परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील सोमेश्वर संस्थान जिरेवाडी येथील महिला बचत गटांनी अनोखा उपक्रम राबविला यामध्ये ३४ महिला बचत गटांचा समावेश होता .महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित येऊन महिलांनी उचललेले पाऊल कुटुंबाच्या व समाजाच्या आर्थिक विकासासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार या कार्यक्रमाचे वाटप करताना प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांनी काढले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच गोवर्धन कांदे तसेच निवृत्त पोलीस सहाय्यक श्रीधर मुंडे उपस्थित होते.
यावेळी, उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मौजे जिरेवाडी ग्रामपंचायत च्या वतीने, महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पिठाच्या गिरणीचा व मिरची कांडण यंत्रांचा शुभारंभ घेत कापून ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मारोती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान जिरेवाडी येथील राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचा व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेला मुलांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला.
यावेळी जिरेवाडी परिसरातील , विविध गावातील महिला बचत गटांची उपस्थिती होती तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment