परळी वैजनाथ ;-- परळी शहरात सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत विविध प्रकारच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. यावेळी जिथे जाल तिथे वाहनांमुळे ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. मोंढा मार्केट, स्टेशन रोड, किराणा लाईन, अरूणोदय मार्केट अशा सर्वच ठिकाणी गर्दी वाढल्याने वाहनांची कोंडी होत आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यानां तर तारेवरची कसरत करावी लागत आहे. पोलिसांनी आज रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्यांची हवा सोडली खरी परंतू ट्रॅफिक जामवर त्यांना मात्र काही इलाज करता आला नाही.
(छाया ः संतोष जुजगर)
No comments:
Post a Comment