परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- परळी तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बळीराम बदने यांनी दि.27 जुलै रोजी आत्महत्या केली होती.या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांना शासनाच्या वतिने नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
मालेवाडी येथील बळीराम भगवान बदने यांनी कर्जबाजारीपणास कंटाळुन दि.21 जुलै रोजी आत्महत्या केली होती आत्महत्या कुटूंबाचे वारसदार श्रीमती सुलभा बळीराम बदने याना आधार म्हणून नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांच्याहस्ते बुधवार दि.12 ऑक्टोबर रोजी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मालेवाडीचे सरपंच भुराज बदने तलाठी पंडित मयत शेतकर्याचे वडील भगवान बदने हे उपस्थित होते.
Thursday, October 13, 2022
मालेवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत. नायब तहसिलदार बी.एल.रुपनर यांच्या हस्ते धनादेश सुपुर्द.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment