Monday, April 25, 2022

सूर्यकांत विश्वासराव हे मराठवाडा शिक्षक संघाचे औरंगाबाद शिक्षक मतदार संघातील उमेदवार.परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा.

--- 
*जुनी पेन्शन व शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-मराठवाडा शिक्षक मतदार संघात मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून संघाचे अध्यक्ष नांदेडचे  सूर्यकांत विश्वासराव असणार असल्याची घोषणा शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीने परळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक पी.एस.घाडगे सर यांनी केली.

            दहा एप्रिल रोजी बीड येथे झालेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्र कार्यकारिणी बैठकीत आगामी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाचे संघटनेचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.  त्यासाठी पी.एस.घाडगे,  व्ही. जी. पवार आणि बी.टी. सांगळे यांची निवडसमिती निवडण्यात आली होती. या समितीकडे सूर्यकांत विश्वासराव यांचा एकमेव अर्ज आला होता. रविवारी ( दि.२४) रोजी परळी येथील कॉ.वैजेनाथराव भोसले सभागृहात मराठवाडा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष,शिक्षक संघाच्या उमेदवार निवड समितीचे प्रमुख तथा शिक्षक संघाच्या सल्लागार मंडळाचे  सदस्य पी.एस.घाडगे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठवाडा शिक्षक संघाच्या कार्यकारणीच्या बैठकीत सुर्यकांत विश्वासराव यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. विश्वासराव यांचे आतापर्यंतच्या संघटनेतील कार्याचे योगदान व कामकाजावर चर्चा/ विचार विनिमय होऊन कार्यकारिणीने एकमताने विश्वासराव यांच्या उमेदवारीस मान्यता दिली आणि राजकीय पक्षाच्या घश्यात गेलेला शिक्षकांचा हक्काचा मतदार संघ परत मिळवायचाच असा निर्धार कार्यकारणीने केला. सर्वांना जुनी पेन्शन व विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळा शंभर टक्के अनुदान मिळवण्यासाठी लवकरच रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

    त्या नंतर मराठावाडा शिक्षक संघाचे तथा उमेदवार निवड समितीचे प्रमुख व शिक्षक संघाच्या सल्लागार मंडळाचे प्रमुख सदस्य पी.एस.घाडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुर्यकांतराव विश्वासराव यांच्या नावाची मराठवाडा शिक्षक संघाचे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. या पत्रकार परिषदेस मार्गदर्शक मंडळाचे तथा निवड समितीचे सदस्य बी.टी.सांगळे, उमेदवार सुर्यकांत विश्वासराव, शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम, सहसचिव टी.जी.पवार, कार्यकारणी सदस्य अशोक मस्कले, बंडू अघाव, सुर्यवंशी आर.एन.,पाटोदेकर ए.डी.,कौशल्य जी.पी.,सौ.रेखा सोळुंके उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पी.एस.घाडगे, उमेदवार सुर्यकांत विश्वासराव, राजकुमार यांनी संघटनेची आतापर्यंतच्या वाटचालीची व केलेल्या कार्याची तसेच आगामी काळातील शिक्षकांच्या प्रश्नावर करावयाच्या आंदोलनाची, संघटनेच्या ध्येय धोरणाची भुमिका विशद केली.संघटनेचे शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले स्व.आमदार राजाभाऊ उदगीरकर, पी.जी.दस्तुरकर, प.म.पाटील यांनी विधिमंडळात व आंदोलनातून शिक्षक व शिक्षणा संदर्भात केलेल्या कार्याचा आढावा पत्रकारा समोर मांडला. व या मतदार संघात संघटनेचाच आमदार आसणे किती गरजेचा आहे ते सांगितले. 
शेवटी कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी पत्रकार बांधवांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment