Wednesday, March 18, 2020

भीमा कोरेगाव चौकशी समितीकडून शरद पवारांना बोलावणं.

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरे गाव चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या दंगलीचे धागेदोरे उलगडण्याचा या समिती चा प्रयत्न असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना या चौकशी समितीने ४ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोरेगाव भीमा दंगलीमध्ये राहुल फटांगळे या युवकाचा मृत्यु झाला होता. ही दंगल मिलिंद एकबोटे आणि संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या संगनमताने घडून आणली गेली असा एक मतप्रवाह आहे. तर दंगलीला शहरी नक्षलवादी कारणीभूत आहेत असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे.
या प्रकरणाबाबत शरद पवार यांनी वारंवार सूचनादर्शक विधानं केल्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय संस्थांकडे या घटनेचा तपास जाऊ नये अशी मागणी शरद पवार यांनी महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर केली होती. आता चौकशीवेळी शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं असेल.

No comments:

Post a Comment