Saturday, October 15, 2022

दिवाळीत पुन्हा रंगणार गीत संगीताची मैफल. मारवाडी युवा मंचच्या वतीने 24 ऑक्टोबरला पहाट गाणी.

परळी वैजनाध (प्रतिनिधी) मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठान व राजस्थानी मल्टीस्टेट परळीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी निमित्त पहाटगाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.24 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे हा कार्यक्रम होत असून छोटे उस्ताद हे प्रांजल बोधक (मुंबई) व स्वरलक्ष्मी लहाने हे या कार्यक्रमातील प्रमुख गायक आहेत. 
दिवाळी आणि त्यानिमित्त होणारी पहाटगाणी हे परळी शहर व परिसरातील गीत संगीत रसिकांचे समीकरणच असून यावर्षीही मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठान व राजस्थानी मल्टीस्टेटच्या वतीने पहाटगाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर मिलाफ ऑर्केस्ट्रा पहाटगाणी कार्यक्रम सादर करणार असून मराठी व हिंदी मधील जुन्या नव्या गाण्यांची सुरेख मैफल यानिमित्त भरणार आहे. भक्ती गीते, भाव गीते यामध्ये सादर केली जाणार असून मी होणार सुपरस्टार व छोटे उस्ताद या स्टार प्रवाह मालिकेतील प्रसिद्ध गायीका कु.प्रांजल बोधक आणि स्वरलक्ष्मी लहाने या प्रसिद्ध गायीका आपले गीत गायन सादर करणार आहेत. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, सचिव जयपाल लाहोटी, कार्याध्यक्ष विजय वाकेकर तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.


फराळ तयार करण्याची कटकट संपली
मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने अल्पदरात फराळ उपलब्ध.
 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घराघरात दिवाळी फराळाची मागणी असते. वाढत चाललेली भाव, पदार्थ तयार करण्यासाठी होणारी महिला वर्गांची कसरत आणि त्यातही चांगले पदार्थ तयार करतांना होणारी अडचण लक्षात घेवून मारवाडी युवा मंच व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर आवश्यक असलेले दिवाळीतील फराळ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 
मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त आवश्यक असलेले विविध प्रकारचे पदार्थ अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामध्ये गोड, तिखट आणि ड्राय फुड अशा प्रकारचे पदार्थ मिळणार आहेत. मँगो बर्फी, मोतीचूर लाडू, पापडी, मिक्स फरसान, मसाला शेव, काजू कतली, रोज कतली, पिस्ता कतली, ड्रायफुड लाडू, म्हैसूर पाक, कलाकंद असे 60 पेक्षा अधिक अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अधिक माहिती व बुकींगसाठी राधेश्याम झंवर 7420881008, मुरलीधर बंग 9511779585, राजेश मोदाणी 9970030144, प्रकाश वर्मा 9096653579, सोमनाथ गडेकर 9850715548 येथे संपर्क साधावा. 


चला...त्यांचीही दिवाळी गोड करू
वापरात नसलेले चांगले कपडे व वस्तूंचे करा दान. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिवाळी हा आनंदाचा उत्सव असतो, गोडधोड पदार्थ तयार करणे, नवे कपडे खरेदी करून आनंदोत्सव साजरा करणे असे दिवाळीचे स्वरूप असते. दुर्देवाने काही घटक मात्र आर्थिक अडचणीमुळे असे उत्सव साजरे करू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्या वतीने चला त्यांचीही दिवाळी गोड करू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 
आर्थिक दृष्टया अडचणीत असलेल्या घटकांसाठी दिवाळीमध्ये त्यांच्या चेहर्‍यावर स्मित हास्य उमटावे, त्यांचाही उत्सव आनंदात साजरा व्हावा या दृष्टीकोनातून मारवाडी युवा मंच प्रतिवर्षाप्रमाणे नागरीकांकडून वापरात नसलेले परंतू चांगले असलेले कपडे म्हणजेच साड्या, ड्रेस तसेच विविध वस्तू संकलित करणार आहेत. संकलित सर्व साहित्य दिवाळीच्या एक दिवस अगोदर गरजवंतांना वितरीत करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागरीकांनी वापरात नसलेल्या कपड्यासोबत विविध प्रकारचे साहित्य वैद्यनाथ सहकारी औद्योगिक संस्था सभागृह, श्री नाथ रोड येथे जमा करावेत असे आवाहन मारवाडी युवा मंच, राधा मोहन साथी प्रतिष्ठान परळीच्या वतीने करण्यात येत आहे. आपल्याकडील उपक्रमासाठी दान द्यायच्या वस्तू औद्योगिक वसाहत येथे दि.22 ऑक्टोबर पर्यंत जमा कराव्यात अधिक माहितीसाठी 9850213019, 9856015548 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment