Thursday, November 5, 2020

परळी शहरातील विविध नागरी समस्या सोडवीण्यासाठी मनसेचे निवेदन.


* अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा.

परळी वैजनाथ ;-- परळी शहरातील जनसामाण्याला भेडसावनारे अनेक प्रश्न घेऊन नागरी सुविधी सोडवण्यासाठी नगर परिषद कार्यालयात मनसे च्या पदाधीकारी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्या मध्ये प्रामुख्याने.
1 मोंढयातील फुटपाथ  पदचा-यासाठी खुले करावे.
2 शहरातील पाणी पुरवठा वेळ/वार/निच्छीत करणे.
3 कॅरीबॅग मुक्त परळी शहर करण्या बाबत ठोस कार्यवाही करावी.
4 राष्ट्रमाता जिजामाता उद्यान  व पंडीत दिनदयाल उपाध्याय उद्यानाचे रखडलेले काम लवकर पुर्ण करावे.
5 घरकुल योजनेत राहीलेल्या सर्व लाभात्र्यांना लाभांष मिळावा व एक हाती पुर्ण रक्कम मिळावी.
6 शहरातील काही भागात अपुरी लाईट व्यवस्था पुर्ण करावी.
7 भुमीगत सांडपाणी नाल्या च्या कामामुळे उखडलेले राहीलेले अपुर्ण रस्ते तात्काळ दुरुस्त अथवा पुर्ण करावे.
आदि व विविध मागण्यासाठी परळी नगरपरिषदेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. व मागण्या तात्काळ पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इषारा देण्यात आला या वेळी मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता दहीवाळ तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर मनविसे शहराध्यक्ष हनुमान सातपुते,शहरउपाध्यक्ष महेश शिवगण, सुमित कलशेटे, विठ्ठल झिलमेवाड, विभागाध्यक्ष संतोष कचरे, माणीक लटींगे, प्रशांत कामाळे, वैजनाथ यादव, गणेश गित्ते, श्रीहारी दहीफळे,आबा गित्ते, धिरज भराडीया, माऊली चौकट, गणेश साळवे,  आदी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment