Saturday, October 29, 2022

परळी च्या भूमीपूत्रांची आशी ही दिवाळी.परळीचे डाॅ.रविंद्र जगतकर यांची सामाजिक बांधिलकी.

*स्वखर्चाने आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतीराव फूले  जन योजनेचे मार्गदर्शनासह कार्डचे वाटप*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांनी सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा" मानत कार्य करत आहेत. त्यांनी दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी आल्या नंतर तालुक्यातील मांडवा, मालेवाडी, मालेवाडी तांडा येथील नागरिकांचे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजनाबद्दल माहिती, नाव नोंदणीसह कार्डचे स्व; खर्चातून वाटप करून सामाजिक बांधीलक जपली आहे.  यामाध्यमातून दोन्ही योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच त्यांनी अशा प्रकारे समाजसेवा करून अगळी वेगळी दिवाळी साजरी केली.
      परळीचे भूमिपुत्र, ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर हे आपल्या गावी आल्यानंतर त्यांनी आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील तपासणी केल्यानंतर येथील गावकऱ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजना आशा काही सरकारी योजनांचे लाभ मिळत नाहीत हे लक्षात घेताच डाॅ. रविंद्र प्रकाश जगतकर यांनी परळी तालुक्यातील विविध ग्रामीण भागात योजनेची माहिती व आयुष्यमान भारत कार्ड वाटप कॅम्पचे आयोजन करून नागरिकांचे 5 लाखाचे सरकारी इंश्योरेंसचे कार्ड वाटप केले.
       महात्मा जोतिराव फूले जन आरोग्य योजनां व आपले पिवळे, आणि केशरी राशन कार्ड हेच आपले दीड लाखाचे  हेल्थ इंश्योरेंस आहे आशी माहीती डॉ. रवींद्र प्रकाश जगतकर यांनी गावातील ग्राम स्थाना दिली. त्यांनी स्व-खर्चातून लोकांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड वाटप केले. तसेच त्यांनी तालुक्यातील नागरिकांनी शासकीय योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. दिवाळीच्या सुट्टीत ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर हे आपल्या गावी आल्या नंतर रुग्णसेवा व समाजसेवा करून सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून "रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा" मानत त्याच्या या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे.

सरदार वल्लभभाई पटेल जन्म दिवसा निमित्त 31 ऑक्टोबर रोजीच्या राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी होण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन. .

बीड,  (जि.मा.का.) :- सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर हा जन्म दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.  बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7:30 वाजता राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. तरी क्रिडाप्रेमी नागरिक, युवक व विद्यार्थ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी केले आहे. 
        राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रती वर्षी जिल्हास्तरावर " राष्ट्रीय एकता दौड " ( UNITY RUN ) चे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येते. बीड येथील या एकता दौडचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक- बस स्टँड- शाहीर अणाभाऊ साठे चौक- जालना रोड मार्गे असा राहील. एकता दौडचा समारोप कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे संपन्न होणार आहे. या एकता दौडमध्ये बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रिडा प्रेमी नागरिक,  शासकीय निमशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध एकविध खेळ संघटना, क्रीडा, युवक, महिला मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, इतर विविध संघटना, खेळाडू, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सहभागी होऊन राष्ट्रीय एकता दौड यशस्वी करावी.

आ.संदीप क्षीरसागर यांनी केली नगर रोडवरील रस्ते बुजविण्यास सुरूवात.


*राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर रस्ताकामासही प्रत्यक्षात सुरूवात. 

बीड (प्रतिनिधी) बीड शहरासह जिल्हाभराच्या दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या नगर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचे काम तांत्रिक बाबींमध्ये अडकल्याने व न्यायालयात प्रकरण चालू असल्याने अडकले आहे. काम सुरू करण्यास उशीर होत आहे. तसेच दिवसेंदिवस रस्त्याची अवस्थाही बिघडत चालली आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांना होणारा असह्य त्रास कमी करण्यासाठी तात्काळ पाऊले उचलत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. तसेच शहरातील वाहतूकीच्या अनुषंगाने मुख्य असलेल्या बायपास टू बायपास रस्त्यातंर्गत असलेल्या राष्ट्रवादी भवन ते सोमेश्वर मंदीर पर्यंतच्या रस्ताकामालाही प्रत्यक्षात सुरूवात केली.

दोन अल्पवयीन मित्रांच्या अपहरण प्रकरणी अज्ञात व्यक्तीं विरूद्ध गुन्हा दाखल.

केज (प्रतिनिधी) दोन अल्पवयीन मित्रांचे अपहरण अज्ञात व्यक्तीने केल्याची घटना मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मस्साजोग येथे घडली
अपहरण झालेल्या दोन मित्रांची सुमित विकास रोडे रा.मस्साजोग आणि  गोविंद आश्रुबा पाळवदे रा. सासुरा,अशी नाव आहेत.मंगळवारी दूपारी 4 वाजता या दोघांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलाचे वडील विकास लिंबाजी रोडे यांनी तक्रार नोंदवली आहे. या अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुरूवारी 27 आक्टोबर रोजीकेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अज्ञात व्यक्तिंविरूद्ध गु. र. न.492/2022 भा. दं. वि. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

आता मातृभाषेतून मिळणार वैद्यकीय शिक्षण — वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


मुंबई — महाराष्ट्रात आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. 2023 या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

एमबीबीएससह (MBBS) आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल. अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी बाबतचा न्यूनगंड दूर करावा यासाठी हा निर्णय घेतला. याबाबत समित्या नेमल्या असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा निर्णय लागू करण्याता आमचा प्रयत्न आहे या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असंही महाजन म्हणाले आहेत.केंद्र सरकारतर्फे प्रत्येक राज्यांमध्ये त्या त्या भाषेतून तेथील शिक्षण देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला असल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा काढली.

मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून आज(शुक्रवार) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली आहे. मात्र मिलिंदि नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध मुद्य्यांवरून वारंवार राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आता शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाल्याचे दिसत आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत झालेली वाढ हा त्यातमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. कारण, मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात, मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची झालेली भेट ही चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याने चर्चेला अधिकच जोर आला आहे. नार्वेकरांना एक्स दर्जाची सुरक्षा होती, आता त्यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमधील कोणत्या नेत्यांची सुरक्षा काढली? –
छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले, नितीन राऊत, संजय राऊत, सतेज पाटील, भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, सुनील केदार, नरहरी झिरवळे, वरूण सरदेसाई, डेलकर परिवार

Friday, October 28, 2022

कृषीमंत्री वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्यात “तुम्ही दारू पिता का?”असा सत्तारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न केला.


बीड (प्रतिनिधी))वादाच्या भोवऱ्यात नेहमीच राहत असलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहेत. बीड दौऱ्यात असताना त्यांनी चक्क जिल्हाधिकार्‍यांनाच दारू पिता का? असा प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यां मध्ये संताप व्यक्त केला जात आहे तर राजकीय वातावरण देखील तापले आहे.

. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान केले यानंतर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली मात्र राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं सांगत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाद निर्माण केला. त्यातच आता अब्दुल सत्तार बीडच्या दौऱ्यावर अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आले असताना जिल्हाधिकाऱ्यांसोबत गप्पा मारत चहा पिताना त्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाच आपण दारू पिता का? असा प्रश्न विचारला. शेतकरी देशधडीला लागलेला असताना कृषिमंत्री दारूच्या गप्पा मारत आहेत यावरून शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. यावरून आता विरोधक देखील आक्रमक झाले आहेत.“महाराष्ट्राचे कृषीमंत्री बीड जिल्ह्यात पिकांचं नुकसान पाहण्यासाठी गेले होते की, जिल्हाधिकाऱ्यांना ‘दारू पिता का?’ विचारण्यासाठी. सैराट झाल्यासारखे महाराष्ट्राची सत्ता उलथापालथ करुन, सरकार स्थापन केलं. सरकारी अधिकाऱ्यांशी दारूच्या गप्पा मारता. त्यामुळे या सैराटच्या नादात मिंधे गट नसून, हा झिंगे गट झाला आहे,” अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ‘अतिवृष्टी पाहणी दौरा कि मद्यसृष्टी पाहणी दौरा?,’ असा प्रश्न उपस्थित करत कविता ट्विट केली आहे. “गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो, हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो,” असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी 29 व ३०.ऑक्टोबर रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार.


मुंबई (प्रतिनिधी) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वतः उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.

Thursday, October 27, 2022

मनसे कडुन अगळा वेगळा दिपोत्सव साजरा - वैजनाथ कळसकर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि  26/10/2022 बुधवार रोजी सायंकाळी ठिक 7:00 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित परळीशहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
 महाराष्ट्र नवनिर्माण सेना परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात त्यांच्या काव्यातुन साकारलेल्या ओमकार
एक दिवा त्यांच्यासाठी..!
ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात
आपल बलिदान दिलं, त्या सर्व भूमिपुत्र हुतात्म्यांसाठी.
एक दिवा त्यांच्यासाठी..!
जे भारतमातेच्या संरक्षणासाठी, सीमेवर शहीद झाले 
त्या आपल्या वीर जवानांसाठी.
एक दिवा त्यांच्यासाठी..!
जे ऊन..वारा..पावसात.. अस्मानी संकटांना तोंड देत, 
आपल्यासाठी शेतात..राबराब राबतात 
त्या अन्नदात्या शेतकरी..शेतमजूर बांधवांसाठी 
एक दिवा त्यांच्यासाठी..!
जे देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील 
याची दिवसरात्र काळजी घेत, कोरोना काळात आपल्याला ज्यांनी मदत केली त्या सर्व पोलीस बांधवासाठी. 
एक दिवा त्यांच्यासाठी..!
ज्यांनी चोवीस तास न थकता न दमता उपाशी राहून स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना काळात 
हजारो लोकांचे जीव वाचवले
त्या सर्व डॉक्टर..नर्स..फार्मासिस्ट बांधवासाठी.
एक दिवा त्यांच्यासाठी..!
ज्यांनी कोरोना काळात आपल्या जवळची व्यक्ती गमावली त्या सर्व भारतीय परीवारांसाठी
एक दिवा त्यांच्यासाठी..!
ज्यांनी कोरोना काळात चोवीस तास आपल गांव..आपल शहर..सॅनीटाईज करून स्वच्छ ठेवण्यात मोलाच कार्य केल त्या सर्व स्वच्छता कर्मचारी बांधवांसाठी. 
एकदा उजळू द्या असंख्य दिव्यांनी आपल अंगण..आसमंत..
देव देश अन धर्मासाठी.
 यावेळी मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहीवाळ,जिल्हा सचिव रवी नेमाने ,तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे,गणेश चव्हाण, महेश शिवगण, सुमित कलशेट्टे, रुषीकेश बारगजे, माणिक लटींगे,डाॅ.रामलींग घनचेकर, शहर सचिव डॉक्टर आशोक मंत्री, व मनसैनीक अदी उपस्थितीत होते.

शेतकऱ्यांना काहीसा दिलासा ई पीक पाहणीची अट रद्द.शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार.

मुंबई - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाच्या पंचनाम्यासाठी ई पीक पाहणी अनिवार्य नसल्याची‌ घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे
पिकाच्या पंचनाम्यासाठी ई पिक पाहणी प्रक्रिया अनिवार्य होती. मात्र ईपीक पाहणी करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मदत मिळवण्यासाठी ही अट रद्द करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात होती. दरम्यान ही अट तात्पुरती रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास मदत होणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीची तीन दिवस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. त्याचवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. त्याचबरोबर नुकसान झालेला कोणताही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं देखील विखे पाटील यांनी सांगितले आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यासाठी राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या दुप्पटीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यामुळे आता शेतकऱ्याच्या हातात मदत कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

धक्कादायक ! अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना अचानक तरुण तिरडीवर उठून बसला.

अकोला (प्रतिनिधी) एका तरुणाचा मृत्यू झाला.तिरडी बांधली शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असताना अचानक हा तरुण तिरडीवर उठून बसल्याची धक्कादायक घटना पातुर तालुक्यातील विवरा गावात घडली
मयत झालेल्या तरुणाचं मी प्रशांत मेसरे असं नाव होतं. 21 वर्षीय प्रशांत मेसरे याचं निधन झालं. प्रशांत मेशरे हा होमगार्डमध्ये कामाला होता.गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.नस चोक अप झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. 25 वर्षांच्या प्रशांतच्या मृत्यूचा धक्का पचवून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली होती.त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करून त्याला स्मशानभूमीत घेऊन जाऊ लागले.दरम्यान अंत्ययात्रा सुरू असताना तरुणांमध्ये अचानक हालचाल जाणवली त्यामुळे अंत्ययात्रा थांबवण्यात आली. तिरडी खाली ठेवताच आश्चर्याची गोष्ट घडली हा तरुण तिरडीवर उठून बसला. हा प्रकार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. ही गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून या तरुणावर काळी जादू केली असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. प्रशांतचा मृत्यू झाला म्हणून मिस यु प्रशांत असे स्टेटस त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर ठेवले होते. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच मोफत वह्या देखील मिळणार - शिक्षण मंत्री केसरकर


नाशिक (प्रतिनिधी) यापुढे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्या मोफत देण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केली.

नाशिक मधील सिन्नर तालुक्यातील कॅप्टन अशोककुमार खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यापूर्वी तेथील विद्यार्थी अतिरिक्त शिक्षक या सर्व गोष्टींची माहिती घेऊनच बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं केसरकर यांनी सांगितल. पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की शेतकरी कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना वह्यांचा खर्च करणे अवघड होते. त्यामुळे पुस्तकातच वह्यांची पान जोडता येतील का याबाबत तज्ञांची मतं जाणून घेण्यात येतील. पुस्तकांसोबतच वह्या देखील मोफतदेण्यात येतील हा उपक्रम शिक्षण क्षेत्राला कराटणी देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली चाकणकर उपस्थित होत्या. 

आरोग्य विभागाचे आयुक्त मराठवाडा दौऱ्यावर खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना घरचा रस्ता दाखवणार - आयुक्त तुकाराम मुंढे

बीड (प्रतिनिधी) शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्यास सुरुवात केली आहे. आज बीडला आल्यानंतर त्यांनी आरोग्य सेवेचा आढावा घेतला यावेळी त्यांनी खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या सरकारी यंत्रणेतील डॉक्टरांना सज्जड दम देत यापुढे अस केल्यास नोकरीवरून काढून टाकण्यात येईल असा इशारा दिला.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन सर्व आढावा घेतला. आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना केल्या. सोबतच अधिकाऱ्यांची कान उघडणी देखील केली.उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही. तसेच यापुढे खाजगी प्रॅक्टिस एखाद्या डॉक्टरने केली तर त्याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच झापले.31 ऑक्टोबर पर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश लातूरच्या उपसंचालकांना दिले आहेत.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साबळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते उपस्थित होते. तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना करत हलगर्जीपणा करणारांना चांगलेच धारेवर धरले. ऐन दिवाळीत तुकाराम मुंढे यांनी बीडला भेट दिल्यामुळे आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.

बीड-नाळवंडी रस्त्यासाठी दहिफळ-चिंचोलीच्या महिला थाळी नाद मोर्चा आंदोलन करणार.


बीड (प्रतिनिधी) बीड नाळवंडी रस्त्यासाठी वारंवार आंदोलन करूनही दखल न घेतल्यामुळे शेवटी दहिफळ चिंचोली येथील महिला आक्रमक झाल्या आहेत. 27 ऑक्टोबरला प्रशासनाचे कान उघडावेत यासाठी थाळी नाद मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

बीड ते नाळवंडी या रस्त्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने 2021 ऑगस्ट मध्ये 10 दिवस नाळवंडी नाका बीड येथे ठिय्या आंदोलन केले होते प्रशासनाच्या व स्थानिक नेत्यांच्या आणिपालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तूर्तास पाठीमागे घेतले होते परंतु त्यावरती कसल्याही प्रकारचे काम झाले नाही म्हणून समस्त त्रस्त नागरिक या अत्यंत खराब रस्त्यासाठी मोर्चा व थाळी नाद आंदोलन करणार आहेत हा रस्ता खूपच खराब झाला असून या रस्त्याने पायी चालणे मुश्किल झाले आहे; तरीसुद्धा जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी हे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देत नाहीत! याचा निषेध म्हणून बीड-नाळवंडी रस्त्यासाठीदहिफळ, चिंचोली,नाळवंडी,लक्ष्मीआई

तांडा, व जुजगवान येथील महिलांनी आक्रमक झाल्या आहेत,म्हणून त्यांनी येत्या 27 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय थाळी नाद आंदोलन व मोर्चा ऐन दिवाळीच्या सणात जिल्हा अधिकारी कार्यालय बीड येथे बेलन घेऊन थाळी नाद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे; यापूर्वी आम आदमी पार्टी कडून निवेदनाच्या माध्यमातून विविध आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला गेल्या कित्येक वर्षापासून बीड नाळवंडी रस्त्याच्या कामासाठी विनंती आलेली असून; त्याची कुठलीही दखल प्रशासनाने घेतलेली नाही ही बाब लक्षात घेऊन महिलांनी आक्रमक होऊन जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना झोपेतून जाग करण्यासाठी आणि त्यांचे लक्ष रस्त्याच्या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यासाठी व रस्त्याच्या कामाच्या लेखी आश्वासनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करणार आहेत यात चिंचोली येथील महिला इतर गावातील महिला बचत गट व महिला मंडळाच्या महिला आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे देण्यात आले त्यावेळी स्वाती मुळे, मनीषा राऊत, रंजना काळे, संगीता राऊत, शारदा काळे, रोहिणी बेद्रे, प्रा. ज्ञानेश्वर राऊत, बाबासाहेब राऊत, नवज्योत बेद्रे, इत्यादी कार्यकर्ते व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Wednesday, October 26, 2022

नदीच्या ओढ्यात वाहून गेलेल्याच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत.

तेलगाव (प्रतिनिधी)  दिंदुड येथील व्यापारी मयत शेख रईस अत्तार हे कन्नपूर मोहा येथे नदीच्या ओढ्यात वाहून गेल्या असता  शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला रुपये 4 लाखाची मदत मिळून दिली यावेळी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष इंजि सादिक इनामदार, पत्रकार अतुल गलांडे यांच्या प्रयत्नामुळे व तहसीलदार स्वामी साहेब यांच्या सहकार्याने तात्काळ निधी मिळून दिला. 
4 लाख रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले यावेळी सर्व पत्रकार बांधव व नागरीक उपस्थित होते.

जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या सक्तीप्रकरणी प्रतिवादींना खंडपीठाची नोटीस.


औरंगाबाद, (प्रतिनिधी) :- जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारींना मुख्यालयी राहण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या शासन निर्णयास आव्हाण देणारी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती संजय ए देशमुख यांनी राज्याचे वित्त विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना नोटीस देत जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी अॅड. सईद एस शेख यांच्यामार्फत उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद मध्ये याचिका दाखल केली आहे.


सदरील याचिकेत म्हटले आहे की पुर्वीचे शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदाचे कर्मचारींना घरभाडे भत्तासाठी कामाच्या ठिकाणी राहण्याची अट शिथिल करण्यात आलेली होती. मात्र दि 07.10.2016 रोजीचा वित्त विभाग, महाराष्ट्र शासन तसेच दि 09.09.2019 रोजीचा ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदांच्या शिक्षक / कर्मचारींना कामाच्या ठिकाणी राहण्याचे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्यामुळे संबंधित शिक्षक / कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत आहे.


इतर शासकीय कर्मचारींना शासकीय घरे / क्वार्टर उपलब्ध असतात. परंतु जिल्हा परिषद कर्मचारींना अशी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना खाजगी घरेच भाड्याने घ्यावे लागते. अनेक शाळा ह्या दुर्गम ग्रामीण भाग, वस्ती, तांडा आदीं ठिकाणी असून स्थानिक लोकांचेही पक्के घरे नसताना शिक्षकांना कामाच्या ठिकाणी राहणे अशक्य आहे. एखाद्या कर्मचारीच्या कुटुंबात पती-पत्नी नोकरीवर असल्यावर कोणाच्या मुख्यालयी राहावे याबाबत शासन निर्णयात स्पष्टता नाही. शैक्षणिक वर्षाच्या मध्येच बढती किंवा बदलीच्या परिस्थीतीत काय करावे, याबाबत शासननिर्णयात कोणतेच मार्गदर्शन करण्यात आलेले नाही.


कुटुंबाच्या शैक्षणिक, आरोग्य तसेच इतर गरजांसाठी शिक्षकांना तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहावे लागतात. संबंधित शिक्षक / कर्मचारी तालुका किंवा जिल्‌ह्याच्या ठिकाणी राहत असले तरी ते आपले कर्तव्य निष्ठापुर्वक बजावत आहे. ज्यामध्ये सार्वजनिक वाहतुक व्यवस्था किंवा खाजगी वाहनाने शिक्षक / कर्मचारीं कामाच्या ठिकाणी दररोज वेळेवर किंवा वेळेपुर्वी न चुकता पोहचून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तरीही संबंधित शिक्षकांच्या चौकशींचे आदेश देण्यात येत आहे. अशा स्थितीत अस्पष्ट व मोघम शासन निर्णयाची अमंलबजावणी करणे कर्मचारींवर अन्यायकारक ठरेल, असेही याचिकेत म्हटले आहे.
यावर खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस तसेच जबाब दाखल करण्याचे आदेश देवून प्रकरणाची पुढील सुनावणी 28.11.2022 रोजी ठेवली आहे. प्रकरणात याचिकाकर्ता यांच्यावतीने अॅड. सईद एस शेख तर शासनाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एस जी कार्लेकर यांनी काम पाहिले.

उमरी रस्त्यासाठी आला 98,00000 लक्ष रुपयांचा निधी ; प्रत्यक्षात कामे कधी सुरु होणार केजकरांचे प्रशासनाला सवाल.


* मुख्याधिकारी जरा ईकडे लक्ष द्या !प्र

त्येक नेता विकासासाठी झटतो सरकारला गावचा शहराचा विकास करण्यासाठी निधी द्यायला भाग पाडतो. त्यामधुन साधला जातो तो विकास केव्हां दिसतो तर केव्हां कागदावरच असतो.

केज, (प्रतिनिधी) :- केज नगरपंचायत अंतर्गत येणारा उमरी रस्ता तसे उमरी रस्त्यासाठी सर्वात जास्त अंदोलने झाली आहेत हे केज शहरातील नागरीकांनी प्रत्यक्षात पाहिली आहेत. नागरीकांच्या वेळोवेळी अंदोलनामुळे मुख्याधिकार नगरपंचायत केज यांनी सन 2020/2021 अंतर्गत नागरी दलीत्तेतर वस्त्यामध्ये सुधारणा करणे या योजने अंतर्गत क्रॉक्रीट रस्ता व नाली बांधकामासाठी रक्कम 1,33,00000 एक कोटी तेहतीस लक्ष रुपये चा अंदाजपत्रकीय रक्कमेचा प्रस्ताव सादर केला होता . नगरपंचायत प्रशासकीय आदेश 18/10/2021 प्रमाणे त्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 8 मध्ये दोन रस्त्यासाठी 35,00000 लक्ष रुपये निधी तर उमरी रस्त्याकरिता उमरी रस्ता मजबुतीकरण व सिमेंट कॉक्रीट बांधकाम करणे यासाठी एकुण 98,00000 लक्ष रुपये निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असुन मात्र केज नगरपंचायतच्या सुस्त व ढिसाळ कारभारामुळे कार्यालयीन प्रक्रिया जाग्यावर थांबल्या आहेत. त्याला गति येत नाही किंवा जानुन बुजुन गति दिली जात नाही.

ज्याच्यावर केज शहरातील जनतेचा विश्वास आहे असे नवनिर्वाचीत आलेले मुख्याधिकारी हजारे ज्याच्याकडे दोन अतिरिक्त पदाचा कारभार आहे ते वेळ काढुन याकडे लक्ष देतील का ? सत्ताधारी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या उमरी रस्त्याचे कामे सुरु करतील का ? विकासाला गति देतील का? कि परत आंदोलन रस्त्यासाठी आंदोलन करावे लागेल ? असे विविध प्रश्न केजकरांच्या माध्यमातुन उपस्थित केले जात आहेत.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर चा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने प्रवीण बागड़े यांना सन्मानित.

 

नागपुर (प्रतिनिधी)  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर तर्फे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना “उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार” विद्यापीठ मुख्यालय येथे आयोजित सोहळयात बहाल करण्यात आले. या कार्यक्रमात सन् 2017-18, 2018-19 व 2019-20 या वर्षातील वर्ग 3 व वर्ग 4 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
सदर पुरस्कार विद्यापीठ मुख्यालय अधिनस्त महाविद्यालय/प्रक्षेत्रे/ संस्था मधील वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांमधुन प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना रु. 10,000/- व वर्ग 4 करीता रु 6,000/- रोख रक्कम, प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले. 
              सदर पुरस्काराचे उदि्दष्ट म्हणजे विद्यापीठ तसेच विद्यापीठ अधिनस्त महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेणे, कर्मचाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सेवा तत्परता व विद्यापीठाप्रती आत्मीयता वाढविणे, कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट आणि असाधारण योगदान देण्याची भावना जोपासने व त्यांची कार्यक्षमता वाढविणे असे आहे.
          वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांमधुन 2017-18 वर्षीचा जाहीर झालेला उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार विद्यापीठाच्या संचालक, विस्तार व शिक्षण विभागातील लघुलेखक *श्री प्रविण मोरेश्वर बागडे* यांना प्रदान करण्यात आला. श्री बागड़े यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्‍यातील दूधबर्डी येथे २० हेक्टर सरकारी जमीन संपादित करून विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रासाठी शासन निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याआधी ते महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे स्वीय सहाय्यकही होते. शासन आणि प्रशासनाच्या अनुभवासोबतच त्यांना समाजसेवेचीही आवड आहे. त्यांनी कोविड अंतर्गत अनेक रुग्णांची सेवाही केली आहे.
         कुलगुरू कर्नल डॉ (प्रो) आशीश पातुरकर, कुलसचिव श्री सचिन कलंत्रे, कार्यकारी परिषद सदस्य श्री सुधीर दुद्धलवार, नियंत्रक (वित्त व लेखा) श्रीमती मनीषा शेंडे, पशुविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ शिरीष उपाध्ये, संचालक (संशोधन) डॉ नितिन कुरकुरे, संचालक (विस्तार शिक्षण) डॉ अनिल भिकाने, अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ सुनील सहातपुरे, विद्यापीठ ग्रंथपाल श्री सुनील गावंडे, परीक्षा नियंत्रक डॉ भूषण रामटेके, नागपुर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ आरजु सोमकुवर आदींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश जावळे यांनी केले. तर आभार उपकुलसचिव (आस्थापना) डॉ अजय गावंडे यांनी मानले.

काटेवाडी या पवारांच्या मूळ गावी बाजीराव धर्माधिकारी यांच्या ओंजळ या कार्यअहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.


बारामती (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या मागील 5 वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाच्या ‘ओंजळ’ या अहवालाचे आज विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्यासह माजी मंत्री धनंजय मुंडे व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

काटेवाडी या पवारांच्या मूळ गावी जाऊन धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांचीही भेट घेतली. परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाच्या ‘ओंजळ’ या कार्यअहवालाचे प्रकाशन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिवर्षी धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेते दीपावली निमित्त शरद पवार व अजितदादा पवार यांची गोविंद बाग येथे भेट घेत असतात. त्याच परंपरेचा भाग म्हणून धनंजय मुंडे यांनी आज भेट घेतली. यावेळी बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, परतीच्या पावसाने झालेले नुकसान यांसह अनेक विषयांवर खा. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली.

यावेळी आ. विक्रम काळे, माजी आ.संजय भाऊ दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, ज्येष्ठ नेते राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, विजय भोयटे, जयराज देशमुख, जितेंद्र नव्हाडे, रविराज तावरे आदी उपस्थित होते.

Tuesday, October 25, 2022

वंचित बहुजन आघाडीचा परळी नगर पालिकेवर जवाब दो मोर्चा संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीचा परळी नगरपालिकेवर जवाब दो मोर्चा संपन्न झाला असून हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष गफार शाखा पठाण, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला असून या मोर्चात परळी नगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून यामध्ये दलित मुस्लिम व ओबीसीचा विकास करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा असे आव्हान हाजी साब यांनी केले
तर या मोर्चा च्या व्यासपीठावर हाजी साहब जफर ठाकूर गफारशहा खान बुरान शेख यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या मोर्चामध्ये परळी शहरांमधील मोहम्मदिया कॉलनी नागसेन नगर भिमानगर येथील रोड नाल्या लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच परळी शहरातील दलितांसाठी असलेल्या एकमेव समशानभूमी मधील अर्धवट राहिलेले काम लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्याचे माध्यमातून परळी नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजीत रोडे जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे वंचित बहुजन युवा आघाडीचे उपाध्यक्ष गौतम साळवे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष साहेब रोडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय गवळी तालुका महासचिव विष्णू मुंडे तालुका युवा उपाध्यक्ष अवी मुंडे तालुका कोषाध्यक्ष राजू भुतके वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष संदीप ताटे शहर प्रसिद्धीप्रमुख केशव कांबळे वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर उपाध्यक्ष शुभम सावंत वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर उपाध्यक्ष धम्मा शिरसागर यांच्यासह मोहम्मद या कॉलनीतील महिला सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परळी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी आश्वासन दिल्यामुळे सदरील जवाब दो आंदोलन स्थगित करून समारोप करण्यात आला

माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर यांचा उपक्रम. दिवाळी निमित्त अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; नवीन कपडे फराळ व फटाके दिली भेट.


माजलगाव (प्रतिनिधी)  दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. पालकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या अनाथांना आपुलकीचा हात द्यावा. दिवाळीनिमित्त अनाथ मुलांना नवीन कपडे फराळ, फटाके व इतर भेटवस्तू देऊन त्यांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेत माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर या युवकाने अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यामुळे या सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला माजलगाव शहरातील विविध भागातील अनाथ मुलांना  सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर यांनी प्रत्यक्ष भेटून दिवाळीनिमित्त सोमवार दिनांक 24 रोजी नवीन कपडे मिठाई तसेच फटाके भेट देण्यात आल्या . अनाथ मुला मुलींच्या विकासासाठी नेहमीच कार्य करणाऱ्या  सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर हे कार्य करत असतात. असाच कार्यक्रम त्यांनी सोमवारी अनाथ मुलांना नवीन कपडे सोबतच  साबण, उटणे, पेस्ट, टुथब्रश, पावडर, क्रिम, टॉवेल, फराळाचे साहित्य आणि पुस्तके भेट दिली आहे.  
*लहानपणापासूनच समाजसेवेची आवड*
शालेय जीवनापासूनच मला समाजसेवेची आवड असून माणुसकी कायम जिवंत राहावी आणि अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी  हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे  सामाजिक कार्यकर्ते नितीन जुजगर यांनी सांगून आपण यापुढेही असे समाजकार्य करणार असून समाजातील सर्व सुजान नागरिकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Monday, October 24, 2022

राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते गौरवप्राप्त किरणकुमार गित्ते यांचा परळीत नागरी सत्कार संपन्न.




परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- परळी ही रत्नांची खान असुन या भागातुन अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याद्वारे चमकत आहेत. त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव किरणकुमार गित्ते हे परळीची शान असुन देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा नुकताच गौरव झाला.गित्ते यांच्या प्रशासकिय सेवेतील ज्ञानातुन महाराष्ट्राला लाभ व्हावा यासाठी मी त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी सांगितले.राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव प्राप्त केलेले परळीचे भुमिपुत्र त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव किरणकुमार गित्ते यांचा रविवारी परळीत नागरी सत्कार करण्यात आला.
  
लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे रविवार दि.23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजत पार पडलेल्या या नागरी सत्कार सोहळ्याचे  कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त रघुनाथ खेत्रे  हे होते तर जेष्ठ नेते प्रा.टि.पी.मुंडे,माजी आ.संजय दौंड, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते, दिनकर मुंडे गूरूजी, बेलंबा गावच्या सरपंच इंदूमती दिनकरराव गित्ते, वर्गमित्र लक्ष्मीकांत दगडगुंडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, डॉ.राजाराम मुंडे, हभप प्रभाकर झोलकर महाराज,  आदींची उपस्थिती होती.

यावेळी माजी मंत्री आ.धनंजय मुंडे आपल्या भाषणात अनेक राजकीय गुपीतांचेही संकेत देत सध्या असलेली राजकीय गडूळ पाणी थोड्या दिवसातच स्वच्छ होईल असे संकेतही असे सांगत शुन्यातुन विश्व निर्माण करण्याचे उदाहरण म्हणजे त्रिपुरा राज्याचे नगर विकास खात्याचे सचिव परळीचे भुमिपुत्र किरण गित्ते हे आहेत,एका वर्षात महामहिम राष्ट्रपती व प्रधानमंत्र्याच्या हस्ते गौरव होणे ही परळीसाठी अभिमानाची बाब  आहे.

नागरी सत्कार सोहळ्यास उत्तर देताना किरणकुमार गित्ते हे अत्यंत भावुक होवुन मी देशाच्या प्रशासकिय सेवेत जे काही काम करत आहे त्याची प्रेरणा आई- वडील,वर्गमित्र व परळीकरांकडुन मिळाली. प्रशासकीय सेवेत काम करताना लोकहीत व लोककल्याण ला सर्वाधिक महत्व दिल्यानेच यश प्राप्त झाले. येत्या काळात परळीचा गौरव व नावलौकीक वाढेल असे कार्य करू असा विश्वास श्री किरणकुमार गित्ते यांनी व्यक्त केला. परळी या माझ्या गावी होत असलेला हा सन्मान माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते प्रा.टि.पी.मुंडे, प्रा.पवन मुंडे, लक्ष्मीकांत दगडगुंडे यांनी मनोगतातुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले तर प्रस्ताविक अनंत मुंडे यांनी केले व आभार प्रा.शंकर कापसे यांनी केले.

@@@@@@

 *अवघ्या दोन दिवसात नेत्रदिपक कार्यक्रमाचे नियोजन*

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते गौरव प्राप्त केल्यानंतर किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे परळी येथे आयोजन केले.नियोजन समितीचे सुरेश (नाना) फड, प्रदिप खाडे, प्रा. पवन मुंडे, प्राचार्य अतुल दुबे, रवी कांदे, अंकुश फड, भास्कर आंधळे, निळकंठ दराडे, ऍड. प्रकाश मुंडे,हरिष नागरगोजे, लक्ष्मण मुंडे, नामदेव मुंडे सर, मनजीत सुगरे रमाकांत बुरांडे, कोमवार सर, बंडू आघाव आदींनी अवघ्या दोन दिवसात या नागरी सत्कार सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करुन उच्च दर्जाचा व सर्वसमावेशक कार्यक्रम पार पाडला. या समितीचे अनेकांनी कौतुक केले. 

@@@@@@@@

 *संस्था, संघटनांकडुन सत्कार*

 आयएएस किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात परळी व परिसरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.या सत्कार सोहळ्यात किरणकुमार गित्ते यांचा मारवाडी युवा मंच, मेडिकल असोसिएशन, डॉकटर असोसिएशन, वकिल संघ, संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, विविध व्यापारी संघटना, नाथ शिक्षण संस्था, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, वकील संघ, ग्रामीण पोलिसांच्या वतीने,  पंचायत समितीचे सभापती, पत्रकार संघ, परळी सिसिड्स अँड फर्टीलाइजर्स संघ, आडत व्यापारी संघसह  संस्था व संघटनांच्या पदाधिकार्यांनी सत्कार केला.

@@@@@@@
*नाथ शिक्षण संस्थेकडुन सत्कार*

 परळीच्या शैक्षणीक क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने अध्यक्ष आ.धनंजय मुंडे, सहसचिव प्रदीप खाडे व सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग यांच्या वतीने या नागरी सत्कार सोहळ्यात सत्कारमुर्ती किरणकुमार गित्ते यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळ वाटणारे मा.मंत्री जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर?


 बीड : अनेक दिवसांपासून शिवसेनेपासून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुरक्षित अंतरावर असणाऱ्या क्षीरसागरांशी पक्षाने संबंध तोडल्याची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोणत्या पक्षात जाणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. रस्ता कामांच्या उद॒घाटन कार्यक्रमावेळी क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळ वाटत असले तरी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बॅकअप दिले जात असल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली. 

देवस्थानच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी भूखंड माफियांविरोधात, गुन्हे दाखल करण्याचे खंडपिठाचे आदेश.


बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील हिंदू देवस्थानच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी भूखंड माफियांविरोधात, गुन्हे दाखल करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे देखील यामध्ये म्हटलंय. यामुळे भूखंड माफीया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह माफीयांचे धाबे दणाणले आहेत. आणि यामध्ये आता कोणा कोणावर पोलीस गुन्हे दाखल करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेली तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरावी, असेही म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर न्या. मंगेश पाटील आणि न्या. अभय वाघवसे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले आहेत. वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र, हिंदू देवस्थानच्या करीत नाहीत, ते गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी केली. यावर आता तक्रारदाराचे निवेदनच एफआरआय म्हणून गृहीत धरून, फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

दरम्यान या आदेशाने आता भूखंड माफीया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह माफीयांचे धाबे दणाणले आहेत. आणि यामध्ये आता कोणा कोणावर पोलीस गुन्हे दाखल करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज शाम 06:53 बजे से शुरू होगा लक्ष्मी पूजन का शुभ मुहूर्त, जान लें अवधि.


दिवाली या दीपावली रोशनी का पर्व है। यह त्योहार हर साल कार्तिक कृष्ण पक्ष की अमावस्या तिथि को मनाया जाता है। मान्यता के अनुसार, इस दिन भगवान श्रीराम 14 साल के बाद वनवास के बाद अयोध्या लौटे थे। एक अन्य मान्यता है कि दिवाली के दिन ही मां लक्ष्मी प्रकट हुई थीं। इस कारण इस दिन लक्ष्मी पूजन किया जाता है। जबकि वाल्मीकि रामायण में वर्णित है कि इस दिन भगवान विष्णु संग मां लक्ष्मी का विवाह हुआ था। दिवाली की शाम को उत्तम मुहूर्त में लक्ष्मी-गणेश और भगवान कुबेर की पूजा का विशेष महत्व है। जानें अन्य खास बातें-

नरक चतुर्दशी आज या कल? छोटी दिवाली क्यों मनाते हैं, जानिए यम पूजन विधि व दीपदान का समय

अमावस्या तिथि कब से कब तक-

दिवाली हर साल कार्तिक मास की अमावस्या को मनाई जाती है। इस साल अमावस्या तिथि 24 अक्टूबर को शाम 05 बजकर 27 मिनट से प्रारंभ होगी, जो कि 25 अक्टूबर को शाम 04 बजकर 18 मिनट पर समाप्त होगी।

दिवाली लक्ष्मी मुहूर्त 2022-

दीपावली 2022 लक्ष्मी पूजन मुहूर्त शाम 06 बजकर 53 मिनट से रात 08 बजकर 16 मिनट तक रहेगा। लक्ष्मी पूजन की अवधि 1 घंटा 23 मिनट की है। प्रदोष काल - 05:43 पी एम से 08:16 पी एम तक और वृषभ काल - 06:53 पी एम से 08:48 पी एम तक रहेगा।

24 अक्टूबर से आने वाले 7 दिन इन राशियों के लिए वरदान समान, पढ़ें वीकली होरोस्कोप

इन घरों में होता है मां लक्ष्मी का वास-

मां लक्ष्मी दिवाली पर उन घरों में प्रवेश करती हैं जहां साफ-सफाई हो और प्रतिदिन पूजा-पाठ होता है।

दिवाली पूजन में इन चीजों को करें शामिल-

दिवाली पूजन में शंख, कमल का फूल, गोमती चक्र, धनिया के दाने, कच्चा सिंघाड़ा, मोती व कमलगट्टे का माला आदि शामिल करना चाहिए।

लक्ष्मी पूजन मंत्र-

 ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः॥
. ॐ श्रीं श्रीयै नम:
. ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः॥


दारुड्याने एसटी बसवर दगड मारून काच फोडला. व चालक, वाहक यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिल धमकी.

केज  (प्रतिनिधी) :- केज तालुक्यातील पिंपळगाव पाटी जवळ एका दारुड्याने चालत्या एसटी बसवर दगड मारून काच फोडला आहे.
या बाबतची माहिती अशी की, रविवार दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वा. धारूर आगाराची बीड-केज ही गाडी क्र.( एम एच-२०/डी-९९२३) ही गाडी विड्याहुन केजकडे येत असताना पिंपळगाव फाट्या जवळ एका दारुड्या इसमाने गाडीच्या डाव्या बाजूच्या समोरील काचावर दगड मारून काच फोडला. तसेच चालक व वाहक यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी चालक अशोक हुंबे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Sunday, October 23, 2022

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी नगरपालिकेवर 25 ऑक्टोबर रोजी जवाब दो आंदोलन :- शहराध्यक्ष गफारश्या पठाण.

                             

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी  नगरपालिकेवर दिनांक 25 ऑक्टोबर मंगळवार रोजी जवाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे परळी शहराध्यक्ष गफारश्या पठाण यांनी दिली आहे.                                  याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून परळी शहरातील मोहम्मदी या कॉलनी येथील रोड नाल्या करण्यात यावेत व पथदिवे उभारण्यात यावेत यासह परळी शहरातील नागसेन नगर भिमानगर येथील रोड नाल्या व लाईटची व्यवस्था करण्यात यावी.व दलितांच्या स्मशान भूमी मधील लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात याव्यात यासाठी अनेक वेळा निवेदन देऊन व प्रत्यक्षात भेटूनही संबंधित नगरपालिकेचे कर्मचारी उडवा उडवी ची उत्तरे देतात व दिशाभूल करणारी कारणे सांगतात व तशा प्रकारचे लेखी ही दिले आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी परळीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य मोर्चाच्या द्वारे जवाब दो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात परळी तालुक्यातील व शहरातील वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन युवा आघाडीच्या  सर्व पदाधिकारी हीतचिंतक कार्यकर्ते इत्यादी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले आहे.

Saturday, October 22, 2022

परळीत महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत आग महत्त्वाच्या कागदपत्रासह साहित्य जळून खाक.

परळी वैजनाथ - शहरातील सुभाष चौकात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये बँकेतील महत्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुट्टी असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास वरच्या मजल्यावरून धूर येत असल्याची माहिती खाली असलेल्या दुकानाचे मालक चव्हाण यांनी अग्निशामक दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच औष्णिक विद्युत केंद्र व नगरपालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र
या भीषण आगीत बँकेतील जवळपास सर्व साहित्य आणि कागदपत्र जळून खाक झाली आहे. या आगीमुळे स्ट्रॉंग रूमचे नुकसान झाले नाही.सुट्टीच्या दिवशी आग लागल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. ही आग शाॅर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी.

रायमोह मंडळातील दुर्दैवी कुटुंबियांचे केले सांत्वन ..!

बीड  (प्रतिनिधी) -राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली.
     पालकमंत्री अतुल सावे यांनी आज शिरूर का. तालुक्यातील रायमोहा मंडळात ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेतील पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. भानकवाडी येथील कुंडलिक सोनसळे यांच्या दोन मुली व एक ३० वर्षीय सिरसमार्ग येथील पाहुणा साईनाथ भोसले वाहुन गेला होता. तसेच दगडवाडी येथील रावसाहेब जायभाये शेतामध्ये असताना अंगावर विज कोसळल्याने ते जागीच ठार झालेहोते. त्यांनी या दुर्दैवी जायभाय व सोनसळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. 
शासनाच्या वतीने जायभाय कुटुंबाला चार लक्ष रु व सोनसळे कुटुंबाला आठ लक्ष रुपय मदतीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. सावे यांनी दगडवाडी व भानकवाडी शिवारात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली वशेतकऱ्यांशी संवाद साधला. 
  यावेळी जि.प. सदस्य वैजिनाथ मिसाळ, उपविभागीय अधिकारी नामदेव टीळेकर, तहसीलदार ( शिरूर ) श्रीराम बेंडे , तसेच राजेंद्र मस्के, नवनाथ शिराळे, रामदास बडे, जालिंदर सानप, संभाजी जाधव, वसंतराव सानप, सुभाष क्षीरसागर, यांच्यासह संबंधित अधिकारी, भाजपा पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
    पालकमंत्री श्री. सावे यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील माजलगाव येथील मेळाव्यानंतर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली व बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकारी यांची भेट व चर्चा केली. जिल्ह्यातील दौऱ्यानंतरत्यांचे औरंगाबाद कडे प्रयाण झाले.

जिरेवाडी येथील महिलांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद - मारोती मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील सोमेश्वर संस्थान जिरेवाडी येथील महिला बचत गटांनी अनोखा उपक्रम राबविला यामध्ये ३४ महिला बचत गटांचा समावेश होता .महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येऊन महिलांनी उचललेले पाऊल कुटुंबाच्या व समाजाच्या आर्थिक विकासासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार या कार्यक्रमाचे वाटप करताना प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांनी काढले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच गोवर्धन कांदे तसेच निवृत्त पोलीस सहाय्यक श्रीधर मुंडे उपस्थित होते.
     यावेळी, उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मौजे जिरेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने, महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पिठाच्या गिरणीचा व मिरची कांडण यंत्रांचा शुभारंभ घेत कापून ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान जिरेवाडी येथील राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेला मुलांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला.
   यावेळी जिरेवाडी परिसरातील , विविध गावातील महिला बचत गटांची उपस्थिती होती तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी शिवसेनेशी कसलाही संबंध.


बीड : माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांचा शिवसेनेशी कसलाही संबंध नसल्याचे बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

आयोजित पत्रकार परिषदेला जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, दिलीप गोरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांनी सांगितले की, जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या संपर्कात नव्हते. त्यांनी पक्षात येऊन पक्षाचा कसलाही फायदा केला नाही तर त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला. आघाडी सरकारच्या काळात मंजूर करून घेतलेल्या 70 कोटीच्या कामाचा शुभारंभ शिंदे-फडणवीस यांच्या हस्ते केली. त्यांची मागील काही दिवसातील भूमिका लक्षात घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार जयदत्त क्षीरसागर यांचा पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचे जाहीर करण्यात आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.


जिल्हाधिकारी साहेब..! अशी आहे पुरवठा विभागाची गोड दिवाळीची कडू कहानी जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष द्यावे.

बीड - गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शिंदे सरकारने शंभर रुपयात शिधा वस्तूंचा संच देण्याची घोषणा केली.जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी फोटो सेशन करत भालदार पुऱ्यातील स्वस्त धान्य दुकानात संच वितरण योजनेचा धाटात शुभारंभ केला.मात्र ई-पाॅस प्रणालीवर मालाची नोंद झाली नाही तर किटच वाटप करायचं कसं असा राशन दुकानदारांसमोर तर तालुका पुरवठा विभागाच्या मनमानीमुळे गरीबांनी दिवाळी साजरीच करायची नाही काय असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे.
परतीच्या पावसाने शेतकरी उध्वस्त केलेला असताना दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आसमानी संकटात सोबतच सुलतानी संकटाशी देखील शेतकऱ्यांना झुंज द्यावी लागत आहे.ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना शिंदे सरकारने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शंभर रुपयांमध्ये साखर, तेल, हरभरा डाळ, रवा एक किलोच्या प्रमाणातील संच देण्याची घोषणा केली. तातडीने अंमलबजावणी देखील केली. राशन दुकानापर्यंत हा माल जाऊन सुद्धा पोहोचला बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या थाटात भालदार पुऱ्यातील राशन दुकानात या किटचे वाटप करून फोटोसेशन करून घेतले.या शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप करावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी पुरवठा विभागाने घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र ही पाॅस- प्रणालीवर या आलेल्या किटची तालुका पुरवठा विभागाने नोंद केलेलीनसल्यामुळे माल येऊनही तो राशन दुकानदारांना वाटप करता येत नाही.किट मिळाले मात्र त्यासाठी देण्यात आलेल्या पिशव्या अजून राशन दुकाना पर्यंत पोहोचल्या नाहीत.
कीट मिळाले नाही म्हणून नागरिकांचा रोष राशन दुकानदारांना ओढवून घ्यावा लागत आहे.नायब तहसीलदार चौरे यांनी छग्या नावाचा खाजगी व्यक्ती ई पाॅस प्रणालीवर नोंद करण्यासाठी नियुक्त केला आहे. त्याचा हा कारभार आहे.ही व्यक्ती ई -पाॅस प्रणालीवर नोंद करण्यासाठी राशन दुकानदारांकडून पैसा घेते पैसा न मिळाल्यास नोंद करण्यास टाळाटाळ केली जाते असा आरोप राशन दुकानदारांकडून केला जातो.मग केवळ दुकानदार चिरीमिरी देत नाही म्हणून गोरगरिबांच्या दिवाळीतील आनंदावर विरजण टाकायचं का? विरजण टाकणारा हा झारीतील शुक्राचार्य कोण? त्याचे एवढे लाड का? चौरेंची त्याच्यावर मर्जी का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.एकंदरच या योजनेची सध्या तरी पुढची वाट लावण्याचा चंग पुरवठा विभागाने बांधला असल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे. 

कांतीकारी साथी जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.


मेष (Aries Horoscope Today ):-

कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा.

सिंह (Leo Horoscope Today ):-

बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

तूळ (Libra Horoscope Today ):-

एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.

मीन (Pisces Horoscope Today ):-

उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.


बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र किरण गित्ते IAS यांच्या नागरी सत्कार व कौतुक सोहळ्याचे रविवारी आयोजन.

परळी वैजनाथ ( प्रतिनिधी):-स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात त्रिपुरा राज्याने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच शहरी आवास योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्रिपुरा सरकार मधील सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, पर्यटन विभागाचे सचिव तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मा. श्री. किरण गित्ते IAS यांचा नागरी सत्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागरी सत्कार समिती परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या नागरी सत्कार व कौतुक कौतुक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून  माजी मंत्री श्री.धनंजयजी मुंडे साहेब,बीड -लातूर -उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. सुरेशजी धस,   , लोकनेते प्रा. टी. पी.मुंडे सर, माजी विधान परिषद सदस्य संजय दौंड,
तर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ. राजारामजी मुंडे, रघुनाथजी खेत्रे सेवानिवृत्त मुख्याध्यापक - जि.प. शाळा आधी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे येथे होणाऱ्या या भव्य नागरी सत्कार व कौतुक सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागरी सत्कार समिती परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“एकनाथा”च्या राज्यात बीड जिल्हा अनाथ "कोरडी माया अन् उपाशी बस ग बया” अशी शेतकऱ्यांची परिस्थिती.

बीड - परतीच्या पावसाने शेतकरी उध्वस्त केला असला तरी दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकारकडून कुठलीच मदतीची ठोस घोषणा अद्याप झाली नाही. ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पन्नास हजार रुपये एकरी अनुदान द्यावं अशी मागणी जोर धरू लागली आहे.असंअसलं तरी पंचनाम्याचा फार्स केला जात आहे.सध्या रोजच पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली असली तरी सरकारही शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं पाहायला मिळू लागला आहे. सरकार फक्त धीर धरा म्हणतयं “कोरडी माया अन् उपाशी बस ग बया” या म्हणीचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. 

उभ्या पिकाची नासाडी झाली असताना शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घासाची डोळ्यासमोर माती झाली. जोरदार पावसाने बळीराजाच्या अश्रू ने देखील आता साथ सोडली आहे. बीड जिल्हा तर “एकनाथा”च्या राज्यात अनाथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. भर दिवाळीत देखील अतिवृष्टी होऊ लागल्यामुळे शेतात गुडघाभर पाणी तर नदी नाल्या दुथडी भरून वाहू लागले आहे. या मध्ये शेतकऱ्यांच पिक उभ्या उभ्याच शेतात सडून गेल आहे. गुरुवारी मध्यरात्री बहुतांश जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. अंबाजोगाई परळी बीड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. हीच परिस्थिती चौसाळा मांजरसुंबा भागात देखील पाहायला मिळाली. तब्बल दोन तास झालेल्या पावसाने उभ्या सोयाबीन पिकाच्या शेंगा झडून एखादी शेंग राहिलीच तर ती आतून सडून गेली. या पावसात शेतकऱ्यांचं पुरतं दिवाळं निघालं असं असलं तरी कृषिमंत्री अब्दुल सत्तार ओला दुष्काळ जाहीर करण्या इतकं नुकसान झालंच नाही ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही असं सांगून आपले हात झटकले. शिंदे सरकारने आतापर्यंत कुठलीच ठोस मदतीची घोषणा केली नाही. बीडचा शेतकरी सध्या आसमानी संकटासोबतच सुलतानी संकटाने देखील पुरता कोलमडून गेल्याचं पाहायला मिळत आहे. वर्षभर जगायचं कसं इथं पोटाची खळगी भरायची मारामार तिथं दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारातून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ लागली आहे त्यातूनच आत्महत्यांचा आकडा वाढला आहे. पंचनामे होणार कधी मदत मिळणार कधी सर्वात जास्त पिक विमा भरणारा जिल्हा म्हणून गौरविले गेलेला बीड जिल्हा पिक विम्याच्या 25% आग्रीम विम्यापासून अजूनही वंचित आहे. विमा कंपनी जबाबदारी झटकण्याची पळवाट शोधत आहे. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या हाल अपेष्ठाकडे अजून पाहिला तयार नाही. धीर सोडू नका सरकार पाठीशी आहे असं म्हणून कोरडी माया दाखवत आहे. “कोरडी माया अन् उपाशी बस गं बया “या म्हणीची प्रचिती येऊ लागली आहे.


कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची अतिवृष्टी नुकसानीची अंधारात पाहाणी शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना.

बीड - अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार अंधारात पाहणी करून सात मिनिटातच सटकले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली ऐन दिवाळीत दिवाळं निघाल्याने शेतकरी मरणाला कवटाळत आहे.अशा स्थितीत पंचनाम्याचा व पाहणी दौऱ्याचा फार्स करत शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या दुखावर मीठ चोळत आहे.कापसाच्या वाती अन् सोयाबीन ची माती झाल्यामुळे कंबरड मोडलेला शेतकरी पुढे जगायचं कसं ? शेत पेरणी योग्य करायची तर पैसा आणायचा कुठून? पेरणी नाही केली तर साल भर खायचं काय? पहिलंच देणं पाणी दिलं नाही तर दारात कोण उभं करणार? अशा एक ना अनेक समस्यांनी तो घेरला गेला आहे. अशा परिस्थितीत शिंदे सरकार मात्र आम्ही पाठीशी आहोत धीर सोडू नका असं म्हणत असलं तरी कुठलीच ठोस मदतीची घोषणा अजून केली नाही.
 सर्व घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. यात बरीच भर म्हणून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा दौरा दुपारी दोन वाजता होता मात्र ते तब्बल सहा वाजता बीडमध्ये पोहोचले. ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही म्हणणाऱ्या सातारांना अंधारात नुकसानीचा अंदाज कसा आला असेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.
अंधारात त्यांनी नुकसानीची पाहणी केली. गेवराई बीड भागात आल्याचं त्यांनी नाटक केलं अंधारात सात मिनिटात पाहणी केली. दौरा आटोपून परतीची वाट त्यांनी धरली. कृषिमंत्र्यांकडे तेवढ्या सात मिनिटातच शेतकऱ्यांनी गा-हाणी मांडली. कृषी मंत्राच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र रोष निर्माण झाला आहे.

Friday, October 21, 2022

बीड जिल्ह्यातील आजी-माजी लोक प्रतिनिधींनी खरीप २०२० चा पिकविमा कंपनी बरोबर तडजोडीमुळे शेतकऱ्यांना वाटप केला जात नाही - वसंत मुंडे

 ‌         
* अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांची चालु कर्ज माफ करा.   
    
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर खरीपा ला पाऊस झालेला असून त्यामध्ये विदर्भ मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यावर बोगस बियाणे मुळे  शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे २०२० चा पिक विमा देण्याचे आदेश असूनही आजतागायत  शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्याचे कारण बीड जिल्ह्यातील आजी माझी लोकप्रतिनिधींनी पिक विमा कंपनी बरोबर तडजोड केल्यामुळे बीडच्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्या पैसे देण्यास तयार नाहीत असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे .  
बीड पॅटर्न अंतर्गत खरीप २०२१ चा पिक विमा फक्त २५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला असुन उर्वरत पिक विमा रक्कम शासना कडून जमा केलेला नाही तरी तात्काळ जमा करावी , चालू खरीप २०२२ चा पिक विम्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरएफ चे निकष न लावता तात्काळ बीड पॅटर्न अंतर्गत २५ टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने देण्यात यावेत व अतिवृष्टी मध्ये झालेल्या शेतकऱ्यांचे सर्व पिकाचे नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नियमानुसार वर्ग करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे मुख्यमंत्री कडे निवेदनाद्वारे केली .