* लाॕकडउनच्या काळात मंदिर बंद ठेवण्याचे आदेश असताना व्हीआयपी लोकांना दर्शनाची सेवा दिली उपलब्ध करून .
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) केंद्र सरकारकडून सर्व देशातील मंदिर ,मज्जिद बौद्ध विहार, दर्गा ,चर्च इतर धार्मिक स्थळे लॉक डाऊन मध्ये बंद ठेवण्याचे आदेश असताना परळी-वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने लॉक डाऊन मध्ये व्हीआयपी लोकांना दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मार्च 2020 ते सप्टेंबर 2020 पर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास लक्षात येऊ शकते करिता काँग्रेसचे नेते वसंत मुंडे रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी महाराष्ट्र शासन कडे तक्रार दाखल केली त्यावर शासनाकडून विधी न्याय विभागा मंत्रालय महाराष्ट्र शासन क.मुंमस1320 प क(1/20,)/का 17 विधी न्याय विभाग दि 22 /10 /2020 ला आदेश चौकशी संदर्भात दिलेले असून सर्व मुद्दे निहाय माहिती तपासणी संदर्भात पथक खास बाब म्हणून नेमून वैद्यनाथ मंदिरातील लॉकडाऊन मधील जे काही ट्रस्टच्यावतीने अनेक भाविकांना धमक्या देणे, मारहाण करणे ,सुरक्षारक्षक मार्फत शिवीगाळ करणे व व्हीआयपी ना दर्शनासाठी व्यवस्था करून त्याचा आदर सत्कार करून आम्ही किती चांगले आहोत हे प्रसिद्धी पेपर च्या माध्यमातून बातम्या देऊन दाखवलेले आहेत या सर्व बाबी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासण्या वेळी चौकशी पथकाला लक्षात येणार आहेत. भाजपच्या वैजनाथ मंदिराच्या पायऱ्या वरील आंदोलनाचे हे परवानगी घेतली होती का नाही या सर्व बाबी तपासण्यात ची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. यासर्व चौकशीमध्ये मुद्दे निहाय तपासणी झाली की काळाबाजार ट्रस्टचा जनतेसमोर येणार आहे. वैद्यनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच नंबरचे परळी-वैद्यनाथ हे मंदिर असून देशातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात लॉक डाउन मुळे सर्व देशभर शासनाच्या नियमाचे पालन केले जात असताना परळी वैजनाथ देवस्थान ट्रस्टने व्हीआयपी साठी खास व्यवस्था करण्यात आली होती .परळीतला भाविक शिवभक्त पायरीचे दर्शन घेण्यासाठी व कळसाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना मज्जाव केला जातो. त्यांच्याबरोबर भांडणे शिवीगाळ केली जाते परंतु व्हीआयपी आल्यानंतर ट्रस्टी चे लोक त्यांची दर्शनाची व इतर सर्व सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सर्व बाबी फूटेजमध्ये असून त्यामुळे संपूर्ण फुटेज तपासले की वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सह कार्यकारिणीवर कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी दिलेली आहे. वैजनाथ मंदिरातील ट्रस्टच्या लोकांचा सर्व काळाबाजार जोपर्यंत जनतेसमोर येत नाही तोपर्यंत विरोधात सतत लढत राहणार असे वंसत मुंडे यांनी पत्रकारांना सांगितले
No comments:
Post a Comment