Thursday, November 28, 2024

अजब प्रकार! शाळेतील कर्मचाऱ्याचे पद कायम ठेवण्यासाठी शिक्षण जि.प. शाळेत अन् टी.सी. मात्र खाजगी शाळेत..!


लातूर (प्रतिनिधी) :- शाळेतील कर्मचाऱ्याचे पद कायम ठेवण्यासाठी महत्वाची असलेली पटसंख्या वाढवून दाखविण्यासाठी त्या-त्या शाळांशी संगनमत करून आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या टी. सी. पालकांच्या परस्पर दुसऱ्या शाळांना देणाऱ्या हरंगुळ खुर्द जि.प. शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापक अण्णा नरसिंगे याचा पालक व ग्रामस्थांनी पर्दाफाश केला. संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर शिक्षण विभागाने खडबडून जागे होत मुख्याध्यापक नरसिंगे यांस तडकाफडकी निलंबित केले.

हरंगुळ ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर मुख्याध्यापक निलंबित.!

शहरालगत असलेल्या हरंगुळ खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अण्णा श्रीरंग नरसिंगे यांनी आपल्या कार्यकाळात जवळपास नऊ मुलांच्या टी.सी.पालकांच्या परस्पर लातूर, नांदगाव येथील खाजगी शाळांना दिल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर या मुख्याध्यापकांवर कारवाई  व्हावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली. मात्र संस्थाचालक धार्जिण्या शिक्षण विभागाने प्रकार पाठिशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. याप्रकरणी कांहीच कारवाई होत नसल्याने अखेर संतापलेल्या पालकांनी बुधवारी (दि.२७ नोव्हेंबर) शाळा चालू देणार नाही, असा पवित्रा घेत शाळेस टाळे ठोकले. जोपर्यंत मुख्याध्यापकावर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला.

पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई

ही बाब लक्षात घेत लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकरी वंदना फुटाणे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकरी व पालकांचे म्हणणे ऐकून घेत सदर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधकारी फुटाणे यांनी सदरच्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली खरी, मात्र जिल्ह्यातील इतर खाजगी शाळांमधील पदे वाचविण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून खेळ करणारे मुख्य सूत्रधार कोण आणि किती आहेत? याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा जाणकारांतून केली जात आहे.

मृत्यूला जिंकणं हे वारकरी संप्रदायाचे तत्व म्हणूनच आळंदीत माऊलीचा समाधी संजीवन सोहळा…


आळंदी (कांतीकारी साथी) तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात.यंदाही आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल झालेत. इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींचं दर्शन घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आळंदीत साजरा केला जातोय. काय आहे हा संजीवन समाधी सोहळा आणि कसा साजरा केला जातो .

संजीवन समाधी सोहळ्याचा इतिहास
महाराष्ट्रात अनेक साधू-संत होऊन गेले. मात्र भगवान सद्गुरू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनीच संजीवन समाधी घेतली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधीत प्रवेश केला. त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे.

आळंदी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी सांगितल्यानुसार, या संजीवन समाधी सोहळ्याला भगवान पांडूरंग, निवृत्ती महाराज, नामदेव महाराज स्वतः पंढरीवरून येतात अशी मान्यता आहे. एकंदरीत अखंड संत मंडळी याठिकाणी उपस्थित असतात. समाधीचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर..’ देव निवृत्ती दोन्ही धरीले कर’ – म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत असताना, प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ यांनी हात धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीजवळ नेलं. यावेळी वारकरी या समाधी सोहळ्याच्या प्रसंग प्रत्यक्षात अनुभवत असतात. मुळात वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही. मृत्यूला जिंकणं हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचा पाया आहे. म्हणूनच हा मृत्यूचा सोहळा नाही, हा संजीवन समाधीचा सोहळा आहे.

कसा साजरा केला जातो संजीवन समाधी सोहळा?

या सोहळ्याची सुरुवात 23 नोव्हेंबरपासूनच सुरुवात होते. परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारावर असलेल्या हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने होते. या सोहळ्यासाठी भगवान विठ्ठलाची पालखी काही आठवड्यांपूर्वी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. मुख्य संजीवन समाधी सोहळ्यात आज म्हणजेच (28 नोव्हेंबर रोजी) दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत हॅलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्याची सांगता 1 डिसेंबर रोजी रात्री 9.30 ते 12.30 दरम्यान माऊलींच्या छबीना मिरवणुकीने होते. या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीवर दररोज अभिषेक, दुग्धारती, महापूजा, नैवद्य, भजन, कीर्तन, पारायण परंपरेनुसार केले जाते. अशाप्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्सवात, जल्लोषात साजरा केला जातो. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही माउलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा जमा झाला आहे.

राज्यात आता दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, अन्यथा होणार कारवाई.


मुंबई (प्रतिनिधी) रस्ते अपघातामध्ये दुचाकीस्वार व सहप्रवासी (पिलियन रायडर) यांच्या मृत्यू व जखमींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांना हेल्मेट आवश्यक असून, ते नसल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत.

सहप्रवाशांवर 'स्वतंत्र हेड' खाली कारवाई होणार असून, त्यासाठी 'ई चलन' मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी पुण्यासह राज्यातील विविध शहरांमध्ये आरटीओ, पोलिस, जिल्हा प्रशासन यांची काही दिवसांपूर्वी संयुक्त बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी अपघातांचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांना अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले होते. हेल्मेटचा वापर होत नसल्याचे दिसून आले. त्यांनी हेल्मेटचा वापर करावा, अशा सूचना दिल्या होत्या.

हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. 'मोटार वाहन कायदा' १९८८च्या कलम १२८ आणि १२९ च्या तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवासी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी करून घ्यावी, असे अप्पर पोलिस महासंचालकांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Tuesday, November 26, 2024

मोठी बातमी! सरकार स्थापन झाल्यावर 3 महिन्यात राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचा पुन्हा धुरळा उडणार.!

मुंबई (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकी च्या विजयाचा गुलाल अजूनही उधळला जात असताना आता महायुतीने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार स्थापन झाल्यावर 3 महिन्यात पुन्हा एकदा प्रचाराचा धुरळा उडणार आहे. राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या प्रलंबित निवडणुका घेण्याबाबत महायुतीने निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीने घवघवीत यश मिळवले. राज्यातील 288 जागांपैकी 235 जागांवर महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत महायुतीत चर्चा होत असताना दुसरीकडे महायुतीने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

*निवडणुकीचा बिगुल वाजणार. 

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूरसह इतर काही महत्त्वांच्या महापालिकांच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षण, वॉर्ड रचना अशा वेगवेगळ्या वादांमुळे महापालिकाच्या निवडणुका प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींच्या कचाट्यात अडकले आहेत. आता, यावर तोडगा काढून निवडणुका घेण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

*कधी होणार महापालिका निवडणुका?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. ⁠महायुतीत याबाबत एकमत झाले आहे. ⁠विधानसभा निवडणूक निकालाचे वारे असे पर्यंत निवडणुका घेण्यावर महायुतीमध्ये एकमत झाले आहे. ⁠सरकार स्थापन होताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत महापालिका निवडणूकांची अधिसूचना जारी केली जाणार आहे. त्यामुळे ⁠राज्यात 2 महिन्यांत पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकांसोबत जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य उमेद वार हे मराठा होते.मराठा आमदार किती? मराठा महासंघाने जाहीर केली संख्या.


कांतीकारी साथी न्यूज -  विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य उमेदवार हे मराठा होते. हा मराठा समाज नेमका कोणासोबत राहिला, मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत तेवढा परिणामकारक राहिला का, अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. मराठा, मराठा कुणबी समाजाचे 2024 च्या विधानसभेत नेमके आमदार किती ? याबाबत काही वेगवेगळे मत आहे. काहींच्या मते 204 आमदार हे मराठा, मराठा-कुणबी आहेत, तर काहींनी 150 आमदार हे मराठा, मराठा-कुणबी असल्याचा दावा केला आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाने याबाबत राज्यातील निवडून आलेल्या आमदारांचा अभ्यास करुन यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यावेळी निवडून आलेले ११२ आमदार हे मराठा, मराठा-कुणबी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी ही माहिती दिली.

“आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्त्यांना विचारून घेऊन ही या आमदारांची संख्या कन्फर्म केली आहे. मागील विधानसभेमध्ये मराठा, मराठा कुणबी 118 आमदार होते.(कुणबी मध्ये ५५ कुणबी प्रकार आहेत.त्यातील फक्त मराठा समाजाशी सोयरिकी होतात ते फक्त मोजले आहेत.) यावेळी ११२ आमदार आहेत,” असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. राज्यात अनुसुचित जाती जमातीसाठी ५४ मतदारसंघ राखीव आहेत.

महाविकास आघाडी आणि महायुतीनेही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली. मराठवाड्यातून निम्म्याहून अधिक मराठा समाजाचे आमदार निवडून आले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असा संदेश मनोज जरांगे यांनी दिला होता, त्यांच्या आवाहानाला मराठवाड्यातील मराठा समाजाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही.

निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले असून मराठावड्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसेल असे म्हटले जात होते. या विभागानेही महायुतीला भक्कम साथ देत 40 जागा दिल्या. महाविकास आघाडीला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत मराठा कार्ड चालले नाही, संविधान बचाव मुद्दा फार चालला नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

विधानसभा निवडणूक 2024 मराठा, मराठा-कुणबी आमदार किती?

भाजप : जिंकलेल्या जागा 132 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 48)

शिवसेना :जिंकलेल्या जागा 57 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 26)

राष्ट्रवादी काँग्रेस: जिंकलेल्या जागा 41 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 20)

काँग्रेस: जिंकलेल्या जागा 16 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 5)

शरद पवार राष्ट्रवादी: जिंकलेल्या जागा १० (मराठा, मराठा-कुणबी आमदार 5)

शिवसेना ठाकरे : जिंकलेल्या जागा 20 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 6)

अपक्ष : जिंकलेल्या जागा 2 (मराठा, मराठा-कुणबी आमदार 2)

अन्य पक्ष :जिंकलेल्या जागा १० (मराठा, मराठा-कुणबी आमदार ००)

(अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आकडेवारीवरुन)

महाराष्ट्र विधानसभा 2024:एकूण आमदार 288पैकी मराठा, मराठा-कुणबी आमदार : 112

10 आमदार शेकाप, समाजवादी एमआयएम जनसुराज्य असे आहेत.

राज्यात अनुसुचित जाती जमातीसाठी ५४ मतदारसंघ राखीव आहेत.

महाराष्ट्र विधानसभा 2019: मराठा, मराठा-कुणबी आमदार: 118

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस भावी मंत्र्यांचीही नावे ही ठरल!


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होत असल्याची माहिती समोर येत आहे. यात आता देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राज्यात सर्वात जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील भावना आहे. यासह अनेक आमदारांनी देखील फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यामुळे आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला जाईल असेही सांगण्यात येत आहे.

महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाला समसमान मंत्रीपद देण्यात येईल अशीही माहिती समोर येत आहे.

महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे. यातच राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजीपाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, यांची नावे समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोडभरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे यांचा समावेश आहे.

अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजिते पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्रम. अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.

नाफेड यासंस्थेचे आनंदवाडी येथे सोयाबीन आधारभूत खरेदी केंद्र सुरू.

परळी-वैजनाथ (प्रतिनिधी): आनंदवाडी (ता.परळी वै.) येथे  नाफेड यासंस्थेचे सोयाबीन आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.जय हनुमान कृषी निविष्ठा सह. संस्था म.परळी वै. यासंस्थेस नाफेडने सोयाबीन आधारभूत किंमतीने खरेदी करण्यास अभिकर्ता म्हणून नेमणूक केली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी सातबारा आठ अ चा उतारा बँक पास व आधारकार्डची झेरॉक्स देऊन नोंदणी करणे आवश्यक असून सोयाबीनची शेतकऱ्यांनी नोंदनी पत्ता जय हनुमान आर्द्रता १२पेक्षा कमी असावा. जय हनुमान  संस्थेचे चेअरमन काशिनाथ कातकडे यांनी माहिती दिली असून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन घालण्याचे आवाहन केले आहे.
नोंदणीसाठी ऑफिसचा पत्ता:- जय हनुमान कॉम्प्लेक्स नेहरू चौक (तळ)परळी वैजनाथ मो.9373458273,8669113551   नाफेड शासकीय खरेदी सेंटर चे ठिकाण :- आनंदवाडी,अंबाजोगाई अहमदपुर रोड ता.परळी वैजनाथ जि.बीड

Friday, November 22, 2024

परळी वीज निर्मिती केंद्रातील सुनिल पवार यांना अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्यपदक. मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या हस्ते कौतुक.


परळी-वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी वीज निर्मिती केंद्राचा देश पातळीवर डंका वाजत असून गुजरात येथील वडोदरा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या विद्युत कंपन्यांच्या अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेत महाजनकोचे प्रतिनिधित्व करताना परळी औष्णिक विद्युत केंद्राचे सुनील पवार यांनी कास्यपदक पटकावले आहे. गुजरात येथील वडोदरा येथे नुकत्याच अखिल भारतीय विद्युत कंपनीच्या बॅडमिंटन स्पर्धेत महाजनकोचे प्रतिनिधित्व करताना परळी औष्णिक विद्युत केंद्राने देशभरातून तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. यापूर्वी 2000-2001 मध्ये रजत पदक पटकावले होते. त्यानंतर 23 वर्षांनी कास्यपदक मिळाले आहे.

या स्पर्धेत राघव देशपांडे  बुद्धिबळ स्पर्धेत रजत पदक तर  शमिमा  शेख यांनीही बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदविला. सुनील पवार यांनी आतापर्यंत क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन या तिन्ही खेळात अखिल भारतीय विद्युत कंपनीच्या स्पर्धेत नेतृत्व केले आहे.
या यशाबद्दल व्यवस्थापक सुनिल पवार यांचे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनिल इंगळे, अधीक्षक अभियंता प्रसन्नकुमार गरुड , धनंजय कोकाटे , संभाजी बुक्तरे  ,राजीव रेड्डी, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे,सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड आदींनी अभिनंदन केले आहे.

परळी मतदारसंघाचे उमेदवार धनंजय मुंडे साहेब यांचे निकालाआधीच शुभेच्छा व अभिनंदनाचे बॅनर परळीसह राज्यात जोरदार चर्चा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी पार पडली. आता 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निकालाकडे राज्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच निकाल लागण्याच्या आधीच बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे कृषीमंत्री उमेदवार धनंजय मुंडे यांचे अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर आमची परळी, आमची आण-बाण-शान, आमचा आमदार, ‘धनंजय मुंडे विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन’ असे मजकुर लिहिण्यात आले आहे. या बॅनरबाजीची सध्या परळी वैजनाथ सह राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. परळी विधानसभा निवडणुक नुकतीच पार पडली आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अति उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचं अभिनंदन करणं सुरू केलं आहे. परळी वैजनाथ तालुक्यातील हनुमान चौक भागामध्ये निकाला आधीच लागले धनंजय मुंडे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. बालाजी फड व सुरेश नाना फड यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे परळी वैजनाथ येथील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या बॅनरवर आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल त्यांनी धनंजय मुंडे यांचे अभिनंदनही केलं आहे

बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या नोटाच्या बॅगा. दागिने. बेहिशेबी संपत्ती सापडली.गुन्हा दाखल.


बीड (प्रतिनिधी)   बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या बॅगा आणि खोके सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदापूर येथील रहिवाशी असणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल 2 कोटी 7 लाख 31 हजार रुपयांची माया कमावल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड (रा. विकासवाडी, पो. रेडणी ता. इंदापूर, जि. पुणे) आणि त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दोन कोटी सात लाख 31 हजार रुपयांची बेहिशेबी संपत्ती.

हरिभाऊ नारायण खाडे हे बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्याकडे सोने आणि पैसे आढळून आले आहेत. खाडे यांच्या गैर कारभारामध्ये पत्नीने त्यांना मदत केल्याने खाडे दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत असताना एक कोटीच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे ना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणात त्यांच्या पत्नी मनीषा खाडे यांच्या विरोधात देखील बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खाडे यांच्या घरात एक कोटीची रोख रक्कम एक किलो सोने अशी दोन कोटी सात लाख 31 हजार रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली. उत्पन्नापेक्षा 116% अधिक ही संपत्ती होती. संपत्ती संपादित करण्यासाठी त्याच्या पत्नी मनीषा खाडे यांनी मदत केल्याने हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात 16 मे 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. 

चौकशी दरम्यान 10 ऑगस्ट 2023 ते 16 मे 2024  या कालावधीत हरिभाऊ खाडे यांनी त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा 2 कोटी 7 लाख 31 हजार 358 रुपये (116.28 टक्के) संपत्ती मिळवल्याच निष्पन्न झालं आहे. त्यापैकी त्याची पत्नी मनिषा खाडे हिने सुमारे 62 लाख 79 हजार953 रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर करुन हरिभाऊ खाडे यांना मदत केल्याचे चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी हरिभाऊ नारायण खाडे त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या.पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी !


बीड (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठवण वाजेपासून सुरु होईल, पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पाच ते सहा ठिकाणी अप्रिय घटना घडल्या. त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मतमोजणी प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु होईल. प्रत्येक ठिकाणी 14 टेबल वर ही प्रक्रिया सुरु होईल. सुरवातीला तपाली मतमोजणी होईल, त्यानंतर इव्हीम मशीन वरील मतमोजणी सुरु होईल.

मतदान प्रक्रिया दरम्यान अनेक ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, निकृष्ट जेवण, लाईट ची सुविधा नव्हती. बीडच्या उपजिल्हाधिकारी कविता जाधव आणि गेवराईचे धुमाळ यांनी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना जी अपमानस्पद वागणूक दिली त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती पाठक यांनी दिलेबीड, माजलगाव, गेवराई या ठिकाणी 29 फेऱ्या होतील. तर आष्टी मध्ये सर्वाधिक 34फेऱ्या होतील. केज आणि परळी या ठिकाणी 28 फेऱ्या होतील. सर्वात पहिला निकाल हा परळीचा अपेक्षित असून शेवटचा निकाल आष्टीचा लागेल.

मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती पाठक यांनी दिली.

बीड जिल्ह्यात ६८.८८ टक्के मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क.सहा ही मतदारसंघाची उद्या होणार मतमोजणी.


बीड (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २२ लाख २७ हजार ८४४ मतदारांपैकी १५ लाख ३४ हजार ४३६ म्हणजेच ६८.८८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बुधवारी (ता.२०) बजाविला. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील मतदानांची मोजणी शनिवारी (ता.२३) होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांनी सांगितले.

गेवराई मतदारसंघात ७२.७२ टक्के, माजलगाव ६७.२४, बीड ६२.१८, आष्टी ७३.०५, केज ६३.४८ आणि परळी मतदारसंघामध्ये ७५.२७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान परळी विधानसभा मतदारसंघात झाले.
गेवराई मतदारसंघात एक लक्ष ९९ हजार ८८९ पुरूष मतदार, १ लक्ष ८० हजार १७ महिला, इतर ३ असे एकूण तीन लक्ष ७९ हजार ९०९ मतदार आहेत. तर माजलगाव मतदारसंघामध्ये १ लक्ष ८५ हजार ८०६ पुरूष, १ लक्ष ६६ हजार ४७२ महिला, इतर १ असे एकूण ३ लक्ष ५२ हजार २७९ मतदारांनी, बीडमध्ये दोन लक्ष दोन हजार ७२० पुरूष, १ लक्ष ८१ हजार ३७२ महिला व इतर ९ असे एकूण ३ लक्ष ८४ हजार १०१, आष्टीतील दोन लक्ष पाच हजार ३५६ पुरूष, एक लक्ष ८१ हजार एक महिला, इतर १ असे एकूण तीन लक्ष ८६ हजार ३५८, केजमध्ये दोन लक्ष दोन हजार ६२० पुरूष, एक लक्ष ८४ हजार ५९५ महिला, इतर सहा असे एकूण तीन लक्ष ८७ हजार २२१ आणि परळीमध्ये एक लक्ष ७६ हजार ५० पुरूष, एक लक्ष ६१ हजार ९२२ महिला व ४ इतर असे एकूण तीन लक्ष ३७ हजार ९७६ असे एकूण मतदार आहेत.

असे झाले मतदान

  • गेवराई मतदारसंघात एक लक्ष ४७ हजार १२४ पुरूष, एक लक्ष २९ हजार १५७ महिला, इतर २ असे एकूण दोन लक्ष ७६ हजार २८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर माजलगाव मतदारसंघात एक लक्ष २६ हजार ५५५ पुरूष, एक लक्ष १० हजार ३२४ महिला, एक इतर असे एकूण २ लक्ष ३६ हजार ८८० मतदारांनी,
  • बीडमध्ये एक लक्ष २८ हजार ३११, बीडमध्ये एक लक्ष १० हजार ५३१, इतर ३ असे एकूण २ लक्ष ३८ हजार ८४५,
  • आष्टीमध्ये १ लक्ष ५२ हजार १७१ पुरूष, १ लक्ष ३० हजार ७५ महिला असे एकूण दोन लक्ष ८२ हजार २४६ मतदारांनी,
  • केजमध्ये एक लक्ष ३० हजार ८५४ पुरूष, एक लक्ष १४ हजार ९४३ महिला आणि इतर २ असे एकूण दोन लक्ष ४५ हजार ७९९
  • आणि परळी विधानसभा मतदारसंघामध्ये १ लक्ष ३६ हजार १५५ पुरूष, १ लक्ष १८ हजार २२८ महिला असे एकूण २ लक्ष ५४ हजार ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू.


केज (प्रतिनिधी) अज्ञात वाहनाने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र जखमी आहे. ही घटना गुरूवारी (दि.२१) सकाळी ९ च्या सुमारास केज तालुक्यातील मस्साजोग येथे घडली. बालाजी मनोहर केदार वय (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे.

केज तालुक्यात मस्साजोग येथील युवक बालाजी केदार हा आपला मित्र उमेश केंद्रे (१८ वर्ष) याच्याबरोबर केजहून त्यांच्या सारणी (सांगवी) या गावाकडे जात होते. यादरम्यान ते मस्साजोग येथील हॉटेल संघर्ष समोर आले असता त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये बालाजीचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पाठिमागे बसलेला त्याचा मित्र उमेश हा गंभीर जखमी झाला. अपघातात नंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच बिट जमादार दत्तात्रय बिक्कड हे घटनास्थळी दाखल झाले.

अजून माणुसकी जिंवत आहे! मयत बेवारस सुशीला जोशी यांच्यावर ब्राम्हण समाज बांधवांनी केले अंत्यसंस्कार.


बीड (प्रतिनिधी) ब्राम्हण समाजातील युवकांनी बेवारस मयत महिला सुशीला मधुकर जोशी वय 50 वर्ष राहणार काळे गल्ली बीड यांचा अंत्यविधी केला नातेवाईकांनी नकार दिल्यामळे दिनांक 21/11/2024 रोजी दुपारी 2 वाजता सुमारास ब्राम्हण सजातील रूढी परंपरा नुसार माय माऊलीचा अंत्यविधी पार पाडला त्यांच्या अंत्यविधीचा सर्व खर्च सामाजीक कार्यकर्ते सागर देशपांडे यांनी केला अत्यंविधीसाठी समाज बांधव उपस्थित होते

मयत महिला नामे सुशीला मधुकर जोशी वय 50 वर्षे राहणार काळे गल्ली बीड ही दिनांक 18/11/2024 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आय.सी.यु वार्ड मध्ये मरण पावलेली होती तीचा नवरा मयत असून तिला मुलगा मुलगी कोणी नाही तिला एक बहीण असून तिचे न नाव रुक्मिणी बडवे असे असून ती पैठण येथील रहिवासी असून तिला फोनवर संपर्क केला असता तिने येऊ शकत नाही असे कळविले व तिचा मुलगा सचिन बडवे यास संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मोबाईल लागला नाही तसेच तिला इतर कोणी नातेवाईकही नाहीत, तिचे प्रेत अंत्यविधीसाठी ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला होता त्यामुळे ब्राम्हण समाजातील तरुणांनी पुढाकार घेत आज सदरील महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ब्राम्हण समाजातील मान्यवर उपस्थित होते

Thursday, November 21, 2024

रेल्वेचं 'तत्काळ' तिकीट बुक करण्यात अडचण येतेय? 'या' प्रो टिप्स ठरतील उपयुक्त, लगेच जाणून घ्या.


-: शक्यतो लांबचा प्रवास असेल तर प्रवाशांकडून भारतीय रेल्वेचा पर्याय निवडला जातो. कारण हा प्रवास अत्यंत आरामदायी, कमी खर्चात आणि प्रवाशांना हव्या त्या श्रेणीमध्ये करता येतो. ज्यामुळे भारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यासाठी अनेक लोक स्वतःसाठी तिकीट बुक करतात, परंतु काही वेळा गर्दीमुळे  कन्फर्म तिकीट मिळत नाही. अशावेळी तत्काळ तिकीट बुकिंग हा योग्य पर्याय आहे. पण तत्काळ तिकीट बुक करणे इतके सोपे नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? काही छोट्या चुकांमुळे तिकीट कन्फर्म होत नाही आणि वेटिंग लिस्टमध्ये जाते. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया

IRCTC मोबाईल ॲप वापरा

-तुम्ही जेव्हाही तत्काळ तिकीट बुक करता, तेव्हा नेहमी IRCTC मोबाइल ॲप वापरा. हे तुम्हाला जलद बुक करण्यात मदत करते. अनेकांना याची माहिती नसते, त्यामुळे विलंब होतो आणि तिकीट कन्फर्म होत नाही.

-IRCTC ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर, होम पेजच्या तळाशी असलेल्या ‘More’ वर क्लिक करा. बायोमेट्रिक वेरिफिकेशन चालू करा. असे केल्याने, लॉगिन करताना कॅप्चा आणि ओटीपीला बायपास केले जाऊ शकते, ज्यामुळे तत्काळ बुकिंग दरम्यान तुमचा वेळ वाचतो.

-IRCTC ॲपच्या होम पेजवर, 'अकाऊंट' वर क्लिक करा. ‘माय मास्टर लिस्ट’ मध्ये नाव, वय आणि लिंग यासारखे तपशील आगाऊ भरा. यामुळे तत्काळ बुकिंग करताना वेळेची बचत होते.

जलद इंटरनेट आवश्यक

नेहमी लक्षात ठेवा की, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी फास्ट इंटरनेट खूप महत्वाचे आहे. हे तपासण्यासाठी तुम्ही पिंग टेस्ट रन करू शकता. यासाठी तुम्ही Google वर जाऊन meter.net वापरू शकता. जर पिंग 100ms पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ कनेक्शन हळू आहे. अशावेळी चांगले सिग्नल असलेल्या भागात जा किंवा वायफाय वापरा.

ऑटो अपग्रेडेशन निवडा

बुकिंगच्या वेळी, जर तुम्हाला कन्फर्म तिकीट हवे असेल, तर प्रवाशांच्या तपशीलात ‘ऑटो अपग्रेडेशन’ वर क्लिक करा. असे केल्याने, जर तुम्ही स्लीपर क्लासमध्ये तिकीट बुक केले आणि तिकीट उपलब्ध नसेल तर तुम्हाला एसी क्लासच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली जाईल, तेव्हा तुम्ही ते अपग्रेड करू शकता.

श्रीक्षेत्र दत्तधाम सारडगाव येथे श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सव !


_सोहळ्याला बद्रिनाथहून जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह संत महंत राहणार उपस्थित_
 
परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) बारा ज्योतिर्लिं गांपैकी एक ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पावन पंचक्रोशीत निर्माण होत असलेल्या श्री क्षेत्र दत्तधाम (अध्यात्मिक उन्नती केंद्र), गोपाळपुरा, सारडगांव, परळी-धर्मापुरी रोड, परळी वैजनाथ, जि. बीड येथे श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य दिव्य सोहळ्याला बद्रिनाथहून जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह संत महंत  उपस्थित राहणार आहेत.
  ह.भ.प. विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज (निर्माणकर्ते श्री. दत्तधाम, अध्यामिक उन्नती केंद्र) यांनी या सोहळ्याबाबत सविस्तर माहिती. 
दिली.मार्गशीर्ष प्रतिपदा, सोमबार दि. २ डिसेंबर २०२४ ते मार्गशीर्ष शुक्ल विनायक चतुर्थी, गुरुवार दि. ५ डिसेंबर २०२४ या चार दिवसीय कालावधीत हा अध्यात्मिक सोहळा होणार आहे.श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग होणार असुन
यज्ञाचार्य: पूज्यनीय पं. राजराजेश्वर दीक्षित (ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग पुजारी, म.प्र.) हे असणार आहेत. 'परमाराध्य' परमधर्माधीश उत्तरामनाय ज्योतीष्पीठाधीश्वर जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती '१००८'  (ज्योतिर्मठ, बद्रिनाथ, उत्तरांचल) यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा तर कलशारोहण सोहळ्याला प.पू. महामंडलेश्वर स्वामी देवेंद्रानंदगिरी (अध्यक्षः वेदांत आश्रम, बहादूरगड, उपाध्यक्षः अखिल भारतीय संत्र समिती), ह.भ.प. मारोतीबाबा कुरेकर (माजी अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षम संस्था, आळंदी),प.पू. वेदांताचार्य विद्यावाचस्पती डॉ. माणिकशास्त्री मुखेकर (वाराणसी, आळंदी) उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यास ना. धनंजय मुंडे, आ. पंकजाताई मुंडे,राहुल भैय्या कराड साहेब (मा. कार्यकारी अध्यक्ष माईर्स एमआयटी पुणे) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तसेच भागवतराव कराड (माजी केंद्रीय अर्थ राजयमंत्री), मा. आ.चंद्रकांत सोनवणे (चोपडा, जळगांव ), संजय दौड माजी विधान परिषद सदस्य,बुधाजी पानसरे उद्योजक, नाशिक यांच प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संपूर्ण सोहळ्यास विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथराव कराड  (संस्थापक- अध्यक्ष, माईर्स एम्. आय. टी., पुणे) यांची प्रेरणा असुन ह.भ.प.डॉ. नामदेवशास्त्री सानप महाराज (श्री क्षेत्र भगवानगड) हे आशिर्वादपर सदिच्छा भेट देणार आहेत. न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचे या सोहळ्यास विशेष सहकार्य लाभणार आहे. व्यवस्थापक समस्त ग्रामस्थ मंडळी, सारडगांव, नंदनज हे आहेत.

*वाल्मिक अण्णा कराड यांचे विशेष सहकार्य*

श्रीक्षेत्र दत्तधाम सारडगाव येथे श्री. दत्तात्रेय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व चार दिवस कीर्तन महोत्सवास मा. ना.धनंजय मुंडे साहेब व नगरपरिषद गटनेते वाल्मीक आणा कराड यांची विशेष सहकार्य लाभले आहे.

• *चार दिवसीय कीर्तन महोत्सव...*

या सोहळ्यात चार दिवसीय कीर्तन महोत्सव  आयोजित करण्यात आला असुन महाराष्ट्रातील ख्यातनाम व जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार किर्तनसेवा करणार आहेत. यामध्ये व्याकरणाचार्य: ह.भ.प. अर्जुन महाराज लाड, महंत ह.भ.प. राधाताई सानप (आईसाहेब) (श्री क्षेत्र मीराबाई संस्थान, पाटोदा),ह.भ.प. बापूसाहेब मोरे महाराज (जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज - श्री क्षेत्र पंढरपूर) तर काल्याचे कीर्तन विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज (नंदनज, ह. मु. नाशिक) यांचे होणार आहे. या महोत्सवात वारकरी संप्रदायातील गुणवान किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, भजनी मंडळी आदी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
सोमवार, दि. २ डिसेंबर ते गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ प्रणप्रतिष्ठा सोहळा व दत्तयाग विधी,भजन, कीर्तन ,श्री.दत्तात्रय भगवान (त्रिमुखी) प्राणप्रतिष्ठा सोहळा, दत्तयाग व  कीर्तन महोत्सव सोहळ्याचा व अध्यात्मिक पर्वणीचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प. विद्यावाचस्पती डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज (निर्माणकर्ते श्री. दत्तधाम, अध्यामिक उन्नती केंद्र) यांनी केले आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतमोजणी कर्म चाऱ्यांचे सरमिसळीकरण.निवडणूक निरीक्षक,राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार.

बीड : -  जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या मतमोजणी कर्मचाऱ्यांचे सरमिसळीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात निवडणूक निरीक्षक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडले.
जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक आणि सुक्ष्म निरीक्षक यांचे रॅन्डमायझेशन (सरमिसळीकरण) झाले. ही प्रक्रिया गेवराई, माजलगावच्या निवडणूक निरीक्षक लालटनपुई वाँगचाँग, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, केज विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक वजाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. तर ऑनलाईन माध्यमातून केज व परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सुनील अंचिपका उपस्थित होते.
यावेळी सहाही मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारही उपस्थित होते. या प्रक्रियेचे अवलोकन त्यांनी केले. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व उमेदवार यांनीही या प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत समाधान व्यक्त केले. 
ही प्रकिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, एनआयसीचे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी भाऊसाहेब बांगर यांनी परिश्रम घेतले.  

जिल्ह्यातील सहाही मतदार संघासाठी केंद्रीय मतमोजणी निरीक्षक यांची नियुक्ती .

बीड :-  जिल्ह्यातील सहाही मतदार संघासाठी केंद्रीय मतमोजणी निरीक्षक यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोग यांनी केली आहे. त्यानुसार 
गेवराईसाठी लालटनपुई वॉनचाँग (मणिपूर ), माजलगावसाठी मनोज कुमार (बिहार), बीडसाठी विजयकुमार जयरामन (कर्नाटक), आष्टीसाठी श्रीमती पूजा अग्निहोत्री (उत्तर प्रदेश), केजसाठी सुनील अंचिपका (गोवा) आणि परळीसाठी श्रीमती ईला तिवारी (मध्य प्रदेश) केंद्रीय मतमोजणी निरीक्षक असतील. 
 जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांच्या दालनात पूजा अग्निहोत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्संगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेंद्रकुमार कांबळे उपस्थित होते.

परळी मतदारसंघातून परळी शहर बुथ निहाय एकूण झालेले मतदान व टक्केवारी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी मतदारसंघ संघात काल दिनांक 20/11/2024 रोजी विधानसभेचे मतदान पार पडले काही अपरिहार्य घटना वगळता मोठ्या संख्येने मतदान पार पडले. 
परळी शहरातील बुथनिहाय एकूण झालेले मतदान व मतदानाची टक्केवारी. आम्ही आमच्या वाचकांना देत आहोत. 


घाटनांदूर मतदान केंद्रावरील तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आरोपीत बहुतांशी तरुणांचा समावेश.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी मतदार संघातील घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथे मतदान केंद्रावर तोडफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी जवळपास 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.

प्रत्येक निवडणुकीत परळी मतदार संघ कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही परळी मतदार संघात राडा झाला. महाविकास आघाडीचे नेते ऍड. माधव जाधव यांना कन्हेरवाडी येथे मारहाण करण्यात आली. व्हिडीओ व्हायरल होताच या मारहाणीचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटले. घाटनांदूर येथील पोलीस चौकीतील पोलीस शिपाई नानासाहेब धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि.20) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास जि. प. प्राथमिक शाळा, जि.प. कन्या शाळा, सोमेश्वर विद्यालयातील मतदान केंद्रात अचानक 50 ते 60 लोक एमएच 06 एझेड 4208, एमएच 14 एवाय 35 आणि एमएच 44 एस 7716 या वाहनातून घातक हत्यारे, लाकडी दंडुके घेऊन आले. ऍड. माधव जाधव यांना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.  पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस, होमगार्ड आणि केंद्राध्यक्ष यांना घातक हत्यारे आणि दंडुक्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी, केंद्राध्यक्ष जखमी झाले. त्यांनतर आरोपींनी ईव्हीएम मशीन आदळून नुकसान केले. सदर फिर्यादीवरून अक्षय कमलाकर मोरे, सुरज अशोक निंबाळकर (दोन्ही रा. मोरेवाडी), शंभूराजे संजय देशमुख (माकेगाव), यशोदीप कल्याण किर्दंत, ओम प्रवीण किर्दंत, वैभव रमेश किर्दंत (सर्व रा. सातेफळ), अभिजीत कल्याण देशमुख (नांदडी), सिद्धेश्वर जाधव, सुनील देशमुख, वसंत मारोती करजाळकर बलांडे, नानासाहेब पूसकर देशमुख, विशाल जाधव, गणेश जाधव, विजय जाधव, अजय जाधव, संजय अनंत जाधव, गोट्या जाधव, उमाकांत जाधव (सर्व रा. घाटनांदूर) व इतर 15 ते 20 जण असे एकूण जवळपास 40 जणांवर कलम बीएनएस 109, 118(1), 132, 189(2), 191(2), 191(3), 190, 324(4), 324(5), मालमत्ता विरुपण प्रतिबंधक अधिनियम, लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 

*सात आरोपी ताब्यात*

दरम्यान, गुन्हे दाखल होताच पोलिसांनी एका अल्पवयीन सह सात आरोपींना ताब्यात घेतले. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास एपीआय राजेंद्र घुगे करत आहेत.

बीड जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदानावेळी तुफान राडा.कुठे काय घडलं? ठिकठिकाणचा सविस्तर आढावा.

बीड (कांतीकारी साथी रिपोर्टर) विधान सभा निवडणुकी साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या महोत्सवाला परळी मतदारसंघातील वेगवेगळ्या राड्यांमुळे गालबोट लागले. परळी मतदारसंघातील धर्मापुरी, परळी शहर, घाटनांदूर, केज तालुक्यातील विडा आणि पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथे हाणामारी, तोडफोड, कॅमेरे बंद ठेवण्यासारख्या घटना घडल्या. त्यामुळे या महोत्सवाचा शिमगा झाला.

रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा होत्या. जिल्ह्यात सहा वाजेपर्यंत मतदान ६७.३४ टक्के एवढे झाले. जिल्ह्यात २४१६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया चालली. २२ लाख २७ हजार ८४४ मतदार यावेळी पात्र होते. सकाळी गुलाबी थंडीत मतदार घराबाहेर पडले नाहीत; परंतु ९ नंतर मतदानाचा टक्का वाढत राहिला. याच दरम्यान गैरप्रकाराचे कथित व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.
रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा होत्या. जिल्ह्यात सहा वाजेपर्यंत मतदान ६७.३४ टक्के एवढे झाले. जिल्ह्यात २४१६ केंद्रांवर मतदान प्रक्रिया चालली. २२ लाख २७ हजार ८४४ मतदार यावेळी पात्र होते. सकाळी गुलाबी थंडीत मतदार घराबाहेर पडले नाहीत; परंतु ९ नंतर मतदानाचा टक्का वाढत राहिला. याच दरम्यान गैरप्रकाराचे कथित व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.
परळी मतदारसंघातील धर्मापुरीसह इतर मतदान केंद्रांवर कॅमेरे बंद ठेवून मतदान केले जात होते. यावर मविआचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आक्षेप नोंदवित निवडणूक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्याच शरद पवार गटाच्या माधव जाधव या नेत्याला धनंजय मुंडे समर्थकांनी बेदम मारहाण करत मतदान केंद्राबाहेर हाकलले. याचे पडसाद जाधव यांचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे उमटले. काही लोकांनी मतदान केंद्रात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत इव्हीएम फोडल्या. तसेच इतर साहित्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे दोन तास प्रक्रिया बंद पडली होती.
परळी मतदारसंघातील धर्मापुरीसह इतर मतदान केंद्रांवर कॅमेरे बंद ठेवून मतदान केले जात होते. यावर मविआचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी आक्षेप नोंदवित निवडणूक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांच्याच शरद पवार गटाच्या ॶॅड.माधव जाधव या नेत्याला धनंजय मुंडे समर्थकांनी बेदम मारहाण करत मतदान केंद्राबाहेर हाकलले. याचे पडसाद जाधव यांचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे उमटले. काही लोकांनी मतदान केंद्रात घुसून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत इव्हीएम फोडल्या. तसेच इतर साहित्यांचीही तोडफोड केली. त्यामुळे दोन तास प्रक्रिया बंद पडली होती.
नवीन मशीन आल्यावर मतदारांनी हक्क बजावण्यास सुरुवात केली. असेच प्रकार पाटोदा आणि केज तालुक्यातही घडले. यामुळे शांततेत सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला दुपारी गालबोट लागण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याप्रकरणाची नोंद झाली नव्हती. केज मतदारसंघातील आनंदवाडी गावामध्ये मतदान केंद्रातील कर्मचारी उल्हास दामोदर थिगळे यांना नवनाथ देवगुडे (रा. आनंदवाडी) याने मारहाण करत कामात अडथळा आणला. ओळखपत्राशिवाय मतदान करू देत नसल्याच्या कारणा वरून कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून अंगावर धाऊन जाऊन हातातील लोखंडी कड्याने डोळ्यावर बुक्क्या मारून जखमी केले. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. ए. जंघाळे हे करत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.
नवीन मशीन आल्यावर मतदारांनी हक्क बजावण्यास सुरुवात केली. असेच प्रकार पाटोदा आणि केज तालुक्यातही घडले. यामुळे शांततेत सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला दुपारी गालबोट लागण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याप्रकरणाची नोंद झाली नव्हती. केज मतदारसंघातील आनंदवाडी गावामध्ये मतदान केंद्रातील कर्मचारी उल्हास दामोदर थिगळे यांना नवनाथ देवगुडे (रा. आनंदवाडी) याने मारहाण करत कामात अडथळा आणला. ओळखपत्राशिवाय मतदान करू देत नसल्याच्या कारणा वरून कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून अंगावर धाऊन जाऊन हातातील लोखंडी कड्याने डोळ्यावर बुक्क्या मारून जखमी केले. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. ए. जंघाळे हे करत आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

विड्यात बोगस मतावरून भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले: बोगस मतदान करण्यावरून भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. हा प्रकार केज तालुक्यातील विडा येथील मतदान केंद्रावर बुधवारी दुपारी घडला. या मारहाणीचा कथित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. केज विधानसभा मतदार संघात येत असलेल्या विडा येथे मतदान केंद्रावर बुधवारी सकाळपासून शांततेत मतदान सुरू असताना दुपारी एक जण बोगस मतदान करताना समोर आला. याची विचारणा भाजप गटाकडून करण्यात आली. यावेळी भाजपचा स्थानिक नेता व शरद पवार गटाचे सरपंच व त्यांचे वडील यांच्यात मतदान केंद्रावर हाणामारी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी सोडवासोडव करण्याचा प्रयत्न केला. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. ही मारामारी सुरू असताना काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांच्यातील हा वाद मिटला. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे.
घाटनांदूरमध्ये मशीनसह साहित्याची तोडफोड; दोन तास मतदान थांबले: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील सातही बूथवर अज्ञात जमावाने हल्ला करून बूथवरील मशीन फोडल्या. शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मतदानप्रक्रिया बंद पाडली. दोन तास मतदान थांबल्यानंतर नवीन मशीन लावण्यात आल्या, त्यानंतर भीतीच्या वातावरणात मतदारांनी आपला हक्क बजावला. घाटनांदूर येथल सोमेश्वर विद्यालयातील बूथ क्र. २८०, २८१, २८३ यावर अज्ञात जमावाने तोडफोड केली. जि.प. कन्या शाळेतील बूथ क्र. २८२ येथेही असाच प्रकार घडला. तेथील महिला कर्मचारी घाबरल्याने त्यांचा बीपी वाढला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा सुरडकर व डॉ. विलास माले यांनी त्यांच्यावर उपचार केले. तसेच जि.प. केंद्रीय शाळा येथील बूथ क्र. २७६, तोडफोडीअगोदरचे मतदान सुरक्षित घाटनांदूरसह परिसरातील मतदानप्रक्रिया बंद पाडण्यात आली. काही ठिकाणी मशीनही फोडल्या; परंतु या गैरप्रकारापूर्वी ज्यांनी मतदान केले आहे, त्यांचे मतदान सुरक्षित असल्याचा दावा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केला. २७७, २७८ येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मतदान प्रक्रिया बंद पाडण्यात आली. त्यानंतर बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
घाटनांदूरमध्ये मशीनसह साहित्याची तोडफोड; दोन तास मतदान थांबले: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील सातही बूथवर अज्ञात जमावाने हल्ला करून बूथवरील मशीन फोडल्या. शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मतदानप्रक्रिया बंद पाडली. दोन तास मतदान थांबल्यानंतर नवीन मशीन लावण्यात आल्या, त्यानंतर भीतीच्या वातावरणात मतदारांनी आपला हक्क बजावला. घाटनांदूर येथल सोमेश्वर विद्यालयातील बूथ क्र. २८०, २८१, २८३ यावर अज्ञात जमावाने तोडफोड केली. जि.प. कन्या शाळेतील बूथ क्र. २८२ येथेही असाच प्रकार घडला. तेथील महिला कर्मचारी घाबरल्याने त्यांचा बीपी वाढला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा सुरडकर व डॉ. विलास माले यांनी त्यांच्यावर उपचार केले. तसेच जि.प. केंद्रीय शाळा येथील बूथ क्र. २७६, तोडफोडीअगोदरचे मतदान सुरक्षित घाटनांदूरसह परिसरातील मतदानप्रक्रिया बंद पाडण्यात आली. काही ठिकाणी मशीनही फोडल्या; परंतु या गैरप्रकारापूर्वी ज्यांनी मतदान केले आहे, त्यांचे मतदान सुरक्षित असल्याचा दावा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केला. २७७, २७८ येथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मतदान प्रक्रिया बंद पाडण्यात आली. त्यानंतर बीड जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन बन्सीआण्णा सिरसाट यांच्या गाडीची तोडफोड करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
चोथेवाडीचे बूथ घेतले ताब्यात: घाटनांदूर जवळ असलेल्या चोथेवाडी येथे बूथ क्रमांक २८६ दुपारी दोन वाजता बूथ ताब्यात घेऊन तोडफोड करण्यात आली. मशीन बंद पाडल्या होत्या. झोनल ऑफिसर यांनी दुपारी चार वाजता नवीन मशीन जोडल्यानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत झाली. या ठिकाणीसुद्धा घाटनांदूरच्या घटनेनंतर हा प्रकार घडला असून या ठिकाणीसुद्धा अज्ञात जमावाने धुडगूस घातला आहे. या दोन्ही घटनांची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. या घटनेमुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
चोथेवाडीचे बूथ घेतले ताब्यात: घाटनांदूर जवळ असलेल्या चोथेवाडी येथे बूथ क्रमांक २८६ दुपारी दोन वाजता बूथ ताब्यात घेऊन तोडफोड करण्यात आली. मशीन बंद पाडल्या होत्या. झोनल ऑफिसर यांनी दुपारी चार वाजता नवीन मशीन जोडल्यानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत झाली. या ठिकाणीसुद्धा घाटनांदूरच्या घटनेनंतर हा प्रकार घडला असून या ठिकाणीसुद्धा अज्ञात जमावाने धुडगूस घातला आहे. या दोन्ही घटनांची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. या घटनेमुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शरद पवार गटाचे माधव जाधव यांना बेदम मारहाण: परळी येथील बैंक कॉलनीतील मतदान केंद्राबाहेर थांबलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अॅड. माधव जाधव यांना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेले बाबा शिंदे यांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. परळीतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सकाळी शहरातील काही मतदान केंद्रांवर भेट दिली. त्यानंतर येथील बैंक कॉलनीतील मतदान केंद्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख गेले असता, त्यांच्यासोबत असलेले अॅड, माधव जाधव, राजेश देशमुख, बाबासाहेब शिंदे, सुदामती गुट्टे हे मतदान केंद्राच्या बाहेर थांबलेले होते, अगोदर बाबा शिंदे यांना एकाने गालावर चापट मारली. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर थांबलेल्या माधव जाधव यांना चापटा बुक्क्यांनी विरोधी चार-पाच जणांनी मारहाण केली. यानंतर माधव जाधव तिथून निघून गेले. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. जाधव हे घाटनांदुरचे आहेत. त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत राहून प्रचार केला होता. बुधवारी उमेदवारासोबत मतदान केंद्राला भेट देत असताना त्यांना मारहाण झाली.
शरद पवार गटाचे माधव जाधव यांना बेदम मारहाण: परळी येथील बैंक कॉलनीतील मतदान केंद्राबाहेर थांबलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अॅड. माधव जाधव यांना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे समर्थकांनी बेदम मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेले बाबा शिंदे यांनाही धक्काबुक्की केली. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. परळीतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सकाळी शहरातील काही मतदान केंद्रांवर भेट दिली. त्यानंतर येथील बैंक कॉलनीतील मतदान केंद्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख गेले असता, त्यांच्यासोबत असलेले अॅड, माधव जाधव, राजेश देशमुख, बाबासाहेब शिंदे, सुदामती गुट्टे हे मतदान केंद्राच्या बाहेर थांबलेले होते, अगोदर बाबा शिंदे यांना एकाने गालावर चापट मारली. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर थांबलेल्या माधव जाधव यांना चापटा बुक्क्यांनी विरोधी चार-पाच जणांनी मारहाण केली. यानंतर माधव जाधव तिथून निघून गेले. याप्रकरणी दुपारी ४ वाजेपर्यंत जाधव यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. जाधव हे घाटनांदुरचे आहेत. त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत राहून प्रचार केला होता. बुधवारी उमेदवारासोबत मतदान केंद्राला भेट देत असताना त्यांना मारहाण झाली.
ईव्हीएम फोडण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला - 'परळी मतदारसंघात जे दादागिरी व दहशतीची भाषा करीत आहेत, ते तुतारीचे उमेदवार व त्यांच्या मुलाने घाटनांदूर येथील मतदान यंत्राची तोडफोड केली आहे. तसेच मुरंबी, चोथेवाडी, तळेगाव घाट, सेलू आंबा येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच घाटनांदूरमध्ये मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सी सिरसाट यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आजपर्यंत तीस वर्षांत मतदान यंत्राची तोडफोड करण्याचा प्रकार आपण कधीही पाहिला नाही. पहिल्यांदाच मतदान यंत्राची विरोधी उमेदवारांच्या जवळच्या माणसांनी तोडफोड करून निवडणुकीला गालबोट लावले आहे. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आपण प्रशासनास कळविले आहे,' अशी माहिती परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी दिली.
ईव्हीएम फोडण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला - 'परळी मतदारसंघात जे दादागिरी व दहशतीची भाषा करीत आहेत, ते तुतारीचे उमेदवार व त्यांच्या मुलाने घाटनांदूर येथील मतदान यंत्राची तोडफोड केली आहे. तसेच मुरंबी, चोथेवाडी, तळेगाव घाट, सेलू आंबा येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच घाटनांदूरमध्ये मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सी सिरसाट यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आजपर्यंत तीस वर्षांत मतदान यंत्राची तोडफोड करण्याचा प्रकार आपण कधीही पाहिला नाही. पहिल्यांदाच मतदान यंत्राची विरोधी उमेदवारांच्या जवळच्या माणसांनी तोडफोड करून निवडणुकीला गालबोट लावले आहे. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आपण प्रशासनास कळविले आहे,' अशी माहिती परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी दिली.
मतदानाचा टक्का ३ ने वाढला जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाचा टक्का ३.८ ने वाढला आहे. रात्री १० वाजता निवडणूक विभागाने सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची अंदाजित आकडेवारी दिली. यामध्ये ६७.३४ ६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. सर्वाधिक मतदान हे परळी मतदारसंघात झाले असून, सर्वात कमी बीड मतदारसंघात झाले आहे.
मतदानाचा टक्का ३ ने वाढला जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाचा टक्का ३.८ ने वाढला आहे. रात्री १० वाजता निवडणूक विभागाने सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची अंदाजित आकडेवारी दिली. यामध्ये ६७.३४ ६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. सर्वाधिक मतदान हे परळी मतदारसंघात झाले असून, सर्वात कमी बीड मतदारसंघात झाले आहे.
कुठे उशिरापर्यंत रांगा, तर कुठे कर्मचारी परतले- जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट, पाटोदा व धारुर शहरातील काही मतदान केंद्र तसेच गेवराई तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. दुसरीकडे सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करुन काही अधिकारी व कर्मचारी मतपेट्या घेऊन परतले होते. अनेक ठिकाणी शांततेत प्रक्रिया पार पडल्याबद्दल स्वागत केले.
कुठे उशिरापर्यंत रांगा, तर कुठे कर्मचारी परतले- जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट, पाटोदा व धारुर शहरातील काही मतदान केंद्र तसेच गेवराई तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. दुसरीकडे सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण करुन काही अधिकारी व कर्मचारी मतपेट्या घेऊन परतले होते. अनेक ठिकाणी शांततेत प्रक्रिया पार पडल्याबद्दल स्वागत केले.

Wednesday, November 20, 2024

बीड विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.

बीड (प्रतिनिधी) बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. बाळासाहेब शिंदे यांच्या निधनाची माहिती कळताच सगळ्यानाच धक्का बसला. अतिशय मनमिळावू होती. बाळासाहेब शिंदे यांच्या निधनाची घटना मनाला सुन्न करणारी आहे. अशा प्रतिक्रिया व्यक्त होवू लागल्या आहे. मित्रपरिवारातील हसरा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सायं. दै.कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी.


कांतीकारी साथी रिपोर्ट न्यूज ;-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ६१.९५टक्के,
अकोला – ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,

औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड – ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,

बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे – ५९.७५ टक्के,

गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली – ६१.१८ टक्के,

जळगाव – ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,

लातूर _ ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर – ५६.०६ टक्के,

नांदेड – ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,

उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,

पुणे – ५४.०९ टक्के,
रायगड – ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली – ६३.२८ टक्के,

सातारा – ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,

ठाणे – ४९.७६ टक्के,
वर्धा – ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.

Tuesday, November 19, 2024

जनता जनार्दनाने विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या आपल्या भूमिपुत्राच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभा करावेत. - धनंजय मुंडे

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - विकास हा आपला पिंड असून मुंडे कुटुंबाच्या दोन पिढ्यांनी परळी मतदारसंघाची सेवा केली आहे व पुढेही शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित भावनेने विकास हीच जात आणि सेवा हाच धर्म मानून काम करत राहू, परळी मतदारसंघातील तमाम जनता जनार्दनाने विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या आपल्या भूमिपुत्राच्या पाठीशी मतदान रुपी आशीर्वाद उभा करावेत असे आवाहन परळी विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनी केले आहे. 
राजकारणात सक्रिय झाल्यापासून आजपर्यंत धनंजय मुंडे यांनी विविध माध्यमातून परळी मतदारसंघातील जनतेची शक्य ती सर्व सेवा केलेली आहे. 
मतदारसंघात मोठे व लहान अनेक विकासाचे प्रकल्प मंजूर केले असून अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावर व प्रस्तावित असलेली कामे पूर्ण करण्यासाठी विकासाचा पिंड आणि तो निभावण्याची क्षमता अंगी लागते. त्यामुळे ती क्षमता अंगी असलेल्या उमेदवाराच्या पाठीशीच आपले मतदान रूपे आशीर्वाद उभे करावेत असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. 
परळी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकी पहिल्या दिवसापासून राज्यात चर्चेची ठरली. आमदार पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे हे एकत्र असल्यामुळे सोपी आहे अशी वाटणारी लोकसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणाने अंतिम टप्प्यात अत्यंत चुरशीची ठरली व पंकजाताई मुंडे यांचा अत्यंत अल्पमतांनी अनपेक्षित असा पराभव झाला. 
मात्र तेव्हापासून काही वरिष्ठ शक्तींनी धनंजय मुंडे यांना टार्गेट केले आहे. याचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी अनेक वेळा आपल्या भाषणांमधून केला. विरोधकांकडून सातत्याने परळीच्या भूमीची, इथल्या नागरिक - मतदारांची बोगस मतदान करणारे आणि गुंडगिरी करणारे असा सातत्याने अपमान करण्यात आला. याचा रोष इथल्या जनतेच्या मनात दिसून येत आहे. हा रोष इथली जनता आपल्या मतांमधून दाखवून देईल असा विश्वास धनंजय मुंडे यांना आहे.

मतदान केंद्र परिसरात मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट वापरास निर्बंध.

बीड,  (जिमाका) : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्ह्यातील समाविष्ट असलेल्या २२८ गेवराई, २२९ माजलगाव, २३० बीड, २३१ आष्टी, २३२ केज व २३३ परळी या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात कोणताही भंग होऊ नये व सदर आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने या मतदान केंद्र परिसरात मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट वापरास निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविनाश पाठक यांनी निर्गमित केले आहेत.
निवडणुकीशी संबंधित मतदान अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, इतर मतदानासाठी नियुक्त अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख, निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना हे प्रतिबंध लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.

भाजप आमदाराच्या बहिणीवर हल्ला अपक्ष उमेदवाराला केलं रक्तबंबाळ स्कॉर्पिओ फोडली.


अमरावती (प्रतिनिधी) शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना अमरावतीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्येही अपक्ष उमेदवार हल्ला करण्यात आला आहे.

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सातेफळ फाट्यावरून जात असताना हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात आमदार प्रताप अडसळ यांची बहीण अर्चना रोठे जखमी झाल्या आहे. त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचं आवाहन आमदार प्रताप अडसड यांनी केलं आहे. चांदूर रेल्वे येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती हलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून अधिक तपास करत आहे.

दरम्यान, अमरावतीमधील घटना ताजी असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे. या घटनेत सोनवणे जखमी झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. सोनवणे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या उमेदवारीची स्कॉर्पिओ फोडली

दरम्यान, नाशिकमध्ये पुन्हा एकदा पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला आहे. भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचा कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली. गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा राहुल ढिकले यांच्या समर्थकांचा आरोप आहे. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून स्लीप वाटप केलं जात होतं. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे नाशिक शहरात तणावाचं वातावरण आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास करत आहे.

बीड जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक.आरोप प्रतिआरोप.पण लाडक्या बहिणींच्या मनात काय.२३ तारखेलाच कळणार.


बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा  प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. सध्या तरी प्रचारसभांमधून ‘लाडकी बहीण’ योजनेवरच भर दिला जात आहे. महाविकास आघाडीकडून ही योजना फसवी असल्याचे सांगितले जात आहे, तर महायुतीकडून ही योजना महिलांना आत्मनिर्भर करत असल्याचा दावा केला जात आहे. राजकारणी जरी वेगवेगळा दावा करत असले तर लाडक्या बहिणींच्या मनात काय? याचे उत्तर २३ नोव्हेंबरला निकालानंतरच समजेल. जिल्ह्यात १० लाख महिला मतदार असून १५ ऑक्टोबरपर्यंत ६ लाख २४ हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. त्यामुळे बहिणींच्या कल कोणाकडे? याकडेही सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ आणण्यात आली. त्यानंतर बहिणींसाठी योजना आणल्याने सरकारवर टीका झाली. त्यामुळे सरकारने ‘लाडका भाऊ’ म्हणून तरुणांसाठीही योजना आणली. आता सरकारने नवीन आणलेल्या योजनांचाच पाढा प्रचारसभांमधून वाचला जात आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्याची सभा असली की त्यात ‘लाडकी बहीण’ या योजनेचा उल्लेख होतोच. एवढेच नव्हे, तर कॉर्नर बैठका, गावभेटी, मतदारभेटींमध्येही महायुतीचे उमेदवार या योजनेची आठवण महिला मतदारांना करून देत आहेत. याचा प्रतिसादही त्यांना मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या छोट्या-माेठ्या सर्वच नेत्यांकडून या योजनेबद्दल आक्षेप नोंदवत ही योजना फसवी असल्याचे सांगितले जात आहे. ही योजना बंद पडणार, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे राजकारण तापू लागले आहे. आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी कोणाला कौल देणार? त्या सुखी आहेत की नाराज? हे निकालानंतरच समजणार आहे. या याेजनेचा सरकाला फायदा होणार का? याकडेही लक्ष लागले आहे.

लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक.

जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान कमी असले तरी आमदार करण्यासाठी लाडक्या बहिणींचे मतदान हे निर्णायक असणार आहे. जिल्ह्यात एकूण २२ लाखांवर मतदार आहेत. पैकी १० लाख ५५ हजार महिला मतदार आहेत. त्यामुळे महिलांच्या मतदानावर सर्वांचाच डोळा आहे.

प्रमुख पक्षाकडून एकच महिला उमेदवार.

महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आहे. शिंदे गटाला पहिल्यांदाच एकही जागा नाही. तर सातपैकी केवळ केजमध्ये नमिता मुंदडा यांच्या रूपाने महिलेला उमेदवारी दिली आहे. इतर सहा ठिकाणी पुरुष उमेदवार आहेत. तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आहेत. यामध्ये एकाही ठिकाणी महिलेला उमेदवारी नाही.

११ महिला उमेदवार मैदानात.

जिल्ह्यात भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यासह इतर प्रमुख पक्षांसह अपक्ष अशा ११ महिला या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. यात २८ वर्षांची तरुणी पूजा मोरे या देखील स्वराज्य पक्षाकडून गेवराई मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात लढत आहेत.

लाडकी बहीण योजनेची आकडेवारी

 (१५ ऑक्टोबरपर्यंत)तालुका - एकूण अर्ज - पात्रशिरूर कासार - ३३५५३ - ३२६६४आष्टी - ६५९८८ - ६३०४१पाटोदा - ५४५२८ - ३१२६७बीड - १३७५३२ - ९८१०३केज - ५९०९८ - ५६६५४धारूर - ३१३८७ - २९८९८गेवराई - ९६९१७ - ९३५९९माजलगाव - ७०३८३ - ६५४८१वडवणी - २४४३४ - २३२२६परळी - ६८४८१ - ६४२९९अंबाजोगाई - ६९६५६ - ६६६९६एकूण - ७१२०५७ - ६२४९२८

मतदारसंघ पुरुष स्त्री तृतीयपंथी.

गेवराई १९९८८९ १८००१७ ३माजलगाव १८५८०६ १६६४७२ १बीड २०२७२० १८१३७२ ९आष्टी २०५३५६ १८१००१ १केज २०२६२० १८४५९५ ६परळी १७६०५० १६१९२२ ४एकूण ११७२४४१ १०५५३७९ २४


Monday, November 18, 2024

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार.288 जागेसाठीे प्रतिक्षा २० तारखेची.


मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी संध्याकाळी सहा वाजता होईल. त्यासोबतच गेल्या महिनाभरापासून राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या रूपाने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. आता उमेदवारांना आणि मतदारांनाही २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष जागावाटप आणि उमेदवार निश्चितीत गुंतले. २२ ते २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती, तर ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

त्यानंतर राज्यात खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात झाली आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले. राज्यातील पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह भाजप आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रीही राज्यात प्रचाराला आले होते. मागील महिनाभरात प्रचार सभा आणि रोड शो यांनी राज्यातील निवडणूक रण ढवळून निघाले होते.

हे दिग्गज नेते होते प्रचारात

भाजप : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

काँग्रेस : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्ष सरचिटणीस प्रियांका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, हिमाचल प्रदेश, तेलंगणाचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री.

उद्धवसेना : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत.

शिंदेसेना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत.

शरद पवार गट : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे.

अजित पवार गट : राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे.

 

निवडणूक आयोगाची कशासाठी मनाई?

सोमवारी संध्याकाळी सहा वाजेनंतर ते मतदान पार पडेपर्यंतच्या कालावधीत टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

जनिमियाँ कुरेशी यांचा डोअर टु डोअर प्रचार.ना.धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिंक्यांनी विजयी करा-जनिमियाँ कुरेशी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना शिंदेगट , व मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार ना. धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ  पंचायत समिती उपसभापती जनिमियाँ कुरेशी यांनी सिरसाळा परिसरात डोअर टु डोअर प्रचार करुन प्रचार फेरी काढण्यात आली. महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहनही जनिमियाँ कुरेशी यांनी केले. 
 महायुतीचे परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सिरसाळा परिसर जनिमियाँ कुरेशी व सहकार्यानी पिजून काढला व परळी मतदारसंघात विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले. धनंजय मुंडे हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते आहेत. धनंजय मुंडे हे आपल्या हक्काचे व्यक्तिमत्त्व आहे. इथल्या प्रत्येक घटकांच्या प्रगतीसाठी ते अहोरात्र झटत असतात. त्यामुळे त्यांना निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे.
 शेतकऱ्यांच्या ऊसाची संपूर्ण जबाबदारी सुद्धा धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. विकास हित आपली जात आणि सेवा हाच आपला धर्म मानून मुडे साहेब गेल्या अनेक वर्ष मतदारसंघात विकासाची एक एक वीट रचत आहेत. रस्ते नाल्या ऊन बंधारे सभागृहे याचबरोबर शेतीचा शाश्वत विकास हा त्यांचा ध्यास आहे.   शेकडो शेततळे, सिंचन विहिरी त्याचबरोबर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण करून मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आपण जलमय केल्याने बारमाही शेतीचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यात नक्कीच झाला आहे. या भागातील विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सोबत खंबीरपणे उभेराहून विजयी करावे असे आवाहन केले आहे. राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे विकासपुरुष ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा धनंजय मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन जनिमियाँ कुरेशी यांनी केले आहे.