परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्री क्षेत्र कपिलधार येथील श्री संत शिरोमणी मन्मथस्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेवून आपआपल्या गावी परतणाऱ्या वीरशैव लिंगायत बांधवांची पाऊले शुक्रवारी रात्रीपासून परळीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनासाठी वळत असून परळीत यावे श्रीं चे दर्शन घ्यावे असे समिकरणच आता रूढ झाले आहे. एकीकडे भाविकांची गर्दी वाढत असतांना त्यांना आपल्याला घडेल त्या श्रद्धेतून त्यांच्यासाठी खिचडी, चहा, पाणी व अन्य अन्न पदार्थाचा महाप्रसादही परळीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री मन्मथ स्वामी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, व सदस्य गेल्या 17 वर्षापासून करीत आहेत. श्री व सौ चिडबुके आप्पा यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले.
श्री संत श्री संत मन्मथ स्वामी सेवा संघाचे शिवराज आप्पा बोटूळे, लक्ष्मण आप्पा बुद्रे ,मधुकर स्वामी, गुरुलिंग स्वामी , त्रिंबक स्वामी , सोमनाथ आप्पा ओपळे, यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ज्योती लिंगाडे,अमृता हालगे ,श्रीदेवी हालगे, महानंदा हालगे , मनीषा हालगे , , सौंदळे, सेलुकर, उमाकांत पोपडे , संदीप हालगे आदींनी भाविकांना प्रसाद वितरणासाठी मदत केली. श्रीक्षेत्र कपिलधारहुन दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकांसाठी शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान बेलवाडीमध्ये येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री मन्मथ स्वामी सेवा संघाच्या वतीने खिचडी प्रसादाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ठेवण्यात आला. आज शनिवारी रात्री उशिरापर्यंत हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. श्री मन्मथ स्वामींची यात्रा संपली असून यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांची पाऊले आता आपआपल्या घराकडे वळत असतांना श्री क्षेत्र परळी येथे वैद्यनाथ प्रभूंच्या दर्शनाकडेही वळाली आहेत.आज दिवसभर भाविक मोठ्या संख्येने परळीत दाखल झाले आहेत. मागील सतरा वर्षापासून ही परंपरा परळीमध्ये वीरशैव समाज व श्री मन्मथ स्वामी सेवा संघ हे जपत आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वीरशैव महासभेचे बीड जिल्हा अध्यक्ष दत्ताप्पा इटके गुरुजी, एडवोकेट चौधरी उपस्थित होते.
*बेलवाडी परिसराला आले जत्रेचे स्वरूप*
श्रीक्षेत्र कपिलधार येथील श्री संत मन्मथ स्वामी यांच्या पवित्र समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आंध्रप्रदेश कर्नाटक, तामिळनाडू व महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले हजारो भाविक भक्तांनी आज शनिवारी परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभुवैद्यनाथाचे दर्शन घेतले. परळीत आलेल्या भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था वीरशैव लिंगायत समाज, श्री मन्मथ स्वामी सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आली होती. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भावीक भक्तांनी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान बेलवाडी परिसरात बेल, फुल, नारळ आदी प्रसादालयाची दुकाने मोठ्या संख्येने घातली गेली होती त्यामुळे वैजनाथ मंदिर परिसराला जणू काही जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले.
No comments:
Post a Comment