Wednesday, March 18, 2020

स्वामी विवेकानंद महाविद्यालयमध्ये पदवी दान समारंभ संपन्न.


 * विद्यार्थ्यांनी पदवीचा सन्मान करावा;-डॉ. भारत हंडीबाग

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व परळीतील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक (13) आयोजित पदवी वितरण समारंभ संपन्न झाला .त्यावेळी आपण जे शिक्षण घेतले ते
 शिक्षण स्वतःसह समाजा च्या कल्याणा साठी उपयोगी आले पाहिजे. आज जे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेऊन बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या पदवीचा सन्मान करावा असे प्रतिपादन डॉ. भारत हंडीबाग यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी न्यू हाय स्कूल शालेय समितीचे अध्यक्ष श्री नानासाहेब काका सोळंके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता व उस्मानाबाद बाद येथील तेरणा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. भारत हंडीबाग, डॉ.गोपाळ काकडे, प्राचार्य एम. टी. देशमुख उपप्राचार्य सुनील लोमटे, न्याय टाईम्सचे संपादक बालकिसन सोनी, प्रा. भगवान कदम, एस .आर .देशमुख ,प्रबंधक श्री. अजय सोळंके यांची उपस्थिती होती.
डॉ. भारत हंडीबाग म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी केवळ पदवी प्राप्त करून थांबणे योग्य नाही तर सोबत पदवीचा सन्मान करून पुढील जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे त्यांनी सांगितले .यावेळी महाविद्यालयातील बीए, बीएस्सी, बीकॉम या तिन्ही शाखांचे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली .या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ ध्वज फेरी काढून करण्यात आली. प्रस्ताविक प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी केले. तसेच प्रा. सुनिल लोमटे  यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. श्रीहरी गुटटे यांनी केले. आभार डॉ. एल.आर. मुंडे यांनी मानले. या वेळी महाविद्या यातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व पदवी घेण्या साठी आलेले मोठ्या संख्येनेविद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment