Monday, March 9, 2020

परळी शहर व संभाजीनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट.

*पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष द्यावे-मागणी .

*परळीची बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असतानाही दुसरीकडे मटका व गुटखाचा बाजार मात्र बहरला.

परळी वैजनाथ ; (प्रतिनीधी ) 
शहरात पोलीस निरीक्षकांच्या नाकावर टिचून मटका, गुटखा जोरात चालू असून, गावठी दारुची विक्रीही सर्रास चालू असल्याचे चित्र आहे. शहर पोलीस ठाण्याच्या समोरच ऑनलाईन मटक्याची तीन दुकाने चालू आहेत हे विशेष परळी शहर व संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू आहेत. 
शहरातील परळी शहर व संभाजीनगर या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे जोरात सुरू आहेत, मात्र पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध धंदे केले जात आहेत. दारू, गांजा, मटका, गुटखा , जुगार असे अनेक अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. शहरात जवळपास तीन ते चार मटका बुकीचालक आहेत. त्यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. दोन-तीन वर्षापूर्वी मटका व्यवसाय काहीसा कमी झाला होता, मात्र तो पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. तसेच शहरात गुन्हेगारी घटना घडत आहेत.मात्र याला आळा बसणे गरजेचे असल्याने परळी परिसरातील नागरिक पालकमंत्री व पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे परळीची बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असतानाही दुसरीकडे मटक्याचा बाजार मात्र बहरत आहे़ उन्हाळा असो की, पावसाळा हा व्यवसाय राजरोसपणे वाढतच चालला असून, लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून होत आहे़. पोलिस प्रशासन मात्र मटका व्यवसायाला लगाम घालण्यात अपयशी ठरल्याचेच दिसत आहे़ परळीमध्ये मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे़ पोलिस प्रशासन छोट्या मोठ्या कारवाया करते़ परंतु, अवैधरित्या सुरू असलेला हा मटका पूर्णत: बंद करण्यासाठी मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत़ आमचे प्रतिनिधी शहरात ठिक ठिकाणी फिरून मटका व्यवसायाची माहिती घेतली असता शहरातील सर्वच गल्लीबोळांमध्ये मटक्याचा हा बाजार थाटल्याचे पहावयास मिळाले़. शहरातील विविध चौकातून मटका बुकींचा शोध घेतला असता मटका अड्डे सुरू असल्याचे पहावयास मिळाले़. मोंढा भाग, टावर, सुभाष चौक, शिवाजी चौक,रेल्वे स्टेशन, नेहरू चौक, गणेशपार अशा प्रत्येक दिशेला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये मटक्याचा व्यवसाय सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ . परळी शहरातच जागोजागी मटक्याचा व्यवसाय चालतो़. या मटक्याचे जाळे किती मोठ्या प्रमाणात पसरले असावे, याचा अंदाज येतो़ रोजंदारीवर काम करून संसाराचा उदरनिर्वाह करणारे अनेक जण दररोज एकदा तरी मटक्याचा आकडा लावत असल्याचे सांगण्यात आले़ झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी मटका मात्र वाढत चालला आहे़ शहरात परळी शहर, संभाजीनगर पोलीसांसह परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय तेजीत असल्याचे निदर्शनास येते़ पोलिस प्रशासनाच्या नावापुरत्या कारवाया या व्यावसायाला बळ देत आहेत़ मोठ्या बुक्कींवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे हा व्यवसाय जोमात सुरु आहे.

No comments:

Post a Comment