नागपूर :दिनांक 31 मार्च नागपूर शहरात मध्य भागी असलेला संती रोड इतवारी या भागात घरो घरो जाऊन मोफत मास्क वाटप करण्यात या भागातील सामाजिक कार्यकर्ते ओमेश्वर कुंभारे यांनी मोफत मास्क वाटप केले व या भागातील जनतेला घरातच बसून राहा असा संदेश त्यांनी दिला .मोफत मास्क वाटप मध्ये या भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री भास्कर राव अरमरकर श्री रमेश खानोरकर ,नरेंद्र अरमरकर ,जितू अरमरकर , योगिता मोजरकर , सौ संध्या पाटील या मास्क वाटप कार्यक्रम मध्ये सहभागी होत्या घरीच लॉक डाउन करून बसा असा संदेश या भागातील जनतेने पाळला.
Tuesday, March 31, 2020
तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांची विटभट्ट्यांवर धडक कारवाई.
* सिरसाळा येथे तीन विटभट्टी मालकांविरोधात गुन्हा दाखल.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असतानाही विटभट्टी चालू ठेवल्याबद्दल तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सिरसाळा येथे विटभट्टी चालकाविरुद्ध धडक कारवाई करीत तिघां विरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या कोरोनामुळे नागरीक परेशान आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्य़ा तील सर्व उद्योग, आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही सिरसाळा परिसरात विटभट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर परळीचे तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी थेट विट भट्टीवर जाऊन पाहणी केली असता शेख नजीब शेख नासेर, सय्युम पठाण मुहम्मद पठाण, रामेश्वर नारायण चव्हाण सर्व रा. सिरसाळा यांच्या विटभट्ट्या चालू असल्याचे निदर्शनास आले.
यावरून सिरसाळाचे तलाठी युवराज सोळंके यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगावसह परिसरात अवकाळी पाऊस व गारपीठीची पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- भागवत मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तळेगाव व
परिसरात वादळी वार्यासह अवकाळी गारांच्या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकर्याच्या घामाचे हिसकावून घेतल्याने प्रशासनाने तात्काळ सदरील पंचनामे करून सरकारने नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांनी केली आहे. कोरोना कहर असतांना
21 दिवसाच्या कडेकोट लॉकडाऊनसमोर वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी संकटात सापडला आहे.
परळी तालुक्यातील तळेगाव, टोकवाडी, लिंबोटा, पांगरी या गावासह अनेक गावात सोमवार दि.30 मार्च रोजी 6.44 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह अवकाळी गारांचा पाऊस झाला.या पावसाने गहू, ज्वारी, हरभरा, जवस, ऊस, पालेभाज्या व बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी निघालेल्या पिकांचे खळे चालू होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान मोठे असून यामुळे शेतकरी उद्धवस्त आणि हवालदिल झाला आहे.खरीपाने शेतकर्यांना साथ दिली नव्हती. परंतु,एका पावसाने रब्बीचे पिक जोमात आले होते.परंतु,अवकाळी पावसाने शेतकर्याच्या घामाचे हिसकावून घेतल्याने.शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे डाळीबाची फुलगळ, फळगळ झाली आहे. तर द्राक्षांची काढणी अंतिम टप्यात असून झालेल्या पावसामुळे मण्यांना तडे गेले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पावसामुळे रब्बी पिके जमिनोदोस्त झाली आहेत. काढणीला आलेली पिके हातची गेल्याने शेतकर्यांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. गतवर्षी रब्बीची पेरणी नव्हती यावर्षी आगात नाही.तरीही एका पावसाने कसे बसे आलेले रब्बीचे पिक निसर्गाच्या अवकृपेने अवकाळी पावसाने हिरावून नेले. गारांचे मोठे ढिगारे शेतात दिसून येत आहेत. हातातोंडाशी आलेली पीके पदरात पडतात की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. तसेच या जोरदार वादळात ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी घराचे पत्रे, शेतातील आखाड्यावरील पत्रे , बैलगाडीसह व साहित्य उडून गेले. काही शेतकरी जखमी झाल्या आहेत.ग्रामीण भागातील बऱ्याच गावांमध्ये घराचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या वीजवाहक तारा तुटल्याने विजेचा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहेत. या जोडण्याचे काम परळी वीज महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर चालू आहे.
एकीकडे ‘कोरोना’चे सावट आणि दुसरीकडे अवकाळी- चे संकट. कोरोनाशी युद्धपातळीवर रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यात शेतकऱ्यांपुढे पण लहरी निसर्गाला रोखणार कसे हा प्रश्न आहेच. अवकाळीचे शुक्लकाष्ठ महाराष्ट्राच्या मागे काही वर्षांपासूनच लागले आहे. त्याचीच पुनरावृत्ती गारपिटीसह झाली. राज्यातील सत्ताधारी संवेदनशील आहेत. अस्मानी आणि सुलतानीच्या संकटातून शेतकऱयांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. अवकाळीच्या तडाख्याने रब्बीही हिरावून घेतलेल्या बळीराजाला उभे करावे लागेल. त्यामुळे शेतकरी संकटात असताना त्याला धीर देण्यासाठी सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा.वीज दरात मोठी कपात.
मुंबई : राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात ५-७ टक्के, व्यावसायिक दरात १०-१२ टक्के आणि औद्योगिक दरात १०-११ टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. नवे दर १ एप्रिल २०२० पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील. तर उर्वरित महाराष्ट्रासाठीचे दर महावितरणकडून कमी केले जातील.
* दरात किती कपात होणार?
मुंबई वगळता महाराष्ट्र
घरगुती - ५ टक्के
व्यावसायिक - १० - ११ टक्के
उद्योग - ११-१२ टक्के
शेती - १ टक्के
मुंबई
बेस्टकडून -
घरगुती - दीड ते दोन टक्के
उद्योग - ७ टक्के
व्यावसायिक - ८ टक्के
टाटा-अदानी
घरगुती - ११
व्यावसायिक -११
उद्योग - १०-११ टक्के
*करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना दिलासा
वीज बिल कमी करण्यासोबतच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्योगांनाही दिलासा दिला आहे. सर्व उद्योग सध्या ठप्प असल्यामुळे पुढील तीन महिने कंपन्यांकडून वीज बिल वसुली केली जाणार नाही. यामुळे उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली परळी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी.
परळी वैजनाथ दि. 31
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज सोमवारी रात्री येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. त्यांनी येथे केलेल्या विलगीकरण कक्षाची पहाणी करून व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त करून कोरोनाशी लढण्यासाठी सर्वांनी घरातच राहुन सहकार्य करावे असे आवाहन केले.
आज सोमवारी रात्री 9.30 वाजण्याचे सुमारास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, न. प. मुख्याधिकारी डॉ. अरविंद मुंडे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर,तलाठी गंगाधर राजुरे आदी उपस्थित होते.
करोना हे मोठे संकट असले तरी आपण सर्व सज्ज आहोत. नागरिकांनीही घरात बसून या संकटाचा सामना करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले
मुक्या प्राण्यांच्या अन्न पाण्याची नागरिक म्हणून व्यवस्था करावी-भोजराज पालीवाल.
परळी (प्रतिनिधी)कोरोना आजारामुळे सर्वत्र संचारबंदी लागू असून रस्त्यावर फिरणारे मुके प्राणी व पक्षी यांना अन्न पाणी मिळणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी स्वत: मुक्या जनावरांसाठी पाणवठा ठेवला असून गॅलरी व गच्चीवर पक्षांसाठी पाणी तसेच अन्न ठेवले आहे. एक नागरिक म्हणून मुक्या प्राण्याचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे, सर्वांनीच शक्य होत असेल तर अशी व्यवस्था करावी असे आवाहन भोजराज पालीवाल केले आहे.
कोरोना आजारामुळे राज्यभरात संचारबंदी लागू असून जेंव्हा व्यवहार किंवा नागरिक रस्त्यावर असतात तेंव्हा मुक्या प्राण्यांना अन्न पाणी सहज उपलब्ध होते. संचारबंदीमुळे सर्वच रस्ते निर्मुष्य असून अन्न पाण्याच्या शोधात मुके प्राणी रस्त्यावर फिरत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या घराबाहेर जनावरांसाठी पाणी तसेच गच्ची किंवा गॅलरी पक्षांसाठी अन्न पाणी ठेवावे असे आवाहन पालीवाल यांनी केले आहे. दरम्यान प्राण्यांच्या जवळ जातांना तोंडाला मास्क लावावा, प्राण्यांना अन्न पाणी दिल्यानंतर साबणाने हात पाय स्वच्छ धुवावेत, शक्य असेल तर गरम पाण्याने आंघोळही करावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
Monday, March 30, 2020
नायब तहसीलदार रुपनर साहेब यांच्या सहकार्यामुळे उपाशी कुटुंबाला मिळाले अन्न.
परळी (प्रतिनिधी ) संपूर्ण भारतात चालू असलेल्या लाॅकडाऊन मुळे लाखो मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यातील नाथरा गावाजवळ राजस्थान राज्यातील दोन कुटुंब उपाशी पोटी असल्याची माहिती नायब तहसीलदार रुपनर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सुञे
हलवून त्यांच्या अन्न पाण्याची सोय केली.
या कुटुंबाची माहिती तलाठी गिते मॅडम यांनी नायब तहसीलदार रुपनर यांना दिली. त्यांनी लगेच नाथरा गावचे चेअरमन अतुल मुंडे यांना दिली. अतुल मुंडे यांनी यांचं कुटुंबातील सर्वाची अन्न धान्याची व्यवस्था केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा जबाबदारीचा ताण असतानादेखील माणुसकीच्या भावनेतून काम करणारे रुपनर, अतुल मुंडे, व तलाठी गिते मॅडम यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४×७ मदत कार्यजीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अडचण असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन.
*अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन*
मुंबई दि.30. कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे,बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे ना.छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मा.मंत्री महोदय यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मा.मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे.
श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-९८७०३३६५६०
श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी-९७६६१५८१११
श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-७५८८०५२००३
श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-७८७५२८०९६५
मंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू झाली आहे. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे .नागरिक या सुविधेबाबत समाधानी आहेत.
देशातील लाॕकडाऊन वाढविण्याचा विचार नाही.
नवी दिल्ली – केंद्र सरकारचा लॉकडाऊन वाढवण्याचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहे. हा कालावधी वाढविला जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जनतेत आहे. त्याला गौबा यांच्या स्पष्टीकरणामुळे पूर्णविराम मिळाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 24 माार्च रोजी, देशभरात 21 दिवसीय लॉकडाऊन घोषित केला होता.
एका पत्रकाराला झाली कोरोना ची लागन.
मुंबई : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून,शासकिय कार्यालयात पाच टक्के कर्मचारी उपस्थितीची तर खाजगी कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात आली आहे.विविध राज्यातील सध्याची सत्य परिस्थिती जनतेसमोर आणण्याचे काम वाहिन्यांचे आणि मुद्रित माध्यमातील पत्रकार करीत असतानाच जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाची बाधा एका पत्रकाराला झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकाराला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना खबरदारी घेण्याची विनंती केली आहे.या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ऑनलाईन संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
वृंदावन, काशी, मथुरा येथून परतलेल्या भाविकांची उपजिल्हा रुग्णालयाकडून तपासणी.
* कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचा डाॅक्टरांचा निर्वाळा.
परळी वैजनाथ दि. 30…
परळी शहर व तालुक्या तील 93 भावीक (यात्रेकरू) वृंदावन, काशी, मथुरा (उत्तर प्रदेश) येथून आज दि. 30 मार्च रोजी शहरात दाखल झाले. सर्वांची परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली असून कुणातही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे यांनी सांगितले. यामुळे परळीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परळी तालुक्यातील सुमारे 93 भावीक उत्तर प्रदेशात लाॅक डाऊनमुळे आडकुन पडले होते. शासकीय, राजकीय प्रयत्नानंतर सर्व यात्रेकरू आज सकाळी परळी शहरात दाखल झाले. सदरिल सर्व 93 व्यक्तींची संशयित कोरोना आजारा संदर्भात आरोग्य तपासणी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डाॅ. वैभव दुबे, डाॅ. व्यंकटेश तिडके व रूग्णालयातील इतर आरोग्य कर्मचारी यांच्याकडुन करण्यात आली आहे.
या संपुर्ण 93 लोकांना कोरोना रोगाची कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत. पण हे सर्व लोक कोरोना प्रादुर्भाव झालेल्या भागातून आले असल्या मुळे ह्या सर्वांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून परळी ग्रामीण पोलिस स्टेशनच्या जवळील वैद्यनाथ भक्त निवास येथे क्वारांटाईन म्हणून ठेवण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे यांनी सांगितले. दरम्यान या यात्रेकरूंमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याने परळीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किराणा दुकानदार व काही फळ-भाजीपाला विक्रेत्यावर कार्यवाही.
परळी वैजनाथ; अत्यावश्यक असलेल्या किराणा बाजार व भाजीपाला खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगर पालिकेने आता शहराच्या विविध भागात असलेल्या किराणा दुकान,मेडिकल व भाजीपाला विक्रीसाठी प्रचंड मेहनतीने शिस्तबद्ध नियोजन केले होते.गर्दी करु नका सोशल डिस्टंस् पाळा वारंवार आवाहन करुन ही परळीत काही महाभाग घालुन दिलेले नियम तोडुन व्यापार करतांना दिसुन आले अश्यांच्या विरुध्द प्रशासनाने कठोर पाउल उचलुन काही दुकानाला सिल तर अनेक हातगाड्यावर आज सकाळी कार्यवाही करण्यातआली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी शिथिल काळात (सकाळी 7 ते सकाळी 9.30 या वेळेत)किराणा व भाजीपाला खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरीक गर्दी होऊच नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे.नागरिक व व्यापारी नियमांचे पालन करता आहेत परंतु काही जण माञ याकडे चक्क नजर अंदाज करत आहेत.अश्या व्यापाऱ्या विरुध्द कठोर पाउल उचलायचे असे प्रशासनाने ठरवले असुन आज जेव्हा सकाळी 7 ते सकाळी 9-30 च्या दरम्यान बाजार चालु झाला तेव्हा प्रशासनाने यावर करडीनजर ठेऊन मार्कट ते अग्रवाल लाॕज दरम्यान असलेल्या दुबे किराणा व दुबे प्रोव्हिजन या दोन किराणा दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे दुकाने सिल करण्यात आली.
फळविक्रेत्यासाठी फांऊंडेशन स्कुल (तोतला मैदान]येथे नियोजन केले असताना काही फळविक्रत्यांनी मार्कट परिसरात हातगाडे लावली होती तर भाजी विक्रेत्यांसाठी नियोजन बॕरिकेट केले असताना काही भाजी विक्रेत्यांनी बॕरिकेटच्या बाहेर भाजीपाला मांडुन दिलेल्या सुचनाचे पालन न केल्याने अश्या विविध व्यापा-यांचे तराजु अदी व साहित्य जप्त करण्यात आले.
तहसिलदार डॉ विपीन पाटिल,न.प.मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली असुन यावेळी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे तलाठी गंगाधर राजुरे व काही पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
Sunday, March 29, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त तुटवडा दूर करण्यासाठी दै. जगमित्र व शुभम देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्तदान शिबीर.
* आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद_
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे नियमितपणे रक्तदान करण्याची प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री धनंजय मुंडेंनी रक्तदात्यांना अधिकाधिक प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने सकारात्मक प्रतिसाद देत दै. जगमित्र व शुभम देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 30 मार्च रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
कोणालाही केव्हाही रक्ताची गरज पडू शकते. रक्तदानाचे महत्त्वही सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे आयोजकांनी मोठ्या संख्येने बाजीप्रभू नगर मधील दै. जगमित्रच्या मुख्य कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान रक्तदान करावे. यावेळी सोशल डिस्टन्स पूर्णतः पाळला जाईल. इच्छित व्यक्तींनी भागवत गांगर्डे 8668287843, शुभम देशमुख 9657613333, रंगनाथ सावजी 9850944242क्रमांकावर संपर्क साधावा.
कोरोना च्या प्रभाव मुळे बॕंकेच्या वेळेतही बदल.
* सकाळी 7 ते सकाळी 9-30 पर्यंत चालणार व्यवहार.
परळी वैजनाथ ;- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी सारखे नियम लावली.अत्यावश्यक सेवा म्हणुन बॕकाही व्यवहारासाठी सुरु ठेवण्यात आल्या परंतु कुढलीही सोशल डिस्टंस्टिंग दिसुन आली नसल्याने जमावबंदीच्याच शिथील कार्यकाळात म्हणजे सकाळी 7 ते सकाळी 9-30 वाजताच बॕका व्यवाहारासाठी सुरु राहतीला अस जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हटले आहे.
covid-19 चा संसर्ग रोखण्यासाठी बॕकामध्ये होणारी गर्दी टाळण्या करिता ग्राहकांनी भारतीय स्टेट बॕकेने व महाराष्ट्र ग्रामीण बॕक या बॕंकांनी उपलब्ध करुन दिलेल्या ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा असे या पञकात नमुद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन .
*राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व
मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळणार-ना.छगन भुजबळ
*राज्यात आता शहरां सोबतच तालुका स्तरावरसुद्धा मिळणार
रोज १ लाख शिवभोजन थाळी;-ना.छगन भुजबळ
मुंबई,दि.२९ मार्च :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे.या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी,असंघटित कामगार,स्थलांतरित,बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात क्षेत्रात तातडीने शिवभोजन केंद्र सुरू होण्यासाठी नव्याने शिव भोजनालय सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहे.त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे,जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे,भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५ रुपयांत शिवभोजन मिळणार असल्याने राज्यातील गरजु,गोरगरीब,शेतकरी,कामगार व मजूर वर्गाला शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
*जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत २४*७ मदत कार्य*
कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे,बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मा.मंत्री कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मा.मंत्री महोदय यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मा.मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे.
श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव-९८७०३३६५६०
श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी-९७६६१५८१११
श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी-७५८८०५२००३
श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-७८७५२८०९६५
कोरोना विषाणुवर प्रतिबंधनासाठी शिल्लक असलेल्या वित्त आयोगाच्या निधीतून उपायोजना कराव्यात ;- भाजप नेते राजेश गित्ते.
*जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातील शिल्लक असलेला वित्त आयोगाच्या निधीतून उपायोजना करण्यासाठी खर्च करावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे बीड जिल्हा परिषदेचे जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्य तथा भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी 21 दिवस संपूर्ण देश आणि राज्य लाॅक डाऊन करण्यात आले आहेत करोना पासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न व विविध स्थरावर जाऊन तात्काळ. गतीने उपायोजना करीत आहे. कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतच्या खात्यात वित्त आयोग या शिर्षकाखाली निधी दिला जातो. हा निधी गाव अंतर्गत उपस्थितीत होणाऱ्या अडीअडचणी, समस्येवर. खर्च केला जातो. या वर्षीचा 2019-20 या चालू आर्थिक वर्षीतील शिल्लक असलेल्या निधी कोरोनाच्या उपाययोजनेसाठी व जनजागृती संबधीत गावात निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी व स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना खर्च. करण्यासाठी परवानगी देण्यात यावी तसेच 2020 व 21 चा 15 वित्त आयोग या वर्षीचा अँडव्हान्स निधी उपलब्ध करून घावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत. बीड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने तसेच जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या करण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून बीड जिल्हा परिषदेचा शिल्लक असलेला वित्त आयोगाचा निधीच्या माध्यमातून
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व याबाबत जनजागृती, स्वच्छता,औषध फवारणी इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना स्वच्छता मोहीम राबवून कोरोना गो करण्यासाठी तात्काळ निर्देश देऊन
परवानगी घ्यावी अशी मागणी राजेश गित्ते यांनी केले आहे. या मागणीच्या मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, खासदार बीड, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, जिल्हाधिकारी बीड राहुल रेखावार यांना ईमेल व्दारे प्रति पाठविण्यात आल्या आहेत.
रविवारचा लाॅक डाऊन शंभर टक्के यशस्वी. प्रशासनाने परळीकरांचे मानले आभार.
परळी वैजनाथ दि. 29
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रविवारी परळीत पुर्णतः लाॅक डाऊन पाळण्यात आले. नागरिकांनी या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल प्रशासनाने संपुर्ण परळीकरांचे आभार व्यक्त केले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्रात फक्त परळीतच हा यशस्वी सोशल डिस्टंस् उपक्रम राबविला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर सोशल डिस्टन्सिंग एवढाच प्रभावी उपचार असल्याने प्रशासनाने आज परळी शहरात संपुर्ण लाॅक डाऊनचे आवाहन केले होते. शहरात प्रशासनाच्या वतीने किराणा दुकानदार, भाजीपाला व फळ विक्रेते यांना आपले दुकान बंद करणे बाबत आवाहन केले होते. त्याला परळीकर जनतेने,किराणा दुकानदार,फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते यांनी 100%प्रतिसाद दिला. आज दिवसभर केवळ दवाखाना आणि मेडिकल चालू होते. विशेष म्हणजे रस्त्यावरही कुणी फिरताना दिसले नाहीत.
नागरीकांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने परळीकरांचे आभार मानले. असुन याची प्रसिद्धी देणाऱ्या सर्व वृतमान पञाचे पञकार विविध वाहिन्यांचे प्रतिनिधीनी यांचे हि विशेष आभार मानले आहेत. आगामी काळातही जनतेने असेच सहकार्य करून कोरोना विरूद्धाची लढाई तीव्र करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे ,न. प. मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे,आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे,पोनि.बाळासाहेब पवार,पोनि.हेमंत कदम,तलाठी गंगाधर राजुरे यांनी केले आहे.
*मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19**या नावाने स्वतंत्र बँक खाते*
या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
मुंबई दि. 28: कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.
*सढळ हाताने मदत करा*
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.
…
Saturday, March 28, 2020
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत खुली राहणार जिल्हाधिकारी राहुल रेखावार.
बीड दि. 28:- जीवनावश्यक वस्तूंची सर्व आस्थापना दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता सकाळी 7 ते 9:30 या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.
याचबरोबर जमावबंदीचा आदेश सकाळी 7 ते या 9:30 या कालावधीत लागू राहील व सदर वेळे व्यतिरिक्त जिल्ह्यात पूर्णवेळ संचारबंदी लागू राहील असे सूचित केले आहे.
कोरोना विषाणूचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) नुसार दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्याच्या नागरी ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमाव बंदी आदेश लागू आहे. परंतु जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यापूर्वीच्या सकाळी 11 ते दुपारी 3 यामध्ये बदल करून सकाळी7 ते 9:30 या वेळेत सुरू ठेवण्यास या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन अधिक काळजी घेत असुन रविवारी संपुर्ण लाॅक डाऊन राहणार आहे. दवाखाना आणि मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर गर्दी वाढत आहे. यामुळे उद्या रविवारची सार्वजनिक सुट्टी लक्षात घेऊन केवळ दवाखाना आणि मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी घरातच थांबुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या आवहानाला प्रतिसाद .राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच रक्तदान शिबीर.
परळी । प्रतिनिधी
दै.मराठवाडा साथी जनजागृती अभियान अंतर्गत राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने परळी उपजिल्हा रुग्णालय येथे लवकरच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि परळी उपजिल्हा रूग्णालय यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. परळी शहरातील ईच्छुक रक्तदात्यांनी नोंदणी करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 9422242433, 9607072505, 9850437354, 9850213019, 9405303333, 8888144677, 9421942192 या क्रमांकावर आपल्या नावाची नोंदणी करावी.
भीम जयंतीवर कोरोना चे सावट .जंयती घरी थांबूनच साजरी करा.
* केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे
आवाहन.
मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता यामहामारीविरुद्ध लढायची वेळ आहे. त्यामुळे या वर्षी भीम जयंती घरी थांबूनच साजरी करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जनतेला केले आहे.
यासंदर्भात बोलताना आठवले म्हणाले, दरवषी 14 एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. मात्र, यावषी कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच आपणदेखील आधी कोरोनाविरूद्धचा मुकाबला जिंकू व मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीम जयंती साजरी करूया. त्या आधी कोरोनाविरोधी लढा जिंकण्याचा संकल्प करू. तसेच सर्वांनी संयम ठेवावा आणि घरीच थांबावे, असे आवाहन आठवले यांनी या वेळी जनतेला केले आहे.आपणच आपले रक्षक तसेच आपणच आहोत आपले रक्षक, नका बनू स्वतःचे भक्षक, अशा काव्यंपक्तीतूनही आठवले यांनी जनतेला संदेश दिला.
गर्दी टाळण्यासाठी नगर परिषदे कडुन काटेकोर नियम .
*शहरात मार्किंग;सोशल डिस्टंट पाळा ;-मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे
परळी वै..[प्रतिनिधी].
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी किराणा, मेडिकल, फ्लावर मिल, भाजी विक्रीच्या ठिकाणी नगर पालिका व पोलिसांकडुन मार्किंग करुन देण्यात येत आहे.
परळी नगर पालिका मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडेसह कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,श्रावण घाटे,शंकर साळवे अदि न.पची टिम रस्त्यावर उतरले आणी त्यांनी बाजार पेठेतील भाजी विक्रेत्याना अंतर ठेऊन मार्किंग करुन दिली.तसेच ग्राहक व विक्रेते यांच्यातील अंतर असावे अशी माहिती दिली.दरम्यान कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर राज्यभरात संचारबंदी लागु करण्यात आली आहे.यामुळे जिवानावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.हि अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तसेच परळी नगर पालिकेने यावर उपाययोजना करत मार्किंग करण्यात आली.दरम्यान कोरोना आजार हा महाभयंकर आहे आणी तो संसर्ग आहे.सोशल डिस्टंट हा फार महत्त्वाचा आहे म्हणुन जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या सुचनांचे पालन प्रत्यक्षात आणण्यासाठी शहरातील चार भाग करुन भाजी विक्रेता फळ विक्रेत्यांना आखणी करुन देण्यात आली असुन किराणा व मेडिकल स्टोअर्स बाजारात ही किराणा पाच पाच फुटाच्या अंतराने आखणी करण्यात आली आहे तेव्हा ग्राहकांनी सोशल डिस्टंट ठेऊन खरेदी करणे अपेक्षित आहे.अत्यावश्यक खरेदीसाठी कुटुंबातील एकाच सदस्यांनी बाहेर पडावे आणी खरेदी झाली कि परत घरी जावे आणी स्वताची काळजी घ्यावी अस आवाहन परळी नगर परिषद करत आहे.
भारतीय वैज्ञानिकों को मिली बड़ी कामयाबी, पहली बार माइक्रोस्कोप में कैद हुई कोरोना वायरस की तस्वीर.
नई दिल्ली. ;-- दुनिया भर में कोरोना वायरस (Coronavirus) से कोहराम मचा है. हर दिन हजारों लोगों की मौत हो रही है. इस बीच भारत के वैज्ञानिकों (Indian Scientists) को बड़ी कामयाबी मिली है. वैज्ञानिकों ने पहली बार कोरोना वायरस की माइक्रोस्कोप (Microscope) से ली गई तस्वीर जारी की है. कहा जा रहा है कि इस तस्वीर से वैज्ञानिकों को आगे रिसर्च में फायदा मिलेगा. साथ ही उम्मीद जग गई है कि भारत में इसके इलाज के लिए वैक्सिन बनाने में भी कामयाबी मिल सकती है.
* ऐसे मिली तस्वीर *
भारत में कोरोना वायरस का पहला मामला 30 जनवरी को केरल से आया था. वैज्ञानिकों ने इस खतरनाक वायरस की चपेट में आने वाले देश के पहले शख्स के गले से कोरोना वायरस का सैंपल लिया था.
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (IJMR) के ताजा अंक में इसे विस्तार से प्रकाशित किया गया है.
दवाओं की खोज
कोरोना वायरस के उपचार की दवा विकसित करने के लिये भारत, विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) के साथ दुनिया के तमाम देशों की साझेदारी वाली परीक्षण प्रक्रिया में अपनी भागीदारी कर सकता है. भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आईसीएमआर) की महामारी एवं संक्रामक रोग इकाई के प्रमुख डा. रमन आर गंगाखेडकर ने शुक्रवार को कहा कि परीक्षण के बाद नयी दवाओं की खोज हो सकेगी.
* फ्रांस का दावा *
इस बीच फ्रांस ने दावा किया है कि उसने इस वायरस की नई दवा खोज ली है. शुरुआती परीक्षण में पता चला है कि इस दवा से 6 दिन के भीतर संक्रमण को गंभीर स्थिति में पहुंचने से रोका जा सकता है. फ्रांस के इंस्टीट्यूट हॉस्पिटलो यूनिवर्सिटी के संक्रमण बीमारियों के विशेषज्ञ रिसर्च प्रोफेसर डिडायर राओ ने दावा किया है कि उन्होंने नई दवा का सफल परीक्षण कर लिया है. उन्होंने दवा के ट्रायल्स का एक वीडियो भी शेयर किया है.
राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठाकरण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश.
मुंबई दि २७: कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले आहेत. केंद्राने नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या यंत्रणेतील रेशनवरील धान्य त्यांना तात्काळ मिळेल. त्यांची अजिबात उपासमार होणार नाही हे पाहण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते आज वर्षा येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद साधत होते. आज पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या
या व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधतांना ते म्हणाले कि, लॉकडाऊनमुळे आपल्याला अडकावे लागले आहे, हि परिस्थिती नाईलाजाने उदभवली आहे. आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा
*शिवभोजन उद्दिष्ट्य वाढवले*
या संकटात राज्यभरातून शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी, त्यांचे उद्दिष्ट्यही आम्ही १ लाख वाढवत आहोत . त्याचा लाभ घ्यावा मात्र त्यासाठी गर्दी करून आरोग्याला धोका होईल असे करू नका
रिटेल सप्लाय चेन आणि होम डिलिव्हरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही निर्देश दिले आहेत. पोलीस, महसूल, सहकार, पणन आणि कामगार विभाग याना यादृष्टीने सर्व सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा हा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून , टँकर्स, कंटेनर यामधून कोणत्याही परिस्थितीत लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यातून एखादा अपघात घडल्यास दुर्दैवी प्रसंग ओढवू शकतो
ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या असे साखर कारखान्यांना सांगितले आहे. हे कामगार आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवा
*दूध संकलन व्यवस्थित होईल*
ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होईल जेणे करून शेतकरी आणि ग्राहक या दोघांची कुचंबणा होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही दिले आहेत.
परराज्यातून आपल्या राज्यात मोठ्या संख्येने नागरिक अडकले आहेत, कुणी इथे काम करणारे कामगार आणि श्रमिक आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी प्रशासन घेईल. काही स्वयंसेवी संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र त्यांनी देखील गर्दी न करता व आपल्या मदतीचे योग्य नियोजन करून मदत कार्य करावे
*खासगी डॉकटर्सवर देखील मोठी जबाबदारी*
खासगी डॉकटर्सवर देखील मोठी जबाबदारी आहे. या लढाईत त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी आपले दवाखाने सुरु ठेवले पाहिजेत. त्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची जबादारी आमची आहे.
*रक्तदान शिबिरे घ्यावी*
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी मात्र अनावश्यक गर्दी होऊ देऊ नये असे मी आवाहन करतो.
कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार हि जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. पोलिसाना सहकार्य देखील आम्ही सूचना दिल्या आहेत
शिर्डी संस्थानाने ५१ कोटी रुपये सहायता निधीसाठी दिले आहेत, सिद्धी विनायकने देखील ५ कोटी देऊ केले आहेत अशी माहिती देताना ते म्हणाले कि वेळीच उपचार झाले तर कोरोना बरा होऊ शकतो. मात्र योग्य उपचार झाले पाहिजेत असेही ते म्हणाले
खा.शरद पवार साहेबाच्या सुचनेची ना. धनंजय मुंडेंकडून तात्काळ दखल .
*त्या’ वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला दिले आदेश.
परळी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या त्यांच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान हातावर पोट असलेल्या वर्गाला मदत केली पाहिजे अशी भूमिका मांडली. या सुचनेची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेतली आहे.
सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध घटकांचे या संकट काळात होत असलेले नुकसान टाळता यावे व त्यांना साहाय्य करता यावे याबाबत ना. मुंडेंनी सामाजिक न्याय विभागाकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर हातावर पोट असणारा, उदा – गटई कामगार, लघु उद्योजक असा आहे. विभागा अंतर्गत येणा-या महामंडळाकडून ज्या घटकांना मदत केली जाते ते, तसेच कर्ज दिले जाते ते लघु उद्योजक यांचे या संकट काळात मोठे नुकसान होणार आहे.
त्यामुळे या घटकांचे होणारे नुकसान टाळणे व त्यांना काय मदत करता येऊ शकते याबाबत अभ्यास करून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आजच ना. मुंडेंनी विभागाला दिले आहेत .
Friday, March 27, 2020
बीड जिल्ह्यात फक्त चार अंबुलन्स मध्ये व्हेंटिलेटर ची सोय .सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मतदार संघात मात्र एकही नाही आरोग्य विभागाचे वास्तव .
*30 लाख च्या आसपास लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याची दयनिय अवस्था ?
बीड:-सध्या कोरोना व्हायरस या विषाणूने जगात थैमान घातले आहे.आणि भारतातील राज्याच्या तुलनेत महराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना बाधीत अढळले आहेत, या धर्तीवर आरोग्य विभागाच्या वतीने चोख खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्येक दवाखान्यात एक रूम अश्या बाधितांसाठी ठेवण्यात आली आहे असे ही सांगण्यात आले आहे.
मात्र बीड जिल्ह्यात या साठी कोणत्या कोणत्या खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत याचा आढावा जेव्हा घेईला गेला, तेव्हा एक भयानक वास्तव समोर आले ते म्हणजे सरकारी दवाखान्यात अत्यावश्यक सेवेसाठी असते ती म्हणजे आंबूलन्स.
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुग्णांना रेफर करण्यासाठी तसेच तातडीने रुग्णांचा जीव वाचवण्यासाथी या रुग्ण वाहिकांचा उपयोग केला जातो. मात्र बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सुविधांनी सज्ज अश्या रुग्ण वाहिकां ह्या फक्त 4 असून या वर जिल्ह्यातील जवळपास 30लाख लोकांच्या आरोग्याची जीमेदरी या 4 अंबुलन्स वर येऊन ठेपली आहे.
याबाबत जिह्याचे शल्य चिकिषचक यांच्याशी महियी घेतली असता ते म्हणाले की, बीड जिह्याच्या जिल्हा रुग्णालयात दोन अंबुलन्स ला व्हेंटिलेटर ची सुविधा आहे तसेच अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एक अंबुलन्स आहे तर नेकनूर येथील रुग्णालयात एक अंबुलन्स अश्या एकूण चारच व्हेंटिलेटर ची सुविधा असणाऱ्या रुग्ण वाहिक सध्या बीड जिल्ह्यात असून या चार रुग्ण वाहिकांच्या मदतीने रुग्णांना रेफर करण्यात येते.
सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात अशी आरोग्याची अतिदक्षता घेलती जात असेल तर, मग कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास कसे होईल हा एक गंभीर प्रश्न सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
यामुळे खबरदार कोणी घराच्या बाहेर पाडलं तर….आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ही आहे उपाय योजना?
परळीतील १६ निराधारांना धनंजय मुंडेंनी दिला आधार; घाटनांदूर येथील वृद्धाश्रमात केली रवानगी.
परळी (दि.२७) ---- : परळी येथील वैद्यनाथ देवस्थान परिसरात अनेक वयोवृद्ध, बेवारस निराधार लोक राहतात. सर्वत्र सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अशा लोकांवर उपासमारीची वेळ आली असताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्फत अशा १६ निराधारांना आसरा मिळवून दिला आहे.
वैद्यनाथ मंदिर परिसरात भिक्षुक, बेवारस निराधार यांची मोठी संख्या असते, त्यातील १६ वृद्ध लोक आणखी तिथेच होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी व त्यांची टीम या लोकांना वृद्धाश्रमात नेण्यासाठी तिथे गेले असता सुरुवातीला ते लोक आश्रमात जायला तयार नव्हते.
डॉ. मडावी यांनी याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधल्यानंतर श्री. मुंडे यांनी त्या लोकांशी चर्चा करून त्यांना निवारा, जेवणाची व आरोग्यविषयक सोय करण्याबाबत आश्वस्त करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. या सर्व १६ लोकांना आता घाटनांदूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या वृद्धाश्रमात नेण्यात आले आहे.
दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेऊन जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत. समाज कल्याण विभागाचे अधिकारी व त्यांची टीम बेवारस, निराधार, भिक्षुक, मानसिक रुग्ण अशा लोकांना निवारा, जेवण व आरोग्यविषयक सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
परळी पिंपळा अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग 548 ब च्या कामाची वर्क ऑर्डर मिळाली नाही ;- वसंतराव मुंडे
परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे कामे चालू असून त्यामध्ये बीड जिल्ह्यात अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग परळी वैजनाथ पिंपळा अंबाजोगाई रस्त्याचे काम न झाल्यामुळे सर्व जनतेला येण्याचा व जाण्याचा खूप मोठा त्रास झाला रस्ता दोन्ही बाजूने खोदून टाकला होता मुदतीच्या आत काम न झाल्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारकडे चौकशी करण्यासंदर्भात तक्रार दाखल शासनाकडे काँग्रेसचे नेते चेअरमन वसंत मुंडे श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केलेली आहे त्यामुळे जुने गुत्तेदार व त्यांनी केलेली कामे त्यांना दिलेली बिले आणि अंदाजपत्रकाच्या नियमाप्रमाणे काम न करताही 35 कोटीची बिले अदा केलेली आहेत त्यामुळे दोन्ही स्तरावरची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय केंद्र सरकारकडून वर्क ऑर्डर देण्यात आलेले नाही अनेक जुन्या कामासंदर्भात गुत्तेदार व टेंडर च्या कामाबाबत चुका निदर्शनास आलेल्या आहेत करिता परळी अंबाजोगाई पिंपळा काम होते का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे असे काँग्रेस नेते वसंत मुंडे म्हणाले केंद्र व राज्य सरकार कडे निवेदन देऊन कामाची गुणवत्ता व भ्रष्टाचारासंदर्भात गोष्टी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे टेंडर रद्द झाले व नव्याने टेंडर ओपन झाले त्यामध्ये औरंगाबादचे कंपनी AGC R SBIPL JV सुटले आहे ज्या अधिकाऱ्यांनी बोगस कामास व कामाला मुदतवाढ देण्यात आली त्यात कनिष्ठ अभियंता उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता जबाबदार आहेत करिता विशेष दक्षता पथक नेमण्यात संदर्भात शासनाकडे हालचाली वसंत मुंडे यांच्या तक्रारी अर्जावरून चालू आहेत तात्काळ चौकशी पथक दिनांक 2/1/2020ला स्थापन झाले असून चौकशी करून निलंबित करण्या संदर्भात व यांच्यावर एफ आय आर करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे यांनी शासनाकडे मागणी केली असून त्यांची नोंद घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत अनेक अपघात झाली पावसा मध्ये गाड्या स्लिप झाल्या येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला रस्ता खराब असल्यामुळे पाठीच्या कण्याचे आजार झाले तसेच धुळीमुळे दम्यासारखे रोग झाले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली त्यामध्ये परळी पिंपळा आंबेजोगाई राष्ट्रीय महामार्ग गेल्या तीन वर्षापासून का विलंब झाला आहे त्यासंदर्भात अहवाल राज्य सरकार कडून केंद्र सरकारने मागवलेले आहे परत दिनांक 28 /1 /2020 ला काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी नितीन गडकरी परिवहन मंत्री यांच्याकडे दिल्ली येथे निवेदनाद्वारे तक्रार परळी अंबाजोगाई रस्त्या संदर्भात पुराव्या सहित तक्रार दाखल केली आहे वसंत मुंडे यांच्या तक्रारीवरून संबंधित अधिकारी व गुत्तेदार यास जबाबदार धरले आहे करिता नवीन कामाची आजतागायत वर्क ऑर्डर देण्यात आली नाही कारण जुन्या कामां मध्ये अनेक नियमाचे उल्लंघन झालेले आहे त्यामुळे 3 महिने झाले तरीही नवीन कामा सुरूवात झालेले नाही जोपर्यंत सम्पूर्ण कामाच्या गुणवत्ते संदर्भात परिवहन विभागामार्फत चौकशी केली जात नाही तोपर्यंत वर्क ऑर्डर देण्यात येते का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे कामास विलंब लागण्याची शक्यता आहे अशी माहिती वसंत मुंडे काँग्रेस चे नेते यांनी दिली आहे. जुने काम कोणत्या दर्जाचे झाले आहे राष्ट्रीय महामार्गाचे सर्व नियमाचे उल्लंघन झाले यास कोण जबाबदार अधिकारी का गुत्तेदार आहे या सर्व बाबी तपासूनच पुढील कारवाई करण्याचे आदेश भारत सरकार कडून राष्ट्रीय महामार्ग संदर्भात देण्याची शक्यता आहे असे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी माहिती दिली आहे
Thursday, March 26, 2020
हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना 'नाथ प्रतिष्ठान'चा मदतीचा हात.
*परळीत ५००० गरजूंना किराणा सामानाचे वाटप.
परळी (दि.२६) ---- : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम - हॉटेलात काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या 'नाथ प्रतिष्ठान'च्या वतीने अशा ५००० गरजूंना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप करण्यात येत आहे.
अशा गरजू लोकांची परळी शहराच्या विविध भागातून एक यादी बनवण्यात आली असून, कोणालाही यासाठी घराबाहेर जावे लागणार नसून, शासकीय नियमांचे पालन करीत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना घरपोच हे शिधा सामान दिले जात आहे. आज व उद्या हे वाटप केले जाणार असून आणखी कोणी गरजू असल्यास त्यांनी आपापल्या प्रभागातील नगरसेवक किंवा नाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क करावा, कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन नाथ प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड , सचिव नितीन कुलकर्णी यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु ज्या गरीबांचे निव्वळ हातावर पोट आहे, अशा लोकांवर या काळात उपासमारीची वेळ येऊ शकते, यामुळे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीतील अशा ५००० लोकांची यादी करून त्यांना श्री. मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.
यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चटणी, हळद असे साधारण २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप केले जात आहे.
रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्व पात्र ७१८८ लाभार्थ्यांचे घरकुल प्रस्ताव मंजूर!
येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही - धनंजय मुंडे
परळी (दि.२६) ---- : रमाई घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातून प्राप्त ७९०० प्रस्तावांपैकी पात्र लाभार्थी असलेल्या ७१८८ प्रस्तावांना आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंजुरी दिली आहे.
बीड जिल्ह्याचे वार्षिक उद्दिष्ट ४००० असताना जवळपास दुप्पट प्रस्तावांना श्री. मुंडे यांनी मंजुरी दिली आहे.
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी याबाबत सांगितले की, जिल्ह्यातुन ३१ मार्च पूर्वी साठी ७९०० प्रस्ताव घरकुल मंजुरीसाठी प्राप्त झाले होते. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास १ लाख २० हजार रुपये घर बांधण्यासाठी व १२ हजार शौचालयासाठी असे एकूण १ लाख ३२ हजार रुपये देण्यात येतात.
बीड जिल्ह्याचे ३१ मार्च २०२० अखेरचे ४००० एवढे उद्दिष्ट होते, मात्र ७९०० प्रस्ताव विभागास प्राप्त झाले होते. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्याकडे परळी येथील निवासस्थानी ही फाईल घेऊन घेल्यानंतर 'सोशल डिस्टन्स' पाळत त्यांनी ७९०० पैकी पात्र असलेले ७१८८ प्रस्ताव मंजूर केले, बीड जिल्ह्याला यावर्षी चार हजार घरांचे उद्दिष्ट असले तरी सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असल्यामुळे स्वतःच्या अधिकाराचा गरजूंसाठी वापर करत त्यांनी सर्व घरकुलांना मंजुरी दिली.
त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षात बीड जिल्ह्यात सर्व लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकूल मंजूर करण्यात यावेत, पुढील दोन वर्षात जिल्ह्यात एकही पात्र लाभार्थी शिल्लक राहू नये असे निर्देश ना. मुंडे यांनी समाज कल्याण विभागाला दिले असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. मडावी यांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने पत्रकारांन सोबत सहकार्याची भावना ठेवावी .सौ.वर्षा मगर
पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल अशी माहीती .माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर.यांनी दिली .असे असताना व प्रशासनाने पत्रकार .डाॕक्टर अति आवश्यक सेवा म्हणून सुट दिली असताना ही महाराष्ट्रात व देशात पत्रकाराला पोलीसाकडुन ड्युटी च्या नावाखाली कुठालीही खाञी करून न घेता त्यांना मारहाण करत आसल्याचे चित्र दिसुन येत आहे .कोरोना सारख्या महामारी विषाणूनी आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात आणी राज्यात कोरोना रूणांची काय परिस्थिती आहे .ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली त्याचे पालान करून प्रशासनाने पत्रकारांना सहकार्य करावे असे आवाहान .कांतीकारी साथी च्या संपादक सौ .वर्षा हनुमंत मगर यांनी केले आहे.
नागरिकांनी पोलीस, डॉक्टर,प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे:- कैलास नाईकवाडे
*कोरोना महामारीला सहज घेऊ नका, गांभीर्य ओळखा .
परळी वै(प्रतिनिधी) कोरोना महामारी हि जागतिक महामारी म्हणून समोर आली आहे. जगात नावाजलेल्या चीन,इटली,जर्मनी,अमेरिका या देशाची कोरोना व्हायरस मुळे दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने आव्हान करूनही नागरिक गांभीर्याने विचार करत नाहीत.आज एक दिवसीय बंद म्हणजे अब्जावधी रुपयाचे नुकसान परंतु नागरिकांच्या आरोग्याचा पुढे काहीही मोठे नाही म्हणून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. आपल्या कुटुंबाला सोडून रात्रंदिवस नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचारी,डॉक्टर, नर्स,आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी, ग्रामसेवक,तलाठी,महावितरण कर्मचारी,पाणीपुरवठा कर्मचारी,महसूल कर्मचारी हे आपले घरदार सोडून नागरिकांच्या आरोग्य ची सुरक्षितता राहावी म्हणून रात्रंदिवस कार्य करतात या सर्व पोलीस, आरोग्य,महावितरण,पाणीपुरवठा इतर सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे तसेच महामारीत स्वार्थी व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी करून नफेखोरी करू नये या महामारीच्या विरोधी लढाई आपण सर्व नागरिकांनी एक जुटीने शासकीय, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मदत ,सहकार्य करावे असे आव्हान शिवसंग्रामचे शहर अध्यक्ष कैलास नाईकवाडे यांच्या वतीने करण्यात आले .
पत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल ;-…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर.
कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात कोरोना रूणांची काय परिस्थिती आहे .ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली .
Wednesday, March 25, 2020
पेट्रोलींग करणाऱ्या पोलिसांवर सिरसाळा येथे हल्ला दोन पोलिस जखमी 10 जणांच्या विरोधा गुन्हा.
परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)
कोरोना आजार पसरू नये यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. देशात आणि राज्यात संपूर्णत: संचारबंदी करण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आलेला आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरच तालुक्यातील सिरसाळा येथे काही जणांनी हल्ला केल्याची घटना बुधवार, दि.२५ मार्च रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, 10 आरोपींच्या विरोधात सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सिरसाळा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे पालन होते आह की नाही? यासाठी पोलिसांकडून पेट्रोलींग करण्यात येत आहे. मोटारसायकलवरून पेट्रोलींग करणाऱ्या दोन पोलिसांवर बुधवारी हल्ला करण्यात आला. पोलिस नाईक किशोर कचरू घटमल (वय३३) वर्षे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांत आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार किशोर घटमल व पोलिस नाईक जेटेवाड हे दुपारी ४ च्या सुमारास गावातील वडार गल्ली येथे पेट्रालींगसाठी गेले होते. त्या ठिकाणी काही महिला व पुरूष एका ठिकाणी जमले असल्याचे पाहून त्यांना समज देण्यासाठी तेथे गेले व त्यांना संचारबंदी असल्याचे सांगितले. मात्र जमावातील लोकांनी आमच्या गल्लीत येवून सांगण्याचा तुमचा संबंध काय? असे म्हणत लाकूड व दगड विटांनी त्यांना मारहाण केली. ज्यामध्ये आरोपी राम तुकाराम पवार, श्रीराम बाबु पवार व त्याची तीन मुलं, दत्ता हरिश्चंद्र देवकर, अशोक तुकाराम पवार, विकास अर्जुन मिटकर, विलास अर्जुन मिटकर, सोनाली भ्र.राम पवार, अनिल जाधव, राम तुकाराम पवार व त्यांची पत्नी यांनी हल्ला चढवला. या घटनेत पोलिस नाईक किशोर घटमल व जेटेवाड हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस निरिक्षक श्रीकांत डोंगरे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस कर्मचाऱ्यां वर हल्ला करणाऱ्या ९ आरोपींच्या विरोधात भादंवीचे कलम 353, 332, 336, 143, 147, 149, 323, 504, 506, 188 सह कलम 51 (बी) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहीती मिळताच पो.नि.श्रीकांत डोंगरे पाटील, सहा.पो.नि.विघ्ने, पोलिस कर्मचारी परतवाड, कनकावार, यरडलावार, जाधव, गायकवाड यांनी घटनास्थळावर जावून जमावाची पांगवापांगव केली.
संचार बंदी च्या काळात बेघर लोकांना दिलासा. एक दिलासा फाउंडेशन चे मोफत अन्नछत्र.
परळी वैजनाथ :- सध्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव कमी करण्या साठी आज पासून 21 दिवस लॉक डाऊन सुरू केले आहे.अश्या परिस्थि तीत तमाम जनतेने आपल्या घरांची दारे ही बंद केली आहे अश्यात ज्यांना घरे नाहीत त्यांच्या साठी मंदिराच्या पायऱ्याच सहारा असतात मात्रअध्या देऊळ बंद असल्यामुळे या बेसहारा लोकांना जगण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आणि अश्या बिकट परिस्थितीत एक दिलासा फाउंडेशन च्या वतीने या बेसहारा लोकांचा सहारा बनून समोर आले आणि या लोकांना आज पासून 21 दिवस दोन वेळचे जेवण मोफत दिले जानार आहे.
एक दिलासा फाउंडे शनच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.असे म्हणले तरी काही वावगे ठरणार नाही.
या कार्याची प्रेरणा घेऊन ज्या ज्या ठिकाणी अश्या बेसहारा लोकांना अनछत्र पुरवले तर कोरोनाला हद्दपार करीत आपण या ही लोकांचे प्राण निश्चित वाचवू शकू.आशा उद्देशाने अनेक सेवा भावी संस्थाने समोर येण्याची गरज आहे.
परळी येथील विजनिर्मिती संच तीन चार पाच मधील ट्रान्सफार्मरला आग.
परळी वैजनाथ;-
परळी येथील विजनिर्मिती संच क्रमांक तीन चार आणी पाच असलेल्या परिसरातील ट्रांस फार्मरला अचानक आग लागली असुन या आगीने परिसरात मोठी घबराहट निर्माण झाली आहे अद्याप ही आग अटोक्यात आली नसल्याचे सुञांनी सांगितले आहे,
दरम्यान परळी नगर परिषद व स्वतः विज निर्मिती केंद्राकडे असेलेले अग्निशामक बंब आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे हि आग जर लवकर अटोक्यात नाही आली तर मोठा अनर्थ घडु शकतो .
Tuesday, March 24, 2020
हवामान खात्याने वर्तविला होता अंदाज बीड मध्ये बरसला पाऊस .
बीड-हवामान खात्याने राज्यात मंगळवारपासून वादळी पाऊसाचा दिलेला इशारा खरा ठरला आहे. बीडमध्ये सायंकाळी 5 च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. भर उन्हाळ्यात यंदा वरुणराज्याने दुसऱ्यांदा हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने मंगळवारी बीड, नांदेड, लातूर आणि पुणे विभागातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार हा अंदाज खरा ठरला असून 29 तारखेपर्यंत मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रत्येकानी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
बीड जिल्हा पोलीस आपात्कालीन परवानगी कक्ष सोय ;- हर्ष पोद्दार साहेब
बीड जिल्ह्यातील कोणताही नागरिक ज्याला -वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन परिस्थितीमुळे कर्फ्यू दरम्यान बाहेर येणे आवश्यक आहे
-आपत्कालीन कारणांमुळे जिल्ह्याच्या हद्दीत जाण्याची परवानगी हवी असेल
- बीड जिल्ह्यातील रहीवासी ज्याला बाहेरुन बीड जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल
तर खालील क्रमांकावर कधीही संपर्क साधू शकताः
एपीआय खटकळ- +919921070690
जर कारण अपरीहार्य असेल तर आपल्याला स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअॅपवर पाठविला जाईल.आपणास थांबवलेल्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यास ते दाखवू शकता. जर आपणास याऊपरही थांबवले तर आपण पुन्हा वरील नंबरवर कॉल करू शकता.
कोरोनाचा संशयित समजून रोखला 6 वर्षीय मुलाचा अंत्यसंस्कार.
किल्लेधारूर-तालुक्यातील कासारी येथे एका सहा वर्षीय मुलाचे अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी कोरोना संशयित समजून रोखल्याची घटना घडली असुन आरोग्य प्रशासनाने याबाबत ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर सदरील मुलावर अंत्यविधी करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कासारी येथील बालक मनोहर भुजंगराव चोपडे (६) याचे हृदयविकाराच्या निदानासाठी मुंबई येथील जेजे रुग्णालयात एक महिन्यापासुन उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल दि.२३ रोजी निधन झाले. निधनानंतर त्याच्यावर कासारी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांत कोरोनाच्या भितीने अस्वस्थता पसरली. ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध दर्शवला. याबाबत तेथील ग्रामसेविका अनुचंदना थोरात यांनी प्रशासनास याबाबतीत माहिती दिली. आरोग्य विभागा तर्फे भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मारुती लगड यांनी कासारी येथे जावून ग्रामस्थांची समजूत काढली. यानंतर मयत मुलावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
परळीत संचारबंदी शिथील झाल्या नंतर लोकांची खरेदीसाठी गर्दी.
परळी / बीड:-( प्रतिनीधी )
परळी तालुक्यात 11 ते 3 च्या वेळेत किराणा दुकाने भाजी मार्केट, फ्रुट मार्केट या ठिकाणी मात्र लोकांनी खरेदि साठी मार्केट मध्ये बऱ्या पैकी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले आहे.
जिल्हाधीकारी राहुल रेखावर याच्या आदेशा नुसार लोकांनी बाहेर निघायचे आहे पण अंतराने खरेदी करण्यास सांगितले आहे त्याच प्रमाणे जे ही विक्रेते आहेत त्यांनी चार फुटाचे अंतर ठेवून विक्रीस बसायचे आहे मात्र तसे न करता जवळ जवळ बसून तसेच लोकांनी खरेदी केल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.
कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (सोसिएल डिसटंस) एकमेका पासून दूर अंतर ठेवणे गरजेचे आहे. मात्र जर का लोक खरेदी साठी अशीच गर्दी करीत राहिले तर जो शासनाचा उदेश आहे तो पूर्ण होणार नाही, आणि या साथीची लागण झाल्या शिवाय राहणार नाही! करीत जनतेने आणि आणि प्रशासनाने याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पहावयास मिळत आहे.
कोरोना बाधित रुग्णांसाठी पत्रकार संघाची रुग्णवाहिकाजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द.
बीड (प्रतिनिधी) जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.बीड जिल्ह्यात परदेशातून व इतर जिल्ह्यातून आप - आपल्या गावात शेकडो प्रवासी आलेले आहेत.भविष्यात कोरोना व्हायरस संशयित रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन सर्व उपाय करत आहे. भविष्यात कोरोना बाधित रूण्ण वाढले तर प्रशासनाच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची रूण्णवाहीका जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे विनामूल्य 24 तास सेवेसाठी सुपूर्द करण्यात आली. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या सुचनेनुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी आणि जिल्हा संघटक अमजद खान यांनी रुग्णवाहिकेची चावी दिली.
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवार दिनांक 23 मार्च रोजी दुपारी पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरस संदर्भात माहिती दिली. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार असून कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी चार दिवसांपूर्वीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोरोना आपत्तीत स्थानिक पातळीवर प्रशासनाला मदत आणि पत्रकारांना मास्क,इतर साहित्य लोकसहभागातून द्यावेत अशा सुचना दिलेल्या होत्या.त्यानुसार बीड जिल्हा शाखेने रूण्णवाहीका देण्याचा निर्णय घेतला.प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सेवेत कोरोना बाधित संशयित रुग्णांना ने - आण करण्यासाठी विनामूल्य 24 तास रुग्णवाहिका सेवार्थ हेतूने प्रशासनाकडे सुपूर्द केली. रुग्णसेवक पत्रकार अमजद खान यांच्या पुढाकारातून जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या आवाहनानंतर रुग्णवाहिके वरील चालक शेख शाहेद यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित संशयित रुग्णांना ने - आण करण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सोमवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता रुग्णवाहिकेची चावी उपस्थित सर्व मान्यवर यांच्या समक्ष सुपूर्द केली. यावेळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, माहिती अधिकारी किरण वाघ, माहिती कार्यालयाचे ना.गो. पुटेवाढ, पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेख आयूब्ब, पत्रकार संदीप बेदरे, संपादक प्रशांत सुलाखे, संपादक किसन माने, पत्रकार आत्माराम वाव्हळ, संपादक अभिमन्यू घरत, संपादक जुबेर फारुकी, संजय कुलकर्णी आदीची प्रमुख उपस्थिती होती. . *विनामूल्य रुग्णवाहिका सेवेत हजर......* कोरोना संशयित बाधित रुग्णांना उपचारार्थ रूग्णालयात जाण्यासाठी आणि रुग्णालयातून घरी जाण्यासाठी विना मूल्य रुग्णवाहिका हवी असल्यास संबंधितांनी तात्काळ पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी 98 22 62 85 21, रुग्णसेवक तथा पत्रकार संघाचे जिल्हा संघटक अमजद खान 97 67 89 87 92 किंवा रुग्णवाहिका चालक शेख शाहेद मोबाईल क्रमांक 95 45 40 42 94 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,जिल्हा शाखा बीड च्या वतीने करण्यात आले आहे.
*अमृत पिल्यासारखे वागू नका!**बाजीराव धर्माधिकारी यांच्या लेखणीतून..!*
मी डॉक्टर नाही,किंवा व्हायरॉलॉजी तज्ज्ञ नाही ; परंतु सार्वजनिक जीवनात वावरणारा एक जबाबदार व संवेदनशील नागरिक म्हणून आणि स्वामी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी कळवावे,शहाणे करुन सोडावे सकळजणा" या उक्तीप्रमाणे थोडा शब्दप्रपंच करीत आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्व भारतीयांना काल 22 मार्च रोजी संपूर्ण भारतभर जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.त्याचबरोबर ठीक 5 वाजता आपाल्या बाल्कनी,गॅलरी, छतावर येवून आरोग्य प्रशासन,पोलीस प्रशासन,पालिका कर्मचारी यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून टाळ्या वाजवा,थाळ्या वाजवा तसेच घंटानाद करा म्हणून सुचित केले होते.सकाळी 6 पासून दुपारी 5 वाजेपर्यंत संपूर्ण भारतात अगदी अलबेल चालले होते.सगळे रस्ते, सार्वजनिक ठिकाणे निर्मनुष्य झाले होते,जगाला हेवा वाटावा इतके एकीचे व संयमाचे दर्शन भारतीयांनी दर्शविले.मात्र 5 वाजता जे चित्र आपण पाहिले,जे Video समोर आले ते अतिशय क्लेशदायक होते.सर्वांची 'सोशल डिस्टन्सिंग ' अपेक्षित असताना एखादी लढाई आपण जिंकल्याच्या आविर्भावात बहुतांशजण वागत होते . ठिकाणी ठिकाणी जुलूस निघाले,मिरवणुका निघाल्या, अतिउत्साह होता,जोश होता हा निर्बुद्धपणा दाखविण्याची खरंच गरज होती का? या घटनांचा निष्कर्ष असा काढला गेला पाहिजे की आपण भारतीय अजून या काळातसुद्धा गंभीर नाहीत.
*गंभीरतेने घ्या..काळजीने वागा*
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केलेले आहे.जागतिक संघटना जेव्हा अशी घोषणा करते तेव्हा आपण काळाची पावले ओळखली पाहिजेत.भारतात कोरोना विषाणू चा संक्रमण काळ हा स्टेज- 2 मध्ये आहे,सर्वप्रथम केसेस होणे रुग्ण सापडणे ही स्टेज 1 त्यानंतर क्लस्टर्स ही स्टेज - 2. ज्या मध्ये संक्रमित झालेले रुग्ण आपल्या परिवारात,आपल्या मित्र,स्नेहीजनांना संक्रमित करतात;आणि यातील स्टेज -3 कम्युनिटी जी की अत्यंत भयावह आहे.आपण सध्या इटली, जर्मनी , स्पेन , फ्रान्स ,चीन या देशात ही स्टेज बघत आहोत .या स्टेजमध्ये सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर संसर्ग प्रस्थापित झालेला असतो आणि ती परिस्थिती कुठल्याही वैद्यकीयदृष्ट्या समृद्ध देशालाही आटोक्यात आणणे कठीण जाते आणि मनुष्य म्हणून आपण हतबल होतो. इटली , जर्मनीमध्ये याचे सध्या प्रत्यंतर येत आहे .सुदैवाने आपण स्टेज -2 मध्येच आहोत ; आणि खरा परीक्षेचा काळ हाच आहे.प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे आणि स्वतःला होम आयसोलेटेड करणे हाच रामबाण उपाय आहे.सुपरहीरो होऊन रस्त्यावर काय घडत आहे हे बघू नका. कारण तुम्ही बाहेर गेल्यावरच संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. नव्हे , तर केवळ आणि केवळ कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळेच तो होतो .त्यामुळे घरी राहणे हीच खरी प्रशासनाला मदत आहे. आपणच आपले रक्षक आहोत .
इटली या देशाची लोकसंख्या 6 कोटी असून महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे.आरोग्य सेवेत इटली जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.भारताची लोकसंख्या 130 कोटी आणि इटली ची 6 कोटी तरीही भारताकडे जेवढा पैसा आहे त्याच्या 70% इटली कडे आहे.मग विचार करा जर भारतात या महामारी ने स्टेज- 3 गाठली तर काय हाहाकार माजेल? आज इटली मध्ये आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत,थर्मोस्कॅनर उपलब्ध नाहीत. हजारो लोक मृत्यमुखी पडत आहेत.कोरोनाबाधीत वृद्ध असेल,तरूण असेल, बालक आले तर तिथल्या आरोग्य प्रशासनास ठरवून कुणाला वाचवायचे हा निर्णय घ्यावा लागत आहे.ही परिस्थिती झाली निष्काळजीपणामुळे ! म्हणून आपण अतिशय गंभीरपणे या संकटाशी सामना केला पाहिजे.स्टेज 2 मधून स्टेज 3 मध्ये या संक्रमणाला येवू न देणे आणि इथेच हे संक्रमण संपविणे हे मोठे आव्हान आहे ; आणि ते आपण पेलू शकतो . म्हणून खरी गरज आहे प्रशासनास सहकार्य करण्याची !
*कोण आहे कोरोना व्हायरस?*
कोरोना हा विषाणू नवीन नाही ; पण जनुकीय रचना बदललेल्या COVID 19 या कोरोना परिवारातीलच विषाणूचे गुणधर्म हे खूप विलक्षण आहेत.यापूर्वी सार्स,मर्स हे विषाणू याच जनुकीय रचनेतले पण COVID 19 हा विषाणू आकाराने 400 मायक्रॉन इतका विशाल आकाराचा दिसायला CROWN म्हणजे मुकुटासारखा म्हणून कोरोना हे नाव तज्ज्ञांनी दिले.हा विषाणू मानवी शरीरात सहज प्रवेश करतो,आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीदेखील ओळखू शकत नाही की हा विषाणू आहे म्हणून आणि आपले शरीर सहज या विषाणू चा स्वीकार करते ;आणि पुढे तासाभरातच मानवी शरीराच्या मदतीने यांची संख्या कोट्यवधी होते ; आणि मानवी शरीर बिमार पडते. हा व्हायरस दुसरे शरीर शोधतो.कोरोनाबाधित रुग्णाच्या थुंकीमधून,खोकल्याच्या ड्रॉपलेट मधून,स्पर्शातून,तसेच ज्या पृष्ठभागावर हा व्हायरस चिटकला आहे म्हणजे Attach झाला आहे जसे की दरवाजाचे हँडल,पायऱ्यांच्या रेलिंग आणि थर्मोस्टॅट गुणधर्माच्या वस्तू जसे की वर्तमानपत्र,पुस्तके ,दुधाच्या पिशव्या,किराणाच्या पिशव्या कपडे यासह अनेक गोष्टींना हे विषाणू सहज चिटकून राहून जिवंत राहू शकतात.जगात अनेक विषाणू आहेत जसे की स्वाईन फ्लू,इबोला,सार्स,मर्स जरी यावरील विषाणू ने बाधित झालेल्या रुग्णांचा मृत्यदर हा जास्त आहे ; पण या विषाणूंचा संसर्गदर हा कमी आहे. या उलट COVID 19 या विषाणू बाधीत रुग्णांचा मृत्युदर हा कमी आहे पण संसर्गदर कित्येक पटीत आहे आणि हाच मुख्यत्वे काळजीचा विषय आहे.तरुणांना आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक असणाऱ्या बाधित व्यक्तीला नक्कीच धोका नाही ; परंतु दमा,मधुमेह,अस्थमा, हृदय रोगी,वृद्ध,बालके यांना अधिक धोका आहे ; आणि बाधित तरुणांपासून संसर्ग होवू शकतो.याचा संसर्गदर इतका आहे की जगाच्या इतिहासात आणि दुसऱ्या महायुद्धातदेखील जितकी मनुष्यहानी झाली नाही ती या संसर्गजन्य रोगामुळे जगात होत आहे.यापूर्वी प्लेगसारख्या अनेक महामाऱ्या आल्या ; पण तत्कालिन लोकसंख्या तत्कालीन सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी पाहिल्या तर ते विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित राहिल्या.आज जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे ; आणि 'सोशल डिस्टन्सिंग ' ची अंमलबजावणी करणे खूप कठीण होत चालले आहे .म्हणून जगाच्या पातळीवर आणि मानवी जीवनासमोर हे कोरोनारूपी महाकाय संकट उभे राहिले आहे.
*काय उपलब्ध आहेत आरोग्य सेवा?*
टाईम्स ऑफ इंडिया अग्रगण्य वृत्तपत्राने काल करोनासारख्या विषाणूचे आरोग्य संकट असताना नेमक्या भारतात आरोग्य सेवांची काय स्थिती आहे याविषयी एक शोधवार्ता प्रकाशित केली त्यात अशी बाब पुढे आली की भारतातील प्रत्येक 84000 व्यक्तींमागे एक आयसोलेटेड बेड,प्रत्येक 26000 व्यक्तींमागे एक क्वारंटाईन बेड,प्रत्येक 11400 नागरिकांमागे एक डॉक्टर,देशात एकूण 11लाख 54000 अल्युपॅथी चे डॉक्टर त्यातील 5 लक्ष फक्त सरकारी सेवेत आणी लोकसंख्या 135 कोटी.सरकारी इस्पितळात देशात एकूण फक्त 137000 हॉस्पिटल बेड रेल्वे स्थानके,तसेच विविध पब्लिक ट्रान्सपोर्ट ठिकाणी टचलेस इन्फ्रारेड थर्मोस्कॅनर चा प्रचंड मोठा तुटवडा.ईतकी भीषण परिस्थिती समोर आलेली आहे.
*काय काळजी घ्यावी लागेल?*
जगात पहिली कोरोनाची केस ही डिसेंबर मध्ये चीनमधील'वूहान ' या शहरात सापडली. आणि आज लाखो रुग्ण बाधित आहेत.WHO ने ,प्रशासनाने आपल्याला वेळोवेळी अनेक संदेशात्मक बाबी सांगितलेल्या आहेत. काय करु नये आणि काय करावे DOs & Donts सांगितले आहेतच. त्यात शक्यतो घराच्या बाहेर निघू नये,स्वतःला होम quarantine करावे,अधून मधून सारखे हात हँड वॉश ने धुवावेत. जिथे पाण्याची अडचण आहे तिथे सॅनिटायझर वापरावे,खोकला,सर्दी,ताप असेल तर वैद्यकीय तपासण्या कराव्यात..लक्षणे असतील तर मास्क वापरावेत.मांसाहारी लोकांनी मांस जास्त शिजवून खावे.रोग प्रतिकार शक्ती वाढविणारे खाद्य पदार्थ खावे. 'वर्क फ्रॉम होम ' ला प्राधान्य द्यावे.सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासण्या करायला सांगाव्यात.स्थानिक प्रशासनास कळवावे. 'सोशल डिस्टन्सिंग 'या सह अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.सकळ मनुष्य जातीने कोरोना या व्हायरस विरुद्ध लढाई पुकारलेली आहे तेव्हा एक चांगले सैनिक म्हणून आपले कर्तृत्व दाखवू.नाहक निष्काळजीपणा दाखवून आपले,आपल्या परिवाराचे,आपल्या गावाचे,आपल्या राज्याचे,आपल्या देशाचे आरोग्य धोक्यात टाकू नये.हा ऐतिहासिक लढा आहे पुढे जेव्हा पुढच्या पिढीला आपण कोरोनाची कथा सांगू तेव्हा आपली विजयगाथाच सांगू नाहीतर फोटो दाखवायची वेळ येईल .तेव्हा खूप काळजी घ्या..घाबरू नका..सतर्क रहा..!
" घरी राहणे सध्या हीच खरी देशभक्ती आहे . "
Subscribe to:
Posts (Atom)