परळी-वैजनाथ (प्रतिनिधी): आनंदवाडी (ता.परळी वै.) येथे नाफेड यासंस्थेचे सोयाबीन आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.जय हनुमान कृषी निविष्ठा सह. संस्था म.परळी वै. यासंस्थेस नाफेडने सोयाबीन आधारभूत किंमतीने खरेदी करण्यास अभिकर्ता म्हणून नेमणूक केली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी सातबारा आठ अ चा उतारा बँक पास व आधारकार्डची झेरॉक्स देऊन नोंदणी करणे आवश्यक असून सोयाबीनची शेतकऱ्यांनी नोंदनी पत्ता जय हनुमान आर्द्रता १२पेक्षा कमी असावा. जय हनुमान संस्थेचे चेअरमन काशिनाथ कातकडे यांनी माहिती दिली असून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन घालण्याचे आवाहन केले आहे.
नोंदणीसाठी ऑफिसचा पत्ता:- जय हनुमान कॉम्प्लेक्स नेहरू चौक (तळ)परळी वैजनाथ मो.9373458273,8669113551 नाफेड शासकीय खरेदी सेंटर चे ठिकाण :- आनंदवाडी,अंबाजोगाई अहमदपुर रोड ता.परळी वैजनाथ जि.बीड
No comments:
Post a Comment