केज दि. 10(प्रतिनीधी )-तालुक्यातील विडा येथे धुलीवंदनाच्या दिवशी जावायला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अखंडित पणे सुरु आहे. यावर्षी गदर्भसावरीचे मानकरी दत्तात्रय गायकवाड हे ठरले.
मंगळवारी धुलीवंदन साजरे करण्यासाठी सकाळी सकाळी सात च्या दरम्यान मस्साजोग येथे मटण घेण्यासाठी दत्तात्रय हे थांबले होते.यावेळी विड्यातील काही तरुण युवक जावाई शोधण्या साठी गेले होते तर हे जावाई अर्थात दाजी दिसले मग लगेच गाडी मध्ये त्यांना बसवून विड्यात आणण्यात आले.प्रतिवर्षा प्रमाणे अत्यंत उत्साहात धुली वंदन हा सण साजरा करण्यात आला.
पुर्ण विडा गावात डीजेच्या तालावर मिरवणूक गाव भर काढण्यात आली. मिरवणूक राजा हनुमान मंदीराच्या पारावर आल्या नंतर जावायाला गावकऱ्याच्यां वतिने ड्रेस चा आहेर चढवण्यात आला व मिरवणूक संपवण्यात आली .
*अन.. मटणाने घात केला
दरम्यान धुलिवंदनिमित दत्तात्रय गायकवाड हे सकाळच्या सुमारास मटण घेण्यासाठी आले होते. मटण घेऊन ते मस्सा जोगच्या बस स्थानकावर आल्या नंतर विड्यातील काही तरुणांनी त्यांना उचलून घेऊन गेले.तत्पूर्वी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दत्तात्रय यांचा मटणाने घात केला.व ते या परंपरेचे मानकरी ठरले .
No comments:
Post a Comment