Sunday, October 9, 2022

परळीत ईद-ए-मिलादुन्नबी जयंती निमित्त भव्य मिरवणूक संपन्न.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ईद-ए-मिलाद म्हणजे जगात शांती त्यागाचा आणि माणुसकीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस.या निमित्त शहरातील मलीकपुरा भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी हा सण व हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ईद-ए-मिलाद म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस.यानिमित्त शहरातील  मशिदीवर आणि गल्लीत गेल्या आठवड्यापासून भव्य रोषणाई करण्यात आली होती.दरम्यान ईद निमित्त गोड भात,बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून वाटप केला जातो.आज जयंतीनिमित्त रविवारी मुस्लिम बांधवांनी भव्य अशी मिरवणूक काढून धार्मिक झेंडे फडकावत उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली. 
हे मिरवणूकीचा मार्ग शहरातील मौलाना आझाद चौक मलिकपुरा येथुन निघाली होती नंतर शिवाजी महाराज चौक, बस स्थानक,एक मिनार चौक, कृषी बाजार समिती,टावर चौक,अख्तरी मस्जिद, पोलिस स्टेशन मार्गने मिरवणूक संपवण्यात आली.

शेवटी पोलीस प्रशासनाकडून झालेल्या सहकार्याबद्दल परळी शहर पोलीस व त्यांच्या सहकार्यांचे अहेले सुन्नत जमात व कमेटीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. दरम्यान इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अहेल सुन्नत जमात व तमाम मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. या मिरवणूकीत शहरातील तमाम मुस्लीम बांधव मोठ्या संख्यने सहभागी झाल्याने ही मिरवणूक न भुतो न भविष्यती अशीच झाली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment