Tuesday, November 10, 2020

बिहार विधानसभा निवडनुक निकाल एनडीए पिछाडीवर महाआघाडीने घेतली आघाडी.

कोरोना महामारी संकटात बिहार विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात घेण्यात आल्या आहे. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निकालाकडे अवघ्या देशाच लक्ष लागले आहे. मतदानानंतरच्या चाचण्यामध्ये महाआघाडी सत्तेवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, आणि सुरूवातीच्या काही फेऱ्यांमधून कलही तसाच समोर येत आहे. महाआघाडीने एनडीएला पिछाडीवर टाकले असून महाआघाडीने आघाडी घेतली आहे.

तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी : बिहारमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने आघाडी घेतली आहे. सुरूवातीच्या कल हाती येताच राजदच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

No comments:

Post a Comment