Thursday, October 20, 2022

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बीड शहरातील 12 रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ.


बीड (प्रतिनिधी) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळे बीड शहरातील नवीन 12 डीपी रस्त्यांना मंजुरी मिळाली या रस्त्याच्या कामाचा (ऑनलाइन) शुभारंभ आज दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत

बीड शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महा अभियान योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यातील 16 रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर आणखी 15 रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळावी यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता तत्कालीन नगर विकास मंत्री व आजचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या टप्प्यातील 12 रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे आज गुरुवारी सायंकाळी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते (ऑनलाईन)रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार असून यावेळी बीडचे पालकमंत्री अतुल सावे,माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि युवानेते डॉ योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे

No comments:

Post a Comment