Saturday, March 21, 2020

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हाकेला साथ द्या. रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हा.;- सौ .वर्षा मगर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
रविवार दि.22  मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे देशवाशीयांना  आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायला हवे असे आवाहन  जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या संपादक सौ वर्षा हनुमंत मगर  यांनी केले आहे. 
जगभरात कोरोनाचे सुरु असलेले थैमान, देशात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवाशीयांशी संवाद साधला. येत्या रविवारी दिवसभर देशभरात जनता कर्फ्यू करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधांनांनी केले आहे. 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा कर्फ्यू पाळावा असे देशाचे पंतप्रधान म्हणाले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत याची तपासणी याद्वारे आपण करणार आहोत अशी साद आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी घातली आहे. या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या देशाच्या हितासाठी आपण घरातच राहावे अशी  विनंती आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी केलेली असून आपण या विनंतीला व आवाहनाला प्रतिसाद देत या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे असे आवहान जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या संपादक सौ.वर्षा हनुमंत मगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले  आहे.

No comments:

Post a Comment