Tuesday, May 31, 2022

पेट्रोल पंप पुढील 3, 4 दिवस बंद ही निवळ अफवा. पेट्रोल-डिझेलचा कंपन्यांचा विरोधात एक दिवस इंधन खरेदी बंद राहणार.

 ‘पेट्रोल पंप पुढील 3, 4 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे आताच पुरेसे पेट्रोल वाहनात भरुन ठेवा’, असे व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज तुम्हालाही आले असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण हे मॅसेज म्हणजे निव्वळ अफवा आहेत, असे पेट्रेलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

पेट्रोल-डिझेलचा कंपन्यांकडून अनियमित पुरवठा होत असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून डिलर्सनी केवळ एक दिवस इंधन खरेदी बंद ठेवली आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. सर्व ठिकाणी पेट्रोल पुरवठा सुरळीत होत आहे आणि राहिल, असे अब्बास यांनी स्पष्ट केले.
31 मेरोजी पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलानमुळे पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीने तसेच सोशल मिडियावरील पेट्रोल पंप बंदच्या अफवेमुळे राज्यभरात शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे 30 मेरोजीच वाहनचालकांनी आपल्या वाहनाची पेट्रोलची टाकी फुल करण्यास सुरुवात केली. जे ग्राहक ऐरवी 1 लिटर पेट्रोल खरेदी करतात, त्यांनी काल 5 लिटर पेट्रोल खरेदी केले. त्यामुळे औरंगाबाद शहरातील काही पेट्रोल पंप बंद झाले, अशी माहिती औरंगाबादेतील जागृती पेट्रोलियमचे व्यवस्थापक सतीश बांगड यांनी दिली.

हे बंद पेट्रोल पंप पाहून नागरिकांमध्ये धास्ती आणखी वाढली आणि त्यांनी अधिकचे पेट्रोल वाहनात भरून घेतले, असेही बांगड म्हणाले. मुळात पेट्रोल पंप चालकांकडे 2, 3 दिवसांचा स्टॉक असतो. त्यामुळे वाहनचालकांनी नेहमी प्रमाणेच पेट्रोल-डिझेल भरले असते, तर काही ठिकाणीदेखील समस्या निर्माण झाली नसती, असेही बांगड यांनी सांगितले.

आज शहरांमधील पेट्रोल पंप नियमित सुरु असले तरी गंगापूर, वैजापूरसारख्या ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत. त्यामुळे तेथील वाहनचालकांचे हाल होत आहेत. याबाबत पेट्रेलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले की, या ठिकाणी समस्या पुरवठ्याची आहे. पेट्रोल-डिझेल कंपन्या पंप चालकांकडून आगाऊ पैसे घेतात. मात्र वेळेवर इंधनाचा पुरवठा करत नाही. अशा स्थितीत गाव, तालुक्याच्या पंच चालकांना तग धरून ठेवणे कठीण जाते. कारण त्यांच्याकडे शहरातील पंपांसारखा अतिरिक्त साठा जास्त नसतो. त्यामुळे पुरवठा बंद होताच त्यांना पेट्रोल पंप बंद करावा लागतो. पेट्रोल पंपांच्या आंदोलनामुळे नव्हे तर कंपन्यांनी पुरवठा न केल्यामुळे गाव, तालुक्यातील पेट्रोल पंप बंद आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

शहरांमध्ये ज्या ठिकाणी पेट्रोलच्या तुटवड्यामुळे पंप बंद झाले आहेत, ते उद्या दुपारपर्यंत सुरु होतील, अशी माहिती राज पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक युसुफभाई यांनी दिली. अफवेमुळे काल आपल्या पंपावर प्रचंड गर्दी झाली होती. आम्ही केवळ एक दिवस इंधन खरेदी बंदचा निर्णय घेतला होता. उद्यासाठी आम्ही पेट्रोल-डिझेलच्या ऑर्डर दिल्या आहेत. त्यामुळे उद्या शहरांत कुठेही तुटवडा जाणवणार नाही, असे ते म्हणाले.

परळीत जगदगुरू डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्डपालखी सोहळा, धर्मसभेचे आयोजन.


*25 जुन ते 25 जुलै दरम्यान डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य व शांतेश्वर शिवाचार्य यांचे आषाढमास तपोनुष्ठान सोहळा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ येथे 23 व 24 जुलै रोजी जगदगुरू डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांची अड्डपालखी सोहळा, धर्मसभा तसेच 25 जुन ते 25 जुलै दरम्यान डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य व शांतेश्वर शिवाचार्य यांचे आषाढमास तपोनुष्ठान सोहळयाचे  वीरशैव लिंगायत समाज परळीच्या वतीने करण्यात आले आहे. 

येथील संतश्री गुरूलिंग स्वामी मठ संस्था (बेलवाडी) व वके्रश्वर मंदिर परळी येथे श्रीमद रंभापुरी महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांचा अड्डपालखी सोहळा, धर्मसभा, महापूजा, अनुष्ठान, मंगल पूजन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे परळी येथे आयोजन करण्यात आले असून याचसोबत श्रीक्षेत्र मन्मथधाम संस्था, कपिलधार, मांजसुंबा येथील ष.ब्र.108 श्री सदगुरू डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व नेगळुरू जि.हावेरी कर्नाटक हिरमेठ संस्थान येथील श्री. ष.ब्र.108 गुरू शांतेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांचे मार्गदर्शनाखाली दि.25 जुन 2022 ते 25  जुलै 2022 रोजी पर्यंत महिनाभर आषाढमास तपोनुष्ठान सोहळा होणार असून या अंतर्गत दररोज सकाळी 5 ते  7 वा. रूद्राभिषेक, सकाळी 7 ते 11 वा. ग्रंथवाचन, सकाळी 11 ते 1 द्वितीय पुजा, दुपारी 4 ते 5.30 वा. शिवपाठ, पाऊल, भजन, सायंकाळी 5.30 ते 6 वा. प्रवचन, सायं.6 ते 7 वा. स्वाामीजींचे दर्शन, सायं.7 वा. आरती व प्रसाद असे कार्यक्रम होणार असून दि.23 जुलै 2022 रोजी रंभापुरी जगदगुरू महापिठ बाळेहोन्नुरू कर्नाटक येथील वीरसिंहानाधिश्वर श्री श्री श्री 1008 जगदगुरू प्रसन्नरेणुक डॉ.वीरसोमेश्वर राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी यांचा अड्डपालखी सोहळा, धर्मसभा कार्यक्रमाचे परळी येथे आयोजन करण्यात आले आहे. दि.24 जुलै 2022 रोजी महापूजा व धर्मसभा व वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि.25 जुलै 2022 रोजी अनुष्ठान व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

परळीत होणार्‍या अड्डपालखी सोहळयाचे रंभापुरीचे जगदगुरू डॉ. विरसोमेश्वर यांना निमंत्रण
परमपूज्य जगद्गुरु श्रीक्षेत्र रंभापुरी महास्वामीजी यांना प्रभू वैद्यनाथाच्या पुण्यभूमी श्री क्षेत्र परळी वैजनाथ नगरीमध्ये प्रथमच विविध धार्मिक कार्यक्रमासाठी येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. परळी वैजनाथ येथील समस्त वीरशैव लिंगायत बांधवांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात श्री नारायण देव गोपणपाळे,अ‍ॅड. शशिकांत धनराज अप्पा नरवणे शशांक सूर्यकांतआप्पा निर्मळे , अ‍ॅड.नरहरी आप्पा टेकाळे यांनी शनिवार दिनांक 28 मे 2022 रोजी कर्नाटक येथील जमखंडी जिल्हा बागलकोट येथे श्रीमद् रंभापुरी वीर सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 जगद्गुरु प्रसन्न रेणुक डॉ. वीर सोमेश्वर शिवाचार्य भगवतपाद महास्वामीजी श्रीमद् रंभापुरी महापीठ, बाळे हुन्नूर, कर्नाटक यांच्या चरणी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे होणार्‍या ष ब्र 108 श्री सद्गुरु डॉ विरुपाक्ष शिवाचार्य स्वामीजी श्री क्षेत्र मनथधाम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या श्री ष ब्र 108 श्री गुरूशांतेश्वर  स्वामीजी, हिरेमठ संस्थान, नेगळूरू, जिल्हा हावेरी, कर्नाटक यांच्या आषाढ मास तपो अनुष्ठान कार्यक्रम दिनांक 25 जून ते दिनांक 25 जुलै 2022 च्या समाप्ति निमित्त आयोजित विविध धार्मिक सोहळ्यासाठी आगमन व्हावे असे विधीवत आमंत्रण सादर केले.
 त्यास वीरशैव  लिंगायत समाजाचे आद्यपीठ असलेल्या श्रीक्षेत्र रंभापुरी येथील परमपूज्य जगद्गुरुंनी संमती देऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभ आशीर्वाद दिले .त्यावेळी ष ब्र 108श्री गुरूशांतेश्वर स्वामीजी यांची विशेष उपस्थिती होती. वीरशैव लिंगायत समाजाचे इतर चारही जगद्गुरु परळी वैजनाथ नगरीत यापूर्वी आलेले आहेत. वीरशैव लिंगायत समाजाचे आद्यपीठ असलेले श्री क्षेत्र रंभापुरी जगद्गुरु यांचे प्रथमच परळीवैजनाथ नगरीमध्ये आगमन व अन्य धार्मिक सोहळ्याची व दर्शनाची संधी प्राप्त झाल्यामुळे समस्त वीरशैव लिंगायत समाजामध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.
या धार्मीक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मा.डाॅ.गणेश ढवळे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित .

__
समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणा-या वर्तमानपत्राला अनन्यसाधारण महत्त्व असुन समाजकारण,राजकारण,प्रशासन आणि एकंदरीत सर्व व्यवस्थाच आबाधित राखण्याचे काम करत असून भ्रष्टाचार,अन्यायाला वाचा फोडणारे,गोरगरीबांना न्याय मिळवून देणारे मुंबई मधील प्रसिद्ध वर्तमानपत्र संपादक संजय पवार यांचे दैनिक लोकांकीतच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल येथील हाॅटेल रेडविंग कॅस्टल येथे धि.२९ मे रोजी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,औद्योगिक.वैद्यकीय,अभिनय,सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तींना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. 
यावेळी बीड जिल्ह्य़ातील सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना कोरोना कालावधीत वाड्या,वस्त्या,तांड्यावर जाऊन विनामूल्य आरोग्य सेवा पुरवणे तसेच विविध गैरव्यवहार प्रकरणात नाविन्यपूर्ण आंदोलनाद्वारे भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडणे,सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देणारे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री. प्रितम म्हात्रे,दैनिक लोकांकीत मुख्य संपादक संजय पवार यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार स्विकारताना शेख युनुस च-हाटकर,दत्तात्रय घरत उपस्थित होते. 
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मुंबई आणि गुजरात येथील हि-याचे व्यापारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजीभाई ठक्कर ठाणावाला,म्हाडा गृहनिर्माण संस्थेचे संचालक विश्वास कोळी,अभिनेते अमोल सावंत,दिग्दर्शक निर्माता अमोल भावे,अभिनेत्री श्रद्धा हांडे आदि विविध सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.

,

नवरा बायकोच्या भांडणातून सहा मुलांची हत्या.या दुर्देवी घटनेत सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू.


महाड (प्रतिनीधी) रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दुर्देवी घटना घडली असून पती पत्नीच्या भांडणातून एका महिलेने ६ मुलांना विहिरीत ढकलून हत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेत सहाही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे

मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला चिखुरी साहनी हा पत्नी आणि सहा मुलांसोबत महाड तालुक्यातील शेलटोली येथे राहत होता. चिखुरी हा बिगारी काम करायचा. पत्नी रुणा ही गृहिणी होती. सोमवारी सकाळच्या सुमारास काही कारणामुळे या दोघांचे भांडण झाले. आणि याच रागाच्या भरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने तिच्या सहाही मुलांना बोरगावजवळील एका शेतातील विहिरीत फेकून दिले. यामध्ये रोशनी (10 वर्षे), करिष्मा (8 वर्षे) , रेश्मा (5 वर्षे) , विद्या (4 वर्षे) , शिवराज (3 वर्षे), राधा (3.5 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

सोमवारी सकाळच्या सुमारास या दोघांचे भांडण झाले. आणि याच रागाच्या भरात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या महिलेने तिच्या सहाही मुलांना बोरगावजवळील एका शेतातील विहिरीत फेकून दिले. त्यानंतर महिलेने रात्री आठ वाजताच्या सुमारास महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात घटनेची कबुली दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर अग्निशमन दल आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि पत्नी यांना ताब्यात घेतले आहे.

राज्यसभेसाठी चालणार मोठा घोडे बाजार सहकार्य करा, सफारी गाडी देऊ.आमदारांना मोठी ऑफर.


सध्या  महाराष्ट्रामध्ये राज्यसभेसाठी चांगली चुरस निर्माण झाली आहे. सहा जागेंसाठी सर्वच पक्षांनी आता कम्बर कसली आहे. भाजपानं तिसरा उमेदवार उभा केल्याने आणखीनच रंगत वाढली आहे. सुरुवातीला संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्याची घोषणा केली होती.

त्यावरूनही बरेच राजकारण झाले. परंतु त्यांनी यातून माघार घेतल्यानंतर राज्यसभेच्या ६ जागांसाठी महाविकास आघाडीने ४ उमेदवार दिले आहेत. मविआकडे ३ उमेदवार निवडून येतील इतकी मते आहेत. तर भाजपानेही या निवडणुकीत ३ उमेदवार देऊन चुरस निर्माण केली आहे. भाजपाकडे २ उमेदवार निवडून येण्याइतपत मतांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता या निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक अपक्ष उमेदवार उतरणार आहेत

त्यांनी थेट सफारी गाडी भेट देण्याचं आश्वासन दिल आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले आहे. अरुण निटुरे म्हणाले की, पक्षाच्यावतीने राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. सर्व आमदारांनी सहकार्य करून मला संसदेत पाठवावं.जे आमदार मदत करतील त्यांना पक्षाच्या वतीने सफारी गाडी भेट देऊ. कार्यकर्त्यांच्या सहभागातून हे सहकार्य करू ही लालच नाही असेहह ते म्हणाले.

महाविद्यालयीन परीक्षांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांचा होणार फायदा…!

 

राज्यातील काॅलेजच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोरोनामुळे विस्कटलेली शैक्षणिक घडी नि त्यात परीक्षांचा उडालेला बोजवारा, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय दिला आहे..

कोरोनामुळे गेली 2 वर्षे राज्यातील शाळा-महाविद्यालयांनी ‘ऑनलाइन’ पद्धतीने अभ्यासक्रम शिकवला. अर्थात शिकवण्यासाठी आवश्यक उपकरणे, इंटरनेट व इतर कारणांमुळे या शिक्षणाला अनेक मर्यादा येत होत्या. लाॅकडाऊनच्या पहिल्या वर्षी परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले, तर दुसऱ्या वर्षी ऑनलाइन परीक्षा झाल्या होत्या.

दरम्यान, आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असून, राज्य सरकारने गेल्या महिन्यात सारे कोविड निर्बंध हटवले. शाळा-महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू झाली.. दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा ‘ऑफलाईन’ पद्धतीने झाल्या.. मात्र, महाविद्यालयीन परीक्षा कशा होणार, याबाबत सावळा गोंधळ सुरु आहे..

राज्यातील काही महाविद्यालये ‘ऑनलाइन’ पद्धतीने परीक्षा घेत आहेत, तर काही महाविद्यालये ‘ऑफलाईन’ (प्रत्यक्ष) पद्धतीने.. मात्र, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होऊ शकतो.. विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये मोठा फरक पडू शकतो व त्याचा परिणाम पुढील प्रवेशांवर होण्याची विद्यार्थ्यांना भीती आहे..

‘ऑनलाईन’ शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव राहिलेला नाही. तसेच, त्यांचे अध्ययनही योग्य प्रकारे झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या काॅलेजच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी काही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनेही केली.

बहुतांश महाविद्यालयांच्या परीक्षा जूनमध्ये सुरू होत आहेत; तर काही स्वायत्त महाविद्यालयांच्या परीक्षाही झाल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे निकाल लवकर जाहीर होतील, तर काहींचे उशिरा.. त्याचाही परिणाम पुढील शिक्षणावर होणार आहे..

मुंबई हायकोर्टाचा निर्णय

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या महाविद्यालयीन परीक्षांबाबत काही विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी (30 मे) सुनावणी झाली.

मुंबई हायकोर्टाने विद्यार्थ्यांना दिलासा देताना, महाविद्यालयीन परीक्षांसाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी एकसमान पद्धत वापरावी, असा निर्णय दिला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी येत्या 1 जूनला याचिकाकर्ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी व राज्य सरकारमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे

मोठी बातमी! ‘School Bus’मध्ये आता ‘ जीपीआरएस' गोष्ट बंधनकारक.

 


मुंबई (प्रतिनीधी)  शालेय विद्यार्थ्यांचा प्रश्न दर काही दिवसांनी समोर येत असतो. त्या त्या काळात त्यावर प्रतिक्रिया येतात नंतर पुढे मात्र काहीच होत नाही. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणे आणि त्यांच्या एकूण प्रवासातील सुरक्षीतता हा प्रश्नही अनेकदा मांडला गेला आहे. याचे तोटेही विद्यार्थ्यांनी व पालकांनी भोगलेले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेबाबत एक मोठा निर्णय अप्पर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) घेतला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील स्कूल बस नियमावलीची सक्ती तातडीने करणे आणि प्रत्येक स्कूलबस मध्ये जीपीआरएस बसवण्यासाठी सूचना अप्पर पोलीस महासंचालकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एक मोठी घटना घडली. विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस तब्बल 4 तास उशिरा पोहोचली. मात्र या 4 तासात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती.

बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने नेहमीच्या मार्गापेक्षा अन्य मार्गाने बस गेली. विद्यार्थी सुखरूप आपापल्या पालकांकडे पोहचले. मात्र त्यानंतर जागे झालेल्या शाळा प्रशासन आणि पालक यांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशाच प्रकारच्या घटना इतर काही शहरांमध्ये सुद्धा घडल्याचं समोर आलं. यासंदर्भात मनविसे यांनी शालेय शिक्षण विभाग आणि पोलिसांना पत्र लिहून याबाबत नियमावली कडक करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आता राज्यात स्कूल बस नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचलकांनी (वाहतूक) परिवहन विभागाला दिल्या आहेत. यानुसार राज्यात प्रत्येक ‘स्कूलबस’मध्ये ‘जीपीआरएस’ बसवणं अनिवार्य असणार आहे.

जूनमध्ये नवं शैक्षणिक वर्ष सुरू होत असून राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू असलेल्या बस सेवांमधील त्रुटी दूर करण्याची गरज असल्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक स्कूलबसमध्ये जीपीआरएस असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

धक्कादायक घटना रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या.


नाशिक (प्रतिनीधी) : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये देवळाली कॅम्पमध्ये दोघा मायलेकींनी रेल्वे खाली उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे अशी या आत्महत्या  करणाऱ्या मायलेकींची नावे आहेत. देवळाली कॅम्पमध्ये शिरोळे कुटुंब वास्तव्यास आहेत. मृत अनिता शिरोळे यांचे पती रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार आहेत. ते काही कामानिमित्त सोलापूरला गेले होते. त्यानंतर या मायलेकी दोघीचं घरात होत्या. यानंतर या दोघांनी अचानक मुंबई-नाशिकरोडकडे असलेला रेल्वेमार्ग गाठला आणि गीतांजली एक्सप्रेस खाली उडी घेऊन आत्महत्या  केली.

कारण अद्याप अस्पष्ट

या मायलेकीनी आत्महत्या  का केली याबाबत कोणतंही ठोस कारण पोलिसांच्या हाती लागलेलं नाही. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराम मायलेकीनी गीतांजली एक्सप्रेस पुढे आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मृत राखी शिरोळे हि महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तसेच त्यांची मोठी मुलगी विवाहीत आहे.

अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे या दोघीचं घरी होत्या. दोघींनी अचानक असे पाऊल का उचलले यामुळे पोलिसदेखील चक्रावून गेले आहेत. पोलीस उपनिरीक्षक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


मुंबई : सेवा शब्द उच्चारणे अतिशय सोपे आहे, परंतु सेवा करणे अतिशय कठीण काम आहे. समाज आपल्याला खूप काही देत असतो. त्यामुळे आपण समाजाचे फार मोठे देणे लागतो. यास्तव, डॉक्टरांनी तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील किमान एक महिना किंवा एक पक्षमास देशासाठी दिल्यास त्यांना आत्मिक आनंद लाभेल व त्यांचा अनुभव देखील वाढेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

‘सेवांकुर भारत’ या संस्थेच्यावतीने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या हेतूने सारागूर, म्हैसूर ‘एक आठवडा देशासाठी’ या शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या ९५ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तसेच डॉक्टरांनी राज्यपाल कोश्यारी यांची नुकतीच राजभवन येथे भेट घेऊन आपले अनुभवकथन केले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा, डॉ. यतींद्र अष्टपुत्रे, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. आरती आढे, महादेव पडवळ आदी उपस्थित होते.

सेवांकुर भारत या संस्थेने औरंगाबाद येथे सुरुवात करुन आज देशभरातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच डॉक्टरांचे संघटन झाल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आठवडी शिबीर आयोजित करून ‘सेवांकुर’च्या माध्यमातून समाजसेवेची भावना रुजवली जाते हे स्तुत्य कार्य असून सेवांकुरच्या कार्याचा वटवृक्ष व्हावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

डॉक्टरांनी डॉक्टरी पेशाचे ज्ञान घेताना उत्तम वक्ते, उत्तम शिक्षक तसेच उत्तम नेते देखील झाले पाहिजे असे सांगून उत्तम नेतृत्वगुण अंगी येण्यासाठी अधिक सेवा करणे आवश्यक असते, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी डॉ.आरती आढे, डॉ. प्रशांत गायकवाड, डॉ. शालिवाहन गोपछडे, डॉ. रोहित गट्टेवार,
डॉ. प्रीती होळंबे तसेच शिबिरात सहभागी झालेल्या इतर वैद्यकीय विद्यार्थी व तज्ज्ञांनी शिबिरातील अनुभव कथन केले. राज्यपालांशी झालेल्या भेटीच्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या ६९ वैद्यकीय महाविद्यालयांमधील ९५ वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते.

मोठी बातमी! आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्बंध लागू होणार ? ठाकरे सरकार विचाराधीन?


प्रकरणे वाढत राहिल्यास, सरकारला निर्बंधांबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत राहिली तर महाराष्ट्र सरकारला काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यावर लक्ष ठेवावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाशी पुरेसा सल्लामसलत केल्यानंतरच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये किंवा नवीन निर्बंधांमध्ये कोणताही बदल करण्याचा विचार केला जाईल, असेही पवार म्हणाले.


दुसरीकडे, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना बीजिंग आणि शांघायसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये नवीन निर्बंध लागू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तेथे, प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर लोकांना घरीच राहण्याचा इशारा देण्यात आला आहे, असे टोपे म्हणाले. टोपे यांनी स्पष्ट केले की मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमध्ये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परिस्थिती फारशी चिंताजनक नाही,

परंतु त्याच वेळी ते सर्वांना सतर्क राहण्यास सांगतात. कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसतानाही, नागरिकांनी स्वयं-सावधगिरीच्या योजना कशा घेतल्या पाहिजेत यावर त्यांचा सल्ला दिला गेला. टोपे यांनी मत व्यक्त केले की प्रकरणांमध्ये वाढ टाळण्यासाठी मास्क घालणे आणि सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महाराष्ट्रात दररोज कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणे हजाराहून अधिक झाल्यास पुन्हा निर्बंध घालण्याचे संकेत दिले. याशिवाय, प्रकरणे वाढत राहिल्यास लॉकडाऊनचा इशाराही त्यांनी दिला.

Monday, May 30, 2022

नोटाबंदी , कलम ३७० नंतर मोदी सरकार लवकरच घेणार समान नागरी कायद्याचा मोठा निर्णय घेणार ?


देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं दमदार पाऊल टाकलंय. उत्तराखंडमध्ये समिती स्थापन झाली

असून तिचा अहवाल येताच कायद्याचा मसुदा तयार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.सर्वात मोठी बातमी:देशात समान नागरी कायदा लवकरच, हालचालींना वेग देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींनी वेग घेतलाय. याचा प्रयोग सर्वप्रथम भाजपशासित उत्तराखंडमध्ये केला जाणार आहे.


केंद्र सरकारनं उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी 5 सदस्यीय समिती तयार केली असून सर्वेक्षणला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय. या समितीच्या अहवालावर आधारित कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तकविधान, मुलांची कस्टडी, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबीक संपत्तीची वाटणी,


देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान राहतील.नवा कायदा लागू झाल्यानंतर हिंदू विवाह कायदा, हिंदू कुटुंब कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ, पारसी लॉ, इसाई लॉ किंवा अल्पसंख्याक धर्मांचे अन्य कायदे रद्दबातल होतील आणि त्याजागी एकच कायदा अस्तित्वात येईल.सुरूवातीला काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू केला जाईल. कालांतरानं


संसदेत कायदा संमत होऊन राज्यांचे कायदे केंद्रीय कायद्यात विलीन होतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. भारतीय राज्यघटना तयार करतानाही या कायद्याचा विचार झाला होता.शिवाय सुप्रीम कोर्टानंही वेळोवेळी अशा समान कायद्याची गरज बोलून दाखवलीये. मात्र जमियत उलेमा ए हिंदनं याला विरोध केलाय. देवबंद इथं झालेल्या जमियतच्या परिषदेमध्ये याविरोधात


ठराव करण्यात आलाय. पर्सनल लॉमध्ये बदल हे घटनेच्या कलम 25मधील वचनाचा भंग असल्याचं या ठरावात म्हटलंय.भाजपच्या निवडणूक शपथपत्रात समान नागरी कायद्याचं

आश्वासन देण्यात आलंय. आतापर्यंत मोदी सरकारनं CAA, अनुच्छेद 370 हटवणं, तीन तलाक बंद करणं, राममंदिर ही आश्वासनं पूर्ण केलीयेत. आता समान नागरी कायदा अस्तित्वात

आणून आणखी एक मोठी मजल मारण्याचा या सरकारचा इरादा स्पष्ट आहे.

मंकीपॉक्सचा लहान वयोगटातील मुलांना जास्त धोका; सरकारी यंत्रणा सज्ज.



मुंबई (प्रतिनीधी) आजारांचे थैमान काही केल्या संपायचे नाव घेत नाही, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालले आहे. कोरोना संपतच होता की जगभरात मंकीपॉक्सने धुमाकूळ घातला आहे. खरं तर मंकीपॉक्स हा आफ्रिकन आजार पण आज तो जगातील बहुतांश देशात जाऊन पोहचला आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सगळ्यांना याबाबत सावधानतेचा इशारा देखील दिला आहे. गेल्या 20 दिवसांत हा आजार 21 देशांत जाऊन पोहचला असून या आजाराचे खूप रुग्ण आढळले आहेत. भारतात अजुन एकही रुग्ण आढळला नाही, ही जरी दिलासादायक बाब असली तरी सरकार मात्र या बाबतीत सतर्क आहे

नुकतीच एक महत्वाची बातमी याबाबत समोर आली आहे. मंकीपॉक्सचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे देशात मुलांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून येतात का यावर बारीक लक्ष ठेवायला हवे , असा इशारा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) या संस्थेने दिला आहे. मंकीपॉक्सच्या विषाणूंमध्ये अद्याप एकही जनुकीय बदल झालेला नाही. मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतरही या विषाणूंमध्ये परिवर्तन झाल्याचे शास्त्रज्ञांना आढळलेले नाही

अर्जेंटिनामध्ये शुक्रवारी मंकीपॉक्सचे दोन रुग्ण सापडले. विशेष म्हणजे, दोन्ही विषाणूग्रस्त पुरुष रुग्ण नुकतेच स्पेनमधून अर्जेंटिना येथे आले आहेत. या विषाणूचे लॅटिन अमेरिकेत सापडलेले ते पहिले रुग्ण आहेत. या महिन्यात जगभर पसरलेल्या मंकीपॉक्स संसर्गाचा केंद्रबिंदू स्पेन हा देश आहे. शुक्रवारपर्यंत स्पेनमध्ये या संसर्गाचे 98 रुग्ण आढळले होते.

कीपॉक्सचे ब्रिटनमध्ये आजवर 106 पोर्तुगालमध्ये 74 रुग्ण सापडले. त्याशिवाय कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, इटली, अमेरिकेसह अन्य देशांतही हा आजार पसरला आहे. परंतु मंकीपॉक्सचा लहान मुलांना जास्त धोका असल्यामुळे त्यांच्या पालकांनी सतर्क राहून आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे गोळीबार झाल्याची घटना.एकजण जखमी.

 माजलगाव (प्रतिनीधी)  माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे ग्रामस्थांना मारहाण करून गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबारात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. यानंतर ग्रामस्थांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला.

माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे काही युवक रस्त्यावर येऊन थांबले असताना जीपमधून आलेल्या संतोष गायकवाड व इतर तीन ते चार जणांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जीपमधील एका व्यक्तीने या युवकांवर गोळीबार केला. यामध्ये साहेबराव जाधव हे जखमी झाले.

यानंतर हे लोक जीपमधून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ही जीप अडवून जीपमधील लोकांना बेदम चोप दिला. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारे लोक हे गावातीलच असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Sunday, May 29, 2022

नेपाळ,काटमांडू येथील 13 वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत बीडच्या विद्यार्थ्याना 14 पदके.

बीड (प्रतिनीधी) 13 वी NSKA आंतरराष्ट्रीय कराटेची स्पर्धा नेपाळ या देशाची राजधानी काटमांडू येथील रंगशाला आंतरराष्ट्रीय स्टेडीयम येथे आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून मूख्य प्रशिक्षक तथा कराटे असोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष अॅड.नितीन पवार सर यांनी काम पाहीले. व त्याचे सहकारी म्हणून महीला प्रतिनिधित्व आरती सतकर मॅडम व सूधीर आपरे सर. या स्पर्धेत बीड जिल्ह्य़ातील 14 विद्यार्थीच्या सहभाग होता.त्याच बरोबर मूख्य प्रशिक्षक अॅड.नितीन पवार सर यांनी तीथे रेफ्री व जज च्या परीक्षेत ही पास होऊन A प्लस ग्रेड घेतले. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये 3 सूवर्ण,6 रोप्य,5 कास्य पदके पटकावली.यात विद्यार्थी म्हणून सार्थक वाघमारे, अवनी सावंत, राणा नाईक, सारंग लांगोरे ,शुभम हावळे, तेजस सावंत, खूशी वाघमारे, शिवनंदन झोडगे, अथर्व गोसावी, अतुल घाडगे, नकुल भवर, दुर्गा कडू,व श्रेयस वाघमारे यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेला 6 विविध देश सहभागी होते.यामध्ये बीडच्या विद्यार्थ्यांकडून आपली मोलाची कामगीरी पत्कारत आर्यन योद्धा कराटे ग्रूप ( बीड जिल्हा ) आपल्या बीडच्या नावसोबतच आपल्या देशाचे सूध्दा नाव रोषन केले आहे.

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी व बनावट नोटांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी मोदी सरकारची नोटाबंदी फेल! तुमच्या खिशातील 500, 2000 रुपयांच्या नोटा बनावट तर नाही ना..? ‘आरबीआय’चा धक्कादायक रिपोर्ट..!


काळा पैसा बाहेर काढण्यासाठी, तसेच बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढल्याने मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर 1000 रुपयांची नोट कायमस्वरुपी बंद करुन 500 व 2000 रुपयांच्या नव्या नोटा छापण्यात आल्या..


मोदी सरकारने नव्या नोटा बाजारात आणल्यावर चलाख घोटाळेबाजांनी त्यांच्याही बनावट नोटा तयार केल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या 2020-21च्या अहवालातून ही बाब समोर आलीय.. विशेष म्हणजे, बनावट नोटांमध्ये 500 रुपयांच्या नोटेचे प्रमाण सर्वाधिक आहे. या नोटा हुबेहुब खऱ्या नोटांसारख्याच दिसत असल्याने अनेकांची फसवणूक होते..


बनावट नोटांचे प्रमाण


500 रुपये (नवे डिझाईन) : 101 टक्के

2000 रुपये : 54.6 टक्के

50 रुपये : 28.7 टक्के

100 रुपये : 16.7 टक्के

10 रुपये : 16.4

20 रुपये : 16.5

200 रुपये : 11.7 टक्के

विशेष म्हणजे, नोटाबंदी करताना 1000 हजारांची नोट कायमची बंद करण्यात आली होती. असे असताना, ताज्या अहवालात सदोष नोटांची आकडेवारी प्रसिद्ध करताना, त्यात 1000 रुपयांच्या 11 बनावट नोटा छापल्याचा उल्लेख आहे.


31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील घडामोडींची माहिती शिखर बँकेने अहवालाद्वारे प्रसिद्ध केलीय. त्यानुसार, बॅंकांच्या निदर्शनास येणाऱ्या या नोटा नव्या डिझाईनमधील आहेत. रिझर्व्ह बॅंकेत ज्या बनावट नोटा जमा झाल्या, त्यांचे प्रमाण आधीच्या वर्षीच्या तुलनेत 6.9 टक्क्यांनी वाढलेय, तर अन्य बँकांत त्यांचे प्रमाण तब्बल 93.1 टक्के इतके आहे.


अशी ओळखा 500 रुपयांची बनावट नोट


नोट दिव्यासमोर ठेवल्यास 45 अंशाच्या कोनातून पाहिल्यास देवनागरीत 500 लिहिलेलं दिसते.

महात्मा गांधींचे चित्र अगदी मध्यभागी दाखवले आहे. भारत व India ही अक्षरे दिसतील.

नोट हलकेच वाकवली, तर सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरव्यापासून ‘इंडिगो’मध्ये बदलताना दिसेल.


जुन्या नोटेच्या तुलनेत गव्हर्नरची स्वाक्षरी, हमी कलम, वचन खंड आणि RBI लोगो उजव्या बाजूला सरकले आहेत.

महात्मा गांधींचे चित्र व इलेक्ट्रो टाइप वॉटरमार्क दिसेल.

नोटेच्या वरच्या बाजूला डावीकडे नि तळाशी उजवीकडे संख्या डावीकडून उजवीकडे मोठी होत जाते.

500 क्रमांकाचा रंग हिरवा ते निळा होत जातो..

उजवीकडे अशोक स्तंभ आहे. उजव्या बाजूला 500 लिहिलेले वर्तुळ बॉक्स, उजव्या आणि डाव्या बाजूला 5 ब्लीड रेषा आणि अशोक स्तंभाचे प्रतीक, रफल प्रिंटमध्ये महात्मा गांधींचे चित्र.

नोट छापण्याचे वर्ष लिहिलेले असते. ‘स्वच्छ भारत’चा लोगो घोषवाक्यासह छापला आहे.

मध्यभागी एक भाषा फलक आहे. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे.


बनावट नोट मिळाल्यास..

तुम्हाला नोटेबाबत संशय आल्यास बँकेत जाऊन मशीनद्वारे त्याची सत्यता पडताळून पाहा. नोट बनावट निघाल्यास, स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करा. बनावट नोट व्यवहारांत आणणे किंवा ती फिरवणे हाही गुन्हा आहे.

जॅक रोडवर ठेवून दरोडा टाकणाऱ्या वाहनांची लुटमार करणारे मामा भाच्चे यांच्यासह पाचही आरोपींना न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलीस कोठडी.


जॅक रोडवर ठेवून लुटमार करुन दरोडा टाकणाऱ्या पाचही आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी.

केज  (प्रतिनीधी ) : रात्रीच्या वेळी महामार्गावर जॅक ठेवून वाहन अडवून वाहनातील लोकांना मारहाण करून त्यांच्याकडील नगदी ऐवज व दागिने काढून घेणाऱ्या वाटमारी प्रकरणातील आरोपीना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.केज तालुक्यातील मस्साजोगजवळ मध्यरात्री रस्त्यावर जॅक ठेवून वाहन अडवून लूटमार करणाऱ्या प्रकरणी दिनांक २८ मे रोजी बीड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन शिवाजी काळे वय २४ वर्षे रा.पारा ता.वाशी,पापा ऊर्फ काळ्या ऊर्फ आकाश बापु शिंदे वय २२ वर्षे रा. खोमनवाडी शिवार ता. केज,रामा लाला शिंदे वय २३ वर्ष रा.नांदुरघाट,दादा सरदार शिंदे वय ४५ वर्ष रा.नांदुरघाट,विकास ऊर्फ बाबा ज्ञानोबा पवार वय २२ वर्ष रा.चिंचोली माळी गायरान ता.केज यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी केज पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.दरम्यान दिनांक २९ मे रोजी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणी पोलीस कॉन्स्टेबल अशोक थोरात,जोगदंड, अशोक नामदास,संतोष गित्ते,शमीम पाशा आणी वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी आरोपीना अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक २ जून पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपीवर दाखल असलेले गुन्हे :- दिनांक ७ मे रोजी पहाटे ४:०० वाजण्याच्या सुमारास बीड कडुन अंबाजोगाईकडे जात असलेली कार मांजरसुंबा ते अंबाजोगाई जाणारे महामार्गावर सारणी-सांगवी पाटी जवळ रोडवर जॅक ठेवून कार चालकाने जॅक घेण्यासाठी कार थांबविली असता दबा धरुन बसलेले अनोळखी सहा ते सात अज्ञात आरोपीनी चालकाला व गाडीतील इतर लोकांना मारहाण करुन त्यांचेकडील रोख रक्कम व दागीने बळजबरीने लुटले होते. त्यावरुन पोलीस स्टेशन केज गु.र.नं.१६१/२०२२ भा.दं.वि.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच त्यानंतर बरोबर १५ दिवसानंतर दिनांक २३ मे रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा ते अंबाजोगाई जाणारे महामार्गावर मस्साजोग शिवारात रोडवर जॅक ठेवून ट्रक चालकाने जॅक घेण्यासाठी ट्रक थांबविल्यानंतर दबा धरुन बसलेले अनोळखी अज्ञात आरोपीनी ट्रक चालकाला मारहाण करुन त्यांचे कडील रोख रक्कम व दोन मोबाईल बळजबरीने लुटले होते. त्यावरुन पोलीस स्टेशन केज येथे गु.र.नं. १८८/२०२२ भा.दं.वि. ३९४ आणी ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे करण्याची पध्दतः-सदर आरोपी हे रात्रीच्या वेळी एकत्रीत येवून महामार्गावर जॅक ठेवून जॅक घेण्याच्या अमिषाने वाहन चालकाने वाहन थांबवून चालक जॅक घेण्यासाठी गेल्यानंतर दबा धरुन बसलेले आरोपी वाहन चालकाला तसेच वाहनातील इतर लोकांना मारहान करुन शस्त्राचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम, मौल्यवान वस्तु व इतर साहित्य बळजबरीने लुटमार करायचे.सदर आरोपींवर यापुर्वी चोरी, जबरी चोरी,दरोडा, घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे बीड आणी उस्मानाबाद जिल्हयात दाखल आहेत.सदर आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे बीड आणी उस्मानाबाद जिल्हयात दाखल आहेत.सदर आरोपीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.वरील गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्येमालाबाबत व त्यांनी केलेल्या आणखी गुन्ह्या बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आणी पोलीसउपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.बीड येथील गुन्हे अन्वेशन विभागाने केलेल्या तपासाबद्धल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

भारत देशात ओबीसीची जनगणना केल्याशिवाया सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकणार नाही.- वसंत मुंडे.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टी व आर एस एस ला संपूर्ण देशातुन आरक्षण रद्द करण्याचा त्यांचा अजेंडा आहे. देशातील शासकीय सर्व यंत्रणेला भारतीय जनता पार्टीने हाताशी घरून आरक्षण रद्द करण्याची मोहीम आखली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष कोर कमिटी सदस्य वसंत मुंडे यांनी केला.  ६ डिसेंबर २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला खूप मोठ्या प्रमाणावर धक्का बसला असून आता तरी ५२/ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येण्याचे आव्हान काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केले.  ओबीसीला संपूर्ण आरक्षण १९९० पासून बी पी मंडल आयोगामुळे लागू झाले, त्यावेळेपासून मनुवादी संस्कृतीला आरक्षण घालण्यासाठी २०२१ साल उजळले . भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग  यांच्या कार्यकाळात ओबीसी जनगणना करण्यात आली, त्यामध्ये इम्पिरियल ओबीसीचा डाटा देण्यासंदर्भात सध्याच्या भाजपा सरकारने वेळकाढू धोरण स्वीकारले व आमच्याकडे इम्पिरियल ओबीसी जनगणनेचा डाटा मुद्दे निहाय उपलब्ध नाही असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले.त्यामुळे आज  महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील ओबीसी आरक्षणावर गदा आलेली आहे . आरक्षणासंदर्भात वास्तव दर्शन माहिती संकलित केल्याशिवाय ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षणाचा जागा राज्य निवडणूक आयोगाला  देताना अडचणी निर्माण  खंडपीठाने स्पष्ट  आदेश केल्यामुळे   झाली . १३ डिसेंबर२०११ जातिनिहाय जनगणना संदर्भात एसीपीसी संदर्भ देऊन ओबीसी जातीची कच्ची यादी देण्याकरिता महाराष्ट्र सरकारने केंद्रिय प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केलेला आहे . परंतु आज तागायत माहिती देण्यात आलेली नाही.  भाजप सरकारकडून ओबीसीची वास्तवदर्शी माहिती संकलित केलेली देण्यासंदर्भात  राज्य सरकारला अडचणीत निर्माण केल्या. ओबीसी चा डाटा ही राष्ट्रीय संपत्ती आसुन त्यावर मनमोहन सिंग सरकारने पाच हजार कोटी रूपये खर्च केलेला आहे. ती सर्वस्वी जबाबदारी भारत सरकारची असून देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री, असताना १२ जून २०१८ ला केंद्र सरकारने पत्रव्यवहार केलेला आहे . पण ती गुपित माहिती ठेवण्याच्या त्यांना सूचना होत्या, कारण आर एस एस व बीजेपीचा भारत देश मधील संपूर्णआरक्षण मुक्त नारा असल्यामुळे, ओबीसीचे आरक्षण आज गेलेले आहे.
भारत देशामध्ये पशुपक्ष्यांची जनगणना केली जाते, परंतु ओबीसी जनगणना  का होत नाही ? देशात आकडेवारी जर ओबीसींना संपूर्ण माहित
 झाली तर तामिळनाडू ओ बी सी पॅटर्न देशात लागू व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून केंद्र सरकार जनगणना करीत नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला.  महाराष्ट्र मध्ये ग्रामपंचायत२७८५५ असून ३५१ पंचायत समित्याआहेत २३६ नगर परिषद तर १२४ नगरपंचायती २७ महा नगरपालिका ३४ जिल्हा परिषद सात विभागीय मंडळे सहकार व शैक्षणिक अनेक संस्था असून स्थानिक  स्वराज्य मतदार संघातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा फटका एकूण २८६३४,व पंचायतराज संस्थानातून एक लाखापेक्षा जास्त सदस्य राजकीय आरक्षणामुळे ओबीसी चे निवडून येत होते. आज खूप मोठ्या प्रमाणावर ओबीसी च्या पुढे राजकीय आरक्षणासंदर्भात मोठे संकट उभे राहिले आहे. त्याकरिता सर्व समाज बांधवांनी रस्त्यावर येऊन लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करावे व राज्य सरकार व केंद्र सरकारने ओबीसीला आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात पाठपुरावा करावा. २७ सप्टेंबर २०१९ ला महाराष्ट्र सरकारने ठराव घेऊन राजकीय ओबीसी आरक्षण संदर्भात न्यायालयाकडे व शासनाकडे माहिती दिलेली आहे . परंतु राज्याचे राज्यपाल यांनी छोट्या चुका काढून जाणून-बुजून आरक्षण रद्द कसे होईल यासाठी  आदेश काढल्यामुळे खरे आरक्षण गेले. राजकीय पक्षातील नेत्यांनी ठरवले तर आज हे आरक्षण मिळू शकते त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. समर्पिता आयोग डाटाचा अहवाल वर आरक्षण मिळणार नाही. देशात ओबीसी जनगणना करणे ही काळाची गरज आहे. तरच सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण ओबीसीचे टीकेल. भारतामध्ये ओबीसी ची लोकसंख्या 50 ते 70 टक्के आहे . देशांमध्ये तामिळनाडू मॉडेल ग्रामपंचायत ते विधान मंडळा पर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लागू झाले पाहिजे. त्यामुळे तामिळनाडू राज्याने ओबीसी आरक्षण संदर्भात ६९ टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे पूर्णपणे तामिळनाडू राज्य मध्ये ओबीसी चे सरकार  मुख्यमंत्रीसह  कामकाज करीत आहे. आर .एस .एस व भाजपला  भारत देश आरक्षण मुक्त करण्यासाठी त्यांची रणनीती चालू आहे, त्यासाठी ओबीसी बांधवांना सावध राहा.  आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपला लढा चालू ठेवावा असे आवाहन काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा - रमेश सरवदे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) धनगर समाजाचे आराध्य दैवत कर्मयोगिनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर  यांच्या जयंती निमित्त सर्व समाज बांधवानी जयंती घराघरांत उत्साहात साजरी करावी असे आवाहन युवक कार्यकर्ते रमेश सरवदे यांनी केले आहे.
येत्या 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे  तरी सर्व समाज बांधवांनी जयंती अगदी उत्साहात साजरी करावी असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे रमेश सरवदे यांनी केले आहे..महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात वाड्या-वस्त्यांवर उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सातबारा कायदा अहिल्यादेवी च्या काळात विकसित झाला. शेती व्यापार इतर व्यवसाय त्यांची भरभराट केली आजचा सातबारा कायदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच्या काळात विकसित झाला होता. राजकारण समाजकारण अर्थकारण विकास करणे आदी क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्यामुळे त्यांनी दिलेल्या कार्याची प्रचंड गरज म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन युवक कार्यकर्ते रमेश सरवदे यांनी केले आहे.

मालकी हक्काच्या जागेतून फुकट रस्ता द्यावा म्हणून प्रशासनावर दबावतंञाचा वापर.

केज (प्रतिनीधी) : शहरात मालकी हक्काच्या जमीनीतुन फुकट रस्ता द्यावा म्हणून काही गावगुंडानी प्रकरण सुरु असताना तहसील कार्यालयाला उपोषणाचा इशारा देऊन महसुल प्रशासनावर दबाव टाकू लागले आहेत.केज शहरातील धारुर रोड वरील सर्वे.नं.११८/५ मधील मुळ जमीन मालकाकडून ही जागा सय्यद अमजद व फुरखान शेख यांनी २०१२ साली रितसर खरेदीखत करुन घेतली होती खरेदी खत आधारे नगरपंचायत व सात बारावर कायदेशीर नोंद करुन घेतली असुन या जागेचा प्रकरण न्यायालयात व तहसील कार्यालयात सुरु असुन काही खंडणीखोर लोंकाच्या भडकावणीत येऊन काही नागरिकांनी तहसील कार्यालयाला उपोषणाचे निवेदन देवून महसुल प्रशासनावर दबाव टाकू लागले आहेत.सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना उपोषण करणाऱ्या वर गुन्हे दाखल करा अशी मागणी जागा मालकाच्या वतीने करण्यात आली आहे.”त्या”शेतकऱ्यांनी केला न्यायालयाचा अपमानया जागेचा प्रकरण केज न्यायालयात सुरु असुन दिवानी न्यायालय क्र.१६६/२०२२ जुनियर डीव्हीजन जे.एम एफ सी कोर्ट केज येथे हे प्रकरण सुरु असुन मालकी हक्काच्या जागेतून रस्ता फुकट मिळावा म्हणून या शेतकऱ्यांनी थर्डपार्टीला या प्रकरणात सहभाग घेतला होता मात्र पुराव्या अभावी त्या शेतकऱ्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

वरिष्ठ शाखा प्रबंधक कॅनरा बॅक मुंबई चे अनंत इप्पर यांची महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी निवड.

 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी आनंत शिवाजीराव ईप्पर वरिष्ठ शाखा प्रबंधक कॅनरा बॅक मुंबई यांची निवड करण्यात आली आहे. सन 2012 मध्ये गोवा राज्यात पणजी सह विविध शाखांमध्ये सहायक प्रबंध म्हणून बँकिंग क्षेत्रात कार्याला सुरुवात त्यानंतर मुंबई येथे विदेश विभाग शाखेतून दोन वर्ष अंतरष्ट्रिया व्यापार संबंधी व्यवहार हाताळले. अकोला जिल्हातील मूर्तिजापूर येथे काम करत असताना समाजातील बेरोजगारी व गरिबी निर्मूलनकरण्यासाठी बँकेमार्फत विविध सरकारी योजनांचा लाभ गरीब व बेरोजगार पर्यंत मिळवून देण्याचा मह्त्वपूर्ण योगदान.पुणे येथे वरिष्ठ प्रबंधक म्हणून मानव विकास शाखेत काम करीत असताना  तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता मोलाचे योगदान दिले.सण 2022 पासून माटुंगा, मुंबई येथे वरिष्ठ प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. पुणे विद्यापिठातून गरीबी व बेरोजगारी निर्मुलन बाबत बँकाची भूमीका या विषयावर  संशोधन (पीएचडी) सुरू ईप्पर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहे. 
   एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र च्या वतीने मागील 21 वर्षापासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील एकता गौरव पुरस्कार,समाजरत्न, जीवनगौरव पुरस्कार आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव या पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,पत्रकारिता,कला. क्रीडा, साहित्य, वैद्यकीय, सहकार, उद्योग, बचतगट आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारा साठी पाञ व्यक्तींनी दि. 22 में 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी केले आहे.   
      या पुरस्काराचे वितरण 2 जून 2022 गुरूवार दुपारी 3 वा.रोजी लोकप्रतिनिधी मान्यवर  आणि सिनेकलावंत यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे.या कार्यक्रमास आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे, सामाजीक न्याय मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकंत्री ना.धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडीत शंकर प्रसाद अग्नीहोत्री, अध्यक्ष जयमहाकाली शिक्षण संस्था वर्धा, तसेच विशेष उपस्थिती मा.आ.वजाहद मिर्झा, मेघराज भोसले, आ.विक्रम काळे, आ.राहुल पाटील, मा.खा.तुकाराम रेंगेपाटील, नशीब सिद्दीकी, नरेंद्र वि.वाबळे, अली खान सिनेअभिनेता, अनिल नरडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार भवन आझाद मैदान, बाळशास्त्री जांबेकर चौक, महानगर पालीका मार्ग मुंबई  संपन्न होणार आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा महाराष्ट्रात शिरकाव ! पुण्यात सात रूग्ण.खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आवाहन .


मुंबई  (प्रतिनीधी) : कोरोना पुन्हा वाढू लागला असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन  आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले असतानाच चिंताजनक बातमी समोर आली असून कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने महाराष्ट्रात शिरकाव केला असून पुण्यात सात रुग्ण आढळले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तो अजून पूर्णपणे संपला नाही त्यामुळे खबरादारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार हे सतत करत आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेची तलवार टांगती असतानाच नव्या व्हेरीयंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाल्याने आता चिंतेत अधिक भर पडली आहे. B.A.4 आणि B.A.5 या दोन्ही वेरीयंटने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे आणि दोन्ही वेरीयंटचे मिळून सात रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. 


B.A.4 आणि B.A.5 या दोन्ही वेरीयंटमुळे जगात चिंता निर्माण झाली असतानाच तो आता महाराष्ट्रात आणि पुण्यात दाखल झाला आहे. पुण्यात B.A.4  चे चार आणि B.A.5 चे तीन रुग्ण आढळल्याचे बी जे मेडिकल कॉलेजच्या समन्वयाने करण्यात आलेल्या  जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे आता चिंता वाढली असून प्रत्येकाने खबरदारी घेण्याची अत्यावश्यकता निर्माण झाली आहे. मागील २४ तासात महाराष्ट्रात ५२९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून उपचार घेत असलेल्या ३२५ रुग्णाना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा रिकव्हरी दर ९८.०९ टक्के झाला आहे. पुण्यात आढळलेल्या नव्या व्हेरीयंट ने मात्र पुन्हा चिंता वाढवली आहे.  


दोन अडीच वर्षे कोरोनाने जगणे आणि मरणे देखील कठीण केले होते. तिसरी लाट पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत तितकीशी प्रभावी ठरली नाही परंतु काही प्रमाण का होईना पण तिसऱ्या लाटेने देखील नुकसान केले आहे. तिसरी लाट संपण्याआधीच चौथी लाट येण्याची चर्चा सुरु झाली होती. काही दिवस गेल्याने चौथी लाट आता येणार नाही असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट असेल असे आधीपासूनच अभ्यासकांनी सांगितलेले आहे त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णांची अधिक चिंता निर्माण होऊ लागली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत गेल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत पण तरीही गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अवश्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून केंद्र शासनाने आधीच राज्यांना सूचना केलेल्या आहेत. कोरोनाला अटकाव करणारी पंचसूत्री पाळण्याचे आवाहं केले आहे यात मास्क, सामाजिक अंतर, लसीकरण यांचाही समावेश आहे परंतु राज्य शासनाने राज्यातील परिस्थिती लक्षात घेत मास्कची सक्ती केली नाही. आज मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्ण वाढत असल्याचे सांगत कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.  मुंबईसह राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत होता परंतु आता मुंबईमध्ये दर दिवशी सरासरी दोनशे रुग्ण आढळून येवू लागल्याने शासन आणि आरोग्य विभाग अधिक सर्तक झाला आहे. 


सर्व रुग्ण पुण्यातील !

नव्या व्हेरीयंट चे सर्व सात रुग्णअसून त्यांना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. ४ ते १८ मे या कालावधीतील हे रुग्ण असून या रुग्णांपैकी चार पुरुष तर तीन महिला आहेत. सदर रुग्ण २० ते ४० या वयातील असून यातील एक रुग्ण मात्र १० वर्षाच्या आतील आहे.

चौथ्या लाटेचा धोका कायम 

देशातील कोरोनाची तिसरी लाट जवळपास संपली आहे परंतु कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे. मुंबई तसेच पुणे या शहरात राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. 


मास्क आवश्यक !

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे परंतु कोरोना पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे प्रत्येकाने दक्षता बाळगावी आणि मास्कचा वापर करावा, लसीकरण करून घ्यावे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे ते वाढविण्यात यावे असे आवाहन  देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे.

Saturday, May 28, 2022

मंकीपॉक्सवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने जारी केला इशारा .


मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने इशारा जारी केला आहे. परिषदेच्या मते, या आजाराचा छोट्या मुलांना सर्वाधिक गंभीर धोका आहे. यामुळे त्याच्या लक्षणांवर नजर ठेवावी लागेल. सद्यस्थितीत भारतात मंकीपॉक्सच्या एकाही रुग्णाची पुष्टी झाली नाही. पण, सरकार याविषयी हायअलर्टवर आहे. दुसरीकडे, भारतीय प्रायव्हेट हेल्थ डिव्हाइस कंपनी ट्रिव्हिट्रॉन हेल्थकेअरने मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी एक RT-PCR टेस्ट किट तयार केली आहे. ही कीट एका तासाच्या आत आपला अहवाल देईल.

मलैंगिक पुरुषांसाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या मंकीपॉक्सचा जगात झपाट्याने प्रसार सुरू आहे. शुक्रवारी अर्जेंटिनातही या आजाराचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण नुकताच स्पेनवरुन परतला होता. देशात व्हायरसचा अन्य एक संशयितही आढळला आहे. तत्पूर्वी, मंगळवारी पश्चिम आफ्रिकेतून यूएईत परतलेल्या एका महिलेलाही मंकीपॉक्सची लागण झाल्याची पुष्टी झाली.

मंकीपॉक्सच्या लक्षणांत संपूर्ण शरीरावर पू भरलेले पुरळ, ताप, लिम्फ नोड्स सुजणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यांचा समावेश आहे.

ऍडोरा रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वीरित्या पार पडली लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पुरूषाचे केले महिलेत रुपांतर !


सोलापूर  (प्रतिनीधी) स्त्री किंवा पुरुषाचा देह घेऊन जन्म घेतला असला, तरी त्या देहातील मन विरोधी लिंगी असल्याची जाणीव झाल्यानंतर जगणेच अस्वस्थ होते. कधीकधी मुलांना आपण मुलगा असूनही मुलगी असल्याचा भास होतो. काही मुलींमध्ये पुरुषाप्रमाणे लैंगिक वर्तन दिसते, त्यांच्यात पुरुष होण्याची इच्छा अधिक असते. तर काही मुलांना आपण मुलगी असल्याचा भास होतो. अशाच प्रकारची एक लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे

सोलापुरातील ऍडोरा रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वीरित्या लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉ. शरण हिरेमठ यांनी शस्त्रक्रिया ही करून दाखवली आहे. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी एका पुरुषाच महिलेमध्ये रूपांतर केले आहे. संबधित तरुणाच्या कुटुंबीयांच्या संमतीनंतर आणि मानसिकरोग तज्ञांच्या सल्ल्यानंतरच ही लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे.

लिंग परिवर्तन करणाऱ्या तरुणाने त्यांची ओळख गुपित ठेवली असल्याने या तरुणाबाबत अधिक माहिती मिळून शकलेली नाही. परंतु, सुरूवातीला फक्त विदेशात होणारी ही शस्त्रक्रिया आता भारतातही आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही होत असल्याने अनेक लिंग परिवर्तन करू पाहणाऱ्यांच्या अडचणींचा मार्ग सुकर झाला आहे

दरम्यान, या शस्त्रक्रियेसाठी साधारण एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती डॉ. शरण हिरेमठ यांनी दिली आहे. त्याचबरोबर लिंग परिवर्तनानंतर पुरूषातून महिलेमध्ये परिवर्तन झालेल्या महिलेला मुलाला जन्म देता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

मोठी बातमी ! राज्यात येत्या 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु.

 

मुंबई (प्रतिनीधी) महाराष्ट्र पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे. राज्यात येत्या 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. एवढच नाही तर, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भविष्यात 15 हजार जागांसाठीचीही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचं वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे

मागील काही वर्षांपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे पोलीस भरती नेमकी कधी होणार? असा प्रश्न भरतीची तयारी करणाऱ्या व्यक्तींना पडला होता. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील तरूण पोलीस भरती प्रक्रिया लवकर येण्याची वाट बघत होते. म्हणून राज्यात येत्या 15 जूनपासून विविध पदांसाठी सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे

पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात येणार नाहीत. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्याक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. पोलिस उपअधिक्षक पदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत.

आकाशवाणी एफ.एम.केंद्र निर्मितीसाठी खा.सुप्रियाताई सुळे यांना रा.काँ.पक्षाच्यावतीने निवेदन. - चेतन सौंदळे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
भारतातील बारा ज्योतीर्लिंगापैकी श्री.वैजनाथ पाचवे ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ येथे तर महाराष्ट्रातील श्री.योगेश्वरी देवीचे प्रसिध्द मंदीर शैक्षणिक वारसा लाभलेल्या अंबेजोगाई येथे  आहे.याठिकाणी देशभरातून भाविक-भक्त व प्रवाशी मोठया प्रमाणात येतात तसेच परळी-अंबेजोगाई धार्मिक पुरातत्व सांस्कृतिक सामाजिक एैतिहासिक औद्योगिक व राजकीय दृष्टया मराठवाडयातील महत्तवाची शहरे आहेत परंतू याठिकाणी ईतर एफ एम केंद्राचे प्रसारण स्पष्ट ऐकू येत नाही त्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांना शिफारस करण्याची मागणी बीड-परभणी जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे परळी दौ-या निमित्त आले असताना निवेदनाद्वारे केली आहे.
 यावेळी रा.कॉ.पार्टीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख,उपनगराध्यक्ष शकील कुरेशी,नगरसेवक चंदूलाल बियाणी,सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक चेतन सौंदळे,आयुबभाई पठाण,अनिल अष्टेकर,गोपाळ आंधळे,विजय भोयटे,वैजनाथ सोळंके,शंकर आडेपवार,रा.कॉ.चे सरचिटणीस अनंत ईंगळे,रवी मुळे,जालिंदर नाईकवाडे,सचिन जोशी,सबाहतअली सय्यद,माने एस.व्ही.,राहुल जगतकर,संजय गित्ते,रा.काँ महिला शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई रोडे,सोफिया बाबू नंबरदार,यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
  सध्या अंबेजोगाई तालुक्यातील पिंपळा(धा.) येथील1991 साली सुरू झालेल्या उच्च शक्ती दुरदर्शन प्रक्षेपण केंद्राच्याद्वारे प्रसारीत होणारे नॅशनल व डी.डी.न्युज चॅनेल भारत सरकारने बंद केली असून त्यामुळे याठिकाणी पायाभूत सुविधा,जागा तसेच आवश्यक कर्मचारी संख्या उपलब्ध असल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे एफ एम-रेडीओ मिर्ची व लोकल रेडीओ स्टेशन सुरू करून तांत्रिक दृष्टया लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच अशाप्रकारचे केंद्र सुरू केल्यास स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळून हक्काचे व्यासपीठ मिळेल व मराठवाडयातील बीड,लातूर,उस्मानाबाद,परभणी,नांदेड जिल्हयातील लाखो लोकांना व प्रवाशी पर्यटकांना एफ एम केंद्राद्वारे सादर होणा-या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल.
त्यामुळे यास तातडीने मान्यता देवून आकाशवाणी केंद्राचे एफ एम,रेडीओ मिर्ची तसेच लोकल रेडीओ स्टेशन सुरू करण्याच्या मागणीसाठी  नगरसेवक चेतन सौंदळे व सहकार्यांच्यावतीने म.गांधी जयंतीनिमित्त 2 अॉक्टो.21रोजी दुरदर्शन उच्चशक्ती प्रक्षेपण केंद्र पिंपळा(धा.) येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.
   सदरील मागणीच्या अनुषंगाने मुंबई आकाशवाणी- दुरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक यांनी तातडीने प्रस्ताव मंजुरीसाठी प्रसारभारती,दिल्ली यांच्याकडे पाठविला होता परंतू अदयापही आकाशवाणी,एफएम निर्मिती केंद्रास मंजुरी मिळाली नसल्यामुळे तीव्र आंदोलनाचा ईशारा रा.काँ.पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.

निवेदने देऊनही गांभीर्याने लक्ष न दिल्याने आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनचे बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी      तालुक्यातील पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी माहिती आणि निवेदने देउनही आशा वर्कर्स यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने जिल्ह्यातील आणि तालुक्यातील आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक युनियनकडून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांनी दिला आहे.

परळी वै. पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी हे तालुक्यातील आशा वर्कर्सच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष करत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप तालुक्यातील आशा वर्कर्स यांनी केला असून गटप्रवर्तक युनियनचे रूपये १७०० प्रमाणे जुलै महिन्यापासूनचे फरक गटप्रवर्तक युनियनचे रूपये ३००० प्रमाणे सप्टेंबरपासूनचा फरक देण्यात यावा. तसेच कोविड लसीकरण मोबाईलायझेशन भत्ता मार्च २०२१ पासून देण्यात यावा. आरोग्य वर्धिनी मानधनात झालेली वाढ रूपये १५०० जुलै २०२१ पासून देण्यात यावे. कुष्ठरोग भत्ता मानधन देण्यात यावे. त्याचबरोबर १००० रु. प्रमाणे कोविड भत्ता सहा महिन्याचा देण्यात यावा. पल्स पोलिओचे एप्रिल २०२२ मानधन आणि ऑपरेशन केसेसचा मोबदलाही देण्यात यावा, अशा अनेक मागण्या बद्दल वेळीवेळी निवेदन देऊनही परळी वै. पंच्यायत समितीचे आरोग्य अधिकारी या प्रकरणी  कोणतीही कार्यवाही न करता आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या कामगारांना उडवाउडवीची उत्तरे देतात. व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. निवेदनात दिलेल्या मागण्या २९ मे २०२२ पर्यंत पूर्ण न झाल्यास तालुका कार्यालयासमोर ३० मे २०२२ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.

‘संभाजीराजेंचा गेम कोणी केला, कोणत्या पक्षाने केला’? आ.शिवेंद्रराजे भोसले .


मागील काही दिवसांपासुन संभाजीराजे छत्रपती हे राजकीय चर्चेत आहेत. राज्यसभा जागांवर होणाऱ्या निवडणुकांवरून सध्या रणधुमाळी सुरु असताना त्यांना उमेदवारी देण्याच्या घटनाक्रमांमुळे सध्या ते जास्त चर्चेत आले.

संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी नाकारली. त्यांना अपक्ष उभे राहायचे होते.

परंतु शिवसेनेनं शिवबंधन न बांधता पाठिंबा देण्यास नकार दिला. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. परंतु यंत्र मात्र राज्यभरातून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही प्रतिक्रीया दिली. संभाजीराजे यांचा गेम झाला असल्याची प्रतिक्रीया शिवेंद्रराजे यांनी दिली.

आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटत आहे त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कोणी केला, हे संभाजीराजेंना चांगलेच माहित आहे.

संभाजीराजेंच्या पाठिमागे महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे. त्यांच्या गडकिल्ले संवर्धनाचे काम, मराठा आरक्षण लढाईत त्यांचे योगदान आहे.

छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचा ओ.बी.सी. चेहरा भाजप नेत्या पंकजा मुंडे नव्याने पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत येणार?


मुंबई  (प्रतिनीधी) महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच वेगवेगळी नाट्यमय वळणे घेताना दिसते. नुकत्याच राज्यसभेच्या जागांसाठी सुरु असणारे राजकारण सर्वश्रुत आहे. परंतु आता तर विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. 20 जूनला सदर निवडणूक होणार आहे.

या जागेंवर उमेदवारी कुणाला मिळणार यावरून आता राजकीय चर्चा झडू लागल्या असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, ‘मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे’, असं म्हणत पंकजांनी आपल्या ‘मन की बात’ बोलून दाखवली आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पक्ष जे करेल ते योग्यच करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझी अशी कुणाशी चर्चा नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते.

आता हा पायंडा पडलेला आहे. पण माझी अशी कुणाशीही चर्चा झालेली नाही. अनेक नावं येत आहेत. माझ्या एकटीचं नाव पुढे येत नाहीय. अनेक जागा आहेत.

पक्ष जो निर्णय घेईल ते निर्णय झाल्यावरच कळेल असेही त्या म्हणाल्या. दरम्यान त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले की, मध्य प्रदेशने जे केलं ते या सरकारला जमलं नाही कारण राज्य सरकारने त्या पद्धतीने केलं नाही. ओबीसी आरक्षण वगळता निवडणुका होऊच नये हाच माझा आग्रह आहे.

कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपला

कुणाला संधी मिळणार? रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. आता भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे. सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला या ना त्या मुद्द्यावरून घेरले आहे.

त्यामुळे भाजपा त्यांना पुन्हा संधी देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडे सदस्य संख्या पाहता नवीन रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन.


मुंबई  (प्रतिनीधी) - देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय विकासामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाचे योगदान असून, यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रणी राज्य राहील. महाराष्ट्रातील संतांनी देशाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्याबरोबरच समाजाला नवी दिशा दिली, यातून हिंदुस्थानमध्ये नवीन चेतना जागृत झाली, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्यात राष्ट्रपती कोविंद बोलत होते. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, आंतरराष्ट्रीय बोन्सायतज्ञ डॉ. प्राजक्ता काळे, डॉ. डी. काय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच लक्ष्मीदत्त या कॉफिटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले.
रामनाथ कोविंद म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सरदारांनी हिंदुस्थान एकजूट करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. सामाजिक कामातही महाराष्ट्राने आघाडीची भूमिका बजावली. मुलींच्या शाळेच्या पहिल्या संस्थापक सावित्रीबाई फुले, देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांनी या भूमीला पावन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीतून शोषित, वंचितांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी कार्य केले आणि ते एक आदरणीय व्यक्तीमत्व ठरले.
दगडूशेठ दाम्पत्याने पुण्यात गणपती व लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा दिली. दगडूशेठ हलवाई यांनी लोकमान्य टिळकांसोबत राष्ट्रीयता आणि सामाजिक सद्भावनेचा स्रोत म्हणून उत्सवाला सुरुवात केली. तेच महाराष्ट्रात जनआंदोलन बनविण्याचे माध्यम झाले. महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असून, देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्र यापुढेही चांगले योगदान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला रामनाथ कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप कळसे-पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त ऍड. शिवराज कदम जहागिरदार उपस्थित होते.

अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसा निमित्त गेवराई येथे होणार मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर.

गेवराई (प्रतिनीधी) : मा.आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडुन मंगळवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वा. कृष्णाई येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्र तपासणी करुन निवडलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडुन करण्यात आले आहे. अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन गेवराई येथे होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेवराई शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंगळवार दि. 31 मे रोजी सकाळी 10 वा. कृष्णाई निवासस्थानी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, दुपारी 12 वा. कृष्णाई येथे अवयव दान संकल्प मोहिमेचा शुभारंभ, दुपारी 2 वा. मराठवाडा पदविधर मतदार संघाचे आ. सतिष चव्हाण यांच्या उपस्थितीत र.भ.अट्टल महाविद्यालय येथे कोविड योद्धयांचा सन्मान, दुपारी 4 वा. राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्या हस्ते कृष्णाई येथे होणार आहे. सायं. 5 वा. ई-श्रम कार्ड नोंदणी व कार्ड वितरण शुभारंभ होणार असुन दि. 1 जुन रोजी डॉ. सर्वोत्तम शिंदे यांच्या माध्यमातुन सकाळी 11 ते 3 यावेळेत श्रीसाई सोनोग्राफी व स्किन केअर सेंटर येथे त्वचा रोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु असुन मोबाईल क्रमांक 9049887750 व 8080063241 वर संपर्क करुन आपली नोंदणी करण्याचे आवाहन जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाकडुन करण्यात आले आहे.

भुसावळ - पालघर एस. टी. बस ला अपघात बस दरीत कोसळली !


भुसावळ (प्रतिनीधी)  : राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी बस पालघर येथील वाघोबा खिंडीत कोसळली असून यात पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून केला जाणारा प्रवास सुरक्षित मानला जातो पण अलीकडे एस. टी चे देखील अपघात होताना दिसत आहेत. भुसावळ - भोईसर मार्गावर असलेल्या पालघरच्या वाघोबा खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस उलट्या अवस्थेत कोसळली असून या अपघातात १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

 जखमींना पालघर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  भल्या सकाळी हा मोठा अपघात झाला असून चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (एस. टी. बस भल्या सकाळी दरीत कोसळली !

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून केला जाणारा प्रवास सुरक्षित मानला जातो पण अलीकडे एस. टी चे देखील अपघात होताना दिसत आहेत. भुसावळ - भोईसर मार्गावर असलेल्या पालघरच्या वाघोबा खिंडीत राज्य परिवहन महामंडळाची बस उलट्या अवस्थेत कोसळली असून या अपघातात १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पालघर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  भल्या सकाळी हा मोठा अपघात झाला असून चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  मद्यधुंद अवस्थेत बस चालक अत्यंत वेगाने बस चालवीत असल्याचा दावा जखमी झालेल्या प्रवाशांनी केला आहे. 

नाशिक येथे या बसचा चालक रातराणी बस सेवेंतर्गत बदलण्यात आला होता परंतु या चालकाने मध्यपान केले होते असे प्रवाशी सांगत आहेत. भरधाव वेगाने बस चालवत असताना पालघरच्या अलीकडेच वाघोबा घाटात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बस दरीत कोसळली. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे त्याला बस चालवू देवू नये असे आम्ही कंडक्टरला सांगत होतो पण कंडक्टरने दुर्लक्ष करून चालकाचीच बाजू घेतली त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे जखमी झालेल्या प्रवाशांचे म्हणणे आहे. 

बसमध्ये २५ प्रवासी 

भुसावळ - पालघर ही राज्य परिवहन महामंडळाची रातराणी बस नाशिकवरून निघाली होती आणि या बसमध्ये २० ते २५ प्रवाशी प्रवास करीत होते. वाघोबा घाटातील एका वळणावर वाहन चालकाचा ताबा सुटून बस उलटी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

मुलींना उशीरा लग्न करणं पडेल महागात…शारीरिक समस्यांचा धोका जास्त.


पुणे  : भारतातील मुलींच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर पूर्वीच्या काळी मुलींची लग्ने अगदी लहान वयात होत असत पण आता तसे राहिले नाही. आजच्या आधूनिक काळात मुलींनाही शिक्षण, नोकरी आणि करिअरमुळे उशिरा लग्न करायला आवडते. अनेक वेळा वाढत्या वयात लग्न झाल्यामुळे महिलांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच समस्यांबद्दल सांगणार आहोत.


जोडीदाराशी जुळवून घेणे कठीण : तरुण वयात महिलांचे लग्न झाल्याचा एक फायदा म्हणजे त्या तरुण असताना जोडीदाराशी जुळवून घेणे सोपे जाते. पण जेव्हा तुम्ही दीर्घकाळ अविवाहित आणि स्वतंत्र राहता तेव्हा मोठ्या वयात लग्न झाल्यावर नवऱ्याच्या आवडीनिवडी आणि गरजांशी ताळमेळ राखणे काहीसे अवघड होऊन बसते. यामुळे अनेकदा नातेसंबंधात दुरावा येतो.


गरोदर राहण्यात अडचण : वयानुसार महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. एका संशोधनात असे म्हटले आहे की वाढत्या वयामुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही मूल होण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याशिवाय वाढत्या वयानुसार महिलांना गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागतो आणि गर्भपात आणि प्रसूतीमध्ये अडचणी येतात. वृद्ध पालकांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना डाउन सिंड्रोम (मानसिक आणि शारीरिक विकार आणि इतर शारीरिक समस्यांचा धोका जास्त असतो.

" या " जिल्ह्यात मंकीपॉक्सची दहशत ‘त्यांची’ होणार तपासणी.

अहमदनगर (प्रतिनीधी) सुमारे दोन ते तीन वर्षे कोरोनाने संपूर्ण जग हैराण झाले होते. मात्र सद्या जगातील बहूतांशी देशात कोरोना संक्रमण फैलाव मंदावला आहे. मात्र आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कारण बेल्जियम, अमेरिका, ब्रिटन या देशात मंकीपॉक्सने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत

यां व्हायरसचा एकही रुग्ण भारतात आढळून आलेला नाही. मात्र तरीही राज्य सरकारच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा देखील अलर्ट झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात गजबजलेले एअरपोर्ट असलेल्या शिर्डीत प्रशासनाने कंबर कसली आहे

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील एअरपोर्टवर कोविडमध्ये ज्या प्रकारे प्रवाश्यांची तपासणी केली गेली होती, तशाच प्रकारची मंकीपॉक्सची तपासणी करण्यात येणार आहे. एअरपोर्टवर बाहेर राज्यातून किंवा देशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये लक्षणे आढळून आल्यास संबंधितास विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटले आहे की,  मंकीपॉक्स विषाणूच्या 20 पेक्षा जास्त देशांमध्ये 200 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. तसेच 100 पेक्षा जास्त संशयित प्रकरणे आढळली आहे. या आजाराचा वेगाने होत असलेला प्रसार पाहता जागतिक आरोग्य संस्थेने राष्ट्रांना संसर्गजन्य रोगावर पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे.


राज्यात सरकारी बदल्यांना स्थगिती, 30 जूनपर्यंत कोणतीही प्रशासकीय बदली नाही,सरकारचा महत्त्वाचा निर्णय.





*आता पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रशासनातील एकही बदली होणार नाहीये. अगदीच तातडीची बदली असेल ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनेच करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे.

मुंबई (प्रतिनीधी) बदल्यांसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी किंवा बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्य सरकारने याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घएतला आहे. ३० जूनपर्यंत  राज्यात एकही सरकारी बदली करु नये,असे आदेशच राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे आता पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रशासनातील एकही बदली होणार नाहीये. अगदीच तातडीची बदली असेल ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनेच करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले आहे.


काय लिहिले आहे या परिपत्रकात

यात लिहिले आहे की- महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी ३० जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. परंतु, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्येतेने करावी.


कोरोनाकाळापासून बदल्या स्थगित

राज्यात वाढलेल्या कोरोना संक्रमाणामुळे, गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही शासकीय बदल्या झालेल्या नाहीत. आता या निर्णयामुळे बदल्यांची प्रक्रिया आणखी एक महिना लांबणीवर पडलेली आहे. बदल्या तूर्तास करु नये, याबाबतची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याची माहिती आहे. दोन वर्षे बदल्या न झालेले अनेक शासकीय कर्मचारी सध्या बदली कधी होणार या प्रतीक्षेत आहेत, अनेकांना त्यांच्या हव्या त्याठिकाणी बदली मिळणार का, याकडेही त्यांचे लक्ष आहे. अशा स्थितीत आता बदल्या लांबणीवर पडल्याने आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचे अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य परळीत स्वागत.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)        खा.सुप्रियाताई सुळे शुक्रवार दि.27 मे रोजी परळी शहरात आल्या असता त्यांचे अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब चौक येथे टाळ, मृदंगाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.
खा.सुप्रियाताई सुळे यांचे परळी नगरीत येताच टाळ मृदंगाच्या गजरात अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने कोकाटे महाराज व गोविंद महाराज यांच्या  भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचे अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रमासाठी आल्या असून त्या सोनपेठ वरून परळी मार्गे आज सायंकाळी लातूरला जाणार असल्याचे कळताच वारकरी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ फेटा व श्री विठ्ठलाची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.

 परळी शहरात  स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब चौकात खा.सुप्रियाताई सुळे यांचे स्वागत सत्कार करण्यासाठी उपस्थित  ह.भ.प गोविंद महाराज नंदनंजकर,ज्ञानेश्वर  महाराज कतारे यांच्यासह कन्हैया वारकरी संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते

Thursday, May 26, 2022

हलगर्जीपणाचा ठपका ठेवत लातुर मनपा सचिव अश्विनी देवडेंवर आयुक्तांकडून निलंबनाची धडक कारवाई.


*महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी काढलेल्या विषय पत्रिकेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नगरसचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

लातूर (प्रतिनीधी)  महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी काढलेल्या विषय पत्रिकेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवत नगरसचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमन मित्तल यांनी आदेश दिले आहेत. सचिव अश्वनी देवडे यांना यापूर्वी कारवाईच्या संदर्भाने प्रारंभी नोटीस बजावली. त्याचा खुलासा २४ तासात मागवला होता. मात्र खुलासा समाधानकारक नसल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.
लातूर महापालिकेची पंचवार्षिक मुदत २१ मे रोजी संपण्याच्या एक दिवस आधी २० मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. विशेष सभा २० मे रोजी असताना त्याची विषय पत्रिका १० मे रोजी काढण्यात आली होती. विषय पत्रिका महापालिकेच्या सदस्यांना १८ मे रोजी म्हणजे आठ दिवसांनी उशिरा देण्यात आली.
विशेष सभेच्या आयोजनात हलगर्जीपणाचा ठपका

महापालिकेच्या या विषय पत्रिका वितरणाच्या कामात व विशेष सभेच्या आयोजनात हलगर्जीपणा झाल्याची बाब निदर्शनास आल्याने शिस्तभंग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आपणावर कारवाई का करण्यात येऊ नये, यासंबंधी २४ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. समाधानकारक खुलासा सादर न केल्यास नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असेही त्यात कळवले होते.

रोजची उपस्थिती बंधनकारक, विनापरवाना मुख्यालय सोडता येणार नाही

यानुसार नगरसचिव अश्विनी देवडे यांच्याकडून सादर केलेला खुलासा समाधानकारक न वाटल्याने आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच मनपा सचिव अश्विनी देवडे यांना निलंबित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी घेतला आहे. निलंबनाच्या आदेशात त्यांना विनापरवाना मुख्यालय सोडता येणार नाही व रोजची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

वाळुमाफीयाची दशहत वाळू माफियाकडून शेतक-यावर जीवघेणा हल्ला.


किल्लारी  (प्रतिनीधी)  येथे वाळुमाफीयाची दशहत निर्माण झाली आहे. नदी काठावरील शेतातील वाळु आरेरावी करून घेऊन जात आहेत. एका शेतक-याने त्यास विरोध केला असता शेतक-यावर ट्रॅक्टर खाली पाडून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे.

किल्लारी येथील शेतकरी पिता-पुत्राने शेतातील दरडीची वाळू खणून घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे मुलगा रामानंद ( राम ) यास मारहाण करून आडवे पाडले व ट्रॅक्टरवरून घातले त्यामुळे पोट, हात, डोक्यास गंभीर मार लागला. यात ते जखमी झाले. या प्रकरणी अरोपी महादू शशीकांत पांढरे, सुधाकर सहदेव दंडगुले, दिलीप दंडगुले, मधुकर दंडगुळे या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पैकी तीन अरोपींना अटक करण्यात आली आहे. शेतकरी बाळु बिराजदार हा किल्लारी येथील तेरणा नदी काठावरील सर्वे नं १९८ मधील शेतात काम करीत आसताना वाळु तस्करी करणारे, महादू शशिकांत पांढरे, सुधाकर सहदेव दंडगुले, दिलीप दंडगुले, मधुकर दंडगुले यानी संगनमत करून फि­र्यादीच्या शेतातील दरडमधील वाळु नेत आसताना फिर्यादी शेतक-यांने अडविले आसता अरोपी महादु पांढरे व दिलीप दंडगुले यानी शिवीगाळ करुन तुझ्या बापाची जागा आहे का वाळु घेऊन जाणार तुला काय करावयाचे ते कर आडवे आलास तर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालून तुला ठार मारु असे म्हटले.

यानंतर शेतकरी बाळू बिराजदार याने आपला मुलगा रामानंद (राम ) यास फोन करून बोलावून घेतले. मुलाने असे का करता म्हणून विचारले आसता अरोपीने शिवीगाळ करून सुधाकर दंडगुले यानी मुलाच्या गच्चीस धरून वाळू का घेऊन जाऊ देत नाहीस म्हणून मारहाण केली भांडणाचा आवाज ऐकून शेजारचे बलभीम घोटाळे व विशाल आंदुडगे याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला आसता अरोपी महादू पांढरे याच्या मोबाईलवर अरोपी ने मि मधुकर दंडगुले बोलतोय ट्रक्टर माझा आहे जाऊदे नाही तर तुला खलास करतो, अशी धमकी दिली.

सुधाकर दंडगुले व दिलीप दंडगुले यानी फिर्यादीच्या मुलास तू तलाटी व तहसीदार यांना फोन का? केला म्हणून गच्चीला धरुन आवळले व महादु पाढरे याने त्याला टॅक्टर खाली घालून मारहाण करुन पळून जा तलाठी येत आहे तेव्हा रामानंद ( राम ) याने ट्रॅक्टरची चावी घेण्याचा प्रयत्न केला आसता रामानंदच्या कमरेवर लाथ मारून खाली पाडले व जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर ट्रॅक्टर घालून पळुन गेला त्यामळे पोटावर, हाताला, डोक्यास मार लागून गंभीर जखमी केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. जखमीवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनी सुनील गायकवाड हे करीत आहेत. पोलिसानी या प्रकरणी पालिसांनी तीन अरोपींना अटक केली आहे