Monday, November 30, 2020

आनंदवन चे समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात डाॕ.शितल आमटे यांची आत्महात्या.


चंद्रपूर - (प्रतिनीधी )  ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात आणि वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली आहे. आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे

शीतल आमटे या संपूर्ण आनंदवनची जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.
 
मध्यंतरी शीतल यांनी या वादाबाबत एक फेसबुक लाईव्ह केलं होतं,नंतर त्यांना तो व्हिडिओ डिलिट करावा लागला होता .आनंदवन मधील वादावरून गेल्या काही दिवसापासून शीतल या चर्चेत आल्या होत्या .त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .

पदवीधर निवडणूक मतदानामुळे 10 वी,12 वी परीक्षा केंद्रात तात्पुरता बदल - मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार.


बीड :- पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या केंद्रामध्ये निवडणूक मतदानामुळे एक दिवसाचा बदल झाला आहे. यासंदर्भात सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, 
दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजीच्या मतदानामुळे खालील प्रमाणे परीक्षा केंद्रास बदल पुढील प्रमाणे आहे.  

 1) भगवान विद्यालय, बीड केंद्र क्रमांक २००३ (इ,. १०वी.) ऐवजी भा.वा.सानप प्राथमिक विद्यालय, धानोरा रोड,  बीड. ( भगवान विद्यालय,धानोरा रोड बीड समोर) 
2) चंपावती विद्यालय, बीड  केंद्र क्रमांक २००० (इ,. १०वी.) ऐवजी चंपावती इंग्लिश स्कुल, बीड (चंपावती विद्यालय, बीड शेजारी) 
 3) बलभीम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केंद्र क्रमांक २०९ (इ,. १२वी.) ऐवजी मिल्लिया कन्या शाळा,किल्ला मैदान, बीड ( बलभीम महाविद्यालय शेजारी) 
 4) श्री सिध्देश्‍वर विद्यालय, माजलगाव केंद्र क्रमांक २५०२ (इ,. १०वी.) ऐवजी सिध्देश्‍वर महाविद्यालय, माजलगाव ( श्री सिध्देश्‍वर विद्यालय शेजारी ,)
 5) न्यू हायस्कूल थर्मल, परळी वै  केंद्र क्रमांक २१४६ (इ,. १०वी.)ऐवजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी ( न्यू हायस्कूल शेजारी) 
6) जि.प. मा.शाळा शिरूर कासार केंद्र क्रमांक २६२५ (इ,. १०वी.) ऐवजी जि.प. कन्या शाळा, शिरूर (का.) ( जि.प. मा.शाळा शेजारी) 
या बदला नुसार आणि बदल झाल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत

तसेच परीक्षार्थींनी हा बदल केवळ दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग-1 आणि बारावीच्या गणित व संख्याशास्त्र भाग-2 या पेपर पुरताच आहे, याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी केले आहे.
००००

Sunday, November 29, 2020

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 9 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असणार.


औरंगाबाद (विमाका):-  आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 
1) आधार कार्ड 
2) वाहन चालक परवाना 
3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. 
छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि.10.11.2020 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील, असे उप आयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद‍ विभाग पदवधीर मतदारसंघ औरंगाबाद यांनी कळविले आहे. 
****

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अनुयायांनी येऊ नये; विविध आंबेडकरी संघटनांचे एकमताने आवाहन.


मुंबई, : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२०) तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे येऊ नये आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त प्रणय अशोक, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कसबे,  रमेश जाधव,  नागसेन कांबळे,  भिकाजी कांबळे,  रवी गरुड,  प्रदीप व प्रतीक कांबळे, सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. हा धोका लक्षात घेऊन मागील ७-८ महिन्यांमध्ये सर्वधर्मीयांनी आपापले सण-उत्सव अत्यंत साधेपणाने आणि एकत्र न येता साजरे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुन अनुयायांनी अभिवादन करावे, अशी नम्र विनंती श्री. दिघावकर यांनी  केली आहे.

अनुयायांना येण्यास निर्बंध असले तरी, महापरिनिर्वाण दिनाची प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय पद्धतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असे सांगून श्री. दिघावकर म्हणाले की, अनुयायांना अभिवादन करता यावे म्हणून चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण देखील केले जाणार आहे, त्याची लिंक सार्वजनिकरित्या दिली जाईल. महापरिनिर्वाण दिनी थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनला देखील विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. चैत्यभूमी वास्तू तसेच अशोकस्तंभ, तोरणा प्रवेशद्वार यांची स्वच्छता करुन रंगरंगोटी करण्यात येत आहे. चैत्यभूमी, अशोकस्तंभ, भीमज्योती आदी सर्व ठिकाणी पुष्प-सजावट करण्यात येईल. सोबतच चैत्यभूमी येथे महत्त्वाच्या व्यक्तींकरिता नियंत्रण कक्ष उभारणी करुन चैत्यभूमी येथे १ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी आणि जल सुरक्षा रक्षक देखील तैनात केले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे देण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा नसतील. उर्वरित तयारी योग्यरित्या आणि विहित वेळेत पूर्ण केली जात आहे.

शासनाने देखील सर्व अनुयायांना विनंती केली आहे की, कोरोना संसर्ग लक्षात घेता, सर्वांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून सहकार्य करावे. यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.

महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली. दरवर्षी राज्यशासन, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलीस आणि इतर शासकीय विभाग देखील महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणावर अनुयायांना सेवा-सुविधा देतात. यंदाची स्थिती वेगळी असून त्यात सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. चैत्यभूमी ही आपली सर्वांची जबाबदारी असून निर्बंध हे कोरोना रोखण्यासाठी आहेत. सर्व अनुयायी आपापल्या घरुन अभिवादन करतील, अशी ग्वाही या संघटनांनी दिली.

विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी आवाहन केले की, सर्व अनुयायांनी ‘राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’ असा मजकूर लिहून आपले नांव, पत्ता, जिल्हा नमूद करुन चैत्यभूमी स्मारक, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ येथे पोस्टाने पत्र पाठवून अभिवादन करावे. या उपक्रमास देखील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला.
0000

Saturday, November 28, 2020

वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन.

पुणे (प्रतिनीधी) पुणे शहर व जिल्ह्याचे वतीने आज दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट  पुणे चे *महासंचालक डॉ. धम्मज्योती साहेबांची* भेट घेण्यात आली यावेळी त्यांना एमपीएससी( *MPSC*)चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांची संख्या ४०० आहे नागपूर औरंगाबाद या ठिकाणी *लॉकडाऊन* सदृश्य परिस्थिती मध्ये अडकले होते आणि त्या *४००* विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे विद्यावेतन मागील सात महिन्यांपासून शासनाच्यावतीने देण्यात आलेलं नाही त्या विरोधामध्ये साहेबांना निवेदन सादर करण्यात आले ४०० विद्यार्थ्यांचे मागील सात महिन्यांपासून विद्यापीठं रुपये *९०००*  *प्रति महिना प्रति विद्यार्थी* .
अनेक विद्यार्थी खेड्यांमधूनआलेले आहेत काही विद्यार्थी भाड्याच्या खोलीमध्ये राहत असून त्यांचे लाईट बिल त्याचप्रमाणे घराचं भाडं अनेक महिन्यांपासून थकले होते काही घरमालकांनी तर लॅपटॉप असेल त्यांच्या जीवन उपयोगी वस्तू असतील पुस्तके असतील अशा गोष्टी त्यांच्याकडे जप्त करून ठेवलेल्या आहेत जर हे पैसे मिळाले तात्काळ त्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत तर ते घर मालक त्यांना त्या वस्तू परत देणार नाहीत अशी परिस्थिती औरंगाबाद व नागपूर मध्ये आहे.काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहाचा चालावा म्हणून काही सावकारांकडून छोट्या मोठी रक्कम ही कर्ज स्वरूपामध्ये घेतलेली आहे परंतु विद्या वेतनच नाही तरी कर्ज फेडायचं कसं असा मोठा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज *डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग  इन्स्टिट्यूट चे महासंचालक धम्मज्योती गजभिये साहेबांना या प्रकरणी निवेदन सादर केले व त्या निवेदनाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला व त्यांनी लवकरच या प्रकरणांमध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना त्यांचे विद्यावेतन देण्याची कबुली दिली.यावेळी *सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष शुभम ज्ञानेश्वर चव्हाण*
 *सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रसिद्धीप्रमुख अक्षय बचुटे गोटेगावकर*
*वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते ओंकार कांबळे* त्याचबरोबर 
*पत्रकार रामदास लोखंडे सर* हे उपस्थित होते

Wednesday, November 25, 2020

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणी सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन.




काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे.

अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली. “जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणं टाळून करोना नियमांचं पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचं पालन करा,” असं फैजल पटेल यांनी म्हटलं आहे. अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला स्वतः ट्विट करून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.

अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांनी अहमद पटेल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पटेल हे सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असल्यानं त्यांचा पक्षात मोठा दबदबा होता.

मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदान करताना मतदारांनी जांभळ्या रंगाच्या पेनने पंसती क्रमांक टाकुन मतदान करावे ;- सौ.वर्षा मगर


परळी वैजनाथ ;- ( कांतीकारी साथी न्युज )  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मतदान करताना मतदारानी निवडणुक आयोगाने  दिलेल्या जांभळ्या रंगाच्या पेन ने पंसती क्रमांक टाकुन मतदान करावे असे आवाहान जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.त्यापुढे असे ही म्हणाल्या की जय महाराष्ट्र महिला संघटना,आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था,व कांतीकारी साथी च्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली आहे त्यामध्ये नविन मतदारांची संख्या मोठी आहे.इतर निवडणुकी पेक्षा या निवडणुकीत मतदान करण्याची पध्दत वेगळी आहे.त्यामुळे मतदान केंद्रावर निवडणुक आयोगाने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या पेन ने पंसती क्रमांक टाकुन योग्य पध्दतीने मतदान करून आपले मतदान बाद होणार नाही याची काळजी घ्यावी असे ही सौ.वर्षा मगर म्हाणाल्या .

Tuesday, November 24, 2020

बीड भाजपात ‘आधे इधर आधे उधर, बोराळकर किधर ’?’ आ.सतिश चव्हाणांसाठी मुख्यमंत्र्यांपासून आघाडीचे सर्वच नेते सक्रिय.

बीड (प्रतिनीधी )- मराठवाडा पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना भाजपातील बंडखोरीमुळे बीड जिल्ह्यात भाजपाचे नेते, कार्यकर्ते ‘आधे इधर आधे उधर’ झाल्याचे दिसून येत असल्याने बोराळकर किधर? हा प्रश्‍न उपस्तित होत असतानाच दुसरीकडे आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाणांची प्रचार यंत्रणा मात्र ७८ तालुक्यात तळ ठोकून असल्याने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह आघाडीच्या सर्वच पक्षातील नेते या निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याने चव्हाणांना ही निवडणूक सोपी जात असल्याचे चित्र सध्या दिसून बंडखोर पोकळेंमुळे भाजपा उमेदवाराची आणि नेतृत्वाची डोकेदुखी मात्र प्रचंड वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपाच्या अंतर्गत बंडाळीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदारसंघात बोराळकर हेच आपले उमेदवार अहोत हे सांगण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना तालुक्या तालुक्यात जावून लोकांना सांगावे लागत आहे. बंडखोर रमेश पोकळे यांच्यावर कारवाई का करण्यात येत नाही या प्रश्‍नाचे उत्तर पक्षश्रेष्ठीवर ढकलण्यात येत असल्याने भाजपा समर्थक आजही नेमके कुठल्या उमेदवाराला मतदान करायचे या मन:स्थितीत आहेत. बीड जिल्ह्यात तर पंकजा मुंडे यांचे अनेक समर्थक कार्यकर्ते, स्थानिक पातळीवरील नेते हे उघडपणे बंडखोर नेते रमेश पोकळेंच्या सोबत दिसून येत आहेत. त्यामुळे बीड भाजपात आधे इधर आधे उधर बोराळकर किधर? हा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे. पंकजा मुंडे दोन दिवसांपासून मराठवाड्यात ठिकठिकाणी बोराळकरांसाठी मत मागत असल्या तरी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते रमेश पोकळेंकडेही दिसून येत आहेत. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातही भाजपा उमेदवारात गोंधळ कायम आहे. दुसरीकडे मात्र आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ही निवडणूक सोपी असताना त्यांनी प्रचार यंत्रणेत कसलीही कुचराई न ठेवता मतदारसंघातल्या ७८ तालुक्यात संपर्क ठेवल्याचे दिसून येत आहे. आघाडीमधील शिवसेना-राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे तालुका, जिल्हास्तरावरील नेतेच नव्हे तर राज्यपातळीवरील नेतेही चव्हाणांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्या व्हिडिओमधून मुख्यमंत्र्यांनी सतीश चव्हाणांच्या आजपर्यंतच्या कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे आघाडीचे सर्वच नेते चव्हाणांना निवडून आणण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्वत: उमेदवार असल्यागत मतदारांपर्यंत जात आहेत

अनलॉकमध्ये लग्नांचा धुमधडाका ना सोशल डिस्टन्स ना मास्क.

बीड (प्रतिनीधी )- कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना लग्नाला केवळ ५० नागरिकांची उपस्थिती होती मात्र अनलॉक होताच लग्नांचा धुमधडाका सुरू झाला असून आता कोरोना संपलाच आहे, असे वागत लग्नाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थिती लावत आहेत. या वेळी कुठलाही सोशल डिस्टन्स पाळला जात नाही, नवरदेवासह एकाही वराडाच्या तोंडाला मास्क लावलेले दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाची लाट नव्हे तर त्सुनामीच येऊ शकते, आजपर्यंत बीड जिल्ह्यात १५ हजार १८६ जण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत ४८० जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा टक्काही झपाट्याने वाढला आहे.

कोरोनाचे संकट गंभीर असताना केवळ विरोधाला विरोध म्हणून काही जण हे उघडा ते उघडा म्हणत आहेत मात्र कोरोनाची दुसरी लाट यायला वेळ लागणार नाही. दिवाळीच्या खरेदीत नागरिकांसह व्यापार्‍यांनी कोरोनाच्या नियमाला धाब्यावर बसवून आपला व्यवसाय केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठा संसर्ग होण्याचा धोका आहे. आजही सार्वजनिक कार्यक्रमात कसलाही सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर होत नाही. लग्न समारंभाला कुठलीही परवानगी न घेता हजारो वर्‍हाडी उपस्तिती लावत आहेत. लग्नसमारंभात सॅनिटायझर मास्कचा वापर होत नाही.

आजपर्यंत बीड जिल्ह्यात १५ हजार १८६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी १४ हजार १५० जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. यामध्ये ४८० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या दोन दिवसांपासून शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने शिक्षकांच्या टेस्ट घेतल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४ हजार ४२२ शिक्षकांच्या तपासण्या झाल्या असून त्यापैकी ४४ शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर ८२६ शिक्षकांचे अहवाल येणे बाकी आहे. अजूनही अनेक शिक्षकांच्या टेस्ट राहिल्या असून त्या घेण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे.

धक्कादायक पाटबंधारा विभागात शेतकर्‍याने जाळून घेतले.


बीड (प्रतिनीधी ) पाटबंधारा विभागाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने एका निराश शेतकर्‍याने कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली. जखमी अवस्थेत शेतकर्‍याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. शेतकर्‍याने यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेतली नसल्याने शेतकर्‍याने आज हे टोकाचे पाऊल उचलले.

बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्‍याची जमीन पाटबंधारा विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारा विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे. कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने सदरील शेतकर्‍याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही. आज दुपारी शेतकर्‍याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. या घटनेने एकच खळबळ उडाली. शेतकर्‍यास तात्काळ जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.


रब्बी पिकांचा विमा उतरवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन.


बीड,दि. 24 :- (जि.मा.का) कृषि व पद्रुन विभागाचा शासन निर्णय दिनांक 17 जूलै 2020 जिल्हयासाठी सन 2020-21 खरीप व रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली असून योजने करीता पुढील तीन वर्षासाठी (2020-21 ते 2022-23) खरीप व रब्बी हंगामासाठी भारतीय कृषि विमा कंपनी अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी काम करणार आहे. या योजनेमुळे बीड जिल्हयातील रब्बी हंगामातील 05 पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. ही योजना या वर्षापासून कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. रब्बी पिकांचा विमा उतरविण्याची अंतिम तारीख रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) 30 नोव्हेंबर 2020 अशी आहे. तर गहू (बा.), हरभरा व रब्बी कांदा यासाठी 15 डिसेंबर 2020 अशी आहे.
शेतकऱ्यांना प्रतिकुल हवामान घटकामुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती इत्यादी बाबी करीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे.
अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून गाव पातळीवर अधिकची सुविधा म्हणून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राद्वारे, महा-ई-सेवा केंद्राद्वारे सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी शक्यतो बँकेत जाणे टाळावे.

पिक, विमा संरक्षित रक्कम (रु.प्रति हे.), शेतकरी विमा हप्ता रक्कम (रु.प्रति हे.) पुढील प्रमाणे- ज्वारी बा. -रु.30000/-, रु.450/-, ज्वारी जि. रु.28000/-, रु.420/-, गहू बा. - रु.38000/-, रु.570/-, हरभरा- रु. 35000/-, रु.525/-, रब्बी कांदा- रु. 80000/-, रु.4000/-.

पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- आधार कार्ड, बँक पासबूकची पहिल्या पानाची स्पष्ट झेरॉक्स, जमिनीचा सातबारा उतारा, स्वयंघोषित पेरणी प्रमाणपत्र, जर कुळासाठी  लाभ घ्यावयाचा असेल तर भाडेपट्टी करार असलेला शेतकऱ्याचा करारनामा.
सदरील योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एैच्छिक आहे. तथापी कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसुचित पिकाचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेच्या सहभागाच्या अंतीम दिनांकापुर्वी 7 दिवस संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरुन देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या अधिसुचित पिकांचा विमा संबंधित बँकामार्फत करण्यात येईल. त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामात आपल्या पिकांचा विमा न करणेबाबत घोषणापत्र आपल्या बँक शाखेत दिले असल्यास चालु हंगामात विमा करण्यासाठी विहित नमुन्यातील घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कमे व्यतीरिक्त कोणतीही जादाची रक्कम संबंधित महा-ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र यांना देण्यात येऊ नये. पिक विमा भरल्यानंतर विम्याची पावती आवश्य घ्यावी. त्यावरील भरलेली रक्कम, पिकांचे क्षेत्र, पिकाचे नाव, बँक खाते क्र., आय.एफ.सी. कोड व मोबाईल क्र. इत्यादी बाबी तपासुन घ्याव्यात. पिक विमा भरण्यासाठी काही अडचणी उद्भवल्यास संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
सर्व ग्राहक सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशीही 24 तास सुरु राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांने लवकर विमा भरण्याची प्रक्रीया पुर्ण करुन घ्यावी. विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता विमा भरण्याची प्रक्रीया पुर्ण करावी. प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र व विमा क्षेत्र या मध्ये तफावत आढळल्यास शेतकऱ्यांना मिळणारी पिक विमा रक्कम ही कमी असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढ्या क्षेत्रावर पेरणी केलेली आहे तेवढेच क्षेत्र नमुद करावे. चुक होऊ देऊ नये. योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिकच्या सविस्तर माहितीसाठी विमा कंपनीचे तालुका स्तरावरील प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, क्षेत्रीय कर्मचारी व सेतु सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.

बीड जिल्हयातील सरपंच पदे आरक्षणाची अधिसूचना जारी.


बीड,दि. 24 :- (जि.मा.का) ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. ग्रापनि-20/प्र.क्र.06/पंरा-2 दिनांक 5 मार्च 2020 अन्वये दिलेले सुचनेप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 च्या नियम 3 (अ) प्रमाणे तालुकानिहाय जिल्हयातील सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी पाच वर्षाकरीता (2020 ते 2025 या दरम्यान गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता) आरक्षित करुन संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार आरक्षित केलेली सरपंचाची पदे तालुकानिहाय आरक्षण अधिसुचित करण्यात येत आहे. अशी अधिसूचना जिल्हाधिकारी बीड यांनी प्रसिध्द केली आहे असे तहसिलदार (सामान्य शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत जयसिंगराव गायकवाड करणार राष्ट्रवादीत प्रवेश.


बीड – मराठवाड्यातला भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. नुकताच गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. एकनाथ खडसे यांच्यानंतर आणखी एक भाजपचा नेता राष्ट्रवादीच्या गळाला आहे.

जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती. परंतु भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही.भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.त्यानंतर आता गायकवाड राष्ट्रवादीच्या गोटात जाणार आहेत

महाआघाडी जातीवादी सरकारचा जाहीर निषेध.चैत्यभूमि ला अभिवादन करण्यास जाणारच आरपीआय डेमोक्रॅटिक चा इशारा.


मुंबई दि (प्रतिनिधी) महाआघाडी सरकारचे धोरण जातीवादि असून आंबेडकर विरोधी आहे, त्यामुळे चैत्यभूमिला अभिवादन करण्यास आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने शेकडो भिमानुयायी जाणारच असा इशारा राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने युवाध्यक्ष कनिष्क कांबळे व केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही घटक पक्षाला विश्वासात न घेता स्वतःची मते आंबेडकरी जणांवर लादत आहेत. जे पक्ष या निर्णयाचे समर्थन करत आहेत त्या पक्षाचा सुद्धा आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने  तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला आहे.
सर्व प्रार्थनास्थळे उघडली असून सर्वधर्मीयांना दर्शनास परवानगी दिली असताना केवळ आंबेडकरी जनतेच्या अस्मितेशी खेळून त्यांच्या भावना दुखावणार्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे डॉ. माकणीकर यांनी म्हटले आहे.
सदर निर्णय हा आंबेडकरी जनतेवर जाणून बुजून लादण्यात येत असून या दांभिक प्रवृत्तींना डेमोक्रॅटिक आरपीआय थारा देणार नसल्याचा मनोदय कनिष्क कांबळे यांनी बोलून दाखविला.
सहा डीसेम्बर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होय, आणि याच दिनाचे औचित्य साधून देश विदेशातून आपल्या पित्याला अभिवादन करण्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात, मात्र या सरकारने आंबेडकरी भावना पायदळी तुडवीत अभिवादन करण्यास मनाई केली आहे किंतु आरपीआय डेमोक्रॅटिक हा निर्णय  ना जुमानता पक्षनेतृत्वात शिवराय फुले शाहू आंबेडकरी शेकडो अनुयायांसह चैत्यभूमी स्थळी अभिवादनास जाणार असल्याचाही गंभीर इशारा देण्यात आला आहे.
 आंबेडकरी जनतेच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन करण्यासंबंधीचे निर्देश मागे घ्यावेत व कोरोनावर उपाययोजना करून अभिवादन करण्यास सहकार्य करावे अन्यथा आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानासमोर काळे झंडे दाखवून तिव्र निदर्शने करण्यात येतील. 
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन निवडुन आलेल्या सरकारणे आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटना व धर्मगुरूंना या बाबत विश्वासात घ्यायला पाहिजे होते परंतु मुजोर झालेले सरकार अन्यायपीडितांना न्याय तर देतच नाही शिवाय अभिवादन करण्यास रोकत आहे ही मुजोरी आरपीआय डेमोक्रॅटिक सहन करणार नसल्याचे मतही पक्षाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

Monday, November 23, 2020

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको.- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


मुंबई, दि. 23 : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ठेवून अनुयायांनी आपल्या कृतीतून  विचारांची प्रगल्भता दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्वागत केले. समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख,  खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सचिव नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सी. एल. थूल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापूर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहेत. डॉ.बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला स्मृतिदिनही साधेपणानेच साजरा केला होता. त्यापूर्वी लाखोंच्या गर्दीच्या साक्षीने होणारी विठुरायाची पंढरीची वारीही साधेपणाने करावी लागली होती. याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, महापरिनिर्वाणदिनी गर्दी न करता, मोजक्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा निर्णय स्वागतार्ह असाच आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण आता अनुयायी म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. आपण बाबासाहेबांकडून प्रेरित होऊन समाजाला पुढे नेऊया. माझ्या आजोबांचे आणि डॉ. बाबासाहेब यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्यामध्ये स्नेह होता. हे ऋणानुंबध आपण समाजापर्यंत नेऊया, असेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने चांगली भूमिका घेतली आहे. आतापर्यंत सर्वधर्मीयांनी सणवार अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात तो साधेपणाने व्हावा. नियमांचे पालन केल्यास या संकटाला रोखता येणार आहे. अभिवादन आणि दर्शनासाठी गृह विभागासह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शेख यांच्यासह खासदार श्री. शेवाळे, आमदार श्री. सरवणकर, समन्वय समितीचे सचिव श्री. कांबळे,  उपाध्यक्ष साळवे, डॉ. मुणगेकर आदींनीही सहभाग घेतला.मुख्य सचिव संजय कुमार यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने शासन-प्रशासन परिपूर्ण तयारी करेल, असे सांगून आभार मानले.

आ.सतीष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहरात पदवीधरांची गृहभेट; मतदारांचा प्रतिसाद.


* ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा.

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे उमेदवार आ.सतीष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळी शहरात  आज गणेशपार,देशमुख गल्ली,धनगर गल्ली इस्लामपुरा बंगला नांदूरवेस सरकारवाडा अंबेवेस,धोकटे गल्ली,आदी भागात प्रचार फेरी काढून पदवीधर मतदारांना गृहभेटी घेवून आ.सतीश चव्हाण यांच्या कार्याचा अहवाल वितरित करण्यात आला. या प्रचारात पदवीधर मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
        आजच्या जुन्या गावभागातील प्रचारफेरीत ना.धनंजय मुंडे  यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास पदवीधर मतदारांना भेटल्यांनातर दिसून येत आहे.जवाहर शिक्षण संस्थेचे संचालक उत्तमराव देशमुख, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबूभाई नंबरदार,जेष्ठ नागरिक डॉ. सुरेश चौधरी,प्रभाकरराव देशमुख,ज्येष्ठ नेते वैजनाथराव सोळंके, सुरेशअण्णा टाक,बाशीत भाई,ऍड.जीवनराव देशमुख, जगदीशअण्णा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.आनंद टिंबे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद सिराज शेख,जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष के.डी. उपाडे नगरसेवक गोपाळ आंधळे,अनिल अष्टेकर,गोविंद कुकर,शिवसेनेचे जिल्हा संघटक रमेश चौंडे,हरीश देशमुख,सुभाष देशमुख, प्रा. सुनील चव्हाण, शिक्षक रमेश कोमावरसर,प्रा.शाम दासूद सर,ज्येष्ठ पत्रकार जी.एस. सौन्दळेसर,काँग्रेसचे किसान सेलचे तालुकाध्यक्ष लहूदास तांदळे,जब्बार काकर, माजी नगरसेवक ऍड.सतीश देशमुख, शरद सोळंके,संजय देवकर, शिवाजी सरवदे,नवनाथ दाणे, नारायण देशमुख,रमेश मस्के, भागवत कसबे,आनंत देशमुख, अमर देशमुख, बळीराम नागरगोजे,अजय सोळंके,चारुदत्त करमाळकर,अभिजित तांदळे, अमर रोडे, वैजनाथ जोशी शिक्षक नेते डी.जी.शिंदे सर,शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख,शहराध्यक्ष श्रीकांत माने,अमोल कांबळे सर,विनोद देशमुख,राहुल ताटे सर,रवी मूळे,दिपक हजारे, दत्तात्रय दुंदुले,प्रा.बाळासाहेब राऊत, राहुल जगतकर, प्रल्हाद नखाते,रामकिशन टेकाळे,शेख जफर,चंद्रप्रकाश हालगे,शिवाजी सरवदे,शाम कुकर आदींसह महाविकास आघाडीचे नेतेगण नगरसेवक डॉक्टर्स वकील शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••
*आजची प्रचार फेरी* 
  आज दि.२४ रोजी   प्रभाग 5 व 3 सकाळी 8 वाजता पद्मावती नगर,तुळजानगर, कीर्तिनगर, गंगासागर नगर, कृष्णानगर, सावतामाळी गल्ली,खंडोबा नगर,देशपांडे गल्ली,बिडगर गल्ली,बांगर गल्ली,उखळवेस, अनंतपुरे गल्ली,रोडे गल्ली, भीमनगर, साठे नगर,जगतकर गल्ली,प्रबुद्ध नगर.

Sunday, November 22, 2020

राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या आंदोलनाला यश.

वरोरा ;- (प्रतिनीधी) राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे वरोरा तालुका उपाध्यक्ष मा.श्री.अभिजित कुडे  यांच्या नेतृत्त्वात नागरी माढेली खांबाडा रस्त्याचे खड्डे बुजविण्यात यावे यासाठी निवेदन दिले तरी खड्डे बुजविण्यत आले नाही त्या साठी अभिजित कुडे यानी 3 वेळा आंदोलन केले व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला , खड्डे बुजविण्याचे आले नाही तर वरोरा येथे मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला त्यांच्या आंदोलनास लोकांचा पाठिंबा मिळत असतो हे लक्षात घेऊन प्रशासनाला जाग आली व रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले , या साठी सर्व नागरिकांनी अभिजित कुडे यांचे आभार व्यक्त केले . रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले यासाठी अभिजित कुडे यानी वरोरा भद्रावती विधानसभा आमदार प्रतिभा ताई धानोरकर यांचे फोन करून आभार मानले

Friday, November 20, 2020

शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार-ना. प्रा.वर्षा गायकवाड


मुंबई –महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड दिल्या आहेत.

या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. वेळोवेळी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत व शिक्षकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी
.

महाराष्ट्रत करोनाच्या संख्येत पुन्हा वाढ.मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा राज्य सरकार करणार बंद?


लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचार सुरू असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

दिवाळीच्या आधीच दिल्लीत करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्य सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे. मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र सरकारकडून लवकरच काढण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत मागील २४ तासात तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिल्लीत सुरूवातीला एकाच दिवसा ५००० हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्रातही रुग्णसंख्येची उसळी

राज्यातही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मागील आठवड्यात दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. मागील दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येनं उसळी घेतली आहे. १८ नोव्हेंबर रोजी राज्यात ५ हजार रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजीही ५ हजार ५३५ रुग्ण एक दिवसात आढळून आले.

तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियांचा हल्ला.चार कर्मचारी जखमी.


* बोरगाव बुद्रुक शिवारात घडली घटना. जिल्हाधिकार्‍यांनी दिली भेट.


गेवराई (प्रतिनीधी )- गेवराई तालुक्यातील गोदावरी नदी पात्राच्या हद्दीत अनाधिकृत वाळुचा उपसा सुरुच आहे. हा वाळु उपसा रोखण्यास महसूल आणि पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. बोरगाव बुद्रुक शिवारात चोरट्या पद्धतीने वाळू उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार यांना झाल्यानंतर तहसीलदाराच्या पथकाने त्या ठिकाणी जावून एका टिप्पर चालकास विचारपूस केली असता गाडीमध्ये आलेल्या काही लोकांनी पथकावर हल्ला केला. यात चार कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आज घटनास्थळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार भेट देणार असल्याचे सांगण्यात आले. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली.
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोरगाव बुद्रुक शिवारातून अनाधिकृतपणे वाळुचा उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार खाडे यांना झाल्यानंतर ते व त्यांचे सहकारी मंडल अधिकारी अमोल कुरुळकर, तलाठी राजकुमार धारूरकर, कोतवाल योगेश शहाणे, शिवशंकर आतकरे, दीपक राठोड हे दाखल झाले. बोरगाव ते कुरणपिंप्री रस्त्यावर या पथकाला पांढर्‍या रंगाचा टिप्पर आढळून आला. या टिप्परला थांबवून त्यांनी चालकाशी विचारपूस केली तितक्यात पाठीमागून एक लाल रंगाची गाडी आली, जिचा क्र. एम.एच. 16 डी.झेड. 9701 असा होता. यातील लोकांनी पथकातील कर्मचार्‍यांना काठीने मारहाण केली. यामध्ये संजय शंकर नेवडे (वय 41), योगेश सुरेश शहाणे (वय 24), शिवशंकर सुरेश आतकरे (वय 26) आणि दिपक आसाराम राठोड (वय 37) यांना मारहाण केली. या मारहाणीत हे चौघे जण जखमी झाले असून या प्रकरणी संजय नेवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले

उर्जामंत्र्याला आरपीआय चा पँथर स्टाईल झटका देऊ. डॉ राजन माकणीकर.

 
 मुंबई ;-- (प्रतिनिधी) लॉकडावून काळातील नागरिकांचे वीजबिल माफ नाही केल्यास उर्जामंत्र्याला डेमोक्रॅटिक आरपीआय पँथर स्टाईल झटका देईल असा गंभीर इशारा पक्षाचे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला आहे.
लॉककडावून काळात हालाकीचे जीवन जगत असतांना कुठे आता तरी काही अंशी जनता कामाला लागली आहे, मात्र पोटाचा प्रश्न अद्यापही निवळला नाही, आणि त्यात विद्युत बिले भरायच्या नोटीशी आणि वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना वजा धमक्यांना जनता हवालदिल झाली आहे.
आर.पी.आय डेमोक्रॅटिक सर्वप्रथम सरकारच्या या धोरणाचा जाहीर निषेध व्यक्त करत असून विजपुरवठा बंद करणाऱ्या अधिकाऱ्यास व ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांना  पँथर स्टाईल झटका देऊ असा गंभीर इशारा डॉ माकणीकर यांनी दिला आहे.
बेरोजगारीने परेशान व हतबल झालेला युवावर्ग व त्याचा परिवार आत्महत्या करत आहे, स्वतःला फासावर लटकवत आहेत, मात्र: अति तेथे माती असते, यादी राखा हाच परेशान झालेला वर्ग सरकारला फासावर लटकवेल, याद राखा, गुमान वीजबिल माफ करा, व पोटाला चिंमटा काढून लॉकडाऊन काळातील आजपर्यंतचे भरलेले बिल परत करा किंवा खाते जमा ठेवा व ज्यांनी भरले नाहीत त्यांच्याकडून वसुली करू नका अस दमही आर.पी.आय डेमोक्रॅटिक च्या वतीने डॉ माकणीकर यांनी सरकार व त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला प्रसिद्धीपत्रकाद्वारे भरला आहे.
अगर सरकारने त्यांच्या धोरणात बदल नाही केल्यास होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या प्रभावी नेतृत्वात राज्य महासचिव कप्तान श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो कार्यकर्ते सरकारला काळे झंडे दाखवून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करणार असल्याचीही माहिती डॉ. माकणीकर यांनी दिली आहे.

अनाथ मुलांना प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी कार्यवाही सुरु.अनाथ मुलांच्या भविष्याच्या अडचणी होणार कमी.



बीड,दि. 19 :- (जि.मा.का)  बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या या अनाथ मुलांना संस्थेकडुन बाहेर पडतांना त्यांच्याजवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विशेष लाभ मिळत नाहीत.  त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 6 जुन 2016 अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत मान्यता प्राप्त (अनुदानित/विनाअनुदानित) संस्थांमध्ये दाखल असलेल्या व खालील निकष पुर्ण करणाऱ्या संस्थेतील अनाथ मुलांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.  

राज्यातील पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरिता विभागीय स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संस्थाचे अधिक्षक व इतर सर्व संबंधितांना माहिती होण्यासाठी तसेच अनाथ प्रमाणपत्रासंबंधीचे सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढुन प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी संबंधित जिल्हयाचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयायामध्ये संपर्क साधण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. आई-वडीलांचा शोध घेवुन त्यापैकी कोणीच ह्यात नसल्याबाबतची खात्री संबंधित यंत्रणेस झाली असणे व त्याबाबतचे संस्थेचे अधिक्षक यांचे प्रमाणपत्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना प्रमाणित करावे, संबंधित जिल्हयाच्या बाल कल्याण समितीने सदर लाभार्थ्याचे आई-वडील ह्यात नसल्याचे व लाभार्थी अनाथ असल्याचे चौकशी अंती प्रमाणित करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी बाल कल्याण समितीने जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचा दाखल, प्रवेश निर्गम रजिस्टरचा दाखला यापैकी एक ग्राह्य धरावा, वरील निकष पुर्ण करणारे मुले ज्या संस्थेत आहे त्या संस्थेच्या अधिक्षकांनी अनाथ प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव संबंधित जिल्हा महिला व  बाल विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा.  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन परिपुर्ण प्रस्ताव, स्वयंस्पष्ट शिफारस करुन संबंधित विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांच्या कार्यालयाकडे पाठवावा,  त्यांनी प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन अनाथ प्रमाणपत्र स्वाक्षरी करुन वितरीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

पेन्शन धारकांसाठी आता पोस्टात हयातनामा देण्याची सुविधा.



बीड ,:- (जि.मा.का) जिल्हयातील सर्व पेन्शन धारकांना प्रत्येक वर्षी द्यावा लागणाऱ्या हयातनामा प्रमाण पत्राची सुविधा बीड विभागातील सर्व डाक कार्यालयामध्ये सुरु करण्या आली आहे. सर्व पेन्शन धारकांना दर वर्षी हयातनामा (जीवन प्रमाण पत्र) आपल्या संबंधित पेन्शन कार्यालयास सादर करावे लागते. यापुर्वी सदरील प्रमाण पत्र लेखी स्वरुपात द्यावे लागत होते.  केंद्र सरकारच्या नविन आदेशाप्रमाणे सदरील प्रमाणपत्र ऑनलाईन आधार प्रणाली द्वारे द्यावे लागते.

बीड विभागातील सर्व डाकघरामध्ये पोस्टमन व डाक सेवकांमार्फत सदरील प्रमाण पत्र रु. 70/- (सत्तर फक्त) एवढी नाममात्र शुल्क घेऊन हयातनामा प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध आहे. यापुढे पेन्शन धारक कोणत्याही जवळच्या डाक घरामध्ये जाऊन तात्काळ प्रमाणपत्र सादर करु शकतात.

सर्व पेन्शन धारकांनी सदरील सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड विभागाचे डाकघर अधिक्षक एस.एन.शास्त्री यांनी केले आहे.
*-*-*-*-*-*-*-*

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार - राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान

 

▪️यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द.
 
 मुंबई,  : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
 
श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.
00000

Wednesday, November 18, 2020

गेवराई शहरातील दोन दिवसा पासुन बेपत्ता १७ वर्षी मुलीचा मृतदेह विहरीत आढळला.


गेवराई : (प्रतिनिधी) बीडच्या गेवराई शहरातुन मागील दोन दिवसां पासून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती तीचा मृतदेह बुधवारी सकाळी विहीरीत आढळून आला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असुन पोलीस पुढील तपास करतायेत.

सायली कल्याण पारेकर वय १७ वर्षे असे मयत मुलीचे नाव असुन ती गेवराई शहरातुन बेपत्ता झाल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी गेवराई पोलीसात नोंदवीली होती. मात्र बुधवारी सकाळी गोवींदवाडी परिसरातील एका विहीरीत त्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस ठाण्याचे फौजदार युवराज टाकसाळ सह कर्मचाऱ्य्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढत सदरील मृतदेह सायली चा असल्याची खात्री केली व शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

सायलीने मुत्यूपुर्वी चिठ्ठीत मी मरतेय नंतर कोणालाही जबाबदार धरु नये असे नमूद केले आहे.सायलीने आत्महत्या केली की घातपात ? याचा तपास गेवराई पोलीस करतायेत.

Tuesday, November 17, 2020

सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही विकासकामासाठी रस्त्यावरील खड्डात दिवे लावून दिवाळी साजरी.राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अनोखे आंदोलन.


वरोरा (प्रतिनीधी )- माढेली ते खांबाडा रस्त्यावरील खड्डात दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली . राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे वरोरा तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . या रस्त्याने जीवघेणे खड्डे पडले आहे लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे या आधी पण राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने या साठी निवेदन दिले आहेत आंदोलन देखील केले आहे तरी या गेंड्याच्या कातडीचे प्रशासनाला जाग आली नाही त्या मुळे परिसरातील लोकामध्ये या बद्दल असंतोष आहे रस्त्याची वाहन    
 क्षमता ३५ टन असताना या रस्त्याने जास्त क्षमतेचे वाहतूक परवाना देण्यात आला त्या मुळे आधीच खड्डे असलेल्या रस्त्याची आता अत्यंत दुर्व्यावस्था झाली आहे लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात आले नाही तर वरोरा येथे आंदोलन करू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला आहे . या वेळी तालुका उपाध्यक्ष अभिजित कुडे, तेजस उरकुडे, रोशन भोयर, योगेश पुसदेकर, विनोद कोठारे, विजय कुडे, ऋषिकेश कुडे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे.


औरंगाबाद ,दि.17 (विमाका):-  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10  उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. 1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद 2) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड 3) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद 4) जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद 5) प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड 6) विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना 7) विवेकानंद शशीकांत उजळंबकर, लातूर 8) शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद 9)  संजय शहाजी गंभीरे ,बीड 10) संदिप बाबुराव कराळे, नांदेड.

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 14) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 15) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 16) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 17) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 18) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 19) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 20) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 21) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 22) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 23) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 24) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 25) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 26) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 27) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 28) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 29) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 30) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 31) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 32) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 33) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 34) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 35) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद

अंबाजोगाईत बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल.


अंबाजोगाई (प्रतिनीधी )अंबाजोगाई शहरा लगत असलेल्या चनाई येथे राहणार्‍या चौधरी व पांचाळ नामक दोन युवकांवर दोनशे व पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये आज रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याबाबत नुसार सूत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार अधिक माहिती अशी की अंबाजोगाई शहरा लगत असलेल्या चनाई येथील दोन युवक व त्यांचे ईतर अन्य साथीदार बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक दहिफळे यांना त्यांच्या माहितीदाराने दिली होती त्यानुसार दहिफळे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना मुद्देमाल सोबत गजाआड करण्याचा निर्णय घेतला काल संध्याकाळी हे दोघेजण सुविफ्ट डिजायर गाडी घेऊन अंबाजोगाई शहरात बनावट नोटा चालवत असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक दहिफळे यांनी आपल्या साथीदार समावेत त्यांच्यावर झडप टाकली असता चौधरी यास गाडी सहित पकडण्यास ते यशस्वी झाले तर पांचाळ हा फरार झाला चौधरी याची पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली असता त्याच्या जवळून दोनशेच्या व पन्नास रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या यातील दुसरा आरोपी पांचाळ याने आज पर्यंत अनेक बोगस लक्की ड्रॉ मार्केटिंगच्या बोगस कम्पण्याच्या माध्यमातून भल्या भल्याना टोपी दिल्याचे आता समोर येत आहे पांचाळ व चौधरी च्या सम्पर्क मध्ये शहरातील अनेक जण असल्याचे समजले असून हे बनावट नोटा स्वतः तयार करत होते की दुसर्‍या शहरातून येथे आणत होते तसेच यांच्या सोबत आणखी कितीजण सहभागी आहे याचा तपास पो नि दहिफळे करत आहे

औरंगाबाद पदवीधर निवडणुक भाजपमध्ये बंडखोरी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा.



औरंगाबाद | पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये असलेली बंडखोरी स्पष्टपणे समोर आली असून, माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंग गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.गायकवाड यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. मी भाजपच्या प्रदेश कार्यसमती सदस्यत्वाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकृत करावा असे गायकवाड यांनी पाटील यांना पाठवलेल्या राजीनाम्यात म्हंटले आहे. तर भाजपकडून पदवीधर निवडणुकीत उमेदवारी मुळे गायकवाड नाराज होते, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. भाजप नेते शिरीष बोराळकर,प्रवीण घुगे,जयसिंगराव गायकवाड हे तीनही नेते आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे बोराळकर यांना अधिकृत उमेदवारी देण्याची घोषणा भाजपने केली आहे.तर दुसरीकडे घुगे आणि गायकवाड यांनी सुद्धा पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपची चिंता वाढली होती. परंतु प्रवीण घुगे यांची समज काढण्यात भाजपला यश आले होते. मात्र, जयसिंगराव गायकवाड यांची नाराजी भाजपला दूर करता आली नाही.

रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुंबई व महाराष्ट्र राज्य कार्यकारण्या बरखास्त.:- डॉ राजन माकणीकर

मुंबई  (प्रतिनिधी) मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त करण्यात येवून नव्या उमेदिच्या कार्यकर्यांना संधी देऊन पक्षाचे बळकटीकरणं करण्यात येणार असल्याने इच्छुकांनी पक्ष कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केले आहे.
डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, माजी आमदार दिवंगत टी.एम.कांबळे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आर.पी.आय स्वतंत्रपणे उभा राहावा, सत्तेत बदल होऊन रिपब्लिकन जनतेला सत्तेत सहभाग मिळावा, सत्ता त्यांच्या हाती यावी म्हणून रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाची निर्मिती केली आहे.
आंबेडकरी विचारांच्या पक्षांची राजकीय वाताहात झाली आहे, ती भरून काढण्यासाठी शिवराय फुले शाहू आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या सर्वधर्मीय जनतेला एक करून सत्तेत सहभागी होण्याच्या दिशेने रिपाई डेमोक्रॅटिक वाटचाल करत आहे,पप विविध जातीधर्मांची व वेगवेगळ्या पक्षांची लोक रिपाई डेमोक्रॅटिक कडे येत आहे.
पक्षाला नव चेतना मिळत असून आगामी निवडणुकीत रिपाई डेमोक्रॅटिक स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी होण्याच्या दिशेने मार्गक्रम करत असल्याचा दावा ही यावेळी डॉ माकणीकर यांनी केला.
पक्षाचे युवाध्यक्ष कनिष्क कांबळे महासचिव डॉ राजन माकणीकर व अन्य 2 पदाधिकारी पक्षाची फेरनिवड व बांधणी कमिटी वर नियुक्त असून इच्छुकांनी आपल्या इच्छा व प्रतिक्रिया महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्या कडे लिखित स्वरूपात पक्ष कार्यालयात नोंदवाव्यात असेही पक्षाच्या वतीने नवनियुक्त केंद्रीय उपाध्यक्ष श्रावण गायकवाड यांनी सांगितले.
लवकरच शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत असून राज्याच्या राजकारणात एक आमूलाग्र बदल घडणार तर आहेच मात्र रिपब्लिकन व आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या पक्षांकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलेल असा सूतोवाच डॉ माकणीकर यांनी केला.
विद्यमान पदाधिकारी नवीन येणाऱ्या सदस्यांना योग्य सन्मान देऊन पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करतील असा आशावाद पक्षाध्यक्षा आईसाहेब नंदा कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला.

Sunday, November 15, 2020

जागतिक पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतिने अभिवादन कार्यक्रम.

बीड (प्रतिनिधी) ;- उद्या 16 नोव्हेंबर रोजी जागतिक पत्रकार दिन साजरा करण्यात येतो.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने उद्या दैनिक लोकसत्ता कार्यालयात सकाळी 11:30 वाजता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे.पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे आणि  मार्गदर्शक दैनिक दिव्य लोकप्रभा'चे संपादक संतोष मानूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतिक पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास तमाम पत्रकारांनी उपस्थित राहावे तसेच पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.

पदवीधर आणी शिक्षक निवडणूक स्थगितीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका.


औरंगाबाद (प्रतिनीधी )- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करून त्यांना स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका लक्ष्मण चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. १ डिसेंबर रोजी पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. लक्ष्मण चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेतून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला आहे. याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे ऑनलाइन व ऑफलाइन मतदार नोंदणी बंद होती. यामुळे केवळ ३% पदवीधरांची नोंदणी झाली. निवडणूक आयोगानेही नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. अशा परिस्थितीत ३ टक्के पदवीधरांच्या मतदानातून आमदार निवडणे लोकशाही प्रक्रियेची थट्टा आहे. निवडणुका घेण्यापूर्वी अधिकाधिक पदवीधर आणि शिक्षक मतदारांची नोंदणी होणे गरजेचे आहे. यामुळे निवडणुका स्थगित करणे किंवा पुढे ढकलणे योग्य निर्णय ठरेल, असे ते म्हणाले. न्या. ए. के. मेनन आणि न्या. ए. के. तावडे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. ऍड. असीम सरोदे यांच्यासह ऍड. अजिंक्य उडाणे आणि ऍड. पूर्वा बोरा यांनी चव्हाण यांची बाजू मांडली. यावर पुढील सुनावणी १६ रोजी होण्याची शक्यता आहे.

प्रक्रियेतील
दोन चुका
लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २३ (३) नुसार सातत्याने मतदार याद्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणि मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करण्याचे अधिकार आहेत. मात्र, उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर असताना ५ नोव्हेंबर २०२० रोजी मतदार नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली.

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.



मुंबई, (प्रतिनीधी) : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.


यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

* हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छापुर्ती. 

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!

Saturday, November 14, 2020

स्वस्त धान्य दुकान-आपला अधिकार.



रेशन कार्ड व स्वस्त दरात धान्य मिळणे हा महाराष्ट्रतील सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे.तो कोणी ही हिरावून घेऊ शकत नाही.रेशन विषयी चे आपले अधिकार माहीत करून घ्या

आज देशातील सर्व सामान्य माणूस हा कोव्हिडं च्या परिस्थिती मुळे आर्थिक आघाडीवर देखील पुरता हतबल झाला आहे.आशावेळी स्वस्त धान्य दुकाना मार्फत सरकारने उपजीविके पुरते धान्य उपलब्ध करून दिले आहे.मात्र सर्वसामान्य माणसापर्यंत येण्यापूर्वीच हे धान्य शिजून भरलेल्या  पोटात जाते; असे होऊ नये म्हणून सरकारने आपल्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी/आपले हक्क या सर्वांची माहिती सरकारच्या विविध वेबसाईटवर उपलब्ध आहे.ती सर्वसामान्य माणसाला मिळायला हवी (®)

काय आहेत रेशनिंग चे नियम

 रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही.

 बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते.

 बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते.

 रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो.

 एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही.

 ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही.

 रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही.

 रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.gov.in/pggrams/ या ऑनलाईन लिंकवर अपलोड करावीत. सिद्धता पडताळून दुकानदारावर तात्काळ कारवाई होते.

http://www.mahaepos.gov.in/SF

या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे? हे आपल्याला कळेल.

१२ अंकी नंबर हा पेन ने लिहलेले असेल तुमच्या रेशन कार्ड वर किंवा आत मध्ये असतो.आपल्या हक्काचे रेशन

दुकानदाराला देणे बंधनकारक आहे जर अपवाद म्हणून हा नंबर कार्डवर नसेल तर ताबडतोब संबंधित दुकानदाराच्या निदर्शनास आणुन द्या त्याने टाळाटाळ

अथवा प्राप्त माहीती नुसार रेशन दिले नाही व तर आपण

http://mahafood.gov.in/pggram: या ठिकाणी संबंधित दुकानदाराविरुद्ध

तक्रार करु शकता.

 रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक दर फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, दुकान क्रमांक, तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद, रेशन कार्यालयाचा पत्‍ता व फोन, रेशनकार्ड संख्‍या, भव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा ही माहिती असणे अनिवार्य असते.

 बीपीएल, अंत्‍योदय व अन्‍नपूर्णा लाभार्थ्‍यांची यादी दुकानात लावलेली असते.

‘RTI माहिती अधिकार’ फेसबुक ग्रुप – https://www.facebook.com/groups/RTI.MahitiAdhikar

 * वरीलपैकी कोणतीही गोष्‍ट आपल्‍या गावातल्‍या रेशनदुकानात होत नसेल, तर ताबडतोब लेखी तक्रार नोंदवा. जर गावातील रेशन दुकानदार धाक/धमकी दाखवत दांडगेशाही करून तक्रार करण्यास मज्जाव करत असेल तर त्रासलेल्या ग्राहकांनी गुप्तता राखून एकत्रितपणे लेखी अर्जावर आपली नावे आणि सही करून तो रजिस्टर पोस्टाने तहसिल कार्यालयाला पाठवा. तसेच दुकानातच तक्रारवही ठेवलेली असते. ती वही मागा आणि त्‍यात आपली तक्रार लिहून त्‍याखाली नाव, पत्‍ता, सही/अंगठा करा. जर दुकानदाराने ही वही दिली नाही, तर तहसिलदाराकडे वही न देण्‍याची तक्रार करा. तक्रारवही न देणे हा अदखलपात्र गुन्‍हा म्‍हणून तहसिलदार कारवाई करतात. तक्रारवहीत पाच तक्रारी नोंदल्‍या, की दुकानदाराला 15 हजार रूपये दंड होतो.

* दुकानावर देखरेख करण्‍यासाठी ग्राम पंचायतीची दक्षता समिती असते. या समितीत जागरूक तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. ग्रामसभेत या समितीविषयी चर्चा करा. गरज असेल, तर समिती बदला. ही समिती दुकानावर धाड घालू शकते. गैरप्रकार असतील, तर दुकानाला टाळेही लावू शकते. तलाठी या समितीचा सदस्‍य सचिव असतो.

आपण आपल्या गावात रेशन दुकानातुन रेशन घेतो. परंतु रेशन दुकानदार आपल्याला पावती मात्र देत नाही. म्हणुन
महाराष्ट् शासनाने लोकांना त्यांच्या पावत्या या ऑनलाईन देखील पाहता येण्यासाठी खालील वेबसाईट चालु केलेली आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन आपला RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकावा. महाराष्ट् सरकारने जनतेस आवाहन केलेले आहे आपण खालील वेबसाईट वर जाऊन आपले रेशनकार्ड वरील धान्य चेक करावे.

आपले रेशनकार्ड चेक करण्यासाठी खालील लिंक वर RC नंबर जो आपण रेशन घेताना बायोमेट्रीक साठी येतो तो नंबर टाकुन आपण आपली पावती प्राप्त करु शकतो. या साईटवर जाऊन आपल्या कार्डावर एका व्यक्तिमागे किती धान्य आपल्याला मिळण्याचा अधिकार आहे आणि दुकानदार किती देतो याची आपणास ऑनलाईन माहिती मिळते. https://mahaepos.gov.in/SRC_Trans_Int.jsp 

* रेशन दुकानदारांचा FPS ID चेक करण्यासाठी खालील लिंक वर पहावे. किंवा आपल्या पावतीवर देखील आयडी असतो. https://mahaepos.gov.in/FPS_Trans_Abstract.jsp

 * रेशन दुकानदारानी शासनाकडुन किती माल घेतला हे खालील लिंक वर पहावे https://mahaepos.gov.in/FPS_Status.jsp

 * रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी खालील लिंक वर पहावे. http://mahafood.gov.in/pggrams/

* वरील वेबसाईट ही शासनाची अधिकृत आहे. जास्तीत जास्त लोकांना आपले रेशन कार्ड चेक करुन घ्यावे. व अशा रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली नि:शुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: helpline.mhpds.gov.in पाठवावा. असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेले आहे.

विधान परिषद निवडणूकीची आचार संहिता लागू असून या काळात समाजमाध्यमांचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन.




बीड (जि.मा.का.) :- जिल्ह्यात विधान परिषद पदवीधर निवडणूकीची आचार संहिता लागू असून या कालावधीत अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय संदेशाचे प्रसारण समाज माध्यमांव्दारे झाल्यास निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. निवडणूक पारदर्शक वातावरणात होण्यासाठी चुकिचे, अफवा पसरवणारे इतर कोणत्याही कायदा  सुव्यवस्था बिघडवणारे माहितीचे लेखी, चित्र वा चित्रफित स्वरुपातील संदेश पाठविणे सायबर सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी समाजमाध्यमांचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल  रेखावार यांनी केले. 
निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री.रेखावार  यांच्या अध्यक्षतेखाली(दि.१२रोजी) झाली. यावेळी ते बेालत होते. बैठकीस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, आकाशवाणीचे अधिकारी गोपाळ ठाकूर, जिल्हा माहिती तंत्रज्ञान सेंटर (एनआयसी)चे प्रमुख प्रवीण चोपडे, सायबर क्राइम शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड आणि पत्रकार भागवत तावरे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी किरण वाघ आणि संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यास्‍तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी देखील निवडणूकांमध्ये असे प्रकार आयोगाच्या निदर्शनास आले आहेत. असे संदेश, मजकूर, माहिती, चित्रे अथवा पोस्ट समाज माध्यमांव्दारे प्रसारित झाल्यास राजकिय  उमेदवारांना एक प्रकारे प्रचार होतो अथवा प्रतिपक्षाच्या उमेदवारास हानी होणाऱ्या बाबी घडू शकतात. निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार  कार्यवाही  केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचार करत असताना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 127 (क) अन्वये विहित करण्यात आलेल्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे. या तरतुदींचे उल्लंघन झाल्यास प्रचलित कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण करण्यासाठी राजकीय जाहिरातींचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण आणि पेड न्यूजवर नजर ठेवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. रेखावार यांनी दिली. 
 ते म्हणाले, बल्क एसएमएस, व्हॉईस एसएमएस, इलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही, केबल, चॅनेल्स, रेडिओ, एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, ऑडिओ-व्हिज्युअल डिस्प्लेज या दृकश्राव्य माध्यमातील जाहिरातींसह सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण (एमसीएमसी) समितीचे प्रसिद्धी पूर्वप्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे असे जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले.
यावेळी निवडणूक कालावधीत समाज माध्यमांव्दारे चुकीचा संदेश पाठवणे,  राजकिय  प्रचार आणि निवडणूकीत  उमेदवारांचा  प्रचार करणारे लिखीत व चित्र  व चित्रफित स्वरुपातील संदेश दिसून येतात याबाबत देखील समिती सदस्यांनी माहिती दिली. याबाबत करावयाच्या उपायांबाबत चर्चा करण्यात आली. 
यावेळी आकाशवाणीचे अधिकारी श्री. ठाकूर, एनआयसीचे प्रमुख श्री. चोपडे, पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड आणि पत्रकार श्री. तावरे यांनी चर्चैत भाग घेतला.   
यावेळी प्रत्येक नोंदणीकृत राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय राजकीय पक्ष व निवडणूक लढवणारा उमेदवार यांनी जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या 3 दिवस आधी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अथवा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती बीड यांच्याकडे अर्ज करावा अशा आयोगाच्या सूचना आहेत. तसेच, इतर व्यक्ती किंवा नोंदणी न केलेल्या राजकीय पक्षांच्या बाबतीत जाहिरात प्रसारित करण्याच्या प्रस्तावित दिनांकाच्या पूर्वी 7 दिवस आधी अर्ज करावा, अशी माहिती देण्यात  आली.
भारत निवडणूक आयोग मतदार जनजागृतीसाठी सोशल मिडीयाद्वारे प्रचार प्रसार करत आहे इन्फोग्राफिक्सचा वापर करतानाच अपप्रचाराला आळा  घालण्यासाठी काम केले जात आहे. यासाठी आयोगामार्फत निवडणूक आचारसंहितेशी संबंधित सोशल मिडीयावर देखरेख करताना आक्षेपार्ह पोस्ट, चित्रफिती, छायाचित्र निदर्शनास आल्यास त्याबाबत आयोगाला  कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
00 0 00

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020.छाननीअंती एकूण 53 उमेदवारांपैकी 45अर्ज वैध तर 8 अर्ज अवैध.

औरंगाबाद - (विमाका):- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -2020 च्या अनुषंगाने  शुक्रवार, दि.13 नोव्हेंबर 2020 रोजी मतदारसंघातील एकूण 53 प्राप्त नामनिर्देशनपत्राच्या छाननी अंती 45 अर्ज वैध ठरले असून 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.  
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस ए इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) अक्षय नवनाथराव खेडकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 14) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 15) ईश्वर आनंदराव मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 16) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 17) अंभोरे शंकर भगवान (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 18) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 19) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 20) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 21) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 22) जयसिंगराव गायकवाड पाटील (पक्ष : अपक्ष), औरंगाबाद 23) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 24) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 25) प्रवीणकुमार विष्णु पोटभरे (पक्ष : अपक्ष) बीड 26) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 27) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 28) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 29) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 30) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 31) विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (पक्ष : अपक्ष) जालना 32) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 33) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 34) विवेकानंद शशीकांत उजळंबकर (पक्ष : अपक्ष) लातूर 35) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 36) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 37) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 38) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 39) शेख गुलाम रसूल कठ्ठु (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 40) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 41) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 42) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 43) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 44) संजय शहाजी गंभीरे (पक्ष : अपक्ष) बीड 45) संदीप बाबुराव कराळे (पक्ष : अपक्ष) नांदेड. 
अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) अतुल राजेंद्र कांबळे 2) छाया सोनवणे 3) सुनील महाकुंडे 4) प्रविण घुगे 5) प्रदिप चव्हाण 6) विजयश्री बारगळ 7) बळीराम केंद्रे 8) शेख फेरोजमीया खालेद. 
****