Saturday, March 14, 2020

सामाजिक कार्यात अग्रेसर व राजकारणाचा उपयोग विधायक कामांसाठी करणारे व्यक्तिमत्व ; मा.श्री.चेतन सौंदळे सर


श्री.वैद्यनाथ प्रभूच्या वास्तव्याने पावन झालेल्या द्वादश ज्योतिर्लिंग परळी-वैजनाथ नगरीत वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज,अहमदपुरकर उर्फ ‘अप्पा' यांच्या भव्य-दिव्य व नेत्रदिपक 82व्या श्रावणमास तपोनुष्ठानाच्या 21 दिवस अद्वितीय सोहळयाचे आयोजन सर्व समाज बांधव,पदाधिकारी,सदस्य तसेच विशेषत:माता-भगिणी यांच्या अथक परीश्रम व समर्पित जीवाभावाच्या अनमोल सहकार्यामुळे पार पडलेला तपोनुष्ठान सोहळा चेतन अरविंद सौंदळे यांच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारी व नियोजनाद्वारे केवळ धार्मिकच नव्हे तर लोक कल्याणकारी,समाजाभिमुख,अभूतपूर्व,अविस्मरणिय व एैतिहासिक संपन्न झाला.
 अप्पांच्या तपोनुष्ठान सोहळयासाठी चेतन सौंदळे यांनी सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्र-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे,माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षिरसागर,श्री.वैजनाथ देवस्थान ट्रस्ट,भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्या अनमोल सहकार्य व योगदानातून तसेच डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर,मुख्य संचालिका लाईफ केअर हॉस्पिटल,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने तपोनुष्ठानातील 21दिवसात विविध आरोग्य तपासणी शिबीर,नामवंत डॉक्टरांचे रोगनिदानावर मार्गदर्शन,स्पर्धा परीक्षा तसेच व्यक्तिमत्तव विकासावरील व्याख्याने,भजन-कीर्तन,प्रवचन,अखंड शिवनाम परमरहस्य पारायण,भाविक व रसिकांसाठी संगीत मेजवाणी व तपोनुष्ठान कालावधीत दररोज महाप्रसाद(अन्नदान) सेवा आयोजित करण्यात सर्व समाज बांधव,पदाधिकारी व सदस्यासहीत चेतन सौंदळे यांचे व्यवस्थापन होते.
सामाजिक कार्यात अग्रेसर व राजकारणाचा उपयोग विधायक कामांसाठी करणारे व्यक्तिमत्तव म्हणून चेतन सौंदळे जनमानसात परीचित आहेत.
 प्रदूषणग्रस्त परळी व परीसरात सर्व वृक्षमित्र सदस्य व चेतन सौंदळे यांच्या परीश्रमातून वृक्ष लागवड संवर्धन चळवळीद्वारे प्रसिध्द सिने अभिनेते श्री.सयाजी शिंदे,नामवंत लेखक अरविंद जगताप तसेच सामाजिक वनीकरण व वनविभाग,बीड जिल्हयाच्या माध्यमातून व नियोजनाद्वारे डेन्स फॉरेस्ट निर्मिती व आनंदधाम परीसरात 1200 झाडांची लागवड करून संवर्धनही केले जात आहे.
अपुरा पाऊस तसेच त्यामुळे निर्माण होणा-या भीषण दुष्काळी परीस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी पाणी फाउंडेशन तसेच ग्लोबल परळीचे निमंत्रक श्री.मयांक गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जलयुक्त शिवार,शेततळे व जलपुनर्भरण उपक्रमात सौंदळे यांनी सक्रीय सहभाग घेऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व गाव पातळीवर पाणी उपलब्धीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
मराठवाडा अवर्षण ग्रस्त क्षेत्र असल्यामुळे पिण्याचे पाणी,शेती व उद्योगासाठी नदीजोड किंवा वाटर ग्रीड उपाययोजना तसेच परळी परीसरातील तीव्र पाणी टंचाईवर मात करण्या साठी व भविष्यातील वाढती लोक संख्या,शहराचे विस्तारीकरण,निर्माण होणारे नवउद्योग यासाठी पाणी पुरवठा करणा-या नागापुर येथील वाण प्रकल्पासारखा दुसरा पाण्याचा साठवण तलाव निर्माण करण्यासाठी सौंदळे यांच्यावतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
परळीतील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी पाच एकर जागेची राज्य सरकारकडून मान्यता मिळवून स्मशानभूमीच्या मुलभूत सुविधा व सुशोभिकरणासाठी शासना मार्फत निधी मिळवण्यासाठी सौंदळे प्रयत्नशील असून काशी,उज्जैन जगद्गुरू व डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या हस्ते आनंदधाम स्मशान भूमीच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे,माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षिरसागर,खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून परळी-अंबेजोगाई तालुक्यासाठी एफ एम आकाशवाणी-रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन केंद्र सुरू करण्यासाठी तसेच  परळी-वैजनाथ परीसरा तील बेरोजगारांना काम तसेच उद्योगाला चालना मिळण्यासाठी पंचतारांकीत एमआय डीसी निर्माण करून परळी-मुंबईसह तीर्थक्षेत्र व ईतर ठिकाणी रेल्वे सुविधा निर्माण करण्याचे तसेच जड वाहतूकसाठी बायपास रोड निर्माण करून,प्रदूषण ग्रस्त परळी परीसरातील रूग्णांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज रूग्णालय,शहरातील उद्यानांचे सुशोभिकरण व भव्य खेळाचे स्टेडीयम निर्माण करण्यासाठीचा पाठपुरावा चेतन सौंदळे यांंचा शासनाकडे चालू आहे.
परळी बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी व विकासासाठी निधी तसेच पशु वैद्यकीय दवाखाण्या साठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून जनावरांसाठीचा सुसज्ज दवाखाणा निर्माण करावा  व परळी येथे आरटीओ अॉफीस व कँप सुरू करून वाहन धारकांची गैरसोय दुर करण्याची मागणी राज्य शासनाकडे करून महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व तत्कालीन उर्जामंत्री ना.अजितदादा पवार,ना.धनंजय मुंडे यांच्या वतिने  परळी शहर भारनियमन मुक्त करण्यात यश मिळवले. परळी शहरातील वाहतूक यंत्रणा कोलमडल्यामुळे वाहन धारक व नागरि कांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.परळी वाहतूक पोलीस कर्मचारी संख्या कमी असून याबाबत पोलीस अधिक्षकांनी दखल घेवून शहरात रहदारीच्या ठिकाणी एकेरी वाहतूक ,सम-विषम पाकॆिंग व्यवस्था व जड वाहतूकीची बाजार पेठेतील वेळ निश्चित करून नगर परीषदे मार्फत पाकॆिंग व्यवस्था निर्माण करावी व फेरीवाले तसेच अॅटो चालकांसाठी जागा नेमून देण्याकरिता नगर परीषद व पोलीस प्रशासनाकडे सौंदळे यांचा पाठपुरावा सुरू आहे.

No comments:

Post a Comment