बीड :- जिल्ह्यातील सहाही मतदार संघासाठी केंद्रीय मतमोजणी निरीक्षक यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोग यांनी केली आहे. त्यानुसार
गेवराईसाठी लालटनपुई वॉनचाँग (मणिपूर ), माजलगावसाठी मनोज कुमार (बिहार), बीडसाठी विजयकुमार जयरामन (कर्नाटक), आष्टीसाठी श्रीमती पूजा अग्निहोत्री (उत्तर प्रदेश), केजसाठी सुनील अंचिपका (गोवा) आणि परळीसाठी श्रीमती ईला तिवारी (मध्य प्रदेश) केंद्रीय मतमोजणी निरीक्षक असतील.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांच्या दालनात पूजा अग्निहोत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्संगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेंद्रकुमार कांबळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment