
*जाहीर कार्यक्रमात हिंदू व ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या.
केज ( प्रतिनिधी ) अमोल मिटकरी यांनी हिंदू परंपरा चा व ब्राह्मण पुरोहिताचा द्वेषपुर्वक उल्लेख करून हिंदू व ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करत आमदारकी रद्द करणे साठी तहसिलदार यांना समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिले.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर येथे एका राजकीय कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह हजारो जनसमुदायासमोर अमोल मिटकरी जे विधान परिषद सदस्य आहेत यांनी हिंदू परंपरा व ब्राह्मण पुरोहित यांच्या संदर्भात जाणीवपूर्वक चुकीचे विधान करून हिंदू धर्मियांच्या व ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळे अमोल मिटकरी यांच्या वर कठोर कारवाई करावी व भारतीय राज्य घटनेनुसार शपथ घेतली असतानाही सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्य केले आहेत व अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील व धनंजय मुंडे हसुन दाद देताना संपूर्ण जगाने पाहिले आहे .
अन्यथा जशास तसे उत्तर देऊन लोकशाही पध्दतीने आम्ही अमोल मिटकरी विरोधात आंदोलन करु यासाठी सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार , अमोल मिटकरीचा पक्ष , संघटना जबाबदार असेल याची नोंद घ्यावी व सामाजिक सलोखा अबाधीत रहावा यासाठी कारवाई करण्याची मागणी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने नायब तहसिलदार श्री लक्ष्मण धस यांच्या कडे दिले.
यावेळी श्रीनिवास केजकर , श्रीधर खोत , धनंजय कुलकर्णी , अदित्य विडेकर , अतुल मुथळे , महेश कुलकर्णी , व्यंकटेश महाजन , दशरथ चवरे आदीच्या निवेदनावर सह्या आहेत.
No comments:
Post a Comment