Thursday, November 14, 2024

घर घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आण म्हणत छळ करून विवाहितेला घरा बाहेर.


गंगाखेड (प्रतिनिधी) : घर घेण्यासाठी पाच लाख रुपये आण म्हणत छळ करून विवाहितेला घराबाहेर काढल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेवाडी ता. पालम येथील सुनिता यांचा विवाह परभणी येथील मारोती नारायण तिथे यांच्या सोबत झाला होता. लग्नानंतर काही वर्ष चांगलं नांदवील्यानंतर पती मारोती नारायण तिथे, भाया कैलास नारायण तिथे, जाऊ रेखा कैलास तिथे यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्रास दिल्याने २०१९ व २०२० मध्ये सुनिता मारोती तिथे या माहेरी राहिल्या २०२१ मध्ये त्या पुन्हा सासरी गेल्या असता घर घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आण म्हणत पती मारोती तिथे यांच्यासह सासरच्या मंडळीने त्रास देणे सुरु केले.

आई वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांच्याकडे एवढं पैसे नाही असे म्हणताच दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पती मारोती तिथे यांनी शिवीगाळ करत चापट बुक्क्याने मारहाण करून तु पैसे आणले नाही तर तुला मारूनच टाकतो असे म्हणून घराबाहेर काढल्याची फिर्याद सुनिता मारोती तिथे वय ३४ वर्ष रा. गजानन नगर परभणी ह. मु. धनेवाडी ता. पालम यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून गुरुवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा  पुढील तपास जमादार संभाजी शिंदे हे करीत आहेत.


No comments:

Post a Comment