Thursday, March 26, 2020

नागरिकांनी पोलीस, डॉक्टर,प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे:- कैलास नाईकवाडे

 *कोरोना महामारीला सहज घेऊ नका, गांभीर्य ओळखा .

परळी वै(प्रतिनिधी) कोरोना महामारी हि जागतिक महामारी म्हणून समोर आली आहे. जगात नावाजलेल्या चीन,इटली,जर्मनी,अमेरिका या देशाची कोरोना व्हायरस मुळे दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने आव्हान करूनही नागरिक गांभीर्याने विचार करत नाहीत.आज एक दिवसीय बंद म्हणजे अब्जावधी रुपयाचे नुकसान परंतु नागरिकांच्या आरोग्याचा पुढे काहीही मोठे नाही म्हणून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. आपल्या कुटुंबाला सोडून रात्रंदिवस नागरिकांची सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचारी,डॉक्टर, नर्स,आरोग्य कर्मचारी ,अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी, ग्रामसेवक,तलाठी,महावितरण कर्मचारी,पाणीपुरवठा कर्मचारी,महसूल कर्मचारी  हे आपले घरदार सोडून नागरिकांच्या आरोग्य ची सुरक्षितता राहावी म्हणून रात्रंदिवस कार्य करतात या सर्व पोलीस, आरोग्य,महावितरण,पाणीपुरवठा  इतर सर्व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे तसेच महामारीत स्वार्थी व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी करून नफेखोरी करू नये या महामारीच्या विरोधी लढाई आपण सर्व नागरिकांनी एक जुटीने शासकीय, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मदत ,सहकार्य करावे असे आव्हान शिवसंग्रामचे शहर अध्यक्ष कैलास नाईकवाडे यांच्या वतीने करण्यात आले .

No comments:

Post a Comment