळ, आसाम, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. तथापि, देशात सर्वाधिक 27 हजार 834 मेगावॅट विजेचा पुरवठा करताना महाराष्ट्रात मात्र कुठेही भारनियमन करावे लागले नाही, हे विशेष. यामध्ये मुंबई वगळून उर्वरित राज्यात महावितरणने मागणीप्रमाणे केलेल्या 23 हजार 794 मेगावॅट अखंडित वीजपुरवठ्याचा समावेश आहे.

एकीकडे देशातील 15 राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचे संकट असताना महाराष्ट्रात अत्यंत दिलासादायक स्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव (ऊर्जा) श्री.दिनेश वाघमारे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या एकत्रित प्रयत्न व पाठपुराव्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज संकटाची स्थिती लवकरच नियंत्रणात आली आहे. तसेच तातडीच्या उपायांनी पुरेशी वीज उपलब्ध करीत भारनियमन शून्यावर आणण्याची कामगिरी महाराष्ट्राने करून दाखविली आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याचे वीज संकट पूर्णतः दूर होईपर्यंत यापुढेही महाराष्ट्रामध्ये भारनियमन टाळण्याचे महावितरणकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

Wednesday, April 27, 2022

पंतप्रधान मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं.दिली कर्नाटक आणी गुजरात ची उदाहरणं


 देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत नरेंद्र मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं आहे. मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावच घेतली आणि खडे बोल सुनावले. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

“इंधनाच्या वाढत्या दरांचं ओझं देशवासियांवर पडू नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अबकारी कर कमी केला होता. केंद्राने राज्यांनाही कर कमी करत नागरिकांना याचा फायदा द्यावा असं आवाहन केलं होतं. काही राज्यांना केंद्र सरकारची भावना लक्षात घेत कर कमी केला. पण काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. यामुळे या राज्यांमध्ये इंधनाचे दर इतरांच्या तुलनेत जास्त आहेत. हा एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहेच, मात्र शेजारच्या राज्यांचंही नुकसान करत आहे,” असं सांगताना नरेंद्र मोदींनी कर्नाटक आणि गुजरातची उदाहरणं दिली.

“नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी काही राज्यांनी व्हॅट कमी केला. कर्नाटक आणि गुजरात जवळच्या काही राज्यांनी साडे तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये कमावले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी सर्वांना व्हॅट कमी करण्यासाठी विनंती केली होती. मी कोणावर टीका करत नसून विनंती करत आहे. त्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे.

तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकलं नाही आणि त्यांच्या राज्यातील नागरिकांवरील ओझं कायम राहिलं. या राज्यांनी किती महसूल कमावला हे मला सांगायचं नाही. पण आता देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी करत लोकांना याचा लाभ दिला पाहिजे,” असा सल्ला यावेळी नरेंद्र मोदींनी दिला. कोलकाता , हैद्राबाद, चैन्नई, मुंबई, जयपुर येथे इंधनाचे दर जास्त आहेत. दीवदमण मध्ये दर कमी आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी करा ही विनंती आहे असं मोदींनी सांगितलं.

कोरोना स्थितीवर आरोग्यमंत्री टोपेंचे मोठे विधान.गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचा विचार .


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्याशी आज कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले. राज्यात सध्या 25 हजार कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात सध्या कोरोनाची काळजी सारखी परिस्थिती नसल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. आवश्यकता भासल्यास गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती होऊ शकते, असेही राजेश टोपे म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्या वाढवण्यात येणार आहे. राज्यात सध्या 25 हजार चाचण्या सुरू आहेत. राज्यात घाबरण्यासारखी परिस्थिती नसून नवे व्हेरियंट सुद्धा हे ओमायक्रॉनचाच भाग आहे. राज्यात कोरोना रुग्णांची चिंता करण्याची कोणतीही गरज नाही, असे राजेश टोपे म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.

गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक होऊ शकतात असा निर्णय आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घेतला जाऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील. असे टोपे म्हणाले. गुढीपाडव्याला राज्यातील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार मास्कबंदी देखील करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या तीन आठवड्यानंतर पुन्हा राज्यात मास्कसक्ती करण्याच्या निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर निर्बंध आणि मास्कसक्तीवर निर्णय घेतला जाणार आहे.

अ.भा. वारकरी महिला मंडळाची रविवारी महत्वपूर्ण बैठक.बैठकीस सर्व महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.

*तालुकाध्यक्षा राधिकाताई जायभाये व शहराध्यक्षा सौ सुरेखाताई मेनकुदळे यांचे आवाहन.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अखिल भारतीय वारकरी महिला मंडळ परळी तालुका व शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 1 मे रोजी सकाळी अकरा वाजता श्री जगमित्र नागा मंदिर येथे होणार असून या बैठकीस परळी तालुका व शहरातील सर्व वारकरी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सभा वारकरी मंडळाच्या तालुकाध्यक्षा सौ राधिकाताई जायभाये व शहराध्यक्ष सौ सुरेखा ताई मेनकुदळे यांनी केली आहे.

रविवार दिनांक 1 मे रोजी सकाळी अकरा वाजता श्री जगमित्र नागा मंदिर परळी येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह-भ-प श्री प्रकाश महाराज बोधले राज्य उपाध्यक्ष ह-भ-प श्री रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली परळी तालुका व शहर वारकरी महिला मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार असून परळी तालुका व शहरातील सर्व वारकरी महिला मंडळाच्या अध्यक्षा पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्षा सौ राधिका ताई जायभाये शहराध्यक्ष सुरेखाताई मेनकुदळे यांनी केले आहे.

रमजान ईद व लाऊड स्पीकरच्या संदर्भात परळी शहर पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी ):
 परळी शहर पोलीस ठाणे येथे रमजान ईद व लाऊड स्पीकरच्या संदर्भात शांतता कमिटीची बैठक दि. 27 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1.30 वा. संपन्न झाली. या शांतता कमिटीच्या बैठकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुस्लिम धर्मीयांचा पवित्र अशा रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. होते. या बैठकीस शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, आदींनी मार्गदर्शन केले. या बैठकीत मुस्लिम बांधवांनी लाऊड स्पीकर व आवाजा संदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना पोलिस प्रशासनाच्या वतीने उत्तरे देण्यात आली.

यावेळी पीएसआय चाँद मेंडके, एपीआय भार्गव सपकाळ, पो.ना.समाधान भाजीभाकरे, पो.ना.रुपेश शिंदे आदीसह पोलीस बांधव उपस्थित होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे व संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद शांततेत पार पाडावे, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.