Saturday, March 28, 2020

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत खुली राहणार जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

बीड दि. 28:- जीवनावश्‍यक वस्तूंची सर्व आस्थापना दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता सकाळी 7 ते 9:30 या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.
याचबरोबर जमावबंदीचा आदेश सकाळी 7 ते या 9:30 या कालावधीत लागू राहील व सदर वेळे व्यतिरिक्त जिल्ह्यात पूर्णवेळ संचारबंदी लागू राहील असे सूचित केले आहे.
कोरोना विषाणूचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) नुसार दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्याच्या नागरी ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमाव बंदी आदेश लागू आहे. परंतु जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने यापूर्वीच्या सकाळी 11 ते दुपारी 3 यामध्ये बदल करून सकाळी7 ते 9:30 या वेळेत सुरू ठेवण्यास या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन अधिक काळजी घेत असुन रविवारी संपुर्ण लाॅक डाऊन राहणार आहे. दवाखाना आणि मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावर गर्दी वाढत आहे. यामुळे उद्या रविवारची सार्वजनिक सुट्टी लक्षात घेऊन केवळ दवाखाना आणि मेडिकल वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी घरातच थांबुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment