Sunday, March 8, 2020

कोरेगाव-भीमा प्रकरणात आरोपी असलेले मिलिंद एकबोटे म.न.से.प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीला.

शिवसेनेने कॉंग्रेससोबत घरोबा केल्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून मनसेने हिंदुत्वाचा आवाज बुलंद केल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक हिंदुत्ववादी मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जवळीक वाढवत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणात आरोपी असलेले मिलिंद एकबोटे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. एकबोटे हे कडवे हिंदुत्ववादी आहेत. ठाकरे यांची भेट घेवून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त 24 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीतर्फे हे निमंत्रण देण्यात आले आहे.
भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्या वर पुण्यात एट्रॉसिटी आणि दंगल भडकावणं या कलमां खाली गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे यांच्याशी मिलिंद एकबोटे यांचे चांगले संबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्र पाहुणे असल्याचं दिसतं.
मिलिंद एकबोटे राजकारणीही आहेत. 1997 ते 2002 या काळात ते पुणे महानगर पालिकेत भाजपचे नगरसेवक होते.2002 साली भाजपने त्यांना तिकीट नाकारले. ते अपक्ष लढले आणि निवडूनही आले. 2007 पर्यंत ते नगरसेवक होते.2007 साली मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी समस्त हिंदू आघाडी या संघटनेची स्थापना केली.

No comments:

Post a Comment