Tuesday, March 10, 2020

जिल्हाधिकारी राहुल रेखावारांनी यांची अचानक सिरसाळा येथील न्यु हायस्कुल परीक्षा केंद्राला भेट .


* विद्यार्थ्यांसह तोतया विद्यार्थ्यांवर सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

परळी वैजनाथ ;- सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा चालु आहेत या परीक्षा  कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी प्रयत्नांची परीकाष्टा करणारे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी  सिरसाळा येथील न्यू हायस्कूलला अचानक भेट दिली असता त्याठिकाणी अण्णासाहेब मारुती कदम नावाच्या विद्यार्थ्याच्या जागेवर तोतया विद्यार्थी अमर मोतीराम महात्मे हा परीक्षा देताना आढळून आल्यानंतर जिल्हा धिकार्‍यांनी केंद्र संचालकासह सहसंचालक आणि गार्डींग शिक्षकाला झापले. तर या प्रकरणी दोन्ही विद्यार्थ्यांवर सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा धिकारी राहुल रेखावार हे परळी दौर्‍यावर असताना त्यांनी अचानक सिरसाळा येथील न्यू हायस्कूल या परीक्षा केंद्राला भेट दिली. या वेळी इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होती. कोथळा येथील हिवरा गोवर्धन न्यू हायस्कूलचा विद्यार्थी अण्णासाहेब मोतीराम कदम याच्या जागेवर तोतया विद्यार्थी अमर मोतीराम महात्मे हा परीक्षा देत असल्याचे आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा धिकारी आल्यानंतर केंद्र संचालक, सह संचालक आणि गार्डींग शिक्षकांनी संबंधित तोतया विद्यार्थ्यास पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनाच सदरचा तोतया विद्यार्थी मिळून आला. सदरची घटना घडल्या नंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केंद्र संचालक, सहसंचालक, गार्डींग ला असलेल्या शिक्षकांना झापले. त्याच बरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या. तर या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात विद्यार्थ्या सह तोतया विद्यार्थी विरुद्ध कलम 420, 268, 419 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment