परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : “खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले”, असं मिश्किल वक्तव्य भाजपा सरचिटणीस व विधान परिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी येथील महायुतीच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. परळीचे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) या विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार (महायुती) धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील गणेश मंदिर परिसरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी या प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, “खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले, तुमचीच नजर लागली, असं वाटतंय. मी दिल्लीला गेल्यावर इथे लक्ष देणार नाही, असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळेच असं झालं”.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या मी पाया पडत होते. काय रे वेंकटेश…? काय दत्ताभाऊ…? खरं आहे की नाही? पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव नसतो. तुमचीच नजर लागली असं वाटतंय. मी दिल्लीला जाईन, दिल्लीला जाईन, असं सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या इथे लक्ष देणार नाहीत, असं सगळं यांचं चाललेलं. घ्या मग आता… आले मी परत तिथेच… खासदार करायला गेले आणि मी आमदार झाले”.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
दरम्यान, पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, “माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेत होते. आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे”.त्यामुळे धनु भाऊ ला पुन्हा आमदार करण्याचे आवाहन केले.
No comments:
Post a Comment