Tuesday, March 24, 2020

कोरोनाचा संशयित समजून रोखला 6 वर्षीय मुलाचा अंत्यसंस्कार.

किल्लेधारूर-तालुक्यातील कासारी येथे एका सहा वर्षीय मुलाचे अंत्यसंस्कार ग्रामस्थांनी कोरोना संशयित समजून रोखल्याची घटना घडली असुन आरोग्य प्रशासनाने याबाबत ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर सदरील मुलावर अंत्यविधी करण्यात आले.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कासारी येथील बालक मनोहर भुजंगराव चोपडे (६) याचे हृदयविकाराच्या निदानासाठी मुंबई येथील जेजे रुग्णालयात एक महिन्यापासुन उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने काल दि.२३ रोजी निधन झाले. निधनानंतर त्याच्यावर कासारी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांत कोरोनाच्या भितीने अस्वस्थता पसरली. ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी विरोध दर्शवला. याबाबत तेथील ग्रामसेविका अनुचंदना थोरात यांनी प्रशासनास याबाबतीत माहिती दिली. आरोग्य विभागा तर्फे भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ मारुती लगड यांनी कासारी येथे जावून ग्रामस्थांची समजूत काढली. यानंतर मयत मुलावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment