Thursday, October 20, 2022

धारूरच्या तहसीलदारपदाचा पदभार नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्याकडे.

किल्लेधारूर (प्रतिनीधी)  धारूर तहसीलच्या रिक्त असणाऱ्या तहसीलदार पदी धारूर येथील नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामेश्वर स्वामी यांच्याकडे प्रभारी पदभार जिल्हाधीकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिला असून त्यांची नियूक्ती झाल्याने आठ महीण्या नंतर धारूर तहसीलला पुर्णवेळ तहसीलदार मिळल्याने नागरीकात आनंद व्यक्त केला जात आहे.

    धारूर तहसील कार्यालयातील कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांची आठ महीण्या पासून रिक्त आसणारे धारूर तहसीलचे तहसीलदार पदी बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नियूक्ती केली आहे. आठ महीण्या नंतर किल्ले धारूर तालूक्याची परिपूर्ण माहीती आसणारे व कार्यतत्पर तथा पुर्ण वेळ काम करणारे तहसीलदार मिळाले असून नागरीकाची कामे मार्गी लावण्यासाठी आता चांगला वेग येणार आहे. यामुळे सबंध तालुक्यातील नागरीकात आनंद व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment