परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सारीबा आरेफ शेख हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा शुक्रवारी (दि.२९ एप्रिल) पुर्ण केला. सद्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. इस्लाम धर्मात रोजा हा विशेष विधी मानला जातो.
सारीबा शेख हिने वयाच्या नवव्या वर्षी जीवनातील पहिला रोजा ठेवला. उन्हाची प्रचंड तीव्रता असताना सारीबा शेख हिने आत्मविश्वास व श्रद्धेने पहिला रोजा ठेवून आपल्या आयुष्यातील रोजा ठेवण्यास सुरूवात केली आहे. सामाजिक सलोखा रहावा यासाठी तिने विशेष प्रार्थना केली. कमी वयात रोजा ठेवल्याने तिचे कौतुक होत असून कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे. कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांची सारीबा शेख ही मुलगी आहे.
No comments:
Post a Comment