Sunday, March 22, 2020

जिल्ह्यात आढळणाऱ्या निराधार, शक्तिहीन, बेवारस, उपाशी व्यक्तींना निवारा देण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधा - जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

* या निराधार व्यक्तींसोबत असलेल्या बालकांची शासकीय निवासी शाळा करणार व्यवस्था.

* जनता कर्फ्यू कालावधीत सापडला माणुसकीचा निवारा.

बीड , दि.  २२:- शहर तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी निराधार, शक्ति हीन, बेवारस, व्यक्ती -वृद्ध आणि वेडसर लोक  आढळल्यास  त्यांची निवार्‍याची व्यवस्था  शासनाच्या  सामाजिक  न्याय  विभागाच्यावतीने  केली जात असून  आपल्या शहरात, गावात अथवा परिसरात  अशी व्यक्ती आढळल्यास  प्रशासनाशी  संपर्क साधावा  असे आवाहन  जिल्हाधिकारी  राहुल रेखावार  यांनी केले आहे . या व्यक्तींसोबत असलेल्या बालकांचा व मुलां चा भविष्याचा विचार करून त्यांना शासकीय निवासी शाळात शिक्षण व निवाऱ्याची व्यवस्था केली जाईल. तर यामधील निराधार वृद्ध व्यक्तींना प्रशासनाच्या व्यक्तीने नगरपालिकेचा रात्र निवारागृहात सोय केली जाणार असून बेवारस वेडसर व्यक्तींना मनोरुग्णालयात दाखल करून त्यांना निवारा उपलब्ध करून दिला जाईल तेथे त्यांची राहण्याची व आहाराची व्यवस्था होऊ शकेल असे श्री.रेखावार यांनी सांगितले.
जनता कर्फ्यू च्या दरम्यान पत्रकार शेख रिजवान यांनी यांना छायाचित्रण करताना अशा व्यक्ती आढळून आल्या त्यांनी शहर पोलीस विभागाच्या मदतीने वाहनाद्वारे आपल्या घरून आणलेले जेवण सदर व्यक्तींना देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  गव्हाणकर यांनी बंदोबस्त दरम्यान माणुसकी जागृत ठेवली.या घटनांबाबत ची माहिती जिल्हाधिकारी श्री रेखावार यांना मिळाल्याने त्यांनी याची तातडीने दखल घेत जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री सचिन मडावी यांना पुढील सूचना देऊन अशा व्यक्तींची आवश्यक ती व्यवस्था करण्यासाठी उपाय योजना केल्या .आपणास अशा व्यक्ती आढळल्यास आपण *समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री सचिन मडावी संपर्क क्रमांक ७७२०८३९१५५ अथवा पत्रकार श्री शेख रिझवान संपर्क क्रमांक ९५६१८४०१८४ यावर माहिती द्यावी* .जेणेकरून या दुर्बल व्यक्तींचे मदत होऊ शकेल असे जिल्हाधिकारी म्हणाले.

No comments:

Post a Comment