Thursday, April 21, 2022

सक्तीच्या रजेवर पाठविलेले बीड जिल्ह्याचे वादग्रस्त पोलिस अधीक्षक आर राजांची बदली.


*उस्मानाबादला अक्षय शिंदे, जालन्यात अतूल कूलकर्णी नवे पोलीस अधीक्षक.

बीड (प्रतिनीधी)- जिल्ह्यातील कायदा व सूव्यवस्था बिघडल्यामुळे पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या विरोधात विधीमंडळात लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली होती . त्यानंतर आर राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात होते. बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश आले असून पुणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे‌.

               आज राज्यातील जवळपास 22 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.यात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, पुणे व नागपूरचा समावेश आहे.नागपूर शहराचे पोलिस उपायुक्त अक्षय अशोक शिंदे यांची उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
चंद्रपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल व्ही. कुलकर्णी यांची जालन्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
नागपूर शहराचे पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांची औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निमित गोयल यांची रा.रा. पोलिस बल गट क्र. 14 औरंगाबादच्या समादेशकपदी बदली करण्यात आली. बदली आदेशाधीन लता फड यांना पुण्याच्या मा.मार्ग पोलिस अधीक्षकपदी पदस्थापना मिळाली आहे.बीडचे वादग्रस्त पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांची पुणे शहर पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.बीडच्या
रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरण , तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे , अवैध वाळू उत्खनन यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी विधिमंडळामध्ये राजा रामा स्वामीराजा रामा स्वामी यांच्या विरोधात आवाज उठवला. तसेच बीडचा बिहार झाल्याच्याही प्रतिक्रिया उमटत होत्या . त्यानंतर पोलीस अधीक्षक आर राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. आता बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment