* काॕपी चालते म्हणून इतर जिल्हातील विद्यार्थ्यां या जिल्हात प्रवेश घेतात .शहरात व तालुक्यात नांदेड ,परभणी सह महाराष्ट्र सीमेवरील जिल्हातील विद्यार्थ्यांनी विविध शाखेसाठी प्रवेश घेतले आहेत .शहरात परिसरात जवळपास चारशे च्या आसपास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत आता बुधवार पासुन पदवीच्या या परीक्षा सुरु होत आहेत या परीक्षावेळी परभणी ,नांदेड येथुन रेल्वेने विद्यार्थ्यां येतात .असे वाटते परळीत याञा आहे की काय .येताना ऐखाद्या दुकानावरुन अपेक्षीत विकत घेतात परीक्षा देतात परत जातात .अशी पदवी परीक्षा सध्या होत आहेत .याकडे ही लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे बोलले जात आहे *
परळी वैजनाथ ; दि.16 (प्रतिनीधी) बारावीच्या परीक्षा संपल्या नंतर आता दाहवीच्या परीक्षा सुरू आहेत या दोन्ही परीक्षात बीड चे जिल्हधिकारी .मुख्यधिकारी यांनी संपुर्ण जिल्हात काॕपी मुक्ती साठी अनेक नवनविन प्रयोग केले .व काॕपीमुक्ती साठी प्रयत्न केले याला चांगले यश मिळाले आता बुधवार पासुन डाॕ बाबासाहेबा आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेस सुरूवात होत आहे.या ही परीक्षा काॕपी मुक्त व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.परळी शहरा सह परळी तालुक्या त पदवी चे जवळपास सात वरिष्ठ महाविद्यालय डाॕ बाबासाहेबा आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहेत या महाविद्यालयात बुधवार पासुन बी.ए. बी.काॕम .बी.एस्सी.प्रथम द्वितीय .तृतीय वर्षाच्या पदवी परीक्षेस सुरूवात होत आहे .परळी शहरात पाच वरिष्ठ महाविद्यालय आहेत यामध्ये वैद्यनाथ महाविद्यालय ,नवगण महाविद्यालय ,महिला महाविद्यालय ,जवाहरलाल नेहरू महाविद्यालय ,स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या सह सिरसाळा येथील पंडित गुरू पार्डिकर महाविद्यालय ,धर्मापुरी येथील शंकरराव गुट्टे महाविद्यालय या सर्व महाविद्यालयात पदवी परीक्षेस सुरूवात होत आहे.बीड चे जिल्हधिकारी राहुल रेखावार व मुख्यधिकारी अजित कुंभार यांनी दाहवी व बारावी च्या परीक्षा काॕपी मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले दहावी बारावी परीक्षा केंद्रावर विशेष बैठे पथके तयार करून पथकात उपविभागीय अधिकारी .तहसीलदार .नायाब तहशीलदारांचा समावेश केला.जिल्हधिकारी साहेबानी व सीईओनी स्वतः काही परीक्षा केंद्रावर भेटी देऊन काॕपी करणारे विद्यार्थ्यां .शिक्षक .केंद्रसंचालकावर कारवाई केली काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .यंदा ही काॕपी मुक्तीची सुरूवात असुन याच पध्दतीने पदवीच्या परीक्षेसाठी ही प्रयत्न होणे आवश्यक आहेत .कारण पदवी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यां काॕप्या करतात .काॕप्यांचा सुळसुळाट असतो .या परीक्षेसाठी येणारी पथके फक्त नावालाच भरारी पथके असतात कारण या पथकातील सदस्य संबधीत महाविद्यालयातील असल्याने ते कोणतीही कारवाई करत नाहीत काॕप्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे या परीक्षेतही काॕपी मुक्तीचा प्रयोग होणे आवश्यक आहे .स्वतः जिल्हधिकारी ,मुख्यधिकारी यांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे .
No comments:
Post a Comment