परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र गौरव पुरस्कारासाठी आनंत शिवाजीराव ईप्पर वरिष्ठ शाखा प्रबंधक कॅनरा बॅक मुंबई यांची निवड करण्यात आली आहे. सन 2012 मध्ये गोवा राज्यात पणजी सह विविध शाखांमध्ये सहायक प्रबंध म्हणून बँकिंग क्षेत्रात कार्याला सुरुवात त्यानंतर मुंबई येथे विदेश विभाग शाखेतून दोन वर्ष अंतरष्ट्रिया व्यापार संबंधी व्यवहार हाताळले. अकोला जिल्हातील मूर्तिजापूर येथे काम करत असताना समाजातील बेरोजगारी व गरिबी निर्मूलनकरण्यासाठी बँकेमार्फत विविध सरकारी योजनांचा लाभ गरीब व बेरोजगार पर्यंत मिळवून देण्याचा मह्त्वपूर्ण योगदान.पुणे येथे वरिष्ठ प्रबंधक म्हणून मानव विकास शाखेत काम करीत असताना तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याकरिता मोलाचे योगदान दिले.सण 2022 पासून माटुंगा, मुंबई येथे वरिष्ठ प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. पुणे विद्यापिठातून गरीबी व बेरोजगारी निर्मुलन बाबत बँकाची भूमीका या विषयावर संशोधन (पीएचडी) सुरू ईप्पर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.
एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र च्या वतीने मागील 21 वर्षापासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील एकता गौरव पुरस्कार,समाजरत्न, जीवनगौरव पुरस्कार आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव या पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक,पत्रकारिता,कला. क्रीडा, साहित्य, वैद्यकीय, सहकार, उद्योग, बचतगट आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारा साठी पाञ व्यक्तींनी दि. 22 में 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजमत खान यांनी केले आहे.
या पुरस्काराचे वितरण 2 जून 2022 गुरूवार दुपारी 3 वा.रोजी लोकप्रतिनिधी मान्यवर आणि सिनेकलावंत यांच्या हस्ते मुंबई येथे होणार आहे.या कार्यक्रमास आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे, सामाजीक न्याय मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकंत्री ना.धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल नबी सत्तार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडीत शंकर प्रसाद अग्नीहोत्री, अध्यक्ष जयमहाकाली शिक्षण संस्था वर्धा, तसेच विशेष उपस्थिती मा.आ.वजाहद मिर्झा, मेघराज भोसले, आ.विक्रम काळे, आ.राहुल पाटील, मा.खा.तुकाराम रेंगेपाटील, नशीब सिद्दीकी, नरेंद्र वि.वाबळे, अली खान सिनेअभिनेता, अनिल नरडी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार भवन आझाद मैदान, बाळशास्त्री जांबेकर चौक, महानगर पालीका मार्ग मुंबई संपन्न होणार आहे.
No comments:
Post a Comment