Friday, November 15, 2024

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले!

इचलकरंजी (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले आहेत. इचलकरंजीमध्ये शरद पवारांची सभा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली, यानंतरही त्यांनी भाषण सुरू ठेवलं.

याआधी शरद पवारांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळीही साताऱ्यात भर पावसात भिजत सभा सुरू ठेवली होती. शरद पवारांच्या या सभेमुळे निवडणुकीचं वारं फिरलं. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर यश आलं.

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. या सभेवेळीच मुसळधार पाऊस सुरू झाला, तरीही पवारांनी त्यांचं भाषण सुरूच ठेवलं. या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पराभवाचा धक्का बसला. आता शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजल्यामुळे निवडणुकीचं वारं फिरणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आह

इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते, त्यावेळी पावसाला सुरूवात झाली. पाऊस पडतोय हे लक्षात येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना भाषण करण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शरद पवार यांनी भाषण करायला सुरूवात केली, यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


No comments:

Post a Comment