Tuesday, March 17, 2020

कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परळी शहरांतील भाजीपाला बाजार बंद.

*व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे-नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे*

परळी वैजनाथ;-  (प्रतिनिधी)
कोरोनो व्हायरसने जगाच्या अनेक देशांत धुमाकूळ घातला आहे.कोरोनाचे संकट अगदी उंबरठ्यावर आल्याने त्याला आत न येऊ देण्यासाठी परळी नगर परिषदेच्या वतिने भाजीपाला  बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला  होता. परळी वैजनाथ येथील भाजीपाला बाजार व्यापारी, नागरिक,शेतक-यांनी कडकडीत बंद पाळला असून प्रशासन,डॉक्टर सामाजिक संस्था नागरिक आपआपल्या पद्धतीने जनजागृती करत आहेत.परळीकर कोरोना रोखण्यासाठी सरसावले असून कोरोनोचा पादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेत आहेत.
परळी शहरामध्ये दररोज शहराच्या जुनी हैद्राबाद बॅंक रोड, घरणीकर रोड,मोंढा मार्केट, डॉ.हडबे रोड तसेच सुभाष चौक येथे भरत असतो. या बाजारात परळी तालुक्यातील खेड्या पाड्यातील शेतकरी नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच हा बाजार तालुक्याच्या ठिकाणी असल्याने येथे भाजी पाल्याची खरेदी- विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकरी व व्यापारी वर्गाची संख्या जास्त असते. त्यामुळे या भाजीपाला बाजारातील होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हा भाजी बाजार रद्द करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी घेतला होता. काही शेतकऱ्यांना बाजार रद्द केल्याचे माहिती नसल्याने भाजीपाला घेऊन आले होते.परंतु कळल्यानंतर त्यांनी भाजीपाला माघारी नेहुन बंदला प्रतिसाद दिला.
नगराध्यक्षा सौ.हालगे यांनी कोरोनोचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भाजीपाला  बाजार रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयाला शेतकरी व्यापारी नागरि कांनी प्रतिसाद देत बाजार आज मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आल्याने कोरोनाचा पादुर्भाव टाळण्यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिक कोरोनो विषयी आपआपल्या परीने जनजागृती करत असल्याने कोरोना रोखण्यासाठी  येथील नागरिक सरसावले आहेत.
* नगर पालिकेचे आवाहन 
कोरोनो व्हायरसने जगाच्या अनेक देशांत धुमाकूळ घातला आहे.कोरोनाचे संकट अगदी उंबरठ्यावर आल्याने त्याला आत न येऊ देण्यासाठी परळी नगर परिषदेच्या वतिने भाजी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला असून परळी वैजनाथ येथील भाजी बाजार व्यापारी, नागरिक,शेतक-यांनी नगर पालिकाला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे व मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment