परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी शिवसेनेकडुन तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व शिवसेना नेते धनंजय गित्ते यांच्या नेतृत्वाखाली ज्या कुटुंबांचे राशन कार्ड नाहीत किंवा जे कुटुंब शासनाच्या योजनापासुन वंचित आहेत अशा कुटुंबांना दिवाळी निमीत्त किराणा सामानाचे किट वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 रुपयांत दिवाळी किट देवुन सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यात येत असुन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सामाजीक निर्णयातुन प्रेरणा घेत हा उपक्रम राबवत असल्याचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व शिवसेना नेते धनंजय गित्ते यांनी सांगितले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी जीजामाता उद्यान येथे या किराणा कीट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.या किटमध्ये दिवाळी फराळसाठी आवश्यक वस्तु असुन परळी विधानसभा मतदार संघातील गरजवंत नागरीकांना ही किराणा कीट वाटप करणार असल्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे व शिवसेना नेते धनंजय गित्ते यांनी सांगितले.यावेळी अँड रामराव माने,विश्वनाथ राठोड,यशोदा राठोड,वैजनाथ माने,सचिन स्वामी,बालासाहेब देशमुख,विष्णू ढेमरे,संजय कदम,दिपक जोशी,रमेश लोखंडे, नवनाथ सरवदे,सागर बुंदुले,नवनाथ लोभे, जगन्नाथ कदम, बालाजी खोशे,नागेश माळी,विठ्ठल गायकवाड आदी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment