Saturday, March 21, 2020

.रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे-ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे.

*परळी वैजनाथ (प्रतिनिधी)*
रविवार दि.22  मार्च रोजी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायला हवे असे आवाहन अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले आहे. 
जगभरात कोरोनाचे सुरु असलेले थैमान, देशात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवाशीयांशी संवाद साधला. येत्या रविवारी दिवसभर देशभरात जनता कर्फ्यू करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधांनांनी केले आहे. 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा कर्फ्यू पाळावा असे देशाचे पंतप्रधान म्हणाले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत याची तपासणी याद्वारे आपण करणार आहोत अशी साद आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी घातली आहे. या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या देशाच्या हितासाठी आपण घरातच राहावे अशी  विनंती आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी केलेली असून आपण या विनंतीला व आवाहनाला प्रतिसाद देत या जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे असे अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment