केज (प्रतिनिधी) दोन अल्पवयीन मित्रांचे अपहरण अज्ञात व्यक्तीने केल्याची घटना मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी मस्साजोग येथे घडली
अपहरण झालेल्या दोन मित्रांची सुमित विकास रोडे रा.मस्साजोग आणि गोविंद आश्रुबा पाळवदे रा. सासुरा,अशी नाव आहेत.मंगळवारी दूपारी 4 वाजता या दोघांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलाचे वडील विकास लिंबाजी रोडे यांनी तक्रार नोंदवली आहे. या अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुरूवारी 27 आक्टोबर रोजीकेज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अज्ञात व्यक्तिंविरूद्ध गु. र. न.492/2022 भा. दं. वि. 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment