Saturday, May 28, 2022

भारतीय जनता पार्टीचा ओ.बी.सी. चेहरा भाजप नेत्या पंकजा मुंडे नव्याने पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेत येणार?


मुंबई  (प्रतिनीधी) महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच वेगवेगळी नाट्यमय वळणे घेताना दिसते. नुकत्याच राज्यसभेच्या जागांसाठी सुरु असणारे राजकारण सर्वश्रुत आहे. परंतु आता तर विधान परिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. 20 जूनला सदर निवडणूक होणार आहे.

या जागेंवर उमेदवारी कुणाला मिळणार यावरून आता राजकीय चर्चा झडू लागल्या असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, ‘मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे’, असं म्हणत पंकजांनी आपल्या ‘मन की बात’ बोलून दाखवली आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पक्ष जे करेल ते योग्यच करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

मी विधान परिषदेत जावं, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत माझी अशी कुणाशी चर्चा नाही. प्रत्येकवेळी निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते.

आता हा पायंडा पडलेला आहे. पण माझी अशी कुणाशीही चर्चा झालेली नाही. अनेक नावं येत आहेत. माझ्या एकटीचं नाव पुढे येत नाहीय. अनेक जागा आहेत.

पक्ष जो निर्णय घेईल ते निर्णय झाल्यावरच कळेल असेही त्या म्हणाल्या. दरम्यान त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले की, मध्य प्रदेशने जे केलं ते या सरकारला जमलं नाही कारण राज्य सरकारने त्या पद्धतीने केलं नाही. ओबीसी आरक्षण वगळता निवडणुका होऊच नये हाच माझा आग्रह आहे.

कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपला

कुणाला संधी मिळणार? रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. आता भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे. सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला या ना त्या मुद्द्यावरून घेरले आहे.

त्यामुळे भाजपा त्यांना पुन्हा संधी देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडे सदस्य संख्या पाहता नवीन रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment